प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.

अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे असें ज्ञान कोणतें ?
आपणांस असें प्रथमदर्शनीं वाटेल कीं, लिहिण्याची कला आणि एकपांसून दहा आंकडयांचें ज्ञान हेंच अत्यंत प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान होय. शोध करतां असे दिसून येंतें कीं, हें प्राथमिक स्वरूपाचेंच ज्ञान फार उशिरां तयार झालें. संस्कृतीच्या अनेक अंगाचा विकास अगोदर झाल्यानंतर या आज आपणांस स्थूल दिसणार्‍या गोष्टी जगांत आल्या. आम्ही येथें प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति म्हणून जे शब्द वापरले ते जगांतील अगोदरचें ज्ञान कोणतें हें लक्षांत आणून त्याचा इतिहास देण्यासाठी वापरलेले नसून, कांही एक सुधारणा झाल्यानंतरच्या कालीं जें प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान भासतें तें दर्शविण्यासाठी म्हणजे लिपि व अंकपद्धति यांसाठीच वापरले आहेत. रानटी मनुष्याचें ज्ञान या विषयावर मागें विवेचन झालेंच आहे. प्रथमत: भारतीय विज्ञानेतिहास आटपून घेऊन प्रागतिक विज्ञानेतिहासाकडे आपणांस गेलें पाहिजे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .