प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १३ वें.
गणितशास्त्राचा इतिहास

प्लेटोपंथ.- पिलॉपानिशिअन युद्ध झाल्यानंतर म्हणजे ख्रि. पू. ४०४ पुढें जरी अथेन्सच्या राजकीय सत्तेला उतरती कळा लागली तरी तेथील शास्त्रज्ञान वाढतच होतें. ह्याच वेळेस सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो (ख्रि. पू ४२९-३४७) हा उदयास आला. त्याचा गुरु गणितास तुच्छ लेखित असे. परंतु प्लेटोनें स्वत: पुष्कळ प्रवास केला व त्या प्रवासांत त्याची पुष्कळ गणित्यांशीं मुलाखत होऊन त्याला गणिताची गोडी लागली. तो परत आल्यावर त्यानें एक गुरुकुल काढलें; व राहिलेलें आयुष्य त्यानें अध्यापनांत घालविलें. त्याच्या गुरुकुलाच्या द्वारावर '' ज्याला भूमितीचीं मूलतत्त्वें माहीत नाहींत त्यानें आंत प्रवेश करूं नये '' असें वाक्य खोदलेलें होतें. ह्यानें गणिताच्या अभ्यासास जोराची चालना दिली. निरनिराळ्या शब्दांच्या व्याख्या करण्यास त्यानें सुरुवात केली; व पृथक्करणपद्धति अमलांत आणिली. ही पद्धत अशी: सिद्ध करावयास सांगितलेली गोष्ट गृहीत धरून ह्यापासून अनुमानानें एका सर्वसंमत तत्त्वास येऊन पोंचावयाचें. त्याच्या पंथांतील लोकांनीं घनभूमितीचा अभ्यास बराच केला. (पृ. २५० पहा)

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .