प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १४ वें,
भूशास्त्रें

पृथ्वीसंबंधाची निरनिराळ्या प्रकारची माहिती अनेक शास्त्रज्ञांच्या परिश्रमामुळें फार मोठ्या प्रमाणांत उपलब्ध झाली असून ती अनेक शास्त्रशाखांत मिळून विभागली गेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागासंबंधाची माहिती 'भूगोल' या सदराखालीं स्वतंत्रपणें येईल. येथें, पृथ्वी तयार कशी झाली म्हणजे तिच्या पोटांतील निरनिराळे थर व द्रव्यें कशीं बनत गेलीं, मूळ निरिंद्रिय द्रव्यापासून सेंद्रिय सृष्टींतील वनस्पतिकोटी व प्राणिकोटी यांच्या उत्पत्तीचा इतिहास लक्षांत घेऊन त्यावरून तिची आयूर्म-यादा किती ठरते, पृथ्वीच्या भोवतालचें वातावरण कोणत्या नियमांनीं बद्ध आहे उर्फ वातावरणशास्त्र कसें निर्माण झालें, पृथ्वीच्या जलाच्छादित भागाची माहिती देणा-या 'समुद्रवर्णनविद्ये' ची किती प्रगति झाली आहे, इत्यादि गोष्टी सांगावयाच्या आहेत. म्हणून भूस्तरशास्त्र ( जीऑलजी ), प्रस्तरावषेशशास्त्र ( पॅलीअँटॉलजी ), वातावरणशास्त्र ( मीटिऑरॉलजी ), समुद्रवर्णनविद्या ( ओशनॉलजी ), इत्यादि निरनिराळ्या शास्त्रांचा 'भूशास्त्रें' हें व्यापक नांव देऊन या प्रकरणांत एकत्र समावेश केला आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .