प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण १५ वें
जीविशास्त्रें

या प्रकरणांत सजीवसृष्टीसंबंधींच्या शास्त्रांचा, म्हणजे मुख्यत: वनस्पतिकोटि, प्राणिकाटी, व मनुष्यकोटी यांचे शरीरावयव व त्यांचे व्यापार याविषयींच्या शास्त्राचा जीविशास्त्र ( बायॉलजी ) या व्यापक शास्त्राच्या दोन मुख्य शाखा मानतात. त्या वनस्पतिशास्त्र ( बॉटनी ) आणि प्राणिशास्त्र ( झोऑलजी ) या होत. वास्तविक, मानसिक व्यापार मेंदू या शरीरावपावर अवलंबून असल्यामुळें मानसशास्त्र ( सायकॉलजी ), तसेंच मनुष्यप्राण्यांच्या शारीरिक व मानसिक व्यापारांमुळें उत्पन्न होणारें समाजशास्त्र ( सोशिऑलजी ) यांचा 'जीविशास्त्रें' या व्यापक नांवाखाली समावेश व्हावयास पाहिजे. तथापि सोयीकरितां समाजशास्त्र व मानसशास्त्र यांनां शास्त्रज्ञ अगदीं स्वतंत्र मानतात.

उलटपक्षीं, जीविशास्त्रें व अजीविशास्त्रें म्हणजे निर्जीव पदार्थांसंबंधीचीं पदार्थविज्ञान व रसायन हीं शास्त्रें अगदीं स्वतंत्र असल्याचें मानण्याची परंपरा आहे. परंतु अलीकडील शोधांवरून सजीव व निर्जीव सृष्टींतील अंतर दूर होऊन निर्जीवांतूनच सजीव सृष्टि उत्पन्न झाली असली पाहिजे असें सिद्ध झाल्यासारखें आहे. यासंबंधीं अगदीं अलीकडील शोधांची माहिती ज्ञानकोशाच्या तिस-या
विभागांत ( पृष्ठ १० ) दिली आहे.

पाश्चात्त्य व भारतीय दोन्हीहि प्राचीन पंडितांनीं वनस्पति व प्राणिशास्त्राचा स्वतंत्रपणें विचार केलेला दिसत नाहीं. आणि मानसिक व्यापारांचा मेंदूशीं किती संबंध आहे याचेंहि ज्ञान फारसें न मिळवितां मानसिक व्यापारांचा तत्त्वज्ञानाशीं व नीतिशास्त्राशीं संबंध जोडून देऊन तदनुसार त्यांची मीमांसा त्यांनीं-विशेषत: भारतीय पंडितांनीं-ब-याच उच्चावस्थेस नेलेली दिसते. जगदुत्पतीचा विचार करतांना एकंदर जीवांचें वर्गीकरणहि केलेले आढळतें. त्यासंबंधानें प्राचीन हिंदू, बौद्ध व जैनधर्मी ग्रंथांत ज्या कल्पना आढळतात त्या येथें देतों.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .