प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण १६ वें.
महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें.

महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक बाबतींत स्वायत्ताता संपादन करण्याची जशी महत्त्वांकाक्षा आहे तशी ज्ञानविषयक बाबतींतहि आहे. ती महत्त्वाकांक्षा येत्या दहाबारा वर्षांत आपण निष्चयानें पार पाडली पाहिजे. यासाठीं आज कांहीं तरी कार्यक्रम आंखून रस्त्यास लागणें अवश्य आहे.  ज्ञानाविषयक स्वायत्तातेखेरीज राजकीय स्वायत्ताता टिकविणें अशक्य आहे. महात्मा गांधीनीं स्वंतत्रतेच्या भावनांचा राष्ट्रीय स्वांतत्-यांशीं निकट संबंध लोकांस पटविला आहे. पण ज्ञानविषयक स्वातंत्-याचा एकंदर स्वातंत्-याशीं संबंध लोकांस अजून पटला नाहीं. ज्ञानविषयक स्वायत्ताता मिळवावयाची म्हणजे काय करावयाचें याची स्पष्ट कल्पना येण्यासाठीं आज आपल्या ज्ञानविषयक उणीवी समजून घेतल्या पाहिजेत. आपल्या ज्ञानविषयक उणीवींचें ज्ञान जितकें स्पष्ट होईल तितकें आपण कार्य करण्यास जोरानें लांगू; आणि जे कार्य करीत असतील त्यांशीं सहकारिता करूं शकूं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .