प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकियाब - जिल्हा- खालचा ब्रम्हदेश अराकान विभागांतील एक जिल्हा.  उ.अ. १९.४७' ते २१.२७'  व पू.रे. ९२.११' ते ९३, ५८', क्षेत्रफळ ५१३७ चौरस मैल.  उत्तरेस चितागांग जिल्हा आणि उत्तर आराकान.  पूर्वेस उत्तर आराकान आणि आराकान योमा. दक्षिणेस आणि पश्चिमेस बंगालचा उपसागर.

बंगालचा उपासागर आणि आराकान योमा यांमधील प्रदेश सपाट असून लेम्रो नदीच्या पूर्वेकडील प्रदेश डोंगराळ आहे.  वरचा किंवा उत्तर ब्रम्हदेश आणि हा जिल्हा यामध्यें या डोंगरातून वाट आहे.  परंतु ती अति बिकट असल्यामुळें तिचा कोणी उपयोग करीत नाहीं.  उत्तरेकडचा प्रदेश देखाली डोंगराळ आहे.  या भागांतील नद्या मुख्यत्वेंकरुन तीन आहेत. मयूकलहून आणि लेम्रो या उत्तरेकडून दक्षिणेकडे वहातात.  शेल्स (Shales) सँडस्टोन्स नांवाच्या वाळूच्या दगडाच्या खडकांनीं हा प्रदेश व्यापलेला आहे.  येथें हत्ती, गवा, वाघ, सांबर, रानटी डुकर इ. रानटी पशू आढळतात.  समुद्राजवळ असल्या कारणानें हवा समशीतोष्ण आहे.  येथील हिंवाळा फार आल्हाददायक असतो.  पाऊस सुमारें १८० इंच पडतो.  वावटळी पासून या भागास वारंवार फार त्रास होतो.  इ.स. १८६८, १८८४, १८९५ सालीं मोठें वादळ झालें होतें.  त्यावेळीं मालमत्तेची बरीच खराबी होते.

इ ति हा स - पूर्वी आराकानच्या राज्यांत हा भाग मोडत असल्यामुळें या भागाचा इतिहास आराकानच्या इतिहासांत दिला आहे.  (आराकान पहा ).  इ.स. १८२६ सालीं पहिलें ब्रह्मी युद्ध संपल्यावर आराकानबरोबर हा जिल्हा ब्रिटिशांकडे आला.  म्योहंग येथे पंधराव्या सोळाच्या शतकांतील कांहीं अवशेष अद्यापि सांपडतात.  महामुनी येथें एक देऊळ आहे त्यांत गौतमाची मूर्ति होती.  परंतु १७८४ सालीं ब्रह्मी लोकांनीं ज्या वेळीं हा भाग जिंकला त्यावेळी ही मूर्ति त्या देवळांतून अमरपुर येथें नेण्यांत येऊन तेथें तिची स्थापना करण्यांत आली. हल्लीं ती मंडाले येथील आराकान देवालयांत आहे.  

जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे पांच लक्ष तीस हजार आहे.

१९०३-४ मध्यें या जिल्ह्याची विभागणी खालीलप्रमाणें होती.
 टाउनशीप अथवा
पोट विभाग
 क्षेत्रफळ लागवडी
खाली क्षेत्रफळ 
  संख्या  लोकसंख्या  दर चौरस मैली
लोकवस्तीचे प्रमाण
 अकियाब  ६२  ३०  १  ६०  ४७४२५  ७६५
 राठेडाँग  १२६९  २३७  ०  ५४५  ११३०९८  ८८
 पोन्नाजियन  ७०४  १०६  ०  २९०  ४९५५५  ७०
 पॉक्टॉ  ४९६  १२७  ०  १९०  ४३३९५  ८७
 मिन्बिया  ४८०  १०४  ०  २९५  ४१६६१  ८७
 कियाक्टाव  ३७०  ११६  ०  ३१२  ५३३०६  १४४
 मीओहंग  १३२९  १५२  ०  २८२  ४९९७८  ९७
 मांगडा  ४२६  १२८  ०  ३७७  ८३२४७  १९५

 

 

 

 

 

 

 

 

                               
                                                                  
बरेज भाग डोंगराळ असून तेथें वसती विरळ आहे.  जिल्ह्याचें मुख्य ठिकाण अकियाव गांव आहे.  वस्ती पुष्कळशी बौद्ध (२८००००) व मुसलमान (१५५२००) लोकांची आहे.  या प्रांतांतील मुसलमान वस्तीच्या निम्मे वस्ती या एका जिल्ह्यांत आहे.

निम्मेपेक्षां अधिक लोक आराकानी भाषा बोलतात व सुमारें १/३ लोक बंगाली बोलतात.

शे त की - जमीन वाळुमिश्रित लापण असून तींत उत्पन्न चांगलें येतें.  पाऊसहि पुष्कळ पडतो.  सपाट असलेल्या भागांत भात व इतर ठिकाणीं इतर बागाइती पिकें होतात.  गुरचरणाकडेहि पुष्कळ जमिनीचा उपयोग होतो.  डोंगरावर उचली (शिफ्टिंग लागवड) होते.  ज्या जमिनीवर उथवाचें पाणी येतें त्या नांगरण्याची देखील जरुरी नसते.  पाऊस पुष्कळ पडत असल्यामुळें पाटाच्या पाण्याची मुळींच जरुर नसते.  इकडे भात लावण्याची पद्धत नाहीं.  फक्त मळी आलेल्या चिखलांत इतस्ततः भाताचें बीं पेरतात म्हणजे झालें.  येथील शेतकरी वर्ग आळशी आहे.  तसेच येथील गुरांत फार रोग होतात.  या दोन कारणांमुळें शेतीची वाढ योग्य होत नाहीं.  मजुरीनें काम करण्याची पद्धति येथें फार आहे.  उचली लागवड करण्याच्या पद्धतीमुळें मोठमोठी जंगलें नाहींशीं झालीं आहेत.  इ.स. १९०३-४ सालीं एकंदर एक हजार एकर जमीन लागवडीखालीं होती पैकीं ९३१ एकर जमिनींत भाताचें पीक होतें.

इतर पिकें - तंबाखु, ऊंस, मिरची, मोहरी इत्यादि.  हल्ली १९०३-४ सालापासून लागवडीचें क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललें आहे.  चितागांग जिल्ह्यांतील लोक इकडे फार त्वरेनें वसाहत करूं लागले असून त्यांपैकी पुष्कळ जमिनीचे मालकहि बनले आहेत.  म्हशींची पैदास येथें होत असते.  मेंढ्या कोणी पाळीत नाहीं.

जंगल - सागवान फार थोडें आहे. सन १९०३-४ सालीं जंगलचें उत्पन्न रु. ८८०० होतें.

ख नि ज प दा र्थ - अद्यापि फारसा याविषयीं शोध झालेला नाहीं.  दगडी कोळसा खालच्या दर्जाचा असल्यामुळे कोणी तो काढीत नाहीं.  सोनें व चांदी या धातूंच्या खाणी येथे असाव्यात असें म्हणतात. पण त्या अद्याप सांपडल्या नाहींत.  राकेल तेलाच्या विहिरी येथें आज तीस वर्षे अस्तित्वांत आहेत.  दरसाल ५०००० ग्यालन तेल यांतून बाहेर काढतात.  हें तेल आसपासच विकलें जातें.  विहिरींची खोली सुमारें ३०० फूट पासून ७०० फूटपर्यंत खोल असते.

व्या पा र - हातमागावरील सुती व रेशमी कापड, सान्या चांदीचें काम, सुतार काम, कुंभार काम, घिसाड काम येथें होतें.  अराकानी स्त्रिया विणकाम करतात.

भात व तांदुळ हे फक्त व्यापारी जिन्नस येथें आहेत.  रस्ते अकियाब गांवाबाहेर मुळींच नाहींत असें म्हटलें तरी चालेल.  मुख्य रहदारी पाण्यावरुन होतें. अकियाब बंदरास पुष्कळ ठिकाणच्या बोटी लागतात.  इ.स.१८४२ सालीं बंदरांत दीपगृह बांधलें आहे.

या जिल्ह्याचे चार विभग व आठ पोटविभग (टाऊनशिप्स ) आहेत.

विभाग - अकियाब, मिन्विया, कियाक्ता, बुथिडाँग. टाऊन शिप्सचीं नांवें वरील कोष्टकांत दिलींच आहेत.  प्रत्येक विभागावर एक्स्ट्रा कमिशनर मुख्य असतो.   आराकानचा कमिशनर सेशन्स जज्ज असतो.

ज मी न म ह सू ल - इ.स. १८३२ सालीं हा वसूल २.५ लाख होता.  इ.स. १८३७ सालीं जंगलांतील माल, झोंपड्या, होड्या, कारागीर (हातांनी काम करणारे) यांजवरील सर्व कर उठविण्यांत आले. इ.स. १८६४-६५ सालीं मासे धरणार्‍या कोळ्यांवर कर बसविण्यांत आला.  इ.स. १८६६-६७ सालीं उत्पन्न पांच लाखांचें होतें.  इ.स. १८७९-८० सालीं नवीन धारापद्धति अंमलांत आल्यावर उत्पन्न ७.७ लाखांचें झाले.  पुन्हा १८८५-८८ सालीं पाहणी झाल्यावर उत्पन्न ८.३ लाखांचें झालें. इ.स. १९०२-३ सालीं उत्पन्न १२ लाख होतें.

इ.स. १८८५-८८ सालीं झालेल्या पाहणींत दर एकरी आकार १-४-० ते ३-०-० रुपये पर्यंत होता.

उत्पन्न दाखविणारें कोष्टक (आंकडे हजाराचे आहेत.)
१८८०-८१ १८९०-१ १९००-१ १९०३-४
जमिनीपासून ७०२ ९८६ ११८५ १४२०
एकंदर उत्पन्न २३३६ २६०२ २६९७ ३०९७

 

 


                 

जिल्ह्यांत लोकसंख्येशीं स्त्रियांचें प्रमाण कमी आहे.  फक्त अकियाब गांवांत देवी टोंचणें कायद्यानें सक्तीचें केलें आहे.  (इं.ग्या. भाग ५)

अकियाब विभाग लोअर बर्मा.  अकियाब जिल्ह्याचा एक विभाग.

अकियाब पोटविभाग - उ. अ. २० ६' ते २० १६' २०० ६' आणि २० १६' उत्तर अक्षांक्ष.  ९२ ४५' आणि ९२ ५६' पूर्व रेखांश. व पू. रे. ९२ ४५' ते ९२ ५६' या पोटविभागांत एक गांव असून ६० खेडीं आहेत.  लोकसंख्या सुमारें अठेचाळीस हजार, इ.स. १९०३-४ जमीन महसूल ५०००० रुपये होता, लागवडीखालीं क्षेत्र ३० चौ. मैल होतें.

अकियाब गांव - अकियाब शहर.  उ. अ. २० ८' व पू. रे. ९२ ५५' हें गांव कलदन नदीच्या मुखाशीं आहे.  लोकसंख्या सुमारें अडतीस हजार.  यांत बंगाली लोक सुमारें अर्धे असून बाकीचे आराकानी, चिनी व ब्रम्ही लोक आहेत.

अकियाब नांवाची पूर्वपीठिका अद्यापि अज्ञात आहे. अक्यात् नांवाचा अपभ्रंश हा असावा असें कांहींचें म्हणणें आहे.  अक्यात् हें बुद्धाच्या जबड्याच्या मंदिराचें नांव आहे.  या गांवास सितत्वे हें आराकानी नांव असून त्याचा अर्थ (जेथे लढाई सुरु झाली ) असा आहे.  याहि नांवाविषयीं कांही दंतकथा मिळत नाहीं.  ब्रिटिश अंमल सुरु होण्यापूर्वी हें गांव मासे मारणारांचे एक खेडें असून त्यावेळी म्योहंग ही आराकानची राजधानी होती.  परंतु ब्रिटिशांचा अंमल सुरु झाल्यापासून हा गांव आराकानची राजधानी आहे.  बंदरांत भरतीवर मोठमोठीं गलबतें येऊं शकतात.  येथील हवा अति रोगी असल्याकारणें कॉलरा वगैरे रोग नेहमीं उद्‍भवतात.  येथे भाताचा व्यापार पुष्कळ चालतो. व तो बहुतेक हिंदी लोकांच्या ताब्यांत आहे.  इ.स. १८७४ सालापासून येथें म्युनिसिपालिटी आहे.  येथें तुरूंग, सरकारी कचेर्‍या सरकारी दवाखाने वगैरे सोयी आहेत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .