विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडलर फेलीक्स - अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ. जन्म अलझे ( जर्मनींत ) गांवीं १८५१ मध्यें. कॉर्नेल विश्वविद्यालयांत पौरस्त्य वाङमयाया अध्यापक १८७४ सालीं. १८७६त न्यूयार्क येथें नीतिशिक्षणसंस्था (Society for Ethicla Culture ) या संस्थेच्या वाढीकरितां त्यानें बरेच श्रम केले. १९०२ सालीं तो कोलंबिया विश्वविद्यालयांत राजकीय व सामाजिक नीतिशास्त्र यांचा मुख्याध्यापक झाला. डॉ. अॅडलरनें लोकोपयोगी व सामाजिक सुधारणांकरितां मोठी चळवळ केली. उदाहरणार्थ जिल्हानिहाय शुश्रूषागृहें, खंडानें घेतलेली मिळकत, घरें इत्यादि बाबी. यानें पुढील पुस्तकें प्रसिध्द केलीं : धर्म व कर्म, मुलांचें नीतिशिक्षण, आयुष्य व संचित, विवाह व घटस्फोट, कर्तव्यधर्म. [Creed and Deed (1877); The Moral Instruction of Children 1892; Life and Destiny (1903); Marriage and Divorce 1903; आणि The Religion of Duty (1906)].