विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडाम्स हेनरी कार्टर :- हा अमेरिकन अथशास्त्र-वेत्ता डेव्हन पोर्ट येथें जन्मला (१८५२). उच्च शिक्षण झाल्यावर तो जॉन हापकीन्स विश्वविद्यालयांत फेलो व लेक्चरर होता. व पुढें कॉर्नेल विश्वविद्यालयांत लेक्चररचें काम केल्यावर तो मिचिगान विश्वविद्यालयांत अर्थशास्त्र व आयशास्त्र ( Finance ) या विषयाचा अध्यापक झाला. तो अंत:संस्थानीय व्यापारी संघाचा ( Interstate Commerce Committee) आंकडेशास्त्री असे.
त्यानें लिहिलेल्या ग्रंथांपैकीं, उद्योगधंद्यामध्यें संस्थानचें अंग ( The State in relation to Industrial Action 1887 ), संयुक्त संस्थानांतील व्यवहार ( Transaction in the United States 1885 ), राष्ट्रीय कर्ज ( Public Debts 1887 ), आयशास्त्र (The Science of Finance 1888 ), अर्थशास्त्र, व कायदेशास्त्र ( Economics & Jurisprudence 1897 ) हे ग्रंथ मुख्य आहेत.