विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडीस अबाबा :- ही अबिसिनीयाची राजधानी होय. उ. अ. ९० व पू. रे. ८०५६' हें शहर एन्टेटो रांगेच्या उतरणीवर समुद्रसपाटीपासून ८००० फूट उंचीवर वसलेलें आहे. भोंवतालचा प्रदेश गवताच्या कुरणांनीं व्यापलेला आहे. हें शहर म्हणजे एक छावणीच आहे असें म्हटलें तरी चालेल. येथें मोठया इमारती नाहींत. येथील मुख्य व्यापारी हिंदु व आर्मेनियन लोक आहेत. येथील इमारतींत फारसें शिल्पकौशल्य दिसत नाहीं. दुसऱ्या मेनेलेकनें १८९२ इसवी सालीं या शहराची स्थापना केली.