विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडेल्सवर्ग :- हें एक लहान व्यापाराचें गांव कॉर्निओलामध्यें आस्ट्रियांत आहे. या गांवापासून एक मैलावर सर्व यूरोपांत भव्य, सुंदर व मोठी अशी एक गुहा आहे. या गुहेंत पाण्यांत विरलेल्या खडूच्या फारच प्रेक्षणीय आकृती दृष्टीस पडतात.