विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅड्रिअन - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत मिचिगानमध्यें लेनावी परगण्यांत रायसीन नदीवर हें एक शहर आहे. लोकसंख्या सुमारें अकरा हजार. येथें अॅड्रियन कॉलेज (१८५९) आहे. मुलींकरितां १८७९ सालीं स्थापिलेली एक औद्योगिक शाळा आहे. येथें सार्वजनिक वाचनालय आहे. येथें व्यापार चांगला चालतो; विशेषत: तारांची कुंपणें तयार होतात. कृषिविषयक हत्यारें, वाद्यें, खेळणीं, मोटारी वगैरे तयार करण्याचे कारखाने व गिरण्या आहेत. १८२८ सालीं हें शहर म्हणून नोंदलें गेलें. हेड्रिअन नांवाच्या रोमन बादशहावरून या शहराला नांव पडलें असें म्हण्तात.