विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅड्रिआ :- हें गांव इतालीदेशांत रोव्हीगो प्रांतांत अॅडीगे व पो या नद्यांच्या मुखांमध्यें वसलेलें आहे. हें समुद्रापासून सुमारें १३१/२ मैल लांब आहे. हें रेव्हीगो प्रांताच्या धर्मखा- त्याच्या अधिकाऱ्याचें मुख्य ठिकाण आहे. पूर्वी अॅट्रिआ नांवाचें शहर जेथें वसलें होतें त्याच ठिकाणीं हें सध्यां आहे. ह्याच गांवावरून अॅड्रीआटिक समुद्रास अॅड्रिआटिक हें नांव पडलें. पक्ष्यांच्या विशेष निपजाविषयीं अॅरिस्टाटलच्या कालीं हें गांव प्रसिध्द होतें. पूर्वी हें दर्याव्यापाराचें ठिकाण होतें.