प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतपुर जिल्हा :- मद्रास इलाख्यांतील एक जिल्हा- उ.अ. १३ ४१' ते १५ १४' व पू. रे. ७६ ४९' ते ७८ ९'. क्षेत्रफळ ६७२२ चौरस मैल. उत्तरेस बल्लारी आणि कर्नूल हे जिल्हे; पश्चिमेस बल्लारी आणि म्हैसूरचें संस्थान; दक्षिणेस म्हैसूरचें संस्थान; आणि पूर्वेस कडाप्पा जिल्हा.

अनंतपुर जिल्हा हा म्हैसूर पठाराचा अगदीं उत्तरेकडील प्रदेश होय. दक्षिणेस हा भाग २२०० फूट उंचीवर असून उत्तरेच्या बाजूस गुत्तीकडे १००० फूट उंच आहे. पूर्वेकडील प्रदेश डोंगराळ असून ईशान्येकडील प्रदेश सपाट आहे. हा भाग व गुत्ती तालुक्याच्या पश्चिम दिशेकडील भाग वगळला असतां बाकीचा जिल्हा ओसाड, जंगलविरहित आहे. जमीन तांबुस रंगाची असून उंचसखल आहे. दक्षिणेकडे पेनकोंडा तालुका हा फारच डोंगराळ असून लागवड करण्यास अगदीं निकामी आहे; वर सांगितलेल्या सपाट भागांतील जमीन काळी असून कापसायोग्य आहे. मदकशीर तालुक्यांत पाण्याची सोय असल्यामुळें तो तालुका जास्त सुपीक आहे.

भू स्त र :- पेन्नार नदी या जिल्ह्यांतून वाहते. या जिल्ह्याचा उत्तरेकडील व पूर्वेकडील भागच फक्त भूस्तरसंशोधक खात्यानें तपासला आहे. या तालुक्यांत वज्रकरूरच्या आसपास भूपृष्ठावर केव्हां केव्हां हिरे सांपडतात. परंतु ते वरच कां सांपडावेत हें गूढ आहे. येथील निळया रंगाचा खडक किंबर्ले (आफ्रिका) येथील निळया मातीच्या रंगाप्रमाणें दिसतो परंतु दोघांची उत्पत्ति अगदीं निराळ्या पदार्थांपासून आहे असें स्पष्ट दाखविलें गेलें आहे. पुष्कळ खेड्यांत कुरुंद नांवाचा खनिज पदार्थ सांपडतो. सुलमररी व नेरिजमुपल्ली येथें चांगल्या प्रतीचा' स्टीयटाइट ' सांपडतो असें म्हणतात.

व न स्प ति - अगदीं ओसाड जमिनीवर ज्या उगवतील अशाच वनस्पति या भागांत दृष्टीस पडतात. निवडुंग, बाभूळ व तरवड हीं झाडें पुष्कळ उगवतात.

व न्य प्रा णि - कडापा जिल्ह्याच्या सरहद्दीवर रानडुकर,सांबर वगैरे प्राणी आढळतात.

ह वा - येथील हवा कोरडी असून निरोगी आहे. उन्हाळा मार्च महिन्यांत सुरू होऊन जून महिन्याच्या आरंभीं पावसाळा सुरू झाला म्हणजे नाहींसा होतो. या जिल्ह्यास दोन्ही पावसा पैकीं कोणताहि पुरेसा पडत नाहीं. ईशान्य दिशेकडून येणारा पाऊस आक्टोबरमध्यें बरा पडतो पण पुढें मुळींच पडत नाहीं. असें म्हटलें तरी चालेल. पावसाची सर्व जिल्ह्याची सरासरी २३ इंच आहे. इ. स. १८५१ व १८८९ सालीं या भागांत मोठीं वादळें उद्भवलीं होतीं त्यामुळें त्यावेळीं फार नुकसान झालें होतें.

इ ति हा स - चवदाव्या शतकांत विजयानगरच्या राज्यांत सामील होण्यापूर्वीचा या भागाविषयींचा इतिहास उपलब्ध नाहीं. या जिल्ह्यांत असलेले पेनुकोंडा व गुत्ती हे दोन किल्ले विजयानगरच्या राज्यांतील फार महत्त्वाचे भाग होते. आणि जेव्हां इ. स. १५६५ सालीं दक्षिणेंतील मुसुलमानांविरुद्ध झालेल्या तालकोटच्या लढाईत विजयानगरचा रामराजा मारला गेला त्यावेळीं नामधारी राजा सदाशिव हा आपल्या अनुयायांसहित पेनुकोंडा येथें पळून गेला. या ठिकाणीं विजयानगरचे राजे पुष्कळ दिवस रहात होते. या किल्ल्यानें पुष्कळ वेढयांस दाद दिली नाहीं. अखेरीस हा किल्ला मुसुलमानांनीं सर केला. परंतु मध्यंतरी विजयानगरचा राजवंश उत्तर अर्काट मधील चंद्रगिरी येथें राहण्यास गेला होता. पुढें गुत्ती किल्लाहि मुसुलमानांनीं सर केला. हा किल्ला मुसुलमानांपासून मुरारराव यानें जिंकून घेऊन तेथें त्यानें आपलें राहण्याचें ठिकाण केलें होतें. त्या वेळेच्या धामधुमीच्या काळांत त्या भागांतील स्थानिक सत्ता तेथील पाळेगारांच्या हातांत असे. परंतु ज्या वरिष्ठ सत्तेचा विजय होत असे त्या सत्तेस या पाळेगारांना नमावें लागत असे. या पाळेगारांचें आपसांत वैमनस्य असल्यामुळें कोणांतच फारसा राम नसे. त्यांतल्या त्यांत अनंतपुरचे हंडे पाळेगार जरा वजनदार असत. हैदरअल्लीच्या हातांत सत्ता आल्याबरोबर त्यानें हा आपल्या राज्याजवळील मुलुख लवकरच काबीज केला. इ. स. १७७५ सालीं गुत्ती किल्ला मात्र हैदराविरुद्ध मुराररावानें लढविला होता. परंतु किल्ल्यांतील लोकांस पाणीपुरवठयाच्या अभावीं शरण यावें लागलें.

इ. स. १७९२ सालीं ब्रिटिश, मराठे व निजाम यांनीं एकत्र होऊन टिपूचा पराभव केला. त्यावेळीं त्यानें जो भाग यांच्या स्वाधीन केला त्यांत अनंतपुरचा ईशान्येकडील भाग म्हणजे ताडपत्री आणि ताडीमरी तालुके निजामाच्या वांटयास आले. पुढें इ. स. १७९९ सालीं श्रीरंगपट्टणच्या हल्ल्यांत टिपु मारला गेल्यावर त्यावेळीं जी वांटणी झाली त्यांत या जिल्ह्याचा बाकीचा भाग निजामाकडे आला. परंतु इ. स. १८०० सालीं आपल्या राज्यांत ब्रिटिश सैन्य जें ठेवावयाचें होतें त्याच्या खर्चाकरतां हा सर्व मुलुख त्यानें ब्रिटिशांस तोडून दिला. या मुलखाचे दोन जिल्हे बनविण्यांत आले; व हल्लींचा अनंतपुर जिल्हा झाल्यामुळें एका कलेक्टरच्यानें काम झेंपेना. म्हणून इ. स. १८८२ सालीं त्या एका जिल्ह्याचे बल्लारी व अनंतपुर असे दोन जिल्हे करण्यांत आले. या जिल्ह्यांत प्राचीन नांव घेण्यासारख्या गोष्टी म्हटल्या म्हणजे पेनुकोंडा व गुत्ती हे किल्ले होत. ताडपत्री येथील देवळांतील खोदकाम प्रेक्षणीय आहे. त्याचप्रमाणें लेपाक्षी व हेमावती येथील देवळें पाहण्यालायक असून त्या जिल्ह्यांत जे शिलालेख आहेत त्या सर्वांत हेमावती येथें जुने लेख सांपडले आहेत. त्यांत पल्लव राजांच्या एका शाखेची वंशावळ सांपडली आहे. नवपाषाणयुगांतील वस्तीचे अवशेष कांहीं टेंकडयावर सांपडले आहेत व कांहीं इतर प्रागैतिहासिक लोकांनीं बांधलेलीं थडगीं इतस्तत: आढळतात.

या जिल्ह्याची लोकसंख्या कसकशी वाढत गेली हें पुढें दिलेल्या आंकडयावरून कळून येईल.

सन लोकसंख्या
१८७१ ७४१२५५
१८८१ ५९९८८९
१८९१ ७२७७२५
१९०१ ७८८२५४
१९११ ९६३२२३
१९२१ ९५५९१७

इ. स. १८७६ सालचा दुष्काळ या जिल्ह्यास बराच भोवला होता.

पुढील कोष्टकावरून एकंदर जिल्ह्याची स्थिति थोडक्यांत कळून येईल
        ( १९२१ च्या खानेसुमारीवरून )

तालुका क्षेत्रफळ संख्या लोकसंख्या१९२१  दर चौरस मैलीं लोकसंख्येचें प्रमाण
गांवे खेडी
गुप्ती ८९६ १२८ १३४३५५ १५०
ताडपत्री ६४१  ९५ १११५५० १७४
अनंतपुर ९२५ १०९ १११८२५ १२१
कल्याणद्रुग ८१७ ७३ ८०१६४ ९८
पेनुकोंडा ६७८ ९४ ९२९१८ १३७
धर्मवरम ७३२ ६२ ८८६६८ १२१
मदकशीर ४४३ ५७ ८५५९५ १९३
हिंदुपुर ४२८ ७८ १००४९० २३५
कादिरि ११६२ १३७ १५०३५२ १२९
एकंदर ६७२२ १४ ८३६ ९५५९१७ १४२

या जिल्ह्यांत अनंतपूर येथेंच फक्त म्युनसिपालिटी आहे. या जिल्ह्यांत जमीनदारी नाहीं तथापि शेंकडा सोळा एकर जमीन इनाम आहे. जमीन फार कमी प्रतीची आहे. मुख्य पिकें-ज्वारी, कोरा, नाचणी, एरंडी इत्यादि. गुरांची अवलाद हलकी असून मेंढयांची पैदास या भागांत फार होते. प्रत्येक मेंढीपासून दरवर्षी चार पौंउपर्यंत लोंकर निघते.

या जिल्ह्यांत जंगल ५१६ चौरस मैल आहे. जंगलांत थोडे फार सागवान व बांबु यांचीं रानें आहेत.

ख नि ज प दा र्थ - इमारती दगडाशिवाय कांहीं नाहींत असें म्हटलें तरी चालेल. वज्रकरूर येथील हिर्‍यांच्या खाणी हल्लीं बंद पडल्या आहेत. कुरुंद कधीं कधीं देशी पद्धतीनें काढण्यांत येतो.

व्या पा र व उ द्यो ग धं दे - मुख्य धंदा सुती व रेशमी वस्त्रें विणणें हा होय. येथून कापूस, गूळ, तरवडाच्या साली वगैरे बाहेर जातात. मद्रास व सदर्न मराठा रेलवे या जिल्ह्यांतून जाते.

दु ष्का ळ - अवर्षणामुळें या जिल्ह्यांत दुष्काळ पुष्कळवेळां पडलेला आहे. इ. स. १७०२-३ सालीं येथें दुष्काळ पडला होता असा दप्तरी पुरावा मिळतो. इ. स. १८०३, १८२४ या सालीं थोडाबहुत दुष्काळ जाणवला. इ. स. १८३२-३३ सालचा दुष्काळ सर्वांत भयंकर होता. इ. स. १८३८, १८४३, १८४४, १८४५, १८५४, १८६५, १८६६, १८७६-७८, १८८४, १८९१, १८९६ हीं सालें दुष्काळाचीं गेलीं. पैकीं १८७६-७८ च्या दुष्काळाच्या वेळीं तन्निवारणार्थ सरू  केलेल्या कामावर एकावेळीं १,३७,३४७ म्हणजे शेंकडा १८ लोक काम करीत होते.

विजयानगराच्या राज्याचे वेळीं जमीन वसूलीची काय पद्धत होती हें माहीत नाहीं. अर्धे उत्पन्न राजास देत असत अशी आख्याइका आहे. विजापुर बादशहांनीं कामिल (कमाल) कर म्हणून ठरविण्याचा प्रयत्न केला होता. शेतकर्‍यांकडून वसूल जमीनदार, पाळेगार किंवा पाटील करी. अवरंगझेबानें विजापुर बादशहाचीच पद्धति कायम ठेविली होती असें दिसतें. मराठ्यांच्या अमदानींत काय पद्धति होती हें समजण्यास मार्ग नाहीं. हैदरानें कायम धारा सुरू केला होता. टिपूनें तो वाढविण्याचा प्रयत्न केला होता पण तो सिद्धीस गेला नाहीं. इ. स. १७९२ सालीं निजामाकडे हा भाग आल्यावर एक मोठा दुष्काळ पडला त्यामुळें वसूल कमी होऊं लागला.

कंपनी सरकारकडे हा भाग आल्यावर मेजर (सर थामस) मनरो साहेबानें रयतवारी पद्धति सुरू केली. इ. स. १८०२ आणि १८०६ सालीं व्यवस्थेशीर पाहणी झाल्यावर धारा बसविण्यांत आला. पुढें इ. स. १८२० सालीं मनरोनें बसविलेला धारा कांहीं प्रमाणांत कमी करण्यांत आला. पुन्हां इ. स. १८५९ सालीं धारा कमी केला. इ. स. १८९०-९७ मध्यें पुन्हा पाहणी होऊन धार्‍याची नवीन आकारणी झाली आहे.

खालील आंकडे हजाराचे आहेत

१८९०-९१ १९००-१ १९०३-४
 जमीन महसूल १००९ १३३९ १३९३
  एकंदर उत्पन्न १६२४ २१७४ २१५०

 

           
                  
                     
                        

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .