विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनाहगड - पंजाब. पतिआळा संस्थानांतील अनाहगड निजामतींतील एक तहशिल उ. अ. ३०० ९' ते ३०० ३४' व पू. रे. ७५० १४' ते ७५० ४४' क्षेत्रफळ ३४६ चौरस मैल. लोकसंख्या एक लक्षावर आहे. या तहशिलींत ३ गांवें व ८६ खेडीं आहेत. इ. स. १९०३-४ मध्यें एकंदर उत्पन्न १.८ लाख रुपये होतें. ( इ. गॅ. )