विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनुमति (१) कर्दमकन्या श्रद्धा, तिच्या ठायीं अंगिरा ऋषीपासून झालेल्या चार कन्यांपैकीं कनिष्ठ. (२) द्वादशादित्यांतील धाता नांवाच्या आदित्याची स्त्री. (३) शाल्मली द्वीपांतील एक महानदी. (४) एक ब्रह्मर्षि. (५) स्कंदाभिषेका करितां आलेली एक देवपत्नी. (महाभारत शल्यपर्व अध्याय ४५.) (६) पौर्णिमेच्या एक अलीकडला दिवस (तै. सं. १, ८, ८, १; ३, ४, ९, १. काठचा संहिता १२, ८ वाजसने यीसंहिता २९, ६०; ३४, ८५ षड्विंश ब्राह्मण ५, ६.) या दिवशीं देवपितरांना पिंड देतात. राजसूय यज्ञांत हिची देवता म्हणून पूजा करितात.