विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनविंद - (१) दुर्योधनाकडील एक वीर. यास अर्जुनानें मारलें. वसुदेवभगिनी राजाधिदेवी व तिचा पति अवंत्य राजा जयसेन यांचा धाकटा मुलगा. थोरल्या मुलाचें नांव विंद ( महा. द्रोण. ९९ ).
(२) केकेय राजाचे दोन पुत्र विंद व अनुविंद. हा अनुविंद भारती युद्धांत पांडवांकडे होता, तो सात्यकीनें मारिला. ( महा. कर्ण. १३ ).
(३) धृतराष्ट्राच्या शतपुत्रांतील एक ( महा. आदि. ५६ ).