विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनुशाल्व - सौभपति शाल्वराजाचा भाऊ. शाल्वास कृष्णानें मारलें म्हणून कृष्णाचा द्वेष धरून पांडवांच्या अश्वमेधकालीं ससैन्य गुप्तरूपानें हस्तिनापुरीं आला आणि प्रसंग साधून अश्वाचें हरण केलें. भीम ससैन्य याच्या पाठीस लागला. यास पकडून आणण्याचे विडे प्रद्युन्न व वृषकेतु यांनीं उचलले. प्रद्युन्नाचा पराभव झाला. वृषकेतूनें मात्र पकडून आणलें. मृत्यूच्या भीतीनें त्यानें अश्व परत दिला, सख्य केलें, आणि अश्वमेधास साह्य करण्याचें यानें अभिवचनहि दिलें ( जै. अश्वमेध अ.१२-१४ ). याचा महाभारतांत उल्लेख नाहीं.