विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनूपगड :- राजपुताना. बिकानेर संस्थानाच्या सूरतगड निझामतींतील अनूपगड विभागाचें मुख्य ठिकाण असून बिकानेरच्या उत्तरेस ८२ मैलांवर आहे. लोकवस्ती सुमारें एक हजार. उ. अ. २९० १२' व पू. रे. ७३० १२'. इ. स. १६७८ सालीं येथील किल्ला बांधला व बिकानेरचा संस्थानिक अनूपसिंग याचें नाव किल्यास ठेवलें. या विभागांत ७५ खेडीं असून, एकंदर लोकवस्ती सुमारें आठहजार आहे; पैकीं शेंकडा ५१ राठ आहेत; पाण्याचा या भागांत दुष्काळच असतो. शेती यथातथाच असून गुरचरण मात्र बरें आहे. सज्जी आणि लाणा हीं झाडें या भागांत पुष्कळ उगवतात. यापासून सोडा तयार करतात. ( इं. गॅ. )