विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनूपशहर तहशील :- संयुक्तप्रांत बुलंद शहर जिल्ह्याची पूर्वकडील तहशील असून तींत अनूपशहर, अहार आणि दिबई हे परगणे आहेत. उ. अ. २८० ५' ते २८० ३७' व. पू. रे. ७७० २८' ते ७८० २८'. क्षेत्रफळ ४४४ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें दोनलक्ष ऐशी हजार. या तहशिलींत चार गांवें व ३७८ खेडीं आहेत इ. स. १९०३-४ मध्यें जमीनमहसूल रु. ४९९००० इतर कर रु. ८०००० होतें. अपर गँजेस कनालच्या अनूपशहर फांटयानें या तालुक्यांतील जमीन भिजली जाते. इ. स. १९०३-४ सालीं लागवडीखालीं असलेल्या ३३९ चौरस मैल जमिनी पैकीं १५८ चौरस मैल बागाइती होती. ( इं. गॅ. ५. ).