प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनूबाई घोरपडे - बा ल प ण व सं सा र - बाळाजी विश्वनाथ पेशव्याची सर्वांत धाकटी कन्या. हिचा इ. स. १७१३ सालीं इचलकरंजी घराण्यांतील व्यंकटराव नारायण घोरपडे याशीं वयाच्या सहाव्यासातव्या वर्षी सातारा मुक्कामीं विवाह झाला. व्यंकटराव व अनूबाई यांच्या विवाहसंबंधानें अशी एक गंमतीची आख्यायिका प्रसिद्ध आहे कीं, या लग्नांत वरपक्षाकडील सेनापतीच्या घरच्या बायकांनीं ' वधूपक्षा कडच्या बायकांनी बुरखा घेतल्याशिवाय आमच्या मांडवांत पाऊलसुद्धा टाकूं नये ' असा हट्ट धरून तो वधूपक्षाकडील बायकांच्या इच्छेविरुद्ध शेवटास नेला होता. अनूबाई व व्यंकटराव या उभयतांना वर्षातून बरेच दिवस पुण्यांत आपल्याजवळ राहतां यावें म्हणून पेशव्यांनीं इ. स. १७२२ सालीं व्यंकटरावास राहण्याकरितां पुण्यास वाडा बांधून दिला व तेथील संसाराच्या सोईकरितां मौजे वडगांव तर्फ चाकण हा सबंध गांव, पर्वतानजीकचा बाग व हडपसर येथील बाग त्यास इनाम करून दिला. अनूबाईस तिचीं वेणूताई व नारायणराव (जन्म इ. स. १७२३-२४) हीं दोनहि अपत्यें पूर्व वयांतच झालीं. ही वेणूताईच पुढें पेशवाईंतले प्रसिद्ध सरदार त्रिंबकराव मामा पेठे यास दिली.

रा ज का र णां त प्र वे श :- इ. स. १७४५ मध्यें अनूबाईच्या पतीस क्षयरोगानें मृत्यु येऊन तिला वैधव्यदशा प्राप्त झाली. तथापि अनूबाईची राजकारणांतील महत्त्वाची कामगिरी यानंतरच्या काळांतीलच आहे. नारायणराव व्यंकटेश याच्या कारकीर्दीत इचलकरंजी संस्थान वैभवाच्या शिखरास जाऊन पोंचलें तें अनूबाईच्या कर्तृत्वामुळेंच होय. नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू हे अनूबाईचे भाचे असल्यानें त्यांजपाशीं असलेल्या तिच्या वजनामुळें संस्थानचें बरेंच हित झालें. पेशव्यांनीं नारायणरावांकडे व्यंकटरावाची सरदारी पूर्ववत् चालू ठेवून प्रत्येक स्वारींत त्याजकडे कांहींना कांहीं तरी कामगिरी सोंपविली एवढेंच नव्हे तर इनामें, तैनाता देऊन, मोठमोठया मामलती सांगून व मुलूखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करार करण्याच्या बाबींतील बोलाचाली त्याजवरच सोंपवून लाखो रुपये त्यास मिळवून दिले.

ज हा गि रीं ची व मा म ल तीं ची प्रा प्ति :- अनूबाई ही बाळाजी विश्वनाथाची कन्या असल्यामुळें शाहू महाराजहि स्वत: तीस बरेंच मानीत होते. व्यंकटराव वारल्यावर शाहूनें अनूबाईचा हा संबंध लक्षांत आणून सबंध आजरें महाल तीस इनाम करून दिला. पुढें १७५३ सालीं पेशवे करवीरकर संभाजीची मर्जी सुप्रसन्न करून घेण्याकरितां कर्नाटकच्या मोहिमींतून करवीरास गेले तेव्हां अनूबाईनें ती संधि साधून त्यांच्याबरोबर राहून, आजरें महालापैकीं एक तर्फी ३१ खेडीं कापशीकरांस संभाजी महाराजांकडून मोकासा चालत आलीं असल्यामुळें त्यांची रीतसर नवी सनद तिनें शंभु छत्रपतीकडून करून घेतली. या प्रसंगीं पेशव्यांस भीमगड, पारगड व वल्लभगड हे तीन किल्ले करवीरकरांकडून जहागीर मिळाले. त्यांची मामलत पेशव्यांनीं अनूबाईसच सांगितली. याच वर्षी राणोजी घोरपडे यानें करवीर दरबाराशीं चाललेल्या कलहांत आपणांस अनूबाईकडून द्रव्याची व फौजेची कुमक होते हें लक्षात आणून नारायणरावास गवसें गांव इनाम दिला. १७५६ सालीं पेशव्यांची सावनुरावर मोहीम झाली तींत अनूबाई हजर होती. या मोहिमींत पेशव्यास सोंधें संस्थानिकाकडून पूर्वी इचलकरंजीकरांकडे असलेला मर्दनगडचा किल्ला मिळाला व तो त्यांनीं इचलकरंजीकरांच्या स्वाधीन करून त्यांत त्यांचे लोक ठेवले. याप्रसंगी, नवीन मिळालेला मुलुख व पूर्वीचा मुलूख मिळून धारवडच्या विस्तृत सुभ्यांची मामलत धारवाच्या किल्ल्यासुद्धा अनूबाईस पेशव्यांकडून मिळाली.

मा ता पु त्रां ती ल क ल हा स आ रं भ :- अनूबाईचा मुलगा नारायणराव हा आतां वयांत आला असल्यामुळें त्याला आपल्या आईच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा कंटाळा येऊन मातापुत्रांत वितुष्ट आलें. हा वितुष्टाचा प्रकार नारायणराव आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणें १७५७ मध्यें पेशव्यांबरोबर श्रीरंग पट्टणाच्या स्वारीस न जातां दुसरीकडे गेला तेव्हां उघडकीस आला. तेव्हां अनूबाईनें आपल्या मुलाची कशीबशी समजूत काढून त्यास १७५९ सालीं इचलकरंजीस परत आणलें.

अ नू बा ई व जि जा बा ई यां चा सं बं ध :- १७५९ च्या अखेरीस मराठयांची व मोंगलाची लढाई सुरू झाली तेव्हां अनूबाई नगरास येऊन पेशव्यांजवळ राहिली. १७६१ सालीं मात्र अनूबाई पेशव्यांच्या स्वारीबरोबर न जातां इचलकरंजी सच राहिली. यांचे कारण शेजारीं करवीरच्या राज्यांत राज्य क्रांतीचा समय जवळ येऊन ठेपला होता हें होय. त्या सालच्या जानेवारींत संभाजी महाराजांचें देहावसान झालें तेव्हां अनबाईनें तें वर्तमान टाकोटाक पेशव्यांस लिहून कळविलें. अशा रीतीनें संभाजीच्या मरणानंतर करवीर संस्थान खालसा करण्याची मसलत पेशव्यांनीं योजिली तींत अनूबाईचें प्रथम पासूनच अंग दिसून येतें. पेशव्यांनी करवीरच्या राज्याची जप्ती करण्याकरितां इचलकरंजीकरांकडील माणसें पाठविल्यामुळें जिजाबाईचा तर असा पक्का ग्रह झाला होता कीं सर्व कारस्थानाच्या मुळाशीं अनूबाईच आहे. पुढें जिजाबाईनें आपली सवत गरोदर असल्याची हूल उठविली तेव्हां त्या गोष्टीची परीक्षा करून बाळंतपणाच्या वेळीं प्रत्यक्ष हजर राहण्याकरितां पेशव्यांच्या सांगण्यावरून अनूबाई करवीरास जाणार होती. पण पानिपताचा पराभव व नानासाहेबाचा मृत्यु यांमुळें तो बेत रहित झाला.

पु त्रा चा अ व्य व स्थि त प णा  व  मृ त्यू :- १७६१ च्या पावसाळयांत अनूबाई आपल्या मामलतीच्या ठिकाणीं धारवाडास होती. १७६२ च्या सुमारास अनूबाईचें आपल्या मुलाशीं पुन्हां बिनसलें. नारायणराव आतां व्यसनाधीन होऊन कारभारांत व खासगी वागणुकींत अव्यवस्थितपणा करूं लागला. त्यास व त्याच्या स्त्रियेस यापुढें अनूबाईनें नजरकैदेंत ठेवल्या प्रमाणें स्थिति होती. १७६४ सालीं अनूबाईच्या शरीरीं समाधान नसल्यामुळें ती माधवरावाबरोबर हैदरावरील स्वारीस येऊं शकली नाहीं. पानिपतच्या युध्दानंतर हैदरानें तुंगभद्रेच्या उत्तरेस स्वाऱ्या करून धारवाड काबीज केलें होतें तें या स्वारींत पेशव्यांनी काबीज करून धारवाडचा सुभा मोकळा केला. व त्याची मामलत पुन्हां इचलकरंजीकरांना सांगितली. अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडून होती, ही संधि साधून नारायणरावानें दंगा आरंभला. पण अनूबाई लवकरच बरी झाल्यानें नारायणरावाचे बेत विरघळून जाऊन त्यास पुन्हां प्रतिबंधांत रहावें लागलें. नारायणरावाचें आतां सरकारी कामगिरीकडे लक्ष राहिलें नसल्यामुळें पेशव्याच्या मनांत त्याचें पथक मोडावें व सरदारी काढून घ्यावी असें आलें होतें; पण १७६६ च्या जूनमध्यें अनूबाईनें पुण्यास जाऊन व आपली भीड खर्च करून व्यंकटरावाच्या नांवें सरदारी करून घेतली. इ. स. १७६९ त मामलतीसंबंधीं बरीच बाकी तुंबल्यामुळें पेशव्यांनी धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढून घऊन बाकी वसूल करण्याकरितां कारकून व ढालाईत इचलकरंजीस पाठविले. हा तगादा उठविण्याकरितां मुलगा आजारी होता तरी त्यास तसाच टाकून अनूबाई पुण्यास गेली व रदबदली करून पेशव्यांकडून बरीच सूट मिळवून राहिलेली बाकी चार महिन्यांत फेडण्याचा तिनें करार केला. या सुटीसंबंधीं कित्येक रकमांवर पेशव्यांचा ' वडील मनुष्य सबब रयात ' असा शेरा होता. इ. स. १७७० मध्यें पेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमीस निघाली तेव्हां अनूबाई आपल्या नातवासह जेऊर मुक्कामीं त्यांच्या लष्करांत जाऊन पोहोंचली. पण इतक्यांत मुलगा वारल्याची बातमी आल्यामुळें ती पुन्हां इचलकरंजीस आली. अनूबाईचा आतां वृद्धापकाळ झाला असल्यामुळें तिच्यानें राज्यकारभाराची दगदग उरकेनाशी झाली होती. त्यांतच पुन्हां हा पुत्रशोक प्राप्त झाला ! तथापि धैर्य धरून आपला नातू व्यंकटराव याच्या कल्याणकरितां तिनें पूर्वीप्रमाणे कारभार पुढें चालविला.

आ ण खी  आ प त्ति  :- इ. स. १७७३ सालीं त्रिंबकराव मामा पंढरपुराजवळ राघोबा दादाच्या पक्षाशीं झालेल्या लढाईत मारले जाऊन अनूबाईच्या मुलीवर वैधव्याचा दुर्धर प्रसंग ओढवला. तेव्हां अनूबाई आपल्या नातवासह मुलीच्या सांत्वनार्थ पुण्यास गेली. तो राज्यक्रान्तीचा काळ असल्यानें अनूबाईनें दूरदर्शीपणा करून आपल्या जवळचा जामदारखाना व जडजवाहीर आपल्याबरोबर पुण्यास घेऊन जाऊन पुरंदरास पेशव्यांच्या जामदारखान्यांत नेऊन ठेवलें. इ. स. १७७४ च्या अखेरीस करवीरकरांनीं रघुनाथराव दादाच्या चिथावणीवरून
पेशव्याच्या मुलुखास उपद्रव देण्याचा उपक्रम करून त्यांनीं इचलकरंजीवर स्वार्‍या करण्यास सुरुवात केली. अनूबाईनें त्यांशीं सलोखा करावा म्हणून पुष्कळ प्रयत्न केला पण उपयोग झाला नाहीं. तेव्हां अनूबाईनें न डगमगतां कोल्हापूरकरांच्या दोन स्वार्‍या परतवून लावल्या; परंतु असें नेहमी होऊं लागल्यास निभाग लागणार नाहीं हें जाणून पुन्हा या स्वार्‍या न व्हाव्या म्हणून अनूबाईनें पुण्याच्या दरबारीं खटपट केली.
पण पुणें दरबार हैदर व इंग्रज यांशीं लढण्यांस गुंतले असल्यामुळें तिकडून अनूबाईस फारशी मदत होऊं शकली नाही.

तो त या चें  रा ज का र ण :- आपल्या आयुष्याच्या अखेरी अखेरीस अनूबाईनें एक अविचाराचें राजकारण करून आपला फार दुर्लौकिक व नुकसान करून घेतलें. १७६६ सालीं पेशव्यांनीं भाऊसाहेबाच्या तोतयाची चौकशी कली तेव्हां अनूबाई पुण्यास होती. तो तोतया नसून खरोखर भाऊसाहेबच आहे असें अनूबाईचें मत होतें. तिची भ्रांति दूर करण्याकरितां पेशव्यांनी त्या तोतयास कांहीं दिवस अनूबाईच्या वाडयांत
ठेविलें होतें तरी तिचें तें मत तसेंच कायम राहिलें. यामुळें १७७६ सालीं रत्नागिरीच्या मामलेदारानें तोतयास कैदेंतून सोडून त्याचें खूळ माजविलें तेव्हां अनूबाईनें तोतयाच्या मदतीस व्यंकटरावाची रवानगी केली. यामुळें पुणें दरबाराकडून तोतयाचें पुढें पारिपत्य झालें तेव्हां इचलकरंजीकरांची देशमुखी, सरदेशमुखी, तैनाती गांव व इनामगांव या सर्वांवर जप्ती आली. पण पटवर्धनांनीं रदबदली केल्यामुळें नाना-फडनवीस व सखाराम बापू यांनीं अनूबाईच्या वृद्धापकाळाकडे लक्ष देऊन इचलकरंजीकरांकडून सवा लक्ष रुपये गुन्हेगारी घेऊन ती जप्ती उठविली.

रा ज का र ण सं न्या स  व  मृ त्यु :- तोतयाच्या मसलतीचा असा परिणाम झाल्यावर अनूबाईनें संस्थानच्या कारभारांतून आपले अंग काढून घेतलें. ती काशयात्रेस गेली होती इतकी माहिती मिळते पण कधीं गेलीं तें साल कळत नाहीं. तिला इ. स. १७८३ सालीं तुळापूर येथें देवाज्ञा झाली.

स्व भा व व र्ण न :- पतीच्या निधनानंतर ३८ वर्षे संस्थानचा सर्व कारभार अनूबाई ही स्वत:च पहात होती. नानासाहेब पेशव्यांच्या अखेरीपर्यंत बहुतेक स्वाऱ्यांत ती हजर असे. तिचा मुलगा किंवा त्याच्या मृत्यूनंतर तिचा नातू व व त्यांचे कारभारी माहिमींवर जात इतकेंच, परंतु त्यांच्या फौजेची तयारी करणें व त्यांस पैशाचा पुरवठा करणें ही जबाबदारी अनूबाईच सांभाळीत होती. दरबारचीं कामेंहि सर्व तीच करून घेत असे. तिची हिंमत, धोरण व महत्त्वाकांक्षा जबरदस्त होतीं. तिचे भाचे नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब यांवर तिची चांगली छाप होती. त्यांच्या लष्करांत प्रत्येक स्वारींत हजर राहून अनूबाईनें आपले बेत सिद्धीस नेण्याची संधि कधीं गमावली नाहीं व त्या कामीं कधीं आळस केला नाहीं ! तिचा पुत्र नारायणराव यास तिनें कधीं स्वतंत्रपणें वागूं दिलें नाहीं. ' हें लहान पोर याला काय समजतें ' अशाच भावनेनें तिनें त्यास जन्मभर म्ह. ४६ वर्षाच्या वयापर्यंत वागविलें ! नारायणरावाच्या मागून संस्थानचा अधिकार तिच्या नातवास मिळाला तें तर तिच्या दृष्टीनें अगदीं नेणतें बाळच, तेव्हां त्याच ती स्वतंत्रपणें कशी वागूं देणार ? मोठमोठ्या सर्व मसलती तिनेंच अंगावर घेऊन पार पाडल्या पुत्र व नातू हे नांवाला मात्र धनी होते. तिचा व्याप मोठा होता त्यामुळें तीस कर्जहि झालें होतें. एके काळीं तर त्या कर्जाचा अजमास १२ लक्ष रुपये होता. बाईस कर्ज होतें त्याप्रमाणें तिनें संस्थानची जमाबंदीहि वाढविली होती. तिची वागणूक नेमस्तपणाची असे व खर्चाच्या बारीक सारीक बाबींवर सुद्धा तिचें लक्ष असे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .