विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अन्नय्याचारी : हा तैलंग जातीय ब्राह्मण किंवा कोण तें कळत नाहीं, व कधीं झाला तें हि कळत नाहीं. मात्र तेलंगी भाषेंत दोन भागांनीं रचलेलें पितामहचरित्र याचें प्रसिद्ध आहे, त्यांत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचें यानें वर्णन केलें आहे. ( कविच. ).