विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपस्मार - आ यु र्वे दी य वि वे च न.- स्मृतीचा नाश हा ज्या रोगांत होतो त्या अपस्मार म्हणतात. ''स्मृतिर्भूतार्थविज्ञानं अपस्तत्परिवर्जने'' अशी अपस्मार शब्दाची निरुक्ति आहे. दुसर्या व्याधीनें क्षीण झाल्यानें, मलिन आहार विहार केल्यानें, किंवा चिंता, भय, शोक, इत्यादि कारणांनीं मन व शरीर हीं दोन्हीहि दोषांनीं व्याप्त होतात व ते दोष मनाचें व बुद्धीचें स्थान जें हृदय त्यास दुष्ट करून संज्ञावाहक स्त्रोतसांसहि दुष्ट करितात. त्यावेळीं तो मनुष्य मूढ बनून अज्ञासारख्या नाना प्रकारच्या वाईट गोष्टी करितो. दांत खातो, फेंस ओकतो किंवा तोंडांत येतो, हातपाय जमीनीवर झाडतो, जें नसेल तें पहातो, अडखळून जमीनीवर पडतो, डोळे व भुंवया हीं वाकडीं होतात, याप्रमाणें कांही वेळ झालें म्हणजे दोषांचा वेग कमी होतो. तो वेग कमी झाल्यानंतर तो मनुष्य शुद्धीवर येतो व कांहीं कालानें पुन्हा वरच्या प्रमाणेंच वेड्यावांकड्या चेष्टा करितो असें वारंवार होतें. यांत मुख्य गोष्ट म्हणजे त्या रोग्यास आपण कोण, कोठें आहों, काय करितों याची शुद्ध नसते. बेशुद्धि हें मुख्य लक्षण ज्या रोगाचें आहे त्या रोगास मुर्छा असें म्हणतात. परंतु त्यांत कोणताहि व्यापार मनुष्य करीत नाहीं व तोंडातून लाळ वगैरे येणें हींहि लक्षणें त्यांत नसतात म्हणून त्या रोगापासून याचा भेद समजावा.
वातापासून, पित्तापासून, कफापासून, आणि सन्निपातापासून असे चार प्रकारचे अपस्मार होतात.
अपस्मार उत्पन्न होण्यापूर्वी हृदय कांपणें, अंग मेहरी आल्याप्रमाणें जड होणें, भ्रम, डोळ्यांपुढे अंधारी येणें, चिंता करीत बसणें. भिंवया वर चढणें, डोळ्यांस विकार होणें, शब्द नसतां ऐकूं येणें, घाम, लाळ व शेंबूड गळणें, अपचन, अरुची, मूर्छा, पोटांत गुडगुडणें, शक्तिक्षय, झोंप नाहींशी होणें, अंगमोडणें, तहान, स्वप्नांत गाणें, नाचणें, दारू व तेल पिणें, आणि तींच मुतणें इ० लक्षणें होतात.
वाताच्या अपस्मारांत रोगी मांड्या कांपत कांपत व वरचेवर धडपडत मूर्च्छित पडतो, आणि बेसूर रडत रडत सावध होतो. त्याचे डोळे सुजल्यासारखे वर येतात. दम लागतो तोंडांतून फेंस येतो, कांपतो, डोक्यास चटके देतो, दात चावतो, मान फुगते, चहूंकडे वेडेवाकडे हातपाय टाकतो, बोटें वळतात, डोळे, त्वचा, नखें, व तोंड, हीं रुक्ष काळसर व तांबूस होतात, आणि त्याच्यापुढें काळें, चंचल, खरखरीत विद्रुप व विकृतमुख असें रूप दिसतें. पित्तानें वरचेवर फेंफर्याचे झटके येतात व वरचेवर सावध होतो. केंस, डोळे, तोंड, व त्वचा हीं पिंवळट होतात. जमिनीवर हात आपटतो. त्यास डोळ्यांसमोर भयंकर, पेटल्यासारखें व सारवल्यासारखें रूप दिसतें व तहान लागते.
कफापस्मारांत फार वेळानें फेंपर्याचा झटका येतो, आणि आला म्हणजे सावध होण्यासहि फार उशीर लागतो, चेष्टा थोड्या करितो, लाळ फार येते, डोळे, नखें व तोंड हीं पांढरीं होतात, आणि डोळ्यांपुढे पांढरें दिसतें.
सान्निपातिक अपस्मारांत वरील सर्व लक्षणें होतात व तो असाध्य आहे.
अ प स्मा र : - (एपिलेप्सी या अर्थानें)-या रोगांत रोग्यास आंचके येऊन अगर कधीं न येऊन बेशुद्धि एकदम येते व रोग्यास मेंदु, इंद्रियें वगैरे ठिकाणीं इतर रोग कांही नसतांना ही खोड त्यास जडते. रोग्यास जे भयंकर आंचके येतात त्यांकडे आपलें लक्ष विशेष जातें खरें, पण त्याबरोबर जी गुंगी असते तीही विलक्षणच असते. याशिवाय मेंदूवर गांठ, आवळुं वाढून अगर मूत्रपिंडदाहरोगांत किंवा पंडुरोगांतहि झटके, अगर आंचके अगदीं अशा प्रकारचे येतात. पण त्यांचा या रोगांत समावेश करीत नाहींत. तर तसल्या आंचक्यांना 'अपस्पारसदृश' आंचके म्हणतात. या रोगांत आंचके येण्यास कारण अशी शरीराची कोणतीहि रचना अथवा इंद्रिय न बिघडतां तो सुरू होतो. रचना विकृत न होतां फक्त व्यापार अगर क्रिया विकृत होते असे जे आणखी कांहीं रोग आहेत-उदा. उन्मादवायुरोग-त्यापैकीं हा आहे. या रोगांना केवळ रोग न म्हणता 'व्यापार विकृति रोग' असे नांव देण्यास हरकत नाहीं.
का र णें :- पुरुषांपेक्षां स्त्रियांमध्यें हा रोग अंमळ अधिक प्रमाणांत असतो. शंभरापैकीं पाऊणशें रोग्यांत रोगास आरंभ बालपणांत अगर यौवनावस्थेचे आरंभीं होतो. पण इतर सर्व वयांचे माणसांमध्यें तो आढळतो. कारण तो समूळ बरा होणें मुष्कीलीचें असतें व रोग्याचे मागें जन्मभर त्या रोगाचा त्रास लागतो व शेवटीं तो दुसरा कोणता तरी रोग होऊन मरतो. रोग होण्यास अनुकूल कारणें आहेत त्यांपैकीं वंशपरंपरा हें एक मोठें महत्त्वाचें कारण आहे. आई किंवा बापास हा रोग असल्याचें निम्या रोग्यांत तरी आढळून येतें. हा रोग नसला तर वेड, औदासीन्य, उन्माद रोग किंवा मद्यपवात यापैकीं एखादा रोग असतो. हा रोग स्वार्जित असल्यास त्यास सुरासेवन, अतिमैथुन, मुष्टिमैथुन, अशापैकीं कांही कारण असण्याचा संभव असतो. पण ज्या वयांत हा रोग सुरू होतो तेव्हां यांपैकीं पहिली दोन कारणें फारशीं संभवत नाहींत. व शेवटील कारणानें अपस्मारससदृशोन्मादरोग बहुधा होतो. खालील एखाद्या प्रकारचें निमित्त आंचके येण्यास पुरेसें होऊन तेव्हांपासून जन्मभर हा रोग रोग्यास पछाडतो:- भयंकर भीति, मानसिक चिंता, अगर चलबिचल, डोक्यास इजा होणें, मोठाले ताप येऊन जाणें, नासापुट पार्श्वग्रंथि, डोळ्यांची दृष्टि बिघडणें, दांत किडणें, जंत होणें इत्यादि. पहिला झटका पुष्कळांना एक दोन तास रात्रीं झोंप झाल्यावर येतो. याचे दोन भेद आहेत, ते असे:-
म हा प स्मा र : - यामध्यें आंचके व बेशुद्धि हीं दोन्ही असतात व (१) सूचनावस्था (२) बेशुद्धि व शरीर ताठणे (३) आंचके येणें व (४) शुद्धीवर येणें असें त्यांचें थोडक्यांत वर्णन आहे.
१ सू च ना : - सूचनेचे अनेक प्रकार असतात. जसे हात, पाय, तोंड, जीभ येथें मुंग्या येणें; कमी दिसणें; दृष्टिभ्रम, काजणे दिसणें, रंग दिसणें, पदार्थ अति मोठे दिसणें; ओकारी, भोंवळ, गुदमरणें, पोटदुखी यांपैकीं कांही होणें; एकदम आग होणें अगर थंडी वाजणें, घाम सुटणें अगर छाती धडधडणें, कसली तरी सांगतां येत नाहीं अशी भीति अगर काळजी, स्वप्नांत असल्याप्रमाणें भासणें, जें घडतें तें पूर्वीं स्वप्नांत घडलेंच आहे असें वाटणें. याशिवाय अनेक इंद्रियासंबधीं अनेक सूचनालक्षणें होतात.
२ बे शु द्धि : - रोगी उभा असो किंवा चालत असो एकदम पुढें पडून किंचाळी मारून (अगर न मारतां) पुढें भुईवर आपटून बेशुद्ध होतो. हात आणि पाय लांब आंखूड वरचेवर करतो; डोळे, तोंड मिटतो उघडतो, बुबुळें फिरवतो; जीभ बाहेर काढल्यामुळें ती दांतांत सांपडून चावली जाण्याचा संभव असतो. लाळ व रक्तमिश्रित फेंस जीभ चावल्यामुळें तोंडातून येतो. चेहरा अति काळवंडतो व तोंड, ओंठ सुजल्यासारखे दिसतात. मळ लघवी व पुरुषाचें धातुस्खलन यांपैकी एक अगर अनेक नकळत होतें. एखादा खांद्याचा सांधाहि आंचक्यानें निखळतो. बुबुळास बोट लावलें तरी पापणी मिटत नाहीं. कनीनिका विस्तृत होते.
३ आं च के : - ही अवस्था थोडी म्हणजे पांचसहा मिनिटें असते व मग ते कमी होऊं लागतात. श्वास लागणें व तोंडास फेंस येणें बंद होतें. व त्यास प्रथम झांपड व नंतर चांगली झोप लागून कांहीं वेळानें एकदमच शुद्धीवर येतो. पण कित्येक वेळां यावेळीं तो वात होऊन बरळतो अगर वेड्यासारखें करितो.
रोगी आपणास बेशुद्धीमध्यें नानातर्हेच्या इजा नकळत आंचक्याचे तीव्रतेमुळें करून घेतो व त्यामुळेंहि वैद्यानें झटके पाहिले नसतील तेव्हां रोगाचें निदान ठरविण्यास एक साधन होतें.
ल घु अ प स्मा र : - एकदम बेशुद्धि येणें यापेक्षां या भेदामध्यें बहुतेक रोग्यांना कांहींएक होत नाहीं. बोलतां बोलतां एकदम नजर ताठल्यासारखी करून कनीनिका विस्तृत होतात. बोलणें भलतेंच येऊं लागतें; व नंतर भोंवतालीं काय घडलें याचें त्यास ज्ञान नसतें. रोगी जेवत असला तर एकदम ताटांत अगर वाटींतच बोटें खूपसूं लागून थोडे सेकंदपर्यंत बेशुद्ध होतो व चटकन् शुद्धी येऊन अनुभवावरून मधील चुकी व विस्मृति त्याचे लक्षांत येते आणि मला जरा आतां भोंवळ येते अगर डोकें दुखतें, मी जरा आतां पडतों, असें म्हणून दुसरीकडे जातो. किंवा पूर्वी जें काम करीत असेल तेंच पुढें करूं लागतो. कधीं भोंवळ तर कधीं एखादाच आंचका येऊन हात अगर पाय हलणें व थोडी बेशुद्धि हें त्रासदायक लक्षण असतें, यांपैकीं कांहीं चिन्हें व लक्षणें महापस्माराच्या सूचनाचिन्हासारखींच असतात.
अ न्वा प स्मा र स्थि ति : - विशेषत: मागील भेदांत वर्णिलेला झटका निघून गेल्यानंतर ही स्थिति होऊन त्यामुळें मानसिक स्थितींत विलक्षण पालट पडतो. कांहीं दिवस गुंगी अगर वेड लागल्याप्रमाणें होतें. कधीं तो अशीं न कळतां कृत्यें करतो कीं त्याची त्यास मागाहून स्मृति नसते. इकडे तिकडे धांवून कोणी भेटेल त्यास तडाखे देतो; बाई असली तर आपलें मूलहि मारून टाकते किंवा रोगी चौर्यकर्म करितो. एक न्यायाधीश होते त्यांनीं अशा स्थितींत भरकोर्टातं कोपर्यांत जाऊन लघवी केली. या मानसिक स्थितीचें ज्ञान वैद्य डाक्तरांनां व वकिलांनां जरूर पाहिजे. त्या माणसाची रोगामुळें अशी मानसिक स्थिती होते हें लोकांस ठाऊक नसतें व मुद्दाम मारामारी अगर खून केला असा आरोप त्याजवर शाबीत होण्याचा संभव असतो. कधीं याबरोबर वेड, अतिरोग, भ्रम, भास होतो. कधीं मुलगे, मुली व स्त्रियांना प्रथम या प्रकारचा अपस्मार होऊन पुढें त्याचें उन्माद वायूमध्यें रूपांतर होतें. कधीं कधीं हे दोन भेद एकमेकांत मिश्र होतात. म्हणजे रोग्यास प्रथम लघु अपस्मार होऊन मोठेपणीं महापस्मार होतो. कधीं नुसती सूचना अवस्थाच फक्त रोग्यास होते. पण असें क्वचितच घडतें.
रो गा चे भे द क्र म : - एका रोग्यांत रोगाचें एकच स्वरूप कायम रहात नाहीं. दोन झटक्यांमध्यें एक महिन्यापेक्षां अधिक काल प्रथम जातो. पण रोगाचा प्रभाव अधिक झाल्यावर हें अंतर कमी कमी होत जातें. कधीं तर रोजच एक, दोन, तीन सुद्धां झटके येतात. व तसें झालें म्हणजे मग बरेच दिवस झटके येत नाहींत. मोठा व कडक झटका येऊन गेला तर बरेच दिवस तो पुन्हां येत नाहीं. पण लहान झटक्याचें तसें नसतें. मद्यसेवन, अतिमैथुन, अतिआहार, मानसिक व शारीरिक श्रम फार केल्यानें आंचके लवकर येऊं लागतात. कांहीं बायकांनां दर महिन्यांत रजस्वला असतांना आंचके येतात.
उ ग्रा प स्मा र : - कांहीं रोगी तर सतत आंचके येत कांहीं दिवस राहून शेवटीं त्यांतच ताप वाढून मरण पावतात. दुसरा झटका येण्यापूर्वीच्या मधील अवकाशांत जर झटके लवकर येत नसतील तर रोग्याची प्रकृति उत्तमच असते. रोगी चांगला धट्टाकट्टा, हौशी व बळकट असतो. पण जर झटके वरचेवर येत असतील किंवा रोग जुनाट असेल तर रोगी चिरडखोर, उदास होऊन त्याची बुद्धी व स्मरणशक्ति कमी होते व शेवटीं अगदीं मानसिक दौर्बल्य येतें. लहान मुलांना तर पूर्ण वेड लागतें, किंवा तीं अर्धवट होतात. वरील उग्रापस्मार खेरीज करून निवळ या रोगानें असा मृत्यू रोग्यास येत नाहीं. त्याचा मृत्यू अपघातापासून होतो. उंचावरून तो खालीं अगर पाण्यांत पडतो व बुडून मरतो. किंवा पांघरुणांत आंचके येऊन तोंड, नाक गुदमरून त्यामुळें मरतो. अगर विस्तवांत पडून, भाजून किंवा गाडी, घोडा, पायगाडीवरून पडून मरतो. हे आंचके येण्याचें कारण मेंदूच्या बाहेरील भागामध्यें असावें. कारण तेथें गांठ किंवा आवाळुं झालें असतां येणारे झटके अगदीं हुबेहुब असेच सोडणारीं मज्जास्थानें असल्यामुळें असले आंचके येणें तेथूनच अधिक संभवनीय आहे. शिवाय, आंचक्याबरोबर बेशुद्धि येणें हें लक्षणहि वरील अनुमानास पुष्टी आणणारें आहे.
रो ग नि दा न :- आंचके पहिले म्हणजे रोग ओळखण्यास सोपा आहे. ते न पाहिजे तर उन्मादरोगाची बेशुद्धि व झटके येतात किंवा काय याचा संदेह पडतो. लघु अपस्माराचा हृदयदौर्बल्यमूर्छेशीं घोटाळा उडण्याचा संभव असतो. (१) उन्मादांतील झटके येतांना रोगी डोकें आपटणें वगैरे कांहीं तरी निश्चित क्रिया झटक्याच्या वेगांत करितो व दाबून धरिलें तर धडपड अधिक करतो. जीभ चावली जात नाहीं, चेहरा काळवंडत नाहीं. ते आंचके फार वेळ टिकतात. कान, नाक, डोळे, या ठिकाणीं उन्मादवायूच्या रोग्यास त्रास दिला असतां, कळत असतो. पण अपस्मारांत रोगी अगदींच बेधुद्ध असतो. (२) मेंदूवर गांठ, आवाळुं झालें असतां झटके एका बाजूलाच येतात. (३) कांही लोक पैसे उपटण्याकरितां लोकांस दया यावी म्हणून ढोंग करितात. ते पडतांना जपून, इजा न होईल असे पडतात. त्यांच्या ढोंग करण्याच्या श्रमानें चेहरा लाल होतो. चेहरा काळा नसतो. व श्रमानें त्यांस घामहि येतो. कनीनिका विस्तृत झालेली नसते. व उजेड असल्यास ती बारीक होते. अंधारांत मोठी होते. तेथें स्पर्श करितांच डोळे मिटून घेण्यांत येतात. पापणी आपण उघडण्याचा यत्न केला तर ती अधिक गच्च मिटून घेतली जाते. तपकिर नाकास लावून शिंका येतात. चिमटे समजतात. (४) मेंदूच्या रोगामुळें झटके असल्यास डोकेंदुखी, ओकारी, अंधत्व व अर्धांगवायु हीं लक्षणें असतात. (५) मूत्रपिंडदाहजन्य झटके असतील तर लघवींत आलब्यूमिन, कठिण नाडी, सूज, मोठें झालेलें हृदय इत्यादि लक्षणें असतात. (६) किडके दांत, जंत, दंतोद्भव, बद्धकोष्ट, शिश्नाची चामडी टोंकाशीं अतिघट्ट असणें, टांचणी अर्भकास बोचत असणें अशा नानाविध कारणांनीं आंचके येतात. त्या सर्वांची चौकशी व शोध केला पाहिजे. बर्याच मोठ्या मुलांनीं अथवा मुलींनीं अंथरूण मुतून ओलें केलें असतां त्यांना अपस्मार आहे किंवा काय याचा शोध करावा. कारण झोपेंत आंचके येतात.
साध्यासाध्य विचार : - मूल वयांत आलें म्हणजे रोग बरा होईल ही आशा बहुधा खोटी ठरते. रोग मोठेपणीं झाला असल्यास बराच सुसाध्य असतो. तसेंच जे आंचके निवळ दिवसा किंवा निवळ रात्रीं येतात तेहि औषधोपचारानें सुसाध्य असतात. मिश्र प्रकारचे आंचके दु:साध्य असतात. तसेंच निवळ महापस्मार किंवा लघु अपस्मार बरा होण्यासारखा असतो पण मिश्र प्रकारचा अपस्मार नसतो. वेड, किंवा अर्धवेड लागून मानसिकस्थिति बिघडली असेल तर गुण येत नाहीं. रोग्यास सूचनावस्था असलेले रोगी बरे होण्याचा संभव असतो. शेंकडा १०-१२ रोगी औषधानें बरे होतात व शेंकडा ४७ रोग्यांना बराच फायदा होऊन रोग ताब्यांत बराच रहातो.
औ ष धो प चा र :- यांचा हेतु आंचक्याचें येणें कमी करणें व नंतर तें येणें बंद करणें हा होय. त्यापूर्वीं एक झटका येऊन गेल्यावर दुसरा झटका येण्याचे दरम्यान रोग्यास आहार हलका व पौष्टिक देऊन, मोकळी हवा, उजेड जेथें मुबलक आहे अशा जागीं त्यास ठेवावें. त्याचे दांत, डोळे तपासून त्यांत खोड असल्यास त्यावर उपाय करावेत. मांसाहार वर्ज्य करवावा. पोट अगदीं भरुन जाईल इतका मोठा आहार नसावा. रात्रीं जेवण होतांच निजूं नये. चहा, कॉफी व दुसरीं उत्तेजक पेयें वर्ज्य करावींत. कोठा साफ ठेवावा. बद्धकोष्ट झाल्यानें कोठ्यांत घाण सांचते तसें होऊं देऊं नये. नियमितपणें दम न लागेल इतका व्यायाम करवावा. व ज्यांत धोका व जीवास अपाय होणार नाहीं असला कामधंदा त्यास पाहून द्यावा. कांहीं ठिकाणीं असल्या रोग्यांची वसाहत केली आहे. अशी सोय आपल्या देशांत केल्यास रोगी तेथें ठेवल्यानें तरी कामधंदा करितांना आंचके आले तरी त्यांस जपण्याची व शुश्रूषेची तजवीज तेथेंच केलेली असते. तेथें रोग्यांचें खाणें, व्यायाम, करमणूक, यासंबंधीं त्यांना जशी हितावह व्यवस्था पडेल अशीच तजवीज ठेवली गेल्यामुळें अशा वसाहती बनविल्यापासून फायदा आहे. असल्या रोगी मुलांना त्यांच्या दर्जानुरूप शिक्षण द्यावें खरें पण परीक्षा, अभ्यासाची सक्ति याचा धाक त्यांचे मागें असूं नये.
औ ष धें :- सोडियम, पोट्याशियम, स्ट्रानशियम, अमोनियम यांचे ब्रोमाईड क्षार या रोगावर फार उपयोगी असल्यामुळें बहुतेक रोग्यांवर त्यांचा बराच अंमल चालतो. पोट्याशियम ब्रोमाईड २०-३० ग्रेन पाण्यांत विरघळवून रोज तीन वेळां देतात. सौम्य रोगास व तरुण रोग्यांनां २० ग्रेनची हलकी मात्रा द्यावी व रोग तीव्र असल्यास ३० ग्रेन किंवा अधिकहि औषध द्यावें. पोट्याशियम, सोडियम, व अमोनियम, या तिहीचे मिश्र ब्रोमाइड सर्व मिळून ३० ग्रेन दिल्यानें अधिक फायदा होतो असें म्हणतात. कित्येक महिने किंवा वर्षें औषध द्यावें लागतें. त्यामुळें आंचक्यामधील अंतर कमी होऊन आंचक्याची तीव्रताहि कमी होते. म्हणजे दर आठवड्यास आंचके येत असल्यास ते महिन्या सवा महिन्यांनीं येतात. मध्यें औषध सोंडलें, तर आंचके पुन: वाढतात; त्यामुळें औषध घेणें हा नित्य क्रम रोगी सहसा सोडीत नाहीं. जरी कित्येक महिने पर्यंत किंवा एक वर्ष पर्यंत औषध घेऊन आंचके आले नाहींत तरी औषध सोडूं नये. तर आंचके थांबल्यावरहि दोन वर्षें औषध घ्यावें. व थोड्या प्रमाणांत आणखी एक वर्ष औषध प्यावें.
ब्रोमाइड मोठ्या प्रमाणांत दिल्यानें सुस्ती येते. हातापायास दुबळेपणा येऊन ते थंडगार लागतात. असें झालें तर ३० ग्रेन प्रमाण औषधाचें करावें. अशी स्थिति ३० ग्रेनपेक्षां जास्त औषध दिल्यानें होते व तिला ब्रोमाइड निशा म्हणतात. किंवा कांहीं दिवस औषध बंद ठेवावें. ब्रोमाइडपासून त्रास न होण्यास त्याबरोबर सोडियम ग्लिसरोफासफेट दररोज एकंदरींत २०-३० ग्रेन त्याशीं मिश्र करून द्यावें. किंवा त्यांत कुचल्याचा अर्क घालावा (२०-३० थेंब). तें पुष्कळ पाण्यांत विरघळवावें. व त्यापासून अंगावर पुटकळ्या येतात त्या न याव्या म्हणून त्यांत २-३ थेंब लायकर आर्सेनिक (सोमल) या विषारी औषधाचे घालावेत. आहारांतील मीठ तोडल्यानें या ब्रोमाइड औषधांचा गुण चांगला येतो असें म्हणतात. मधून मधून ब्रोमाइड बरोबर दुसरीं औषधें मिश्र करून देतात ती:- बेलाडोना, झिंकसल्फेट किंवा ऑक्साइड, लोहबोर्याक्स, क्यालशियमल्याकटेट, अँटिपायरीन, डिजिटालीस, भांग इत्यादि.
आं च के आ ले अ स तां का य क रा वें? - सूचनावस्थेंत हातांत मुंग्या येऊन त्या वर जात असतील तर हात जोरानें चोळल्यानें किंवा बांधून टाकिला असतां आंचके येणें टाळलें जातें अशानें झटका थांबवितां येतो असें कळलें म्हणजे दंडाभोंवतीं दोराचा वेढा बांधून एक टोंक मनगटाशीं ठेवावें म्हणजे जरूर वाटेल तेव्हां हें टोंक ओढून दडाभोवतीं दोरी आंवळून झटका थांबवावा. कांहीं रोगी ज्या ज्या प्रकारची सूचनावस्था असेल ती ती क्रिया करून आपापले झटके थांबवूं शकतात. उदाहरणार्थ, कोणास अंमळ पडून राहिल्यानें तर कोणास मुरडा ही सूचना असल्यामुळें शौचास जाऊन आल्यामुळें झटका थांबवितां येतो. या क्रिया करण्यास जें लक्ष द्यावें लागतें व स्नायूंची क्रिया करावी लागते त्यामुळें झटका थांबत असावा व म्हणून मानसिक शक्कचे प्रयत्नानेंहि तो थांबावा व त्यासाठीं रोग्यानें आपल्या रोगाकडे लक्ष न देतां अशा वेळीं भोंवताली लक्ष द्यावें असें कांहींचें मत आहे. नायट्राइट आफ आमील हें औषध हुंगल्यानें कोणाचा झटका थांबतो.
झ ट का आ ल्या व र का य क रा वें :- रोगी पडला असेल तेथेंच (येथें पाणी अगर विस्तव नसेल तर) त्यास पडूं द्यावे. त्याचें डोकें आपटून इजा न होईलसें करावें. कपडे, नेसणें, सैल करावें. एक बूच, किंवा काठीचा तुकडा दांतांच्या जबड्यामध्यें ठेवावा म्हणजे जीभ चावली जाणार नाहीं. निजतांना अशा रोग्यांनीं कृत्रिम दांताची कवळी काढून ठेवून झोंपीं जावें. नाहींतर झटक्यांत ती सुटून घशांत अडकून बसते. महापस्मारासाठीं ब्रोमाइड क्षाराचें प्रमाण दुप्पट करावें. व त्यांत क्लोरल १५ ग्रेन घालावें. दर ४ तासांनीं द्यावे. आमील नैट्रेट हुंगवावा. अगर क्लोरोफार्म, मार्फिया टोंचून घालावा.