प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अफगाणिस्तान - अफगाणिस्तान हा मध्यआशियांतील एक देश आहे. अंदाजानें याचें क्षेत्रफळ (बदकशान व काफरिस्तान मिळून) २४५,००० चौरस मैल आहे. लोकसंख्या सुमारें ५०,००, ००० आहे. याचे उत्तरेस रशियन तुर्कस्थान, पश्चिमेस इराण, व पूर्वेस व दक्षिणेस काश्मीर, हिंदुस्थानच्या वायव्यसरहद्दीवरील टोळ्यांचा प्रदेश व बलुचिस्तान. अर्वाचीन काळांत आशयांतील रशिया व ब्रिटिश हिंदुस्थान या दोन विरोधी राज्यांमधील एक देश या नात्यानें अफगाणिस्तानला महत्त्व आलें आहे. १९ व्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षांत या देशासंबंधी आपली माहिती बरीच वाढली व याच्या उत्तर, पूर्व व दक्षिण सरहद्दी बारकाईनें कायम करण्यांत आल्या. दुसर्‍या अफगाण युद्धामुळें या देशाची विस्तृत प्रमाणावर शास्त्रीयरीत्या भूगोलविषयक पाहणी करतां आली. १९८४-८६ मधील रुसो-अफगाण कमिशननें याची उत्तर सरहद्द निश्चित करुन नकाशा काढला. १८९३ मधील डुरँड करारानें दक्षिण व पूर्व सरहद्दीवरील पठाण टोळ्या अलग करण्यांत आल्या. पामीर कमिशननें (१९८५) याची ईशान्य सरहद्द ठरविली. अखेरीस १९०४-१९०५ मधील इराणीलुबची कमिशननें याची पश्चिमेकडील सरहद्द ठरविली.

प्रांत.-या देशाचे चार प्रांत आहेत. (१)उत्तर अफगाणिस्तान अथवा काबूल. (२) दक्षिण अफगाणिस्तान अथवा कंदाहार, (३) हिरात, (४) अफगाणी तुर्कस्तान, व घिलजाई, हझारा, गिझनी, जलालाबाद, काफरिस्तान यांसहित. नद्यांच्या पात्रांमुळें हे विभाग ठरविलेले आहेत. या देशांत मुख्य चार नद्या आहेत. (१) काबूल, (२) हेल्मंड, (३) हरिरुड व (४) ऑक्सस. हा देश मुख्यत्वेंकरून डोंगराळ आहे, परंतु चांगली लागवड केलेलें व पाट बंधार्‍याचे पाणी दिलेले असे कांहीं प्रदेश आहेत. या भागांत इतकीं विपुल फळें होतात कीं तीं बाहेर देशीं रवाना करतात. अफगाण लोक फार कुशल शेतकरी आहेत व पाणी पुरवठ्याचा जितक्या म्हणून नैसर्गिक सोयी आहेत त्यांचा ते चांगला उपयोग करून घेतात. पाटबंधार्‍याच्या व्यावहारिक शास्त्रांत चिनी लोकच त्यांचेवर वरचढ करूं शकतात.

प र्व त:- या देशांतील मुख्य पर्वंत हिंदुकूश, कोहिबाबा व फिरोझ पठार हे होत. सफेत कोहचें सर्वांत उंच शिखर शिकराम हें १५६०० फूट उंच आहे.

भू स्त र.- सितोपल (क्रेटॅसियस) काळांत जेव्हां हिंदुस्थानचें द्वीपकल्प मादागास्कर व दक्षिण आफ्रिका यांचेशीं जमिनीच्या एका पट्ट्यानें जोडलेलें होतें तेव्हां बलुचिस्तान, अफगाणिस्तान व इराण हे देश एकसारखे समुद्राचे खालीं नव्हते परंतु कोठें जमीन कोठें पाणी असे फेरफार दाखवीत असत. या सितोपल (क्रेटॅसियस) काळाच्या अखेरीस बर्‍याच सृष्टिविषयक घडामोडी घडून आल्या. त्यामुळें हिमालय पर्वत वर उंच झाला. तृतीयावस्थाक काळाचा बराच काळ लोटल्यानंतर अफगाणिस्तानचा भूप्रदेश समुद्रसपाटीचेवर आला. यानंतर समुद्राचें पाणी हळूहळू मध्य आशियाच्या खांचखळग्यांत गेलें.

र स्ते व घां ट- खैबर, कुरम व टोची हे मुख्य घांट आहेत. काबूल व जलालाबाद यांचेमध्यें दोनरस्ते आहेत. पहिला लाटाबंद घांट व दुसरा खुद्द काबूल घांट. पेशावर व काबूल यांचे मध्यें खैबर घांट आहे. गोमल घांट हा हिंदुस्थान व अफगाणिस्तान यांचेमधील मुख्य व्यापाराचा रस्ता आहे. हिरात, काबूल व कंदाहार यांचेमधील रस्ते हे देशांतर्गत दळणवळणाचे मार्ग आहेत.

वृ क्ष व व न स्प ती :- आफगाणिस्तानांत ओक, फर, यू व सिडर जातींचीं झाडें आढळतात. तसेंच ज्या भागांत ओक झाडें आहेत तेथें बदाम अक्रोड वगैरे झाडें होतात.

सफेद कोह पर्वतावरहि अशींच अरण्यें आहेत. ६००० ते १०००० फूट उंचीवर नेचे (फर्न्स) व पुष्कळ शेवाळाचे प्रकार आढळतात. ३००० ते ६००० फूट उंचीवर जंगली आलिव्ह वगैरे अनेक झाडें होतात. हिरातच्या प्रदेशांत हिवर (पॉलर), वाळुंज (विलो), तुती (मलबरी), अक्रोड, अप्रिकट सफरचंद, पिअर, पीच यांची लागवड करतात. तसेंच द्राक्षांचे वेल पुष्कळ असतात. या शिवाय अनेक तर्‍हेचीं झाडें या प्रदेशांत वाढतात.

ओसाड मैदानांत झाडें फार दुर्मिळ आहेत. दूर अंतराअंतरावर झुडुपें मात्र दृष्टीस पडतात. वसंत ऋतूंत मात्र हा देखावा सर्व बदलून जातो व पूर्वींचे ऋक्षप्रदेश लाल, पांढरे व पिवळे ट्युलिप, लिली, वगैरे फुलांचा गालिचा धरणीवर हंतरला जातो.

प्रा णी.- हरिरूड व मुधीबच्या जंगलांत वाघ व चित्तो सांपडतात. लांडगा, तरस आणि कोल्हा सर्वत्र आढळतो. बहुतेक नद्यांत ओटर सांपडतात. कंदाहार व पश्चिम अफगाणिस्तान या प्रदेशांत रानटी गाढव व एका जातिचे हरीण (gazelle) मिळतात. पिंगट अस्वल आणि रानटी कुत्रा हे हिंदुकुश पर्वतांत असतात.

अफगाणिस्तानांत सर्वत्र सर्प विपूल आहेत. पुष्कळसे सर्व हिरव्या रंगाचे असून १॥ फूट लांग व बरेच जाड असतात. हे निरुपद्रची असून पांढर्‍या मुंग्यांचा संहार करणारे आहेत; रेजिस्तानमध्यें एक जातीचा सर्प आढळतो तो फार विषारी असतो. उष्ण प्रदेशांत हिंदुस्थानांत सांपडणार नाग पुष्कळ आहेत.

ह वा मा न.- अफगाणिस्तानची हवा उंचीच्या मानाप्रमाणें निरनिराळ्या प्रकारची आहे. ५००० फुटांवर हिवाळ्यांत थंडी फार दु:सह असते. गझनी येथें तीन महिने बर्फ पडत असतें व उष्णतामापक यंत्रामध्यें पारा शून्य अंशाखालीं १०-१५ अंश उतरतो. हझाराप्रांतामध्येंहि हिंवाळा तितकाच प्रखर असतो व काबूलमध्यें मात्र कांही अंशाने कमी असतो.

उन्हाळ्यांत उष्णताहि तितकीच प्रखर असते. काबूल जरी ५७८० फूट उंचीवर आहे तरी तेथें उष्णतामान ९० ते १०० अंशावर असतें. हिरात येथें उन्हाळा कमी असतो. उन्हाळ्यांत येथें पाउस क्वचितच पडतो.

पावसाचें सरासरी मान ११ इंच असतें व पुष्कळसा पाऊस मार्च व एप्रिल महिन्यांत पडतो. ज्यानुआरी महिन्यांत सरासरी ३१. ४’ मे महिन्यांत ६७. ४’ जुलै महिन्यांत ७२२’ व नोव्हेंबर ५१. २’ उष्णतामान असतें.

लो क व स्ती.- सध्याचें अफगाणिस्तान हे पाशयन साम्राज्याचे एरिया, बॅक्ट्रिया, ड्रान्गीआना, आराकोशिया, परोपामिसस या प्रांतांचें झालेलें आहे. या सर्व प्रान्तांवर त्यावेळीं इराणी सुभेदार असत.

अफगाणिस्तानचे रहिवासी भिन्न राष्ट्रांचे व भिन्न जातींचे लोक असून त्यांचे हितसंबंध परस्परविरुद्ध व महत्त्वाकांक्षा परस्पर विघातक आहेत. फक्त ते एकाच मुसुलमानी धर्माचे आहेत. तरीपण त्यांच्यांत शिया व सुनी असे दोन पंथ आहेत. येथील लोकसंख्या सुमारें ४५-५० लाख यांच्या दरम्यान असावी. यांचे पूर्वज तुर्कइराणी (Turko-Iranian) जातीचे असून यांत सेमेटिक रक्ताची थोडीशी भेसळ झाली असावी.

दुराणी लोक राज्यकर्ते आहेत. व ते व गिलचे मिळून १५ लाख असावेत. गिलच्यांची वस्ती विशेषत: कंदाहारच्या उत्तरे कडील पठारावर आहे.

ताजीक लोकांची संख्या सुमारें ९०००० आहे. त्यांच्या खालोखाल हजार लोक होत. त्यांची वस्ती ५०००० आहे. उझबेग लोक ३००००० आहेत.

किझिबशिस लोक ५०००० आहेत. हे पूर्वींचे तुर्क लोक असून ते पूर्णपणें पर्शियन बनले. हे लोक इ. स. १७३७ मध्यें नादीरशहाबरोबर अफगाणिस्तानांत आले.

हिंदी लोकांची संख्या सुमारें ३५००० आहेत. तसेंच साफि, काश्मिरी, सिंधी, लघमानि, अरब, सैय्यद, पराकास, आणि काफिर या लोकांची वस्तीहि थोडीथोडी आहे.

भाषा - अफगाण लोकांची भाषा पस्तु (Pashtu) अथवा पक्तु ही आहे व ती आर्यन इन्डोइराणि भाषेपासून झालेली असावी. यावरूनच अफगाण लोकांनां पठाण म्हणण्याचा प्रघात पडला.

पर्शियन ही कांहीं बाहेरील आलेल्या लोकांची भाषा आहे. पण सध्यां तीच सर्व लोकांची भाषा होऊं पाहते आहे व दरबारची भाषा तीच आहे. जलालाबाद जिल्ह्यामध्यें लघमानी भाषा बोलतात- अफगाण व बलुचिस्तानच्या सरहद्दीवरील मुलखांत बलुची भाषा चालते.

पस्तु भाषेंतील सर्वांत जुना ग्रंथ म्हटला म्हणजे युसुफझइ लोकांचा नायक शेक मली यानें लिहिलेला स्वत:च्या विजयाचा इतिहास होय.

अकबराचे कारकिर्दींत बयाझिद अन्सारी व अफगाण साधू अखुंद दर्वेझा यांनी हि पस्तुभाषेंत ग्रंथ लिहिले आहेत. अबदुर रहमान हा फार प्रख्यात कवि होता. दुसरा कवि खुशाल खान हा होता. अहमद शहा राजा यानेंहि कविता केली होती. पोवाडे असंख्य आहेत.

स्व रू प  व  स्व भा व.- अफगाण लोक सशक्त, सुंदर, गौरवर्णी व दिसण्यांत सुरेख असतात. मरण ही त्यांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट असते. ते हल्ला करण्यांत मोठे धाडसी असतात पण अपयशानें त्यांचा धीर तेव्हांच खचतो ते घातकी व खुनशी असतात. त्यांच्या बायका यहुदी लोकांच्या बायकांप्रमाणें सुंदर असतात व त्यांचे अवयवांची ठेवण यहुदी बायकांप्रमाणेंच असते. ते आदरातिथ्य उदारमाननें करतात. त्यांच्यांत एक असा नियम आहे कीं, शरण आलेल्यास मग तो आपला शत्रू कां असेना आपला जीव गमावून देखील जीवदान दिलें पाहिजें. पण हा नियम त्यांच्या आवाराच्या आंतच लागू असतो. एकदां तो इसम बाहेर पडला म्हणजे त्याचा संकटांतील मित्रच त्याला पहिल्यानें भोसकण्यास मागें पुढें पहात नाहीं.

ध र्म - अफगाण लोकांनां त्यांच्या धर्माचें ज्ञान बेताचेंच असतें. ते त्याच्या मुल्लांच्या तावडींत विशेष असतात.

जादूटोणा, शकून, ज्योतिष वगैरेवर त्यांचा विश्वास फार असतो ते पिरांनां देव समजतात व त्यांनां संकटाचा परिहार करण्याची शक्ति असते असा त्यांचा पक्का विश्वास असतो.

अफगाण लोकांचा दफनविधि इतर मुसलमान लोकांच्याहून भिन्न नाहीं.

वि वा ह.- अफगाण लोकांत बायका विकत घेण्याची चाल आहे. त्यांच्या किंमतीचें प्रमाण नवर्‍याच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून असतें. ह्या चालीचा परिणाम असा झाला आहे कीं, अफगाणी स्त्रियांस त्यांचे पति जरी चांगल्या रितीनें वागवितात, तरी स्त्रिया ह्या कांहीं अंशीं पुरुषांच्या जंगम मालमत्तोप्रमाणें लेखिल्या जातात. पुरुषास आपल्या स्त्रीचा वाटेल तेव्हां आणि कांहीं एक कारण न सांगतां त्याग करितां येतो. परंतु स्त्रीला मात्र तसें करितां येत नाहीं. तिनें पाहिजे असल्यास त्या संबंधानें काजीकडे अर्जी करून आपली दाद मागावी. परंतु हा रिवाजहि फारसा दिसून येत नाहीं. नवरा आपल्या बायकोच्या पूर्वीं मरण पावला, आणि त्याची विधवा स्त्री पुनर्विवाह करण्यास इच्छित असली, तर तिजसाठीं नवर्‍यानें लग्नसमयीं जें द्रव्य खर्चिलें असेल, तें नवर्‍याचे वारस तिजपासून परत घेतात; व तें तिनें दिल्यावर तिला पुनर्विवाह करण्याची मोकळीक होते. परंतु, इस्त्रायलांप्रामणें अफगाण लोकांतहि गतभर्तृकेशीं तिच्या दिरास लग्न लावावें लागतें; आणि जर कोणी तिर्‍हाईत पुरुष दिराच्या सम्मतीवाचून त्याच्या गतभर्तृका भावजयीशीं लग्न लावील, तर त्यानें त्या दिराचा फार भयंकर गुन्हा केला असें समजतात. तत्रापि, कोणाहि विधवेस तिच्या मर्जीविरुद्ध, आणि जो पुरुष तिला आवडत नसेल त्याशीं लग्न लावण्याची फरज पाडीत नाहींत. उलट तिला संतती असून जर ती वैधव्यांत राहण्यास कबूल असेल, ती तिचें तसे करणें फार पसंत समजलें जातें.

वि वा ह का ल.- सर्व अफगाणिस्तानांत, अनुक्रमें विसावें आणि पंधरापासून सोळावें वर्ष हा मुलामुलींचा योग्य विवाहकाल समजला जातो. परंतु ज्याला स्त्री खरेदी करण्याचें सामर्थ्य नसतें, असा पुरुष वेळेनुसार चाळीस वर्षांचा होईपर्यंत देखील अविवाहित राहतो. तसेंच वर न मिळाल्यामुळें कधीं कधीं स्त्रियाहि पंचवीस वर्षांच्या होईपावेतों 'बेगम' राहतात. जे श्रीमान् आहेत, त्यांना द्रव्याची कमताई नसल्यानें ते आपलीं मुलें वयांत येण्यापूर्वींच त्यांना बायका करून देतात. शहरांत राहणार्‍या लोकांमध्यें मुलगा पंधरा वर्षांचा आणि मुलगी बारा वर्षांची झाल्यावर, किंवा खर्चाचें सामर्थ्य असल्यास ह्या वयापूर्वींहि त्यांचीं लग्नें करण्यांत येतात. अफगाणिस्तानच्या पश्चिम भागांतील लोकांत मुलगा पूर्ण वयांत येऊन त्याची दाढी वाढल्याखेरीज त्याचा विवाह करीत नाहींत. गिलचे लोक तर ह्यापेक्षांहि उशीरां लग्नें करितात. तथापि, ठोकळ मानानें पाहूं जातां, एकंदर अफगाणांत पुरुषांचा विवाह हा त्याच्या अंगी स्त्री संपादन करण्याचें व कुटुंब पोषण करण्याचें सामर्थ्य येण्यावर अवलंबून असतो.

श री र सं बं ध- हे लोक शक्य असेल तेथपर्यंत आपापल्या जातींमध्यें शरिरसंबंध करितात. परंतु न जमल्यास पुरुष, इराण वगैरे अन्य देशांतून स्त्रिया करून आणितात; व तसें करण्यास त्यांना कोणताहि प्रत्यवाय नसतो. परंतु अफगाणांतील मुलगी परक्या देशांत देणें, हें मात्र फारच गौण समजलें जातें. सबब तद्देशीय संभावित गृहस्थ, किंबहुना कोणीहि दुराणी मनुष्य आपली मुलगी परदेशीं देण्यास कधीं हि कबूल होत नाहीं!

सो य री क ज म वि ण्या ची री ति - शहरांतून स्त्रिया पुरुषांच्या दृष्टीस मुळींच पडत नाहींत. त्यामुळें नागरिक अफगाणांचीं लग्नें बहुतकरून स्त्रीमध्यस्तांच्या द्वारें आणि युक्तिप्रयुक्तिनें जमविण्यांत येतात. अमुक एका गृहस्थाची मुलगी उपवर आहे असा एखाद्या अविवाहित पुरुषास सुगावा लागला, म्हणजे तो आपल्या नातलग स्त्रीस अथवा शेजारीण बाईस त्या मुलीच्या घरीं पाठवितो, व तिच्या मार्फत त्या बेगमेची एकंदर माहिती मिळवितो. त्या स्त्रीनें केलेल्या वर्णनावरून ती बेगम त्यास पसंत पडली, तर तो त्याच स्त्रीस आपलें लग्न जमवून देण्याबद्दल विनंति करितो. मग ती बाई मुलीच्या आईची भेट घेते; आणि मुलीचे वाडवडील तिला त्या मनुष्यास देण्यास कबूल होतील किंवा कसें, ह्याबद्दल खुलासा काढते. जर मुलीच्या वडिलांस ती गोष्ट मंजूर होईल असें कळलें, तर मग मध्यस्थ बाई त्यांचपाशीं उघड रीतीनें मुलीची मागणी करिते; आणि चारचौघांच्या विचारानें तें लग्न जमविण्याचा दिवस मुकरर करून परत येते. नंतर नेमिलेल्या दिवशीं मुलाचा बाप आपल्या कित्येक इष्टमित्रांसह मुलीच्या बापाकडे जातो. त्याचप्रमाणें मुलाची आईहि कित्येक स्त्रियांसह मुलीच्या आईकडे जाते; आणि तो वरपक्ष औपचारिक रीतीनें वधूची मागणी करितो. अर्थात् ती कबूल केली जाते. मग वरपक्षाकडून वधूला एक आंगठी, शाल, वगैरे वस्तूंचा नजराणा देण्यांत येतो; आणि वरपिता कन्यापित्याला मोठ्यानें परंतु विनयपूर्वक म्हणतो कीं, ''माझा मुलगा मी आपल्या सेवेस हजर करितों त्याचा आपण स्वीकार करावा.'' ह्या त्याच्या म्हणण्यास कन्यापिता 'मुबारिक बौषद्' म्हणजे “हा संबंध मंगलप्रद होवो!'' अशा अर्थी आपला रुकार देतो. नंतर कुराणांतील फातेहा नामक कलमांचें पठण होऊन, व त्या भावी जोडप्याचें कल्याण होण्याविषयीं ईश्वराची प्रार्थना करून उभयपक्ष एकमेकांस मिठाई वांटितात; आणि मुलीचा बाप आपल्या भावी जामातास कांहीं किरकोळ वस्तूंचा नजराणा देतो. ह्या कृत्यानें उभयपक्षीं लग्न करण्याचा निश्चय झाला, असें समजलें जातें, व तें झाल्यानंतर पुष्कळ दिवसांनीं लग्नसमारंभ करण्यांत येतो.

अं द ण दे ण्या च्या व स्तू आ णि उ ल ट हुं डा-सगाई आणि शादी याच्या दरम्यान जी मुदत असते, तींत मुलीचा बाप मुलीबरोबर आंदण देण्याच्या संसारोपयोगी वस्तू तयार करून ठेवितो. ह्या वस्तू म्हणजे सतरंज्या, ताटें, धातूचीं भांडीं, अंगावर घालण्याचे कांही दागिने वगैरे होत. त्याचप्रमाणें तिकडे नवरा नवरीला देण्याच्या उलट हुंड्याची रकम जमवून ठेवीत असतो. अर्थात ही उलट हुंड्याची रकम म्हणजे नवरीच्या बापास नवरीबद्दल देण्याची किंमतच होय. ही किंमत त्यास आंदण मिळणार्‍या वस्तूंच्या किंमतीपेक्षां कितीतरी पटीनें अधिक असते, हें सांगणें नकोच! नवरीच्या किंमतीशिवाय, नवर्‍यास आपल्याला राहण्यासाठीं एखादें घर, आणि इतर आवश्यक वस्तूंचा संग्रह करावा लागतो. तो गरीब स्थितींत असला, तर त्या बिचार्‍यास ही तयारी करण्यास एखादें दुसरें वर्षहि लागतें. परंतु श्रीमान् असल्यास अल्पावकाशांत सर्व सिद्धता होऊन नंतर मुसुलमानी रिवाजाप्रमाणें एकाद्या दिवशीं टोलेजंग लग्न समारंभ करण्यांत येतो.! [अलोनीकृत ''लग्नविधि व सोहाळे.'']

मुसुलमानी कायदा एकापेक्षां जास्त बायका करण्यास आडकाठी करीत नाहीं. श्रीमंत लोक चार चार बायका करून शिवाय दासी व रखेल्या बाळगतात. कोणत्याहि बाईला एके वेळेस एकापेक्षां जास्त नवरे नसतात. गुलामगिरी अजिबात नाहींशी झाली आहे.

रा ह णी - अफगाण लोकांनां फार साध्या रीतीनें राहवें लागतें, व वर्षांतून सहा महिने ते फळावर राहतात. मक्केकडे तोंड करून प्रार्थना म्हणत मारलेल्या बकर्‍याच्या मांसाशिवाय ते दुसर्‍या मांसास शिवत नाहींत. श्रीमंत लोक गहूं व तांदूळ खातात. गरीब लोक क्रुट नांवाची खीर करून खातात.

पो शा ख - अफगाण लोक आंत खमीस घालून वर चोगा घालतात. डोक्याला तांबडें किंवा निळें पागोटें असतें. श्रीमंत लोकांचे कपडे लोकर किंवा रेशीम यांचे असतात, बाकी तर्‍हा तीच असते. सध्यां सरदार व हुद्देदार लोक यांचेमध्यें यूरोपियन पेहराव करण्याची चाल बळावत चालली आहे.

घ रें- घरें बाधण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली तीच आहे. घरें उन्हांत वाळविलेल्या विटांचीं असतात. तीं एक मजली असून घराच्या सभोंवार उंच भिंत असते.

क र म णु की :- या लोकांचें आवडतें कर्मणुकीचें साधन म्हणजे शिकार होय. ती कुत्रे बरोबर नेऊन पाठलाग करून करतात किंवा बंदुकीनें गोळी मारून चालते किंवा बहिरी ससाण्याच्या साह्यानें करण्यांत येते. शर्यतीचा प्रचार पुष्कळ आहे. तसेंच कुस्ती (दंगल) व इतर ताकतींचे खेळाबद्दल या लोकांस आवड आहे. एडक्याच्या किंवा उंटांच्या टकरा लावण्यांत येतात. सर्व प्रांतांत बुद्धिबळाचा डाव खेळतात. व गोट्या लहान मुलें तसेंच म्हातारेहि खेळतांना आढळतात.

रो ग रा ई :- हवेच्या दोषामुळें पुष्कळ प्रकारच्या तापांच्या सांथी उद्भवतात. संधिवात व पडसें पुष्कळ लोकांना पीडा देत असतात.

तसेंच गरमी, गंडमाळा, मुतखडा, त्वचेचे व डोळ्यांचे रोग फार प्रचारांत आहेत. गेल्या २० वर्षांत तीन सांथी महामारीच्या उपद्रवाच्या आल्या होत्या.

जा ती :- अर्वांचीन अफगाणिस्तानांत रहाणार्‍या सर्व लोकांस हिंदुस्थानचे लोक पठाण असें म्हणतात; परंतु पुक्तु भाषा बोलणार्‍या लोकांनाच अफगाणिस्तानचे लोक पठाण असें समजतात.

पॅ क्टि अ न अ थ वा प ठा ण :- पुक्तान या मूळ शब्दाचें हिंदुस्थानीभाषेंत पठाण असें रूपांतर झालें आहे. ग्रीक इतिहासकार ज्यांना पॅक्टिअन (ऋग्वेदांत उल्लेखिलेले पक्थ हेच या पॅक्टिअन अथवा पठाणांचे पूर्वज होत.) असें म्हणतात, ते पॅक्टिआन व हल्लींचे पक्तुन किंवा पुक्तुन हे एकच असावे. पॅक्तिया या शब्दांत बराच चमत्कार आहे. आरमेनिया प्रांतांत याच नांवाचा एक देश आहे असें हिरोडोटस म्हणतो. व हेंच नांव दक्षिण यूरोपांतील देशामध्यें शोधून काढणें अवघड नाहीं.

हिरोडोटसनें ज्याचा उल्लेख केला आहे तो पॅक्टिया प्रांत सिंधच्या सरहद्दीवर होता व त्याचें क्षेत्रफळ हल्लींच्या पुक्तुनखवाच्या क्षेत्रफळाइतकेंच आहे. पुक्तुनखवा यास रोह असेंहि म्हणत व रोह व कोह म्हणजे पर्वत हे एकाच अर्थांचे शब्द असल्यामुळें तेथें रहाणार्‍या लोकांना रोहिले असें म्हणतात.

पॅक्टियामध्यें गन्दारी वगैरे चार राष्ट्रें होतीं. या देशाला इराणी लोक आर्यावर्त, ग्रीकलोक अरिअन असें म्हणत; नंतर याला खुरासन व हल्लीं अफगाणिस्तान असें म्हणतात. बॅक्ट्रिआ, मारगिआना वगैरे याचे मुख्य भाग होते. बॅक्ट्रिआसच हिंदुलोक बाहूलीक म्हणत. सिंधूनदचा वरचा भाग व ऑक्ससचा वरचा भाग यांमधील प्रदेशास बाहुलीक असें म्हणत असत.

हल्लींची सुलेमान पर्वताची ओळ आणि सफेद कोह यांमध्येंच पॉक्टिआ प्रांत (मुसलमान इतिहासकार याला रोह असें म्हणतात) मोडत असे. पॅक्टिआसच हल्लीं पुक्तुनख्वा असें म्हणतात. व हेंच पठाण लोकांचें मूळ ठिकाण होय. अफगाण, घिलझी, वझीरी, काकर वगैरे लोकांची पुक्तुन किंवा पठाण लोकामध्येंच गणना केली जाते.

ग न्धा री- गन्दारियन किंवा गन्धारी हे काबूल व सिंधुनद यांमधील प्रदेशांत रहात असत. गन्दारिया व सिंधू गन्धार हे प्रदेश पेशावर दरी व तिच्या सभोंवती असलेल्या टेकड्या यांमध्यें मोडतात.

पांचव्या किंवा सहाव्या शतकांत उत्तरेकडून पुष्कळ सिथिअन अथवा शक लोक आल्यामुळें, गन्दारिया किंवा गन्धारांत रहाणार्‍या लोकांनीं देशत्याग केला व हेलमन्द नदीच्या तीरावर वसाहत केली व एक शहर स्थापून त्यास त्यांनीं गन्धार असें नांव दिलें. हे लोक बौद्धधर्मी होते; त्यांनीं आपल्या धर्माचें पवित्र स्मारक म्हणून बुद्धाचें जलपात्र बरोबर नेलें. त्यांनी सुमारें दोनशें वर्षेपर्यंत आपलें स्वातंत्र्य व धर्म यास धक्का लागूं दिला नाहीं.

या लोकांशिवाय त्या ठिकाणीं दुसर्‍या कित्येक जातींचे लोक रहात असत; परंतु त्या संर्वामध्यें हे लोक प्रमुख होते. हे लोक येण्याच्या पूर्वींपासून तेथें पर्शियन, शक, तैमनी वगैरे जातींचे लोक रहात.

गन्धार किंवा कन्दाहार येथें अनेक हिंदु लोक रहात असत; परंतु कालावधीनें त्यांनीं इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यामुळे त्यांचें राष्ट्रीयत्व नष्ट झालें. फक्त त्यांचीं आनुवंशिक नांवे कायम राहिलीं.

गन्दारियन अथवा गान्धार लोकांचे शेजारी अफगाण लोक यांनीं दक्षिण अफगाणिस्तानच्या रहिवाश्यांस जिंकून त्यांना महमदी धर्म स्वीकारण्यास भाग पाडलें व ते बलाढ्य असल्यामुळें आपल्या प्रजेस त्यांनीं स्वत:चें नांव देऊन व विवाहद्वारा त्यांच्याशीं मिसळून आपली भाषा व आपल्या चालीरीती त्यांनीं तेथें सुरू केल्या. अफगाणिस्तानांतील निरनिराळ्या रहिवाशांस साधारणत: अफगाण असें म्हणतात.

पश्चात गन्दारियन लोकांचा अफगाण लोकांशीं एकजीव झाला व आतां त्यांस पक्के मुसुलमान असें समजलें जातें.

पंधराव्या शतकांत तैमूरचा नातू मिर्झाउलुख बेग हा काबूल येथें राज्यकारभार पहात असतां धर्मांतर केलेले बौद्ध व अफगाण झालेले गन्दारियन लोक हे सिंधु नदाजवळील आपल्या पूर्वींच्या प्रदेशांत परत आले. युसुफ्झी किंवा मन्दर व अफगाणांच्या महमन्द जातीचे लोक सुमारें चारशें वर्षांपूर्वीं ध्वारा, मर्घा, तारनक व अर्घासन या नद्यांजवळ रहात होते. व तारीन जातीचे लोक पेशीनच्या दरींत रहात होते. परंतु तारीन लोकांचा प्रदेश सुपीक नसल्यामुळें, त्यांची मन्दर व महंमद लोकांशीं भांडणें होऊन, मन्दर व महमन्द लोकांनां आपल्या देशास मुकावें लागलें.

नंतर मन्दर व महमन्द लोक हे पेशावरच्या दरीकडे (प्राचीन गन्धार) गेले. नंग्रहार यासच हल्लीं जलालबादची दरी हें नांव आहे. त्याठिकाणीं या दोन्ही जातींचे लोक कांही दिवस राहिल्यानंतर ते निरनिराळ्या मार्गानें पुढे गेले. युसुफ्झी किंवा मन्दर व मलोइ या जातींचे लोक पुर्शोर म्हणजे पेशावर येथें खैबरच्या मार्गानें गेले.

द ला झ क - थोड्याच दिवसांनीं हे अफगाण लोक व तेथील रहिवाशी यांचे भांडण झालें. युसुफ्झी लोक या मूळच्या लोकांस दलाझक जातींपैकीं काफीर असे म्हणत. हे दलाझक सिथिअन जातीपैकीं असावेत. व ज्या वेळीं जाठ व कांहीं लोकांनीं पांचव्या किंवा सहाव्या शतकांत येथें येऊन गन्दारियन लोकांनां पिटाळून दिलें त्यावेळीं हे दलाझक लोक त्या ठिकाणीं आले असावेत. कारण दलाझक व जाठ या लोकांनीं एकत्र होऊन पेशावरची दरी व्यापून टाकिली होती. तेथील जाठ लोकास गुजर असें म्हणतात. जनावरें पाळणें, जमनीची लागवड करणें हे गुजर लोकांचे धंदे आहेंत. सिंधु नदीपासून जेव्हां दलाझक लोकांनां हांकून देण्यांत आलें तेव्हां पंजाबच्या जाठ लोकांनीं त्यास आश्रय दिला.

महमूदगझनीच्या वेळेपासून दलाझक मुसलमान झालेले आहेत. त्यांनीं पेशावरावर स्वारी करून तेथील लोकांस हांकून दिलें. तेथें त्यांचें प्रस्थ बरेंच वाढलें. परंतु अखेरीस मिर्झाउलूघ बेगच्यावेळीं युसुफ्झी व महमन्द या लोकांनीं त्यांचा पराभव करून त्यास हुसकून दिलें.

सतत सहा वर्षेंपर्यंत दलाझक लोकांशीं झगडून युसुफ्झी लोकांनीं त्यास पिटाळून दिलें व त्यांचा प्रदेश आपल्या अंमलाखालीं आणिला. नंतर गन्धारी, हिंदकी व गुजर या लोकांशीं लढून, त्यांनीं उत्तरेकडेहि आपला अंमल बसविला.

यु सु फ्झी - वीस वर्षांत युसुफ्झीं लोकांनीं कांहीं लोकांचा समूळ नाश केला, कांहीं लोकांनां पिटाळून दिलें व कांहीं लोकांनां शरण येण्यास भाग पाडून व मुसुलमान धर्माची दीक्षा देववून त्यांस हिंदकी हें नांव दिलें. हें हिंदकी लोक पांचव्या शतकांत जाट वगैरे लोकांनीं पादाक्रांत केलेल्या गन्धारी लोकांपैकीं असून अफगाण जेत्यांचे नातलग असावेत. हांकून दिलेले दलाझक लोक आपला मुलूख परत मिळविण्यासाठीं एकसारखे प्रयत्‍न करीत होते; यामुळें युसुफ्झी लोकांनां चैन पडत नसे. शेवटीं जहांगीर बादशहानें त्यांचा बंदोबस्त केला. पेशावर, कच्छ, पाकली, धोलपूर वगैरे ठिकाणीं कांहीं दलाझक लोक आढळतात. पेशावर येथें या लोकांच्या दोन पोटजाती होत्या:-गारी व गौमत.

मोठ्या युक्तीनें युसुफ्झी लोकांनीं स्वात देश जिंकिला; तेथील लोक डोंगराळ प्रदेशांत पळून गेले व त्यांनीं गनीमी काव्यानें लढाई चालविली. परंतु दुष्काळामुळें स्वाती लोकांस शरण यावें लागलें. या लोकांनीं मुसुलमानी धर्म स्वीकारिला परंतु त्यांनीं आपलीं पूर्वींचीं नांवें बदललीं नाहींत.

यावेळीं महमन्द लोक काबूल व स्वात व या नद्यांमधील डोंगराळ प्रदेश (गन्धार) काबीज करीत चालले होते. गन्धारी लोकांबरोबर त्यांनां लढावें लागलें. व या लढाईंत महमन्द लोकांनां जय मिळून ते गन्धार येथें गेले.

नंतर त्यांनीं काबूल नदी ओलांडून डोंगराळ प्रदेशांत प्रवेश केला. महमन्द लोक फार रानटीपणानें वागल्यामुळें त्यांनीं जिंकलेल्या देशांतील लोकांनीं आपला देश सोडून दिला व काम आणि कतार (काफिरिस्तान) च्या किल्ल्यांत त्यांस आश्रय मिळाला.

कांहीं कालपर्यंत या गन्धारी लोकांनीं आपला धर्म सोडिला नाहीं; या लोकांनां मुसुलमान लोक काफिर असें म्हणत. हळू हळू या लोकांनां मुसुलमानी धर्माचें वळण मिळालें. व कांहीं लोक पक्के मुसुलमान झाले; परंतु कांहीं लोक काफीरच राहिले. ग्रिअर्सनला बर्‍याच अलीकडे काफरिस्थानांत हिंदु लोक आढळले. धर्मांतर केलेल्या गन्धारी लोकांचे साफी व गन्धारी असे दोन भाग झाले. हे लोक व स्वात व बाजवर पासून लुघमान व तागोपर्यंत पसरलेले आहेत. विश्वासू व उत्तम शिपाई अशी या लोकांची गणना केली जाते. यांनीं धर्मांतर केल्यामुळें हे धर्मवेडे आहेत. यांच्यापैकीं पुष्कळ लोक मुसुलमानी धर्माचे धर्मोपदेशक आहेत. स्वातचा प्रसिद्ध आखुंद (राजा व साधू) हा गन्धारीच होता. प्रसिद्ध मुल्ला मुष्का आलम हाहि एक आखुंदजादा आहे. या परत आलेल्या गन्धारी लोकांनीं आपल्या पूर्वजांचा मुलूख परत मिळविण्यासाठीं जी लढाई केली ती लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्या वेळची या लोकांची स्थिति व हल्लीं ब्रिटिश अंमलाखालीं असलेली त्याची स्थिति याचा तुलनात्मक दृष्टीनें विचार करणें बरेंच मनोरंजक आहे.

या अफगाण जातींच्या लोकांनां त्यांनीं केलेल्या स्वार्‍यामध्यें कोणीहि विशेष अडथळा केला नाहीं. खैबर जवळील नापीक प्रदेशांत हे युसुफ्झी लोक कांहीं दिवस स्वस्थ राहिले. तेथील लोकाशीं याची भांडणें होऊन युसुफ्झी लोकांची सरशी झाली. ते लोक जरी नास्तिक होते तरी त्यांचे अधिकारी मुसुलमान असल्यामुळे त्यांनी युसुफ्झी लोकांस मदत केली व म्हणूनच त्यास जय मिळाला.

वीस वर्षांच्या अवधींत युसुफ्झी लोकांनीं तो देश पूर्णपणें जिंकिला. तो देश त्यांस फार सोईचा वाटला, परंतु बौद्ध अंमलाखालीं असलेली सुधारणा, व्यवस्था व भरभराट या वेळीं राहिली नाहीं. जुनीपुराणीं शहरें वगैरे या देशाच्या प्राचीन उत्कर्षाची साक्ष पटवितात. सावलधर, शाहरी, बहलोल वगैरे ठिकाणची खोदींव कामापासून बरीच माहिती उपलब्ध होते व हिंदु कारागिरांस ग्रीक लोकांपासून शिक्षण मिळालें असावें असें वाटतें. स्वात, बाजावर, बुनर वगैरे ठिकाणीं अनेक जुनीं स्मारकें आहेत व तीं प्राचीन उत्कर्षाचीं द्योतक आहेत. मुसुलमानी धर्म सुरू झाल्याबरोबर ती पहिली स्थिति पार बदलून गेली.

दहाव्या शतकाच्या शेवटीं व अकराव्या शतकाच्या प्रारंभीं तुर्क घराण्याचा पहिला सुलतान महमूद गझनी यानें तेरा चवदा स्वार्‍या गन्धार देशावर केल्या. तो मूर्तिविध्वंसक होता. शहरें जाळणें व लोकांची कत्ताल करणें हा त्याचा मुख्य धंदा होता. गन्धार देशाचा यानें पूर्णपणें नाश करून टाकिला. व सर्व देश ओस पडल्यामुळें, वन्य पशूचें तें वसतिस्थान झालें.

पंधराव्या शतकांत मिर्झा उलूघ बेग हा काबूल येथें राज्यारूढ असतांना युसुफ्झी लोकांनीं जेव्हां तो देश जिंकण्याचें ठरविलें तेव्हां त्या देशाची स्थिति अशा प्रकारची होती. परंतु त्यांनीं तो देश सुधारून इतक्या भरभराटीस आणिला कीं सोळाव्या शतकामध्यें बाबर बादशहा जेव्हां दिल्लीस गेला त्यावेळीं त्या देशास बरेंच महत्तव होतें. बाबर यानें त्या लोकांशीं तह करून त्यांच्या पुढार्‍याच्या मुलीशीं लग्न करून त्यांचें कांहीं सैन्य आपल्याला मदत म्हणून आपल्या बरोबर घेतले. बाबर यानें पेशावरच्या दरींतून जात असतांनां घडलेल्या कांहीं मनोरंजक गोष्टी लिहून ठेविल्या आहेत व वाघ वगैरे हिंस्त्र पशूंची शिकार केल्याची हकीकतहि दिली आहे.

कांहीं देशांत तेथें राहणार्‍या प्रांण्यांच्या नांवांवरून नांवें पडलेलीं आढळतात. परंतु केवळ नावावरून कोणतेंहि अनुमान काढणें हे धोक्याचें आहे. युसुफ्झी हे अफगाणांमध्यें आपली गणना करितात व ते आपल्याला बेनी इस्त्रायल असें म्हणवितात. त्यांच्या नांवाचा अर्थ ''जोसेफचे वंशज'' असा होतो. व त्यांच्या देशास इस्त्रायल नांवेहि दिलेली आढळतात.

युसुफ्झी लोकांची लोकसंख्या बरीच वाढली व कांहीं ओसाड प्रदेशाची त्यानीं लागवड केली. परंतु त्यांच्या शेजारीं राहणार्‍या खत्तक जातीशीं त्याचे तंटेबखेडे झाले. हे खत्तक लोक जरी पठाण होते तरी ते अफगाण नव्हते. खत्तक लोकांनीं बरेंच यश संपादिलें. परंतु अखेरीस युसुफ्झींच्या हल्ल्यापासून आपला बचाव करण्यासाठीं त्यांस काबूल नदीच्या पलीकडे जावें लागलें; परंतु तेथेंहि त्यांचा बचाव न झाल्यामुळें त्यांनीं जमालगढीं येथें आपलें ठाणें दिलें.

युसुफ्झी लोकांनीं शीख लोकांशी बरीच टक्कर दिली. परंतु त्यांना शेवटीं हार जावें लागलें. इ. स. १८४९ त पंजाब प्रांत इंग्लिशांनीं जिंकिला त्यावेळीं युसुफ्झी यांच्या ताब्यांत आले. त्यावेळेपासून त्याच्या देशात पुष्कळ सुधारणा झाली आहे; जिकडे तिकडे उत्तम रस्ते केले आहेत व जो प्रदेश पूर्वीं ओस होता त्या ठिकाणीं हल्लीं दाट वस्ती झाली आहे. व बराच भाग हल्लीं लागवडींत आणिला आहे व पूर्वींची युसुफ्झी लोकांची स्थिति आता अगदीं बदलून गेली आहे. पूर्वींप्रमाणें ते आतां त्रासदायक नाहींत. ते धनवान व चैनी आहेत व ते ब्रिटिश सरकारशीं राजनिष्ठेनें वागतात. इतर लोकांप्रमाणेंच ब्रिटिश सरकारच्या अंमलापासून या लोकाचें कल्याण झालें आहे.

आ फ्रि डी.- हिरोडोटसनें उल्लेखिलेल्या (२.९१) अपारीटीचे आफ्रीडी हे हल्लींचे वंशच आहेत. त्या देशाच्या पूर्वींच्या मर्यादा व त्या लोकांचा स्वभाव यांमध्यें आतां बराच फरक पडलेला आहे. सुफेद कोहचा सर्व भाग व उत्तर व दक्षिणेकडील त्याच्या पायथ्याकडचा सर्व प्रदेश यांमध्ये आंफ्रिडी देशाचा समावेश पूर्वी होत असे.

ओराक्झी व बँगश या जाती हल्लींच्या आफ्रिडी लोकांपैकींच आहेत. अफगाण लोक या जातींच्या लोकांनां घुरघुष्ट जातीपैकीं समजतात. पुक्तुभाषा बोलणार्‍या लोकांचा मूळपूरुष जो कैसचा तिसरा मुलगा, त्याच्या वंशजांपासून या घुरघुष्ट जातीची उत्पत्ति झालेली आहे.

आफ्रिडी, ओराक्झी, बंगश, तोरी, व झीरी वगैरे जातींचा तुर्कलान्री लोकांमध्यें समावेश होतो; व ते सुलेमानच्या उत्तरेकडे रहातात. तुर्कलान्री लोकांनां काराराई किंवा कारालान्री असेंहि म्हणतात. खत्तक जातीपैकीं दोघे भाऊ एका लष्कराच्या छावणींत गेले असतां, एकास तेथें लोखंडी स्वयंपाकाचें भांडें सांपडलें; पुक्तुभाषेंत त्यास कर्र्‍हाई असें म्हणत व दुसर्‍या भावास एक अर्भक सांपडलें; त्या मुलाला कराराई असें नांव दिलें व नंतर त्या शब्दाचें करालान्री असें रूपांतर झालें परकीयांनीं स्वारी करून या देशांत वसाहत केली होती असें या गोष्टीवरून व्यक्त होतें. तुर्क जातीच्या भिन्न भिन्न लोकांपासून या तुर्कलान्री लोकांची उत्पत्तिा झाली असावी. या तुर्क जाती सबक्तगीन व तैमूर यांबरोबर त्या देशांत आल्या; व त्या लोकांशीं मिसळून गेल्या. कांहीं तुर्क लोक सुलेमान पर्वतापाशीं येऊन राहिले असावे. कारण आरब लोकांनां तुर्क लोकांपासून अडथळा झाल्याविषंयीं इतिहासकार लिहितात. हा अडथळा ख्रिस्ती शकाच्या आठव्या शतकांत झाला.

ओराक्झी व बंगश यांनीं लवकरच स्थलांतर केलें; बंगश लोकांनीं कत्ती जवळ झुर्माल देशांत वसाहत केली. व तेथें ते फारमुली लोकांशीं भांडूं लागले; नंतर कालावधीनें घीलजी लोकांनीं त्यांस कुर्रामांत घालवून दिलें; तेथें तोरी लोकांशीं त्यांचे तंटे झालें व त्यामुळें त्यांनां मिरांझी व कोहात येथें जावें लागलें. नंतर कांही लोक हिंदुस्थानांत आले व ओराकझी व बंगश यांनीं अनुक्रमें भोपाळ व फरुखाबाद येथें वसाहती केल्या. हल्लींचा फरुखाबादचा नबाब व भोपाळची बेगम याच जातींपैकीं आहेत.

आफ्रिडी देशांत अनेक तुर्क जाती आल्यामुळें तेथील लोकांस सुफेद कोह व सिंध यांमधील प्रदेशांत यावें लागलें. दक्षिणेकडील भागांत ओराक्झी राहिले व बँगश लोकांनीं मिरान्झी व कुर्राम या दर्‍या व्यापून टाकिल्या. कुर्राम दरींतील तोरी लोक सिंधच्या उत्तरेकडून आले असावे; सुमारें साडेसहाशें वर्षांपूर्वीं अपारीतीच्या आसपास रहाणारे लोक अपारीती देशांत येऊन त्यांनीं खत्तक हे नांव धारण केलें.

हल्लींच्या आफ्रिडी लोकांच्या ताब्यांत फारच थोडा मुलूख आहे. सुफेद कोहचा दक्षिण भाग घीलजी, शिनवारी वगैरे लोकांच्या ताब्यांत आहे. हे शिनवारी लोक नादीरशहाच्या वेळीं इराणी शिखांनांबरोबर आले असें म्हणतात. या लोकांनीं पठाणांची भाषा व चालीरीती यांचा स्वीकार केला आहे. हे लोक कबूल व पेशावर यांमधील प्रदेशांत वाहतुकीचें काम करितात. शिनवारी लोक उत्तम शिपाई व धूर्त लुटारू म्हणून प्रसिद्ध आहेत.

सुफेद कोहचा दक्षिण भाग हल्लीं तोरी व खोस्तवाल यांच्या ताब्यांत आहे व काबूल व कुर्राम नद्यांमधील प्रदेश खत्तक लोकांकडे आहे. या देशाच्या नैर्ऋत्येकडील भागांत झीमुख्त लोक राहतात, हे लोक लुटारूपणाबद्दल प्रसिद्ध आहेत.

सामल व गार या दोन विभागांत आफ्रिडी, ओराक्झी, बंगश वगैरे सर्व जातींचा समावेश होतो. हे लोक जेव्हां इस्लामचे अनुयायी झाले तेव्हांपासून हे दोन भाग अस्तित्त्वांत आले. बौद्धधर्मी लोक सामलच्या बाजूला मिळाले व त्यांचे प्रतिस्पर्धी, मेजियन धर्माचे लोक, यांनीं 'गार' हा पक्ष उचलिला.

उद्योगी, शांत, विचारी व लोकांस त्रास न देणारे असे जे बौद्ध लोक त्यांचे आफ्रिडी हे वंशज असावे अशी क्कचितच कल्पना होते.

आफ्रिडी हे जरी आपणांस मुसुलमान म्हणवितात तरी त्या धर्माचीं मतें त्यांस पूर्णपणें अवगत नाहींत; इतकेंच नाहीं तर आपला उद्देश सोडून त्या तत्त्वांप्रमाणें वागण्यासहि ते तयार नाहींत.

आफ्रिडी हे पूर्वीं बौद्ध असोत किंवा अग्निपूजक असोत; परंतु हल्लीं ते रानटी स्थितीप्रत गेले आहेत. ते अगदीं अशिक्षित असून त्यांच्यावर कोणाचाहि अंमल नाहीं, ते लुटारू व गळेकापू आहेत, त्यांच्यापुढें कोणताहि उच्च हेतु नाहीं. हे बेइमानी व भयंकर शत्रू समजले जातात. खून व मारामार्‍या करून लुटालूट करणें हेंच त्यांचे ध्येय आहे.

हे जरी मुसुलमान आहेत तरी मुसुलमानी धर्मोपदेशकांस ते मान देत नाहींत, यामुळे धर्मोपदेशक त्यांच्याकडे जाण्यास धजत नाहींत व अशा प्रकारें यांची स्थिति हास्यास्पद आहे. एका मुल्लानें त्या लोकांस धर्मविधि पाळल्यापासून होणारे सर्व फायदे समजावून सांगितले व यात्रा करून तेथील सत्पुरुषांस कांहीं बळी देण्यास सांगितलें. नंतर त्यांनीं त्या मुल्लासच बळी दिलें व झियारत उभारिली व अशा प्रकारें तिरा येथें एक पवित्र मूर्ति स्थापन झाली. त्या लोकांची एवढीच काय ती पवित्र जागा आहे. कारण त्यांस अशा प्रकारची भक्ति आवडत नाहीं.

एकदां पेशावर येथील एका बड्या अधिकार्‍यानें कांहीं आफ्रिडी लोकांस आपल्या दरबारीं बोलाविलें होतें. या लोकांपैकीं एकजण दरबारांत प्रवेश करण्याच्या ठिकाणीं मोठ्या ऐटीनें येऊन बसला व तो अधिकारी आला असतां तो मनुष्य जाग्यावरून हालला सुद्धां नाहीं. तेव्हां त्या अधिकार्‍यानें ''मी कोण आहें हें तुला माहीत आहे कां'', असें विचारिलें; तेव्हां त्यानें उत्तर दिलें कीं, ''मीहि तुझ्याप्रमाणेंच ईश्वराचा एक प्राणी आहे.''प्राणी या शब्दाचें इराणी भाषेंत आफ्रिदा असें भाषांतर होतें. या वेळेपासून या लोकांस 'आफ्रिडी' हें नांव प्राप्त झालें.

आफ्रिडी लोकांचे आठ वर्ग आहेत ते येणेप्रमाणे:- कुकी खेल, मलिकदिन खेल, कंबर खेल कमार खेल, झक्का खेल (हा संख्येनें अतिशय मोठा व आडदांड असा वर्ग आहे.), सिपाह, अका खेल, आणि आदाम खेल. यांपैकीं पहिल्या सात जाती खायबर घाटाच्या आसपास रहात असून उन्हाळी महिन्यांत टिर्‍हाला प्रयाण करितात. अदाम खेल लोक (५९०० लढवय्ये लोक) कोहट घाटाभोंवतीं राहतात व ते जास्त स्थायिक व कमी चंचल आहेत. दिसण्यांत आफ्रिडी सुरेख, उंच, तालिमबाज असून त्यांचें नाक व गालाचीं हाडें उंच असतात व रंगहि गोरा असतो. आपल्या डोंगराळ जाती सुद्धां आफ्रिडी जगांतील उत्कृष्ट लढवय्याप्रमाणें शौर्य दाखवीतात. हिंदी सैन्यांत हे पहिल्या प्रतीच सैनिक ठरले आहेत; पण स्वदेशांतून दूर गेल्यास ते घरची खंत घेतात. यांचा स्वभाव क्रूर, लबाड व बेविश्वासी असतो अशी ख्याती आहे. आपला मुलगा पटाईत चोर व्हावा अशी अफ्रिडी आईची ईश्वराजवळ प्रार्थना असते असें म्हणतात. पण अठरा वर्षें खायबर घाटांत राहिलेल्या कर्नल सर रॉबर्ट वारबर्टनचें या लोकांबद्दल असें मत आहे कीं,''बाळपणापासूनच त्यांच्या परिस्थितींमुळें आफ्रिडी मुलगा सर्व मनुष्य जातीबद्दल अविश्वास बाळगण्यास शिकतो व पुष्कळ वेळां त्याचे जवळचे आप्त, त्यांच्या लहानशा उत्पन्नाचे कायदेशीर वारस त्यांचे कट्टे शत्रू होतात. तेव्हां मनुष्यजातीविषयीं बेविश्वास आणि स्वत:च्या जीवितरक्षणासाठीं पहिला घाव घालण्याची तयारी हे त्यांचे साहजिक सिद्धांत बनून जातात. आपण त्याचा अविश्वास घालविला व माया दाखविली म्हणजे तो आपणाविषयीं अतिशय भक्ति बाळगतो व शिव्याखेरीज करून कोणतीहि गोष्ट सहन करितो.'' आदरातिथ्य हा या लोकांत विशेष गुण आहे. बोलावलेल्या किंवा न बोलावलेल्या पाहुण्याचा ते नेहमीं सत्कार करून त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतात. पण एकदां कां यजमानाच्या घरांतून बाहेर पाऊल टाकिलें म्हणजें मात्र पाहुण्यानें स्वत:विषयीं फार जपलें पाहिजे; कारण यजमान कांहीं सहनशीलता धारण करण्यास बांधला गेला नसतो. सारांश, या लोकांच्या ठिकाणीं पठाणांचे सर्व गुणदोष जास्त प्रमाणांत वास करितात. आफ्रिडी लोकांत २७००० लढवय्ये आहेत असे म्हणतात. पण त्यांच्या गांवांची संख्या व आकारमान पाहतां हा आंकडा फार मोठा वाटतो. खायबर व कोहाट मार्गांवर यांचे वर्चस्व असल्याकारणानें यांना इतकें महत्त्व प्राप्त झालें आहे; व या दोन मार्गांच्या संबंधांतच ब्रिटिशांचा यांच्यांशीं संबंध आलेला आहे.

आफ्रिडी किंवा खैबारी यांनीं ब्रिटिशांनां फार त्रास दिलेला आहे. त्यांनीं केलेले खून, मारामार्‍या व लुटारूपणा यांमुळें ब्रिटिशांच्या आफ्रिडी लोकांशीं अनेक चकमकी झाल्या; परंतु ब्रिटिशांच्या सहवासापासून त्यांच्यांत कांहींएक फरक झाला नाहीं; मात्र त्यांच्या सहवासामुळें सरहद्दीवरील इतर लोकांपेक्षां हे चांगले लढवय्ये झाले असून ब्रिटिशांचे संरक्षण करण्याची पात्रता यांच्या अंगीं आली आहे; परंतु या लोकांनां जिंकून यांचा मुलूख काबीज करणें ब्रिटिशांनां भाग आहे.

निरनिराळ्या आफ्रिडी जातींवर ब्रिटिशांनीं ज्या अनेक मोहिमी केल्या आहेत त्यांपैकीं कांहीं जाती पुढील होत्या. १८५० मध्यें आदामखेलवर; १८५५ अकाखेलबर; १८५३, १८७७-१८७८ त जोवकी आफ्रिडीवर; १८७८, १८७९, १९८० त झक्काखेलवर मोहीम व १८९७ मध्यें तिव्हा मोहीम.

ख त्त क.- हिरोडोटस ज्या लोकांनां सत्तागिदी असें म्हणे त्यांसच अर्वाचीन इतिहासकार सत्तक, शत्तक, सेतक किंवा खत्तक असें म्हणतात. सुलेमान, कोह, सानवाल व सिंधु नद्याजवळील कांहीं प्रदेश ही त्यांची जन्मभूमि होय. वझीरी लोकांनीं खत्तक लोकांनां हांकून लाविलें; परंतु त्यांना स्वत: खत्तक लोकांच्या डोंगराळ प्रदेशांत जावें लागलें; परंतु ही गोष्ट घडण्यापूर्वीं इराणी लोकांनीं (चाकमानी किंवा चामकनी) खत्तक लोकांवर स्वारी केली व तेथें त्यांनीं आपलें ठाणें दिलें. हा सर्व देश हल्लीं वझीरी लोकांच्या अम्मलाखालीं आहे; तथापि मुकीम व कानीगोराम येथें चामकनी लोक आहेत.

इराणी इस्लमाईट लोकांपैकीं चामकनी ही एक जात असून ते लोक सरकारच्या त्रासामुळें आपल्या देशांतून पळून गेले. हे लोक मुसुलमानांच्या शियापंथीचे (अल्ली इलाही) होते. त्यांचे धर्मविधी फार चमत्कारिक आहेत. ते धर्मविधींच्या वेळीं एक दिवा लावून ठेवीत व कांहीं वेळानें जो मालवून टाकीत. पुरुष व स्त्रिया एकत्र जमून धर्मविधी करीत असत. त्यांनां चिराघकुश (दिवा मालविणारे) किंवा आरमूर (अग्नि विझविणारे) असें म्हणत. या लोकांच्या पुढार्‍याचें नांव अमर लोबान असें होतें. त्यांच्या देशात दुष्काळ पडल्यामुळें कांहीं लोक लोगर दरींत जाऊन बारकीबरक येथें राहिले व कांहीं लोक पेशावरच्या दरींत जाऊन त्यांनीं आपल्या स्वत:च्या नांवावरून चामकनी हें गांव वसविलें. थोडे लोक हिंदुस्थानांत आले व तेथील लोकांशीं मिसळून गेले; परंतु पुष्कळ लोकांनीं आपलें जन्मस्थान सोडिलें नाहीं. त्यांच्या शेजारीं मांगल व खिताई या जातींचे लोक रहात असत. चामकनी लोक हे स्वभावानें शांत, उद्योगी, दुसर्‍यास त्रास न देणारे असे आहेत व गृहकलह व लुटारूपणा यांपासून अलिप्त राहणारे अशी त्यांची प्रसिद्धि आहे.

वझीरी लोकांनीं घालवून दिल्यामुळें खत्तक, हनी व मांगल हे लोक बन्नू प्रदेशांत जाऊन दोयाल (सद्रावान्) येथें राहिले; परंतु बलुची लोकांनीं त्यांस पिटाळून दिल्यामुळें ते कारबोघा, तेरी, चात्रा वगैरे ठिकाणीं गेले. इकडे तोरी लोकांनीं बंगश लोकांना कुर्रामांतून घालवून दिल्यामुळें ते ओराक्झी लोकांपाशीं येऊन भांडूं लागलें. ही संधि साधून खत्तक लोक ओराक्झी लोकांचां मुलूख काबीज करूं लागले, व उत्तरेकडे आपला राज्यविस्तार करीत करीत त्यांनीं ओराक्झी व आफ्रिडींची पिछेहाट केली व युसुफ्झी लोकांच्या प्रदेशांत प्रवेश केला व बुलाक व तेरी जातींच्या लोकांचा त्यांनीं संहार केला.

खत्तक लोकांच्या चालीरीती, रूप, वर्ण वगैरे इतर पठाणांहून भिन्न आहेत. पूर्वेकडील पठाणांपैकी फक्त खत्तक लोक पुश्तु भाषा बोलतात. हे स्वभावानें साधे असून धर्मोपदेशकांवर त्यांचा पूर्ण विश्वास असे.

एके दिवशीं चौघे भाऊ शिकारीसाठीं गेले असतांना त्यांनां चार तरुण मुली भेटल्या; त्यांच्याशीं लग्न करावें असे चौघांनी ठरविले; वडील भावानें आपल्या पसंतीप्रमाणें उत्तम पोशाख केलेल्या मुलीशीं लग्न लाविलें व इतर तिघांनीं चिट्या टाकून बाकींच्या तिघींशीं विवाह केले. परंतु नंतर असें आढळून आले कीं उत्तम वस्त्रें धारण केलेली मुलगी फार कुरूप असून इतर सुंदर होत्या. यामुळें वडील भावाची इतरानीं थट्टा केली व ''पा खता लार्ये'' म्हणजे 'तूं चिखलांत गेला आहेस किंवा चिखलांत पाय टाकिला आहेस' असें ते त्याला म्हणाले. या गोष्टीपासून खत्तक हें नांव निघालें असें म्हणतात. या गोष्टीचें कांहीसें बुद्धाच्यापूर्वजकथेशीं साम्य आहे; ब्रिटिश अंमलाखाली खत्तक लोकांची वागणूक फार चांगली असून ते राजनिष्ठ आहेत. काळाबाग येथील मिठाच्या खाणी यांच्या ताब्यांत आहेत व पेशावरची दरी व बदकशान यांमधील देशास हे लोक मीठ पुरवितात. यांच्या राजनिष्ठेचा व यांच्या कामगिरीचा मोबदला म्हणून, यांचा मुख्य ख्वाजा महंमदखान यास नाइट ऑफ दि आर्डर ऑफ दि स्टार ऑफ इंडिया ही बहुमानाची पदवी देण्यांत आली.

सुलेमान पर्वतापासून खत्तक लोकांनां ज्यांनीं पिटाळून लाविलें ते वझीरीलोक व मुसुलमान इतिहासकार ज्यांना वईर्सी असें म्हणतात हे एकच असावेत असें वाटतें. पांच सहाशें वर्षांपूर्वीं वझीरी लोकांनीं पहिल्यानें खत्तक लोकांवर स्वारी केली. त्यांच्या एका पूर्वजाची पवित्र अशी एक मूर्ति, व त्यांच्या सोधाकी नांवाच्या पोटजातीच्या लोकांच्या जमीनी बर्माल प्रांतांत आहेत. या बर्मालांत राहून वझीरी लोकांनीं खत्ताकांनां हांकून लाविलें व चामकनी लोकांस जिंकून सर्व खत्तक देश आपल्या ताब्यांत घेतला.

वझीरी लोक बलाढ्य असून स्वतंत्र आहेत. दिसण्यांत हे इतर पठाणजातींहून भिन्न दिसतात; हे लोक गुरांचे कळप घेऊन हिंडतात.

हिरोडोटसच्या मनाप्रमाणें दरायसच्या साम्राज्यांतील दादिसी (३.९१; ७.६६) हें चौथें व शेवटचें राष्ट्र होय. हल्लींच्या ताजिक लोकांचे दादिसी हे पूर्वज असावे असें कांहीं लोकांचें म्हणणें आहे; परंतु हें सुसंगत दिसत नाहीं. गन्दारियनच्या उत्तरेकडे रहाणारे, दरद लोक हे यांचे पूर्वज असावे असेंहि कांही लोक म्हणतात; परंतु हीहि व्युत्पत्ति स्वाभाविक आहे असें वाटत नाहीं. काकर लोकांशीं मिसळून गेलेले दादीलोक हे दादिसींचे पूर्वज असावे हें अधिक संभवनीय आहे. काकर लोकांच्या ताब्यांत असलेला सर्व प्रदेश पूर्वी दादिसी किंवा दादी लोकांच्या ताब्यांत होता; परंतु हळू हळू त्यांची तेथून पिछेहाट झाली.

अफगाणिस्तानचे काकरलोक हे शक असून कच्छ व रावळपिंडी येथें रहाणार्‍या गक्कर लोकांपैकींच आहेत. काकर हा घुरघुष्टचा नातू होता. घुरघुष्ट हा अफगाणांचा मूळपुरुष जो किश त्याचा पुत्र होय. किशचा वडील पुत्र सराबन यास शार्ज्यून व कृश्यून असे दोन पुत्र होते. सुर्जन व कृशन या रजपूत नांवांपासून हीं वरील नांवें निघालीं असावीं; असुरी सार्गन या नांवाशीं याचा कांहीं संबंध आहे कीं काय हे निश्चयात्मक सांगतां येत नाहीं. व या नांवांचें मुसलमानींत शारफुद्दीन व खिरुद्दीन असें रूपांतर झालें असावें. अशाच प्रकारचें शब्दसादृश्य अफगाणांच्या सर्व वंशावळींत आढळतें. महाभारताच्या वेळीं पांडव हे पंजाब व अफगाणिस्तान येथें जाऊन त्यांनीं स्वतंत्र राज्यें स्थापिलीं ही गोष्ट लक्षांत ठेविली असतां वरील गोष्ट आपणांस पटतें. घुरघुष्ट हें सिर्घिझ किंवा घिर्घिझ यांचे रूपांतर असल्यामुळें तुर्कस्तानांतून हे लोक आले असावे असें वाटतें. प्राचीन दादीसीचा पुष्कळसा भाग जरी हल्लीं काकर लोकांच्या हातीं आहे, तरी मूळचे ते सर्व एक नव्हते. घुरघुष्टचे दुसरे नातू (दानीचे पूत्र) जे दादी, नाघर व पानी यांच्या चालीरीती व भाषा खर्‍या काकरहून भिन्न होत्या. नाघर लोकांनां रजपूत असें म्हणतात; यांचे पानी (पणीं?) लोकांशीं बरेंच साम्य आहे. नाघर व पानी हे शेखावती व हैदराबाद येथें रहातात व अगदीं थोडे लोक काकर देशांत रहातात. दादी हे काकर लोकांशीं पूर्णपणें मिसळून गेले व खोजन्दहून आलेल्या लोकांनीं केलेल्या वसाहतींत राहिले; यामुळें त्यांस खोजन्दी किंवा खुन्दी असें म्हणतात.

का क र.- महबानचे गदून कछ या लोकांशीं आपला संबंध असल्याचें काकर लोक सांगतात व हे लोक आपल्याला काकर समजतात व कछ येथील एका वसाहतवाल्यास घुरघुष्ट असें म्हणतात. घोर पर्वताजवळील तैमनी चारायमाक लोकांशींहि आपला संबंध आहे असें काकर म्हणतात व हे लोकहि आपण काकर लोकांपैकीं आहोंत असें सांगतात. उत्तरेकडील इतर चारायमाकांहून आपणांस हे भिन्न समजतात. कारण यांच्या चालीरीती, भाषा व धर्म हीं निराळीं आहेत. कॅपचाक व दार्झी असे तैमनीचे दोन भाग आहेत. दार्झी लोकांनां अफगाण म्हणतात.

काकर देशाच्या उत्तारेपासून दक्षिणेपर्यंत एक पर्वताची रांग आहे व त्या ठिकाणीं कांहीं उत्तम व सुपीक दर्‍या आहेत. कंजोझी दरींत 'सन्य' जातीचे लोक व बोरी दरींत संजर व संभीरजातीचे लोक राहतात. काकर लोकांच्या अनेक जाती असून त्यांच्या भाषा व चालीरीती भिन्न भिन्न आहेत; परंतु त्या सर्वांना काकर पठाण असें म्हणतात.

काकर लोक हिंगाचा व्यापार करितात; परंतु कांहीं लोक गुरांचे कळप घेऊन हिंडतात व थोडे लोक जमिनीची लागवड करणारे आहेत. काकर देशाच्या दक्षिणेस काकर लोकांचे शत्रू बलुची लोक रहातात. शयूना दाघ या नांवाचें काकर लोकांचें एक प्रसिद्ध मैदान आहे. तोबा पर्वताच्या पश्चिमेस अनेक दर्‍या आहेत; त्यांपासून निघालेल्या लहान लहान प्रवाहापासून लोहर नदी झाली आहे. उन्हाळ्यांत हा प्रदेश राहण्यास फार चांगला आहे. कारण येथील हवा उत्तम आहे; परंतु हे लोक अज्ञानी, रानटी, पशुवृत्तीचे व लुटारू आहेत.

स्वकीय व परकीय अनेक भिन्न भिन्न जातींचा समावेश पठाण लोकांमध्यें होतो. पठाणांच्या देशांत प्रवेश होण्यापूर्वी काकर, वझीरी, तोरी वगैरे लोकांनां पुष्कळ धडपड करावी लागली. पठाणच्या रहिवाश्यांशिवाय अफगाणिस्तानचे अफगाण व घीलजी हे आपणांस पठाण म्हणवितात. कारण हे लोक पठाण देशाच्या हद्दींत राहतात व त्यांनीं पठाणांची भाषा व कायदे यांचा स्वीकार केला आहे.

पठाण लोकांनीं अनेक शतकेंपर्यंत आपले स्वातंत्र्य कायम राखिलें होतें; परंतु सर्व देशांत ते स्वतंत्र नव्हते. कारण पंजाब जिंकल्यापासून युसुफ्झी, खत्तक, बंगश वगैरे लोक ब्रिटिशांचे प्रजाजन आहेत. कुर्राम, दौर वगैरे लोकांस काबूल सरकारनें पादाक्रांत केलें होतें; परंतु युसुफ्झी, वझीरी, महमंद वगैरे लोक स्वतंत्र आहेत.

पॅक्तियन, पुक्तून किंवा पठाण राष्ट्रें भिन्न भिन्न परकीय लोकांशी मिसळून गेलीं व असें होणें स्वाभाविक आहे. कारण तो देश इराण, तुर्क व हिंदुस्थान यांच्या हद्दीवर आहे. बौद्ध, ब्राह्मण व गाबर हे इस्लामचे अनुयायी झाल्यामुळें वरील गोष्ट घडून आली. महमूद गझनीनें हा धर्म स्वीकारिण्यास लोकांस भाग पाडिलें; परंतु अशा प्रकारचें धर्मांतर हें टिकाऊ नव्हतें. महमूदच्या पश्चात् अनेक लोकांनीं आपला पूर्वींचा धर्म पुन्हां स्वीकारिला; परंतु बाराव्या शतकांत शहाबुद्दील घोरीच्या वेळीं हिंदुस्थानांत मुसुलमानी धर्माचा पुन्हां प्रसार झाला. या वेळीं अरबी धर्मोपदेशक (सय्यद) व बाटलेले हिंदु (शेख) हे धर्मप्रसारासाठीं सर्व पुक्तून देशांत हिंडले. हे धर्मप्रसारक त्या लोकांशीं सौम्यपणानें वागले नाहींत. त्या अडाणी लोकांपासून बर्‍याच देणग्या यांनीं मिळविल्या. त्यांच्या मुलींशीं लग्ने लाविलीं व स्वर्ग मिळविण्याचा मार्गदर्शक म्हणून आपलें बरेंच वजन वाढविलें.

परंतु शिया व अल्लीइलाहि या पंथाचे धर्मोपदेशक सुनी धर्मोपदेशकांचे प्रतिस्पर्धि होते.

पण इराणचें वजन पुक्तुन देशांत नाहींसें झाल्यामुळें सुनी लोकांचें वर्चस्व झालें व शिया व अल्लीइलाहि किंवा चामकनी या पंथांच्या लोकांचें कांहीं चालेनासें झालें पठाण लोकांत कांहीं शियापंथाचे लोक अद्यापि आढळतात; परंतु अल्लीइलाहि किंवा चामकनी यांचा बराच छळ झाल्यामुळे ते मुनी झाले.

घि ल जी.- जलालाबादपासून कलाती घिलजीपर्यंत घिलजी लोकांची बरीच वस्ती आहे. सियाबन्द पर्वताजवळ त्यांची जन्मभूमी असावी असें वाटतें.

अफगाणांचा मूळपुरुष, कइस किंवा किश याचा दुसरा मुलगा बतन हा सियाबन्द पर्वताजवळ रहात होता. त्याची धर्मावर फार श्रद्धा होती. त्याला साधू असें समजून लोकांनीं त्यास शेख ही पदवी अर्पण केली.

खलिफ वालिदच्या वेळीं खुरासान व घोर जिंकण्यासाठीं बगदादहून अरबी सैन्य आलें, त्या वेळीं घोर पर्वताजवळ बेनीइस्त्रायल व बेनीअफगाण हे लोक रहात होते. अरब लोक आल्याबरोबर तेथील अधिकारी पळून जाऊन त्यानें शेख बतन यांच्यापाशीं आश्रय मागितला. बतननें त्याचें उत्तम प्रकारें स्वागत करून त्यास ठेवून घेतलें. त्यानें बतनची मर्जी संपादिली, त्यामुळें दोघे एकमेकांवर विश्वास टाकूं लागले.

शेख बतन यास मत्तो या नांवाची एक सुंदर कन्या होती. शहाहुसेन (नवीन आलेला पाहुणा) व मत्तो यांची प्रीति जडली, ही गोष्ट बनत यास कळल्यावर त्यानें दोघांस फांशी देण्याचें ठरविलें; परंतु बतनच्या पत्‍नीनें शहा हुसेन हा राजवंशापैकीं आहे किंवा नाहीं हें पाहण्याविषयीं बतन यास सुचविलें. घोरच्या उत्तरेस त्यांनीं एक विश्वासू मनुष्य पाठविला; तेव्हां हुसेन हा राजवंशी आहे असें त्यांच समजलें. नंतर बतननें त्या दोघांचें लग्न करून टाकिलें. थोड्याच दिवसांनीं बिबी मत्तोस एक पुत्र झाला, त्याचें नांव बतननें घालझो म्हणजे चोराचा मुलगा असे ठेविलें. हें नांव पुढें सर्व जातीस मिळालें व त्याचें रूपांतर घिलझी असें झाले. घिलझी व घोर या जातींचें मिश्रण झालें असावें असें या गोष्टीवरून वाटतें.

बिबी मत्तोच्या दुसर्‍या पुत्राचें नांव इब्राहीम लो (मोठा) असें होतें. लो चा लोदी असा अपभ्रंश झाला. व हेंव नांव इब्राहीमच्या वंशजांनां मिळालें. हे हेंच लोदी घराणें पंधराव्या शतकांत दिल्लीस राज्य करीत होतें. घोर घराण्यांतील लोदी व सूर राजे हे घिलजी जातीचे होते यांत संशय नाहीं. या शिवाय तुराम, तोलर, बुराण आणि पोलर असे बिबी मत्तोचे पुत्र होते. व हीं नांवें त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या जातींस देण्यांत आलीं आहेत. तुराण पासून तोखी, व होतक व वुराणपासून अन्दर व तराकी या पोटजाती उत्पन्न झाल्या. हीं सर्व नांवें तुर्क आहेत. आठव्या शतकांत, ज्या वेळीं अरब लोक ट्रँसोझिआना (तुराण) पादाक्रांत करीत चालले होते त्यावेळीं कांहीं तुर्क लोकांनीं आपला देश सोडून देऊन ते घोर पर्वताजवळ येऊन राहिले, हें अफगाणांच्या इतिहासावरून स्पष्ट होतें.

खिलती (तुर्क) घोर प्रातांत शिरले त्यावेळीं, होतक, तोखी, अन्दर, वगैरे जातींचा: समावेश त्या लोकांत होत असे; त्यांनीं ज्यू, अफगाण, हिंदु वगैरे लोकांमध्यें आपली वसाहत केली. तेथे कांहीं दिवस राहून नंतर हल्लींच्या ठिकाणीं आले. खिलिची लोकांच्या देशाच्या पूर्वेस अफगाणिस्तानांतील घिलजी लोकांची वसाहत होती. या घिलजींच्या देशास तुराण असें म्हणत.

खिलिची किंवा घिलजी हे तुरणांतून पूर्वेकडे गेले. लहान लहान जाती या घिलजी लोकांशीं मिसळून गेल्यामुळे घिलजींचा इतका विस्तार झाला. प्रमुख जातीच्या सत्तोखालीं ज्या नवीन नवीन जाती आल्या त्यांच्या नांवांमध्यें जो बदल झाला त्यावरून वरील विधानास पुष्टि मिळते.

या नवीन जातीचे लोक धर्मांतर केलेले पठाण होते, किंवा सबक्तगीन बरोबर आलेल्या तुर्कांचे हे नातलग होते हें अनिश्चित आहे. घिलजी लोकांनीं जिंकलेले लोक आपल्या जेत्यांशीं मिसळून गेल्यामुळें घिलजींचीं लोकसंख्या वाढली असावी हें संभवनीय आहे. चगताई तुर्क, घिलजींच्या संन्निध रहात असूनहि ते फार भिन्न आहेत व त्याच्याशीं संबंध असल्याचें त्यांस कांहीं एक माहित नाहीं. अशा लोकांपैकींच, तेराव्या व पंधराव्या शतकांतील चंगीझ व तैमूर यांच्या स्वार्‍यांबरोबर आलेले मोंगल व मागलचे चगताई तुर्क हे लोक आहेत; या लोकाच्या जन्मभाषेत व रंग रूपांत जरी बदल झाला आहे तरी ते त्यांचे शेजारी जे घिलजी त्यांपासून आपल्याला अगदी निराळे समजतात. या अप्रसिद्ध लोकांचा इतिहास व उत्पत्ति शोधून काढणें महत्त्वाचें व मनोरंजक आहे.

अफगाणिस्तानच्या घिलजी लोकांनां महमूद गझनीने आपल्या बरोबर हिंदुस्तानच्या स्वार्‍यांच्या वेळीं घेतल्यामुळें, त्या वेळेपासून हे प्रसिद्धीस आले. या स्वार्‍या चालल्या असतांना घिलजी लोकांनीं आपला राज्यविस्तार केला. अफगाणिस्तानांत राहणार्‍या सर्व लोकांत, गुरें घेऊन भटकणारे व लष्करी बाण्याचे लोक अशा प्रकारें हे घिलजी लोक प्रसिद्ध आहेत; व यामुळेंच मुलूख जिंकणें त्यांस अवघड गेले नाहीं.

घिलजी लोकांची राज्यकारभारपद्धति व इतर चालीरीती अफगाणिस्तानांतील इतर लोकांपेक्षां अगदीं भिन्न आहेत. बहुतेक घिलजीलोक गुरांचे कळप घेऊन हिंडतात. हे सत्रंज्या वगैरे तयार करितात. हे लुटारू व भांडखोर आहेत. धैर्य व शरीरसामर्थ्य या बाबतींत अफगाणिस्तानांतील दुसरे कोणतेहि लोक यांची बरोबरी करूं शकणार नाहींत. परंतु हे लोक रानटी व सूड घेणारे आहेत.

नासर खरोती वगैरे घिलजी लोक हिंदुस्तानांत व अफगाणिस्तानांत व्यापार करितात. त्यांच्या धंद्यावरून त्यांस पोविन्द व लवानी किंवा लोहानी असें म्हणतात.

गोमल व झोआब या घाटमार्गानें ते हिंदुस्तानांत येतात. दिल्लीपर्यंत ते आपल्या बरोबर उंट आणितात व पुढें आगगाडीनें किंवा पाय रस्त्यानें ते मोठमोठ्या शहरीं जातात. ते फळें, हिंग, लोकर वगैरे जिन्नस हिंदुस्तानांत आणितात व कापूस, चहा, रेशीम वगैरे माल ते आपल्या देशांत नेतात.

हिंवाळ्यांत हे लोक हिंदुस्तानांत येतात. या व्यापार्‍यांचा पोशाख अव्यवस्थित व घाणेरडा असून त्यांचा आवाज मोठा व चालीरीती असभ्यपणाच्या आहेत. परंतु कांही श्रीमान् व्यापारी व्यवस्थितपणें व टापटिपीनें वागतात.

पोविन्द ही जरी खिलजी लोकांची पोटजात आहे तरी कांही गोष्टींत ते बरेच भिन्न आहेत. खरोति व नासर लोकाचा आकार, व रूप रंग वगैरे सुलेमान, खुले व तुराण लोंकापेंक्षा भिन्न आहेत.

अठराव्या शतकाच्या आरंभीं कंदाहारच्या इराण सरकारविरुद्ध घिलजी लोकांनी बंड केलें. इराणी लोकांच्या जुलमास कंटाळून यांनीं अनेक विनंतिअर्ज केलें; परंतु तिकडे कोणीहि लक्ष न दिल्यामुळें त्यांनीं मीरवेस यास शहापुढें आपल्या तक्रारी मांडण्यासाठीं पाठविलें; परंतु त्याचाहि कांहीं उपयोग झाला नाहीं; परंतु शहाचें दौर्बल्य मीरवेसच्या लक्षांत आलें.

परत आल्यावर सैन्य जमवून त्यानें इराणविरुद्ध बंड केले; इराण सरकारचा पराभव होऊन इराणी सैन्यास पिटाळून लावण्यांत आलें. नंतर मीरवेस हा काबूल येथें स्वतंत्रपणें राज्यकारभार करूं लागला. त्यानें इराणी लोकांस तीनवेळां मागें हटविलें व आठवर्षे राज्य करून इ. स. १७१५ त तो मरण पावला. त्याचा पुत्र महमूद यानें १७२० त इराणावर स्वारी केली परंतु त्या स्वारींत त्याचा पराभव झाला.

दोन वर्षांनीं त्यानें पुन्हा स्वारी केली. त्यानें दक्षिण इराण पादाक्रांत केलें; व मोठमोठीं शहरें घेऊन त्यानें आपला दरारा बसविला. सरतेशेंवटीं इराणचा शहा, शहा हुसेन यानें आपलें सर्व राज्य महमूदच्या स्वाधीन केलें. या जयामुळें तो गर्वानें फुगून जाऊन त्याची महत्तवाकांक्षा अनावर झाली. तो सर्वप्रकारच्या सुखांत निमग्न झाल्यामुळें लवकरच वेडा व क्रूर झाला.

अनन्वित कृत्यांमुळें त्याच्याच लोकांनीं महमूदचा खून केला व त्याचा पुतण्या मीर अश्राफ यास गादीवर बसविलें परंतु मीर अश्राफ यास लवकरच इराणच्या तामास्पचा (शहा हुसेनचा वंशज) सेनापति प्रसिद्ध नादीर यांच्याशीं तोंड द्यावे लागलें. अश्राफचा पराभव झाला; परंतु निराश न होतां अश्राफनें पुन्हां लढाईची तयारी केली परंतु त्यास यश न आल्यामुळें तो कन्दाहारकडे पळून गेला; व एका बलुची सरदाराकडून मारला गेला. घिलजी लोकांचा अंमल इराणांत सातच वर्षें होता; परंतु तेवढ्या मुदतींत तेथें रक्तपात होऊन तो देश ओस पडला.

घिलजींनां इराणांतून घालवून दिल्यानंतर नादरिनें स्वत:गादी बळकाविली व तो हिंदुस्थान जिंकिण्यासाठीं निघाला. इ. स. १७३८ त कन्दाहार घेऊन तें उध्वस्त करून टाकिलें. काबूल येथें कांहीं मोगल इराणी लोक बंदोबस्तासाठीं ठेविले. हे लोक काबूल येथेंच राहिले. व ते ज्या भागांत रहात असत त्यास चांडौल असें म्हणतात. हे लोक शियापंथी आहेत. यांचें येथें बरेंच वजन आहे. हे ब्रिटिश अंमलास अनुकूल आहेत.

नादीरशहाच्या मरणानंतर अहमदशहाचा अंमल घिलजी लोकांनीं मान्य केला. परंतु अबदाली राजानंतर त्या लोकांत बराच असंतोष उत्पन्न झाला व शहा तैमूर बरोबर ते भांडूं लागले; परंतु इ. स. १८०९ त जल्दक येथें शहाझमान यानें घिलजी लोकांचा पराभव केला. त्यावेळेपासून नष्ट झालेली सत्ता पुन्हां मिळविण्याची खटपट त्यांनीं केली नाहीं. परंतु त्यांचें महत्त्व कमी झालें असें मात्र नाहीं. दुराण्यांच्या दरबारांत यांचे पुष्कळ वजन आहे. परंतु ब्रिटिश सरकारचा हे व दुराणीलोक द्वेष करितात व त्यांच्याशीं विश्वासघातकीपणानें वागतात.

इ. स. १८३९ पासून १८४२ पर्यंतच्या ब्रिटिशांच्या स्वारींत त्यांनीं काबूल व कन्दाहार यांमधील दळणवळणास बराच अडथळा केला व १८४२ त त्यांच्या सैन्याशीं हे घिलजी लोक फार क्रूरतेन वागले. परंतु हे बलाढ्य असे शत्रू नाहींत, इतकेंच नांहीं तर यांच्यांशीं सहज सलोखा करितां येईल.

ता जि क.- ताजिक किंवा पार्सीवान् हे अफगाणिस्तानच्या लोकांपैकींच आहेत; परंतु तेथील रहिवाश्यांच्या भाषेहून व चालीरीतींहून ताजिकांची भाषा व चालीरीती भिन्न आहेत. हे लोक पूर्वींच्या इराणी लोकांचे वंशज आहेत. ज्याप्रमाणें अफगाण लोक हिंदु लोकांत मिसळून गेले त्याचप्रमाणें अरब लोक इराणी लोकांत मिसळून जाऊन, मिश्र जातीस त्यांनीं आपलें पूर्वीचेच नांव दिलें. अरब लोकाच्या पूर्वीच्या इराणी नांवावरून ताजिक हें नांव पडलें असावें. प्राचीन इराणी इतिहासकार आपल्या उत्तरेकडील शत्रूंस तुर्क व दक्षिणेकडील शत्रूंस ताज असें म्हणत; व यामुळेंच इराणांत अरबांनां ताज असें म्हणत असत. व त्यांच्या संबंधीं प्रत्येक वस्तूस ताजिक असें नांव पडलें. कांही कालानें इराणांतील आरबी वस्तूंसच ताजिक हें नांव मिळालें. ज्या अरब लोकांनीं इराणी लोकांशीं विवाह करून आपलें राष्ट्रीयत्व गमाविलें त्या लोकांस इराणी लोक ताजिक असें म्हंणू लागले. चिनी, तावची व ताजिक हे एकच शब्द असावे असें म्हणतात; असें असेल तर ताजिक याचा अर्थ इराणी शेतकरी असा होतो. हिरातपासून खैबरपर्यंतच्या भागांत, कन्दाहार पासून ऑक्झसच्या भागांत व काश्गर प्रांतांत हे ताजिक लोक राहतात. पंरतु हाझरा, अफगाण किंवा सय्यिद लोकांशिवाय इराणी भाषा बोलणार्‍या लोकांस हल्लीं ताजिक असें म्हणतात. बदकशानच्या प्राचीन रहिवाशांनांहि ताजिक हें नांव आहे.

हे लोक अनेक शतकांपर्यंत स्वतंत्र होते परंतु हल्लीं ते काबूल सरकारचे प्रजाजन आहेत. ते मुसुलमानीं शिया किंवा सुनी पंथाचे असून ते आपल्यास अलेक्झाडर दि ग्रेट याचे वंशज समजतात. सपाट प्रदेशांत राहणार्‍या ताजिक लोकांत पोटभेद नाहींत. अफगाण,: घिलजी व पठाण यांमध्यें ज्याप्रमाणें खेल व झाई असे विभाग आहेत तसे ताजिक लोकांत नाहींत. 'खेल' हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ टोळी असा आहे. झाई हा इराणी शब्द असून त्याचा अर्थ 'जन्मलेला' असा आहे. परंतु हा शब्द खेल (टोळी) या शब्दाप्रमाणेंच समजला जातो. जसें- 'मुसाझाई किंवा मुसाखेल' याचा अर्थ मोसेसची टोळी. ताजिक लोकांमध्यें कांहीं शेतकी काम करणारे आहेत, त्यांनां दिहवार किंवा दिहगान असें म्हणतात. सपाट देशांत रहाणारे ताजिक लोक धिप्पाड, सुंदर व सशक्त आहेत. ते स्वभावानें शांत, उद्योगी, काटकसरीनें रहाणारे व मनमिळाऊ असे आहेत. त्यांच्या देशांत त्यांचा उच्च दर्जा नसून राज्यकारभारांत त्यांनां कोणी विचारीतहि नाहीं. खेडेगांवांतील लोक शेतकी व बागबागाईत करितात; शहरांत रहाणारे लोक व्यापार धंदा करितात; हे लोक बुद्धिमान, राजनिष्ठ व उद्योगी आहेत; फार थोडे लोक लष्करी नोकरींत शिरतात. ब्रिटिश लोकांविषयीं या लोकांचें चांगलें मत आहे. घिलजी व पठाण या लोकांशिवाय दुराणी किंवा अफगाण हेच काय ते ब्रिटिशांचे शत्रू आहेत. या लोकांचा इतर सर्व लोक द्वेष करितात असे असूनहि ब्रिटिशविषयीं इतर सर्व लोकांचीं मने कलुषित करण्यांत या लोकांनां यश येतें हे आश्चर्य आहे.

ह झा रा- अफगाणिस्तानांतील इतर सर्व लोकांहून हझारा हे लोक अगदीं भिन्न आहेत; व त्या देशाचा बराच भाग त्यांनीं व्यापून टाकिला आहे. पूर्वीं ज्याला पॉरोपॉमिसस् असें म्हणत तो देश यांच्या ताब्यांत आहे. हा प्रदेश डोंगराळ आहे; परंतु येथें पुष्कळ सुपीक दर्‍या असून येथें पुष्कळ महत्त्वाच्या नद्या उगम पावतात.

या देशांत प्राचीन काळीं दाट वस्ती असून हा देश जिंकण्यास चंगीझखानास बरींच वर्षें लागलीं. त्यावेळीं तेथें पुष्कळ इराणी लोक रहात होते; व त्यांच्या ताब्यांत अनेक मजबूत किल्ले होते. हे फार आश्चर्यकारक असून हे मनुष्यांनीं बांधलेले नसावे असें तेथील हल्लींचे रहिवाशी सांगतात येथें बुद्धाच्या वेळच्या पुष्कळ इमारती असून पुष्कळ जुनीं नाणींहि सांपडतात.

हझारा हे मोंगल लोकांपैकीं तातर लोक असावें असें त्यांच्या आकृतीवरून उघड होतें. परंतु निश्चित असें काहींच सांगतां येत नाहीं. हझारा हा शब्द, इराणी शब्द हजार (सहस्त्र) यावरून निघाला असावा. तेराव्या शतकांत चेंगझिखानानें या लोकांच्या एक हजारांचीं एक, अशा दहा लष्करी वसाहती बनविल्यामुळें या लोकांनां हझारा हें नांव प्राप्त झालें असावें.

परंतु हे लोक स्वत: आपल्याला हझारा असें म्हणवीत नाहींत. निरनिराळ्या जातींच्या नांवांवरून ते आपल्या देशांत प्रसिद्ध आहेत; जसें जाघुरी, बिसूद, दाही, झंगी, दाहीकुदी, गौर वगैरे. दाही हे राष्ट्राचे नांव असावें; हे लोक आपल्याला काबुली, घिलजी किंवा आवघान असेहि म्हणतात. चार्यमाक, जमशेदी, तैमूनी वगैरे जातींना हे आपल्यापैकींच समजतात. ते आपली मातृभाषा विसरले असून इराणी भाषा व शिया पंथ यांचा, त्यांनीं स्वीकार केला आहे. थोडे लोक सुनी पंथाचेहि आहेत.

सिंधुनदीच्या पूर्वेस हजारा या नांवाचा एक प्रांत आहे; तो मोंगललोकांच्या ताब्यांत होता. व तसेंच कुर्रामपासून काबूलपर्यंतच्या देशांतहि हझारा हे नांव प्रसिद्ध आहे. इराणांतून पळून आल्यावर इस्त्रेलाइट लोकांनां ज्या ठिकाणीं आश्रय मिळाला असें एसद्रास म्हणतो तोच हा हाजरा देश असावा असेहि कांहीं लोकांचें मत आहे.

तातर हे लोक साधेभोळे असून धर्मोपदेशकांच्या आज्ञेप्रमाणें वागणारे आहेत. हे अशिक्षित असून आपल्या जातींच्या पुढार्‍यांच्या पूर्णपणें अंकित आहेत. हिंवाळ्यांत हे लोक उद्योगधंदा पाहण्यासाठीं पंजाबांत येतात. हे लोकशूर व कणखर आहेत. विश्वासु, उद्योगी व बुद्धिवान् अशी अफगाण लोकांमध्यें यांची प्रसिद्धि आहे. हे लोक पाखंडी असल्यामुळें सुनीपंथाचे अफगाण लोक यांनां आपले गुलाम असें समजतात.

हझारा हे लोक आफगणांचे कट्टे शत्रू आहेत; अफगाणिस्तानांतील युद्धांत हझारा लोकांनीं ब्रिटिशांस बरीच मदत केलेली आहे. या लोकांतील स्वतंत्र जातींच्या लोकांनीं काबूल सरकारास दाद दिली नाहीं. गुरखे लोकांप्रमाणें हे शूर आहेत. यांनां पश्चिमेकडील गुरखे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण यांची व गुरख लोकांची जात एकच असून चेहर्‍यांतहि बरेंच साम्य आहे. हे लोक ब्रिटिशाच्या फार उपयोगी आहेत. हे ब्रिटिशांच्या पक्षाकडे सहज येतील व हे लोक देशाचें उत्तम प्रकारें संरक्षण करू शकतील.

या लोकांची उत्पत्ति, चालीरीती व हितसंबंध भिन्न भिन्न असल्यामुळें, परकीय लोकांच्या मदतीशिवाय हे लोक एकछत्राखालीं शांततेनें राहूं शकले नाहींत. ब्रिटिशांचे प्रजाजन होण्याची या लोकांची मनापासून इच्छा आहें.

शे त की.- अफगाणिस्तानच्या बहुतेक भागांत वर्षांतून दोन पिकें काढतात. पहिलें गहूं, बाजरी वगैरेचें असतें. दुसर्‍या खेपेस भात (धान) मका व डाल होतात.

जमीनीचे दोन भाग केलेले असतात. एक आबि व दुसरा ललमी. पहिलीला आपण बागाईत व दुसरीस जिराईत म्हणूं.

बहुतेक सर्व यूरोपियन शाकभाज्या येथें तयार होतात. हिरात, काबूल, कंदाहार व जलालाबाद ह्याठिकाणीं अफूची लागवड करतात. हिरातप्रांतात कापूस मुबलक पिकतो; बदाम व एरंडीचीं झाडें पुष्कळ होतात व त्याच्या फळांपासून तेल काडतात. येथे फळें विपुल होतात व तीं चांगल्या प्रकारचीं असतात. सफरचंद, पीयर, बदाम, पीच, मनुका, डाळिंबें, द्राक्षें, अंजीर इत्यादि फळें सर्वत्र होतात.

अफगाणिस्तानांतील शेतकरीवर्ग पाच तर्‍हेचा आहे. (१) स्वत:च्या मालकीची जमीन करणारे. (२) दुसर्‍याची जमीन भाडेपट्टीनें करणारे. (३) बाझअर, लहान शेतकरी (४) मोलानें शेतांत काम करणारे. (५) आपल्या धन्याची जमीन करणारे गुलाम.

मजुराचा रोज पोटास घालून ४॥ आणे असतो. कंदाहारामध्यें तो ६॥ आण्यापासून ७ आण्यापर्यंत असतो.

प्रा णी.- घोडे, उंट, गायी मेढ्या व बकरीं ही या लोकांची संपत्ति आहे. पूर्वीं घोडे बाहेर देशीं पुष्कळ विकण्यास जात, परंतु अबदुल रहिमान खानानें त्याची निर्यात बंद केली. तेव्हांपासून ह्या व्यापारास आळा पडला आहे. उत्तम घोड्याची निपज करण्याकरितां इंग्लिश व अरब वळू आणून ठेविले आहेत व ह्या गोष्टीकडे अमीराचे फार लक्ष आहे.

बैलाचा नांगराकडे व ओझीं वाहण्याकडे उपयोग होतो.

हिरात व कंदाहार येथून पुष्कळ लोंकर बाहेर देशीं रवाना होते.

अफगाणिस्तानामधील उंट जास्त राकट व बळकट असतो.

ख नि ज प दा र्थ.- अफगाणिस्तानामध्यें धातू पुष्कळ सांपडतात असा बोलवा आहे पण याला त्या शास्त्राचें उत्तम ज्ञान असणार्‍या लोकांचा पाठिंबा नाहीं. तरी पण पुष्कळ भागांत दगडी कोळसा सापडणें शक्य आहे.

टोबा पठारावर 'अन्टिमनी' सांपडतो. कंदाहारच्या उत्तरेस सोन्याच्या खाणी लागूं शकतील. हिंदुकुश पर्वतामधील रुप्याच्या खाणी सर्वांनां प्रसिद्ध आहेत. शाह मकसुद डोंगरात पूर्वीं ताब्याच्या खाणी चालूं होत्या. तसेंच कंदहारच्या उत्तरेस ६० मैलावर ''नेश'' या ठिकाणीं तांब्याची अशुद्ध धातू सांपडतें. शिसें घोरबंद भागांत व इतर ठिकाणीं निघतें. कंदाहार येथें सांपडणार्‍या सोन्याच्या मातीत अशुद्ध निकल मिश्रित असतो. हिंदुकुश पर्वतामध्यें लोखंड विपुल आहे; तुरटी पुष्कळ तयार होते.

खानाबाद येथील खाणींत सोरमीठ पुष्कळ सापडतें. कोटिअश्रु येथें पांढर्‍या संगमरवरी दगडांच्या खाणी लागल्या आहेत.

व्या पा र.- ओक्सर येथें चांगल्या जातीचें रेशीम तयार होतें. तें बुखारा व महोद येथें जाऊन त्याचें उत्तम कापड तयार होतें. हिरात व कंदाहार या ठिकाणीं पुष्कळ रेशीम होतें पण तें तितकें चांगलें नसतें. अफगाणचे गालिचे म्हणण्यासारखे चांगले होत नाहींत. पोस्टिन्स म्हणजे मेंढीच्या कमावलेल्या कातडीचे डगले सर्व देशांत होतात.

काक्म, बरक, कर्क हे विशेषत: हिरात येथें चांगले होतात. काक्म हे उंटाच्या केंसापासून तयार केलेलें कापड आहे. दुसरीं दोन मेंढी व बकरा यांच्या केसापासून तयार होतात. माळेचे मणी येथून मक्केला पुष्कळ जातात.

गेल्या २०-२५ वर्षांत हत्यारांचे कारखाने यूरोपियन लोकांच्या देखरेखीखालीं पुष्कळ उघडण्यांत आले आहेत.

सगळ्या अफगाणिस्तानचा व्यापार किती आहे हें सांगण्यास आंकडे दुर्मिळ आहेत. हिरात येथून रशियांत जाणारा माल पुष्कळ मोठ्या किमतीचा असतो. खोरासान व सिस्तन येथें जाणारा माल इ. स. १९०३ मध्यें साडे दहा लाखाचा गणला आहे. यांत शेंकडा ४० लोंकर असून ती रशिया, फ्रान्स व अमेरिका या देशांत जाते.

इ. स. १९०४ मध्यें हिंदुस्थानानें अफगाणिस्तानशीं दीडशें लाखांचा व्यापार केला. परंतु या मालावर जकात अति जबर असल्यामुळें व्यापार घटत चालला आहे. हिंदुस्थानांतून दोरा, चहा, नीळ, साखर व तयार कातडीं धाडलीं जातात. तसेंच नुकतें नुकतें कापड जाऊं लागलें आहे. बाहेरदेशी जाणारे जिन्नस:- वाळविलेलीं व ताजीं फळें, तूप, रेशीम, लोंकर, ''पोस्टिन्स'' कातडी, संतरंज्या. हा सर्व व्यापार उंटाच्या पाठीवर चालतो.

व्या पा रा चे मु ख्य मा र्ग.- हिंदुस्थान ते काबूल, खैबरखिंड व जलालाबाद; कंदाहारला व गझनीला गोमलखिंड, अथवा क्वेटा, बदकशानपासून बाजवार आणि जलालाबाद चित्राळ मार्गानें व दुसरेहि कांहीं आणखी मार्ग आहेत.

ट पा ल.- इ. स. १८७० मध्यें अमीरानें टपालाची पद्धत सुरू केली पण ती अजून बाल्यावस्थेंतच आहे. इ. स. १८७२ मध्यें तिकिटें काढण्यांत आलीं. १ शाही. (१ आणा), अबासि (१/३ काबुली रुपाया). २ अबासि व १ काबुली रुपाया, अशा किंमतीचीं तीं असत. १९०२ मध्यें तिकिटें सर्व संपलीं असून अमीराच्या मनांत यूरोपियन धर्तीवर तीं काढण्याचे आहे. त्यामुळें सध्यां तिकिटाशिवाय सर्व व्यवहार चालतो. हांशील प्रथम अगर पत्र घेणाराजवळून घेतात.

येथें दुष्काळ फारसे नसतात व असलेच तर त्यांची तीव्रताहि विशेष भासत नाहीं. मागील दुष्काळामध्यें अमीरानें पर्शियांतून धान्य आणवून लोकांनां दिलें.

रा ज्य प द्ध ति व का य दे.- अफगाणिस्तानची राज्यपद्धति म्हणजे अमीराची अनियंत्रित राजसत्ता होय. या देशाचे काबूल, तुर्कस्थान, हिरात, कंदाहार व बदकशान असे पांच राजकीय विभाग केले आहेत. प्रत्येक विभागावर एक नायब म्हणजे गव्हर्नर नेमिलेला असतो. या नायबाच्या हाताखाली सरदारलोक व काजी हे न्याय देण्याचें काम करतात. राजाच्या दरबारांत अगर कौन्सिलांत बसणार्‍या सरदार लोकांचे तीन वर्ग आहेत. ते असे--(१) सरदार (२) खान व (३) मुल्ला सरदार हे वंशपरंपरागत मोठे लोक असतात, खान हे लोकाचे प्रतिनिधी असतात व मुल्ल धर्माचे प्रतिनिधी असतात. या तीन प्रकारच्या प्रतिनिधींच्या दोन सभा आहेत; पहिली दरबारशाही अथवा बादशाही सभा व दुसरी खार्वानिन मुल्खी अथवा साधारण लोकांची सभा. मुल्लालोक आपल्या दर्जाप्रमाणें या दोहोंपैकीं एका सभेंत बसतात. अमिराच्या कार्यकारी अधिकार्‍याची खिल्वात नावाची एक खास कमिटी आहे. ही संस्था प्रधानमंडळाच्या कौन्सिलप्रमाणें काम करते. विचारल्याशिवाय कोणाहि मंत्र्याला राजास सल्ला देण्याचा अधिकार नाहीं व कोणालाहि आपल्या खात्याच्या अधिकाराबाहेर सल्ला देतां येत नाहीं. अमीर हा मुख्य कार्यकारी अधिकारी असून शिवाय मुख्य न्यायाधीश व वरिष्ठ अपील कोर्ट आहे. अमीराकडे अपील करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे. दोस्त महंमद व अबदुर रहमान या अमिराकडे प्रजेचे अर्ज नेहमी जाऊं शकत. अमिरापेक्षां हलक्या प्रतीचें कोर्ट काझीचें होय व काझीपेक्षां कोतवाल हलक्या दर्जाचा असतो. मोठ्या प्रांतिक शहरांत व्यापारी तंट्यांचा निकाल लावण्याकरितां पंचायती असतात. मुलकी, जकात, डाक व लष्करी कामकाज याचीं निरनिराळीं खातीं आहेत. अफगाणिस्तानांतील न्यायकचेर्‍यांतून इस्लामचा कायदा चालतो व अबदुल रहमान यानें केलेल्या सुधारणांसहित देशांतील चालीरीती संबंधीं कायदाहि पाळला जातो.

अमीर व हिंदुस्तान सरकार यांच्यामध्यें झालेल्या कराराप्रमाणें पदरेशाशीं अफगाणिस्तानच्या राज्यकारणावर इंग्लिशांचा दाब आहे. बाकीच्या व्यवहारांत अमीर स्वतंत्र आहे. पूर्वी अमीर फक्त काबुल व सभोंवारचा प्रदेश येथील राजा होता. व बाकीचे प्रांत राजघराण्यांतील लोकांच्या अधिकारात असत. पण ही पद्धत अबदुल रहिमानखानानें बदलून टाकिली आहे. सध्यां सर्व प्रांतांवरील स्वामित्व एकट्या अमिराच्या हातांत एकीभूत झालें आहें. सध्यां मुख्य कचेर्‍या काबुल येथें ठेवून त्यांवर अमिराचे नातलग मुख्य नेमलेले आहेत. तरी पण राज्यांतील कोणतीहि गोष्ट अमिराच्या सल्ल्यावांचून होऊं शकत नाहीं.

राज्यकारभाराकरितां अफगाणिस्तानचे सहा भाग करण्यांत आले आहेत ते असे:- अफगाण-तुर्कस्तान, बदकशान, हिरात, कंदाहार, फर्‍हा आणि काबुल. काबुल खुद्द अमीराच्या हातांत आहे. बाकीच्या प्रांतांवर एकेक गव्हर्नर नेमलेला आहे. तो मुलकीं व न्यायाचीं कामें पाहतो. त्याला ''नायब-उल-हुकुमा'' म्हणतात. या भागांचे पुन: लहान प्रांत व जिल्हे पाडलेले आहेत. त्यांवर हकीम नेमलेला असतो. त्याला दिवाणी व फौजदारी अधिकार असतात. त्याच्या कचेरीला महकम-इ-हकिम म्हणतात. अपील कोर्ट काबुल येथें असून अमीर स्वत: मुख्य न्यायाधीश असतो. हकीमाच्या खालच्या कोर्टांनां महकम-इ-शर अथवा काझीचें कोर्ट म्हणतात. काझीच्या मदतनिसास मुफ्ति म्हणतात. काझी व मुफ्ति याच्यामध्यें जर एकाद्या मुद्यावर मतभेद झाला तर तो काबुल येथील खान-इ-मुल्ला याच्याकडे मताकरितां पाठविण्यांत येतो, व त्याच्यानें त्या प्रश्नाचा निकाल न झाल्यास अमीराकडे तो जातो. न्याय कोणच्या पद्धतीनें दिला जावा याबद्दल नियम अबदुलरहिमानखानच्या वेळेस ठरवून, छापून काढले आहेत. वरच्या न्यायकचेर्‍यांनां ''किताब-इ-हुकूमति'' असें नांव आहे व काझी वगैरे यांच्या कचेर्‍यांना 'असास-उल्-कुझट'' म्हणतात. यांत मुसुलमानी कायदा (शर) चालतो. राजद्रोह, बंड, सरकारी पैसा खाणें, खोटे दस्तैवज करणें, व राजसत्तोविरुद्ध सर्व अपराध यांचा निवाडा करणें अमीराच्या हातांत असतें. कोणासहि अमिराशिवाय मरणाची शिक्षा देतां येत नाहीं. व्यापार्‍यांचे तंटे पंचायती मार्फत निकालांत येतात. सध्यां दिवाणी कज्यांत फिर्याद स्टांपावर मांडावी लागते.

ज मा बं दी.- अफगाणिस्तानचें उत्पन्न खाली दिलेल्या बाबींतून होतें.- (१) जमीनींवरील कर. (२) आयात व निर्यात मालावरील जकात. (३) फळबागांवरील कर. (४) वनचराई ४० जनांवरापैकीं एक. (५) दस्तैवजाचे स्टांप कागद. (६) डोईपट्टी. (७) हिंदुस्थान सरकारकडून दरवर्षी मिळणारी १८ लाख रुपये खंडणी. इ. स. १८५६त राज्याचा वसूल ३० लाख होता तो सध्यां खंडणी धरून १२० ते १३० लाखांपर्यंत वाढला आहे. म्हणजे पूर्वीच्या चौपट झाला आहे. खर्च बेतांत ठेवला असून दर वर्षीं पुष्कळ मोठ्या रकमेची बचत केली जाते. जमिनीचा सारा उत्पन्नाच्या रूपानें दिला जातो तो वर्षाच्या सरासरी उत्पन्नावर ठरविलेला असतो.

ज्यामानानें जमीनीला पाणी मिळत असेल त्यामानानें तो जास्त किंवा कमी असतो. साधारणपणें नदीच्या पाण्यावर केली जाणार्‍या जमीनीवर उत्पन्नाच्या १/३ सारा असतो. ओढ्यांच्या किंवा झर्‍यांच्या पाण्यावर होणार्‍या उत्पन्नावर १/५ असतो. जेथें कारेस मधून पाणी मिळत असेल व ते राज्याच्या मालकीचें नसतें तेव्हां त्या जमीनीवर उत्पन्नाच्या १/१० सारा द्यावा लागतो. पावसावर अवलंबून राहणार्‍या जमीनीवर उत्पन्नाचा १/१० सारा द्यावा लागतो. मोठ्या शहरांजवळ असलेल्या मळ्यांतून किंवा फळबागांतूंन ३६०० चौ. यार्डावर ७॥ ते९ रुपये सरकार घेणें असते.

एवढेंच जर सरकरांत द्यावें लागत असतें तर शेतकरी वर्ग सुखी असता पण सैन्यांतील शिपाई व सरदारलोकांचे आश्रित ह्यांनां खेड्यांतून लूट करून पोट भरण्याची परवानगी असते त्यामुळें शेतकर्‍याला जवळ जवळ दुप्पट सारा पडतो.

देशांत सोन्याचें नाणें मुळींच चालू नाहीं म्हटलें तरी चालेल. पण सध्यां एक टांकसाळ स्थापन झाली असून जुनें नाणें परत घेऊन त्याच्या जागीं नवें नाणें प्रसारांत येत आहे.

सै न्य.- अमीराजवळ सैन्य पुष्कळ मोठें असून यूरोपियन पद्धतीप्रमाणें त्यांत दर्जे ठरविलेले आहेत. सध्या ३००००० लोकांनां पुरेल इतका दारूगोळा व हत्यारें अमीराजवळ आहेत. हिंदुस्थानच्या सैन्यांत अफगाण लोकांचा पुष्कळ भरणा आहे. ते लोक हिंदुस्थानांत येऊन आपणांस सैन्यांत दाखल करून घेतात.

सं र क्ष ण.- अफगाणसैन्य सरासरी ५०००० असावें. हे सैन्य हिरात, कंदाहार, काबूल, मझर-इ-शरिफ, जलालाबाद, व अस्मार या ठिकाणीं व हिंदुस्थानच्या बाजूस सरहद्दीवरील नाक्यांवर ठेविलेलें आहे. अबदुल रहमान म्हणत असें कीं, 'एका आठवड्याच्या आंत १००००० लोक रणांगणावर उभे करतां येतील परंतु मुख्य अडचण पैसा व नेण्या आणण्याचीं साधनें यांचा अभाव' ही होय. १८९६ मध्यें त्यानें अशी एक पद्धत सुरू केली होती कीं, प्रत्येक आठ माणसांतून एकानें (१८ व ७१ वर्षांच्या वयाच्या दरम्यान) लष्करी शिक्षण घेण्यास यावें. काबूलच्या दारूगोळ्याच्या कारखान्यांत दररोज २०००० काडतुसें व १५ बंदुका तयार होऊं शकतात व आठवड्यांतून दोन तोफा बनू शकतात. या देशांतील मुख्य किल्ले हिरात व देहडाडी हे होत. देहडाडी किल्ला क्रुप, हॉचकिस, नॉर्डेनफेल्ड व मॅक्झिम या जलदबारी तोफांनीं सज्ज केलेला आहे. या किल्ल्यांतील मुख्य छावणी बल्खपासून बारा मैलांवर मझर-इ-शरिफ येथें आहे.

प्रत्येक मोठ्या शहराला एकेक कोतवाल असतो. तुरुंगाचें कामहि त्याला पहावें लागतें. तसेंच सर्व पोलीस काम त्याच्याचकडे असतें.

शि क्ष ण.- शिक्षण केवळ प्राथमिक मिळतें व तें स्वत: बहुतेक अज्ञान अशा मुल्लांच्या हातीं आहे. मास्तर मुलांनां सांगतो व सर्व मुलें एकदम तें म्हणतात. शिक्षण लेखन, वाचन व थोडेसें गणित याच्याबाहेर जात नाहीं. कुराण हें शिक्षणाचें मुख्य अंग आहे. वरच्या प्रतीच्या शिक्षणसंस्थां मुळींच नाहींत. परंतु सध्यांच्या अमीरानें शिक्षण सक्तीचें केलें असून काबून येथें एक कॉलेज काढण्याचा विचार आहे. सध्यां अफगाणमध्यें इंग्लिश मुळींच नाहीं पण भांवी विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमांत त्याचा समावेश केला जाणार आहे.

अफगाणिस्तानच्या हकीमांनां शारीरशास्त्र व रोगनिदान शास्त्र यांची माहिती मुळींच नसते व शस्त्रक्रियेचें ज्ञान जवळ जवळ तेवढेंच असतें असें एका डॉक्टरचें म्हणणे आहे.

प्रा ची न अ व शे ष.- काबुल नदीच्या पात्रांत बुद्धधर्मकालीन वस्तूंचे अवशिष्टभाग बरेच आहेत. बमियनची भिंतींत कोरलेल्या आकृतींबद्दल प्रसिद्धि आहे व हैबक येथें बरेच चित्तावेधक बुद्ध लोकांच्या कामांचे अवशिष्ट भाग आहेत. काबूलच्या उत्तरेस कोह-दमन मध्यें जुन्या शहरांच्या जागा आहेत, पैकीं बेग्राम हें सर्वांत मोठें आहे. येथें कित्येक हजार नाणीं सांपडलीं. काबूलच्या जवळ व याच्या दक्षिणेस कांहीं मैलांवरील टेंकड्यांवर असंख्य स्तूप आहेत. जलालाबादच्या दरींत अशाच प्रकारचे अवशेष आहेत.

टार्नाक नदीच्या दरींत (उलान रोबाट) एका जुनाट शहराचे पडके भाग आहेत. हेंच पूर्वीचें आर्कोशिया शहर असें समजतात. हेल्मंडावरील गिरिष्कजवळ मोठे उंचवोटे व इमारतींचीं इतर चिन्हें आहेत, व सिस्टनच्या मैदानांत कित्येक मोठ्या शहरांचे अवशेष भाग आहेत. तसेच पुल्की, पेशावरन, व लाख येथें पुरातन ड्रान्गियानाचे स्मरणीय भाग आहेत. कंदाहार येथील एका मशिदींत राखून ठेविलेलें एक पुरातन दगडीं भांडें हेंच पेशावर येथें पांचव्या शतकांत पुरलेलें शाक्य मुनीचें भिक्षापात्र होय. ग्रीको-बुद्धकाला (यवन-बुद्धकाला) नंतरच्या शिल्पकलाविषयक अवशेष भागासंबंधीं अफगाणिस्तानांत अभाव आहे. गिझनी येथें महमूदंचे थडगें व दोन महत्त्वाचे विटांचे मनोरे खेरीज करून कांहींच शिल्लक राहिलेलें नाहीं. अफगाणिस्तान व त्याच्या आसमंतांतील भागांत पुष्कळ नाणीं सांपडलीं. जलालाबादपासून १० मैलांवर बसवल नांवाचें गांव आहे, तेथें व जलालाबादच्या दक्षिणेस ५ मैलावर आडा उर्फ हदा नांवाचें गांव आहे तेथें व खुद्द जलालाबाद येथें बुद्ध स्तूप व कोरीव लेणीं सांपडलीं. त्या कोरीव लेण्यांत वरील भाग कमानदार असून यापैकीं कांहीमध्यें बुद्धाच्या मूर्ती होत्या. मुसुलमान लोकांनीं हा प्रांत ज्यावेळेस जिंकला तेव्हां त्यांनीं हें सर्व कोरलेलें काम फोडून टाकून त्यावर दगडमाती लोटून दिली [इं. अँ. ८. १९८-२०० ].

प्रा ची न मा हि ती.- पाणिनीच्या व्याकरणावरून डॉ. भांडारकर अफगाणिस्तान या शब्दाबद्दल माहिती पुढील प्रमाणें देतात. हें राज्य प्राचीन ग्रीक व रोमन भूगोलवेत्त्यास कपिसेन या नांवानें ठाऊक होतें. ह्युएनत्संग हा यास 'किआ-पिशे. असें नांव देतो. पाणिनी यानें या राज्यास 'कापिषी' असे नांव दिलें आहे. (४.२,९९): आणि यावरून त्यानें या देशांत होणार्‍या मद्यास कापिषायनी असें म्हटलें आहे.

अर्कोसिआ :- या राज्यास अरब भूगोलवेत्तो अर्खोज अथवा रोखोज असें म्हणत. ह्युएनत्संग यानें रौलूट असें या राज्याचें नांव धरून 'त्सौकूट' हा शब्द योजिला आहे. यूरोपीय प्राचीन शास्त्रवेत्त्यांनीं (विल्सन- अ‍ॅरिआना अँटिका) अर्कोटिस हें या राज्याचें अथवा नदीचें नांव झेंद शब्द 'हरकिति' या शब्दापासून निघालें आहे असें म्हटलें आहे. झेंद 'हरकिति' हा शब्द संस्कृत सरस्वती या शब्दाचें रूप आहे; परंतु सरस्वती ही सप्तसिंधूंपैकीं एक नदी असल्यामुळें ती सतलजच्या पूर्वेस असून दुसर्‍या सहा नद्यांपासून इतक्या दूर असणे शक्य नाहीं. तेव्हां अर्कोसिआ, अर्खोज अथवा रोखोज हीं नावें पाणिनीच्या भाष्यकारांनीं उल्लेख केलेल्या 'रिक्षोद' पर्वताच्या नांवापासून निघालेलीं असावीं. येथील ब्राह्मणांस 'अर्क्षोदा:' असें म्हटलें आहे. हें नांव अपवादांमध्यें आहे (पाणिनी ४.३, ९१).

वने, वन्ने, बनु:- ह्युएनत्संग यानें उल्लेख केलेल्या फलनु या अफगाणिस्तानांतील प्रांतास अर्वाचीन ग्रंथकार वने, वन्ने अशीं नावें देतात. कनिंगहॅम हा या प्रांतास बनु म्हणतो. या प्रांताचें संस्कृत नांव माहीत नाहीं; तथापि पाणिनी यानें कांही ठिकाणीं 'वरणु' या देशाचा उल्लेख केला आहे (४.२, १०३; ४.३, ९३) आणि हाच ह्युएनत्संग यांचा फलनु देश असावा.

स्वात :- या काबूल नदीच्या शाखेचा 'सुवास्तु' या नांवानें पाणिनीनें उल्लेख केला आहे (४.२, ७०).

गंधार :- यांचा देश कच्छादि गणांत घातला आहे (४.२,१३३).

अओर्नोस :- हा किल्ला अलेक्झांडर यानें फार शौर्यानें घेतला. याचें संस्कृत नांव अद्याप माहीत नाहीं. प्रो. वुइल्सन हा यास 'आवरण' म्हणतो. याच्या पूर्वींचें नांव ग्रीक लोकांनीं गाळलें असावें. कंनिंग हॅम हें नांव 'वर' = राजा याच्यापासून आलें असावें असें म्हणतो.

पाणिनी यानें 'वरणा' असें एका नगरीचें व तेथील लोकांचें नांव दिले आहे, त्यावरून कदाचित् हें नांव निघालें असेल (पाणिनी ४.२, ८२). सिंधु नदीच्या उजव्या तीरावर अटकच्या समोर हल्लीं एक बरणस अथवा वरणस या नांवाचें गांव आहे असें म्हणतात.

ओर्तोसान :- या शहरास प्राचीन भूगोलवेत्त्यांनीं हल्लींचें काबूल म्हटलें आहे. याचें संस्कृत नांव सांपडत नाहीं. प्रो. वुइल्सन हे हा शब्द 'ऊर्घ्द्वस्थान' यापासून निघाला असें म्हणतात. परंतु ही निव्वळ कल्पना दिसतें. कारण या नांवाचें गांव असल्याचा उल्लेख सांपडत नाहीं. ह्युएनत्संग यानें या प्रदेशास 'फो-लि-शि-स-तगं-न' असें म्हटलें आहे. हा शब्द पानिणीनें उल्लेख केलेल्या (५.३,११७) परशु या शब्दापासून परशुस्थान असा होऊन त्याशब्दापासून निघाला असावा.

पंजाब :- पाणिनी व पतंजलि यांनीं या प्रांतास 'बाहिक' म्हटलें आहे (४.२,११७ ५.३,११४). अलेक्झांडरचे इतिहासकार म्हणतात कीं, त्यानें हिड्रओट्स् (रावी) नदी ओलांडल्यावर पंजाबांतून जाऊन संगल शहर घेतलें. यूरोपीय प्राचीन शास्त्रवेत्ते यास 'शाकल' असें संस्कृत नांव देतात; परंतु हें पाणिनीनें उल्लेख केलेले 'सांकल' (४.२,७५) असावें. हें शहर सांकल नांवाच्या पुरुषानें बसविलें होतें. शाकल ही मद्रांची राजधानी असून ती ह्युएत्संग याच्या वेळीं कायम होती; परंतु संगल या शहराचा अलेक्झांडर यानें नाश केला होता. (पाणिनी पहा)

पर्वत :- पंजाबच्या मध्यभागाचें नांव 'ह्युएनत्संग' यानें पर्वत या शब्दाचें मातृकान्तर करून 'पलेफतो' असें दिलें आहे. हें मातृकान्तर मॉ. जुलिआँ यांच्या आधारानें बरोबर आहे. कनिंगहॅम यानें हें सोर्वत अथवा पर्वत याचें रूपान्तर असावें असें म्हटलें आहे; परंतु पाणिनीनें पर्वत हें देशाचें नांव दिलें आहे (४.२,१४३).

मल्लि व ऑक्सिड्रेक :- पाणिनीमध्यें एका नियमाचें उदाहरण म्हणून (५.३,११४) मालव आणि क्षुद्रक हे शब्द दिले असून हे पंजाबांतील लोक असून त्यांचें अनेक वचन 'मालव्या:' आणि 'क्षौद्रक्या:' असें होतें असें म्हटलें आहे. यावरून अलेक्झांडर यास पंजाबांत भेटलेले वरील मल्लि आणि ऑक्सिड्रेक हे मालव व क्षुद्रक असावे. कनिंगहॅम याच्या म्हणण्याप्रमाणें आक्सिड्रेक हा शब्द शूद्रक यापासून निघालेला दिसत नाहीं.

संब्रेसी अथवा सब्रेसी :- हे लोक कनिंगहॅम याच्या म्हणण्याप्रमाणें संवाग्री (हा संस्कृत शब्दासारखा दिसत नाहीं) नसून यौधेय गणांतील (५.३,११७) बौभ्रेय असावें (रा.गो.भांडारकर).

अ र्वा ची न इ ति हा स.- अफगाण इतिहासकार या लोकांस बेनि इस्त्रायल (इस्त्रायलचीं मुलें) म्हणतात व साल राजा (मुसुलमान लोक याला तालात म्हणतात.) पासून त्याचा मुलगा जेरिमिया, जेरिमियाचा मुलगा अफगाण व त्याच्यापासून आपण पैदा झालों असें हे लोक म्हणतात. असंख्य अफगाणी लोक नेबुकाडरेझरनें येथून दूर नेले; पण ते घोर व फेरोझाच्या पहाडांत नेले. महंमदानें आपला नवीन पंथ जाहीर केल्यानंतर नऊ वर्षांनीं त्यांनां या देवदूताची माहिती झाली व त्यांनीं कायस याचें नेतृत्वाखालीं एक मंडळ महंमदाचा शोध करण्याकरितां मदिनेला पाठविलें. या मंडळामधील लोक कट्टे भक्त बनले व परत आल्यावर त्यांनीं या सर्व लोकांचें धर्मांतर केलें. कायस व त्याचीं तीन मुलें यांपासून खरे अफगाण लोक आपण पैदा झालों असे म्हणतात.

ही गोष्ट निरनिराळ्या सविस्तर रीतींनीं अफगाण लोकांनीं कित्येक पुस्तकांत वर्णन केलेली आहे. यांपैकीं सर्वांत जुनें पुस्तक सोळाव्या शतकांतील आहे व यापेक्षां जास्त पुरातन काळीं या गोष्टीचा कांहींएक मागमूस आपणास माहीत नाहीं. मेजर रॅव्हर्टी यानें दिलेल्या भाषांतरांत सालोमान राजानें सुलेमान पर्वतांत, अफगाणमध्यें स्वत:वसती केली असें वर्णन आहे. नेबु काडरेझर किंवा घोर यांसंबंधीं उल्लेख नाहीं. फॅरोआच्या जातीच्या कॉप्टसच्या लोकांपासून अफगाण लोकांची उत्पत्ति झालेली आहे असें आपण वाचलें, असें फेरिस्ता नांवाच्या इतिहासकाराचें म्हणणें आहे. मि. बेलोनें आधार दिलेल्या इतिहासांपैकीं एका इतिहासांत असें लिहिलें आहें की, कायमचे वेळेपूर्वीं बिलोबिलुचसचा बाप, (उझबेगांचा पूर्वज) उझबक व अफगाना हीं भावंडें होतीं.

इ. स. पूर्वीं ३१० व्या वर्षी सेल्युकसनें हिंदुस्थानांतील सांड्रकोटस (चंद्रगुप्त) याला विवाहांतील ठरावान्वयें सिंधू नदीच्या प९चिमेकडील हिंदु लोकांची वस्ती असलेला कांहीं प्रदेश दिला होता. यांत काबूल नदीच्या पात्राचा कांहीं भाग होता. यानंतर साठ वर्षांनीं बॅक्ट्रियामध्यें एक स्वतंत्र ग्रीक घराणें स्थापन झालें. याची सत्ता काबूलवर व केव्हां केव्हां सर्व अफगाणिस्तानावर पसरलेली होती. काश्मीरांतील जुनें शिल्पकाम, पंजाबांतील माणिक्याल येथील स्तूप व पेशावर दरींत सांपडलेलें बरेंच खोदीव काम यावरून ग्रीकवर्चस्वाची साक्ष पटते. बॅक्ट्रियावर सिथियन लोकांनीं स्वारी केली, या बाबतींत जुन्या व चिनी कथानकांत एकमत आहे. यांपैकींच एका मुख्य राष्ट्रानें-ज्याला चिनी लोकांनीं युएची म्हटलें आहे-सोग्डियाना व ऑक्सस येथें राज्य स्थापिलें. ख्रिंस्ती शकाच्या सुमारास कुशन नांवाच्या यांच्यांपैकीं एका मुख्य नायकानें आपला राज्यविस्तार हिंदुकुश पर्वताच्या दक्षिणेकडील देश व सिंध व अफगाणिस्तान यांच्यावर केला. यालाच ग्रीक ग्रंथकार इंडो-सिथिया म्हणतात.

काबूल नदीचे पात्रांतील देशांत बुद्ध धर्माचें वर्चस्व अगोदरच बसलें होतें. जलालाबाद, पेशावरच्या मैदानांत व काबूलच्या आसपास या धर्माचीं चिन्हें सांपडतात. यानंतर एका मागून एक कित्येक घराणीं झालीं. त्यांपैकीं प्रख्यात राजा कनिष्क होता. बुद्ध ग्रंथांत याचा उल्लेख सांपडतो व अकराव्या शतकांतील मुसुलमान प्रवासी, तत्त्ववेत्ता, इतिहासकार व भूगोलकार अबु-इ-रैहान महंमद अल-बिरुनी यालाहि या राज्याची माहिती होती.

तुर्कोमन घराणीं :- ह्युएनत्त्संगच्या वेळीं हिंदु व तुर्क राजे काबूलच्या दरींत राज्य करीत होते. व दहाव्या शतकाच्या अखेरीस काबूल येथील एका हिंदु राजाचें स्वामित्व नाहींसें होऊन सबक्तगीन नावाच्या एका तुर्काच्या हातीं येथील सत्ता गेली. काबुलचें हिंदू घराणें नष्ट झालें तें अलबिरुणीनें म्हटल्याप्रमाणें सन १०१० ते १०२१ च्या दरम्यान केव्हां तरी झाले असले पाहिजे. याविषयीं व्हिन्सेंट स्मिथनें लिहिलें आहे कीं, ''शंकरवर्म्याच्या कारकीर्दीत (सन ८८३ ते ९०२) कनिष्कचा वंशज व तुर्की घराण्याचा शेवटचा राजा, लल्लिय नामक ब्राह्मणाच्या हातून पराभव पावला. तेव्हा लल्लियानें तेथें आपलें घराणें स्थापन केलें व तें सन १०२१ पर्यंत तेथे नांदल्यावर मुसुलमानांनीं त्या सुमारास त्याचा उच्छेद केला.'' (प्राचीन भारतवर्षाचा इतिहास. तिसरी आवृत्तिा पान ३७६).

त्याच्यामागून त्याचा मुलगा महमूद व इतर वंशज यांनीं बाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केलें व काबूल शहर हें आशियांतील एक भव्य शहर बनविलें. यानंतरच्या घराण्यांस सामान्यत: पहिलें अफगाण घराणें समजतात. याचा मूळपुरुष अल्लाउद्दिन घोरीं हा होता. यानें काबूल उद्धस्त केलें होतें. याचा पुतण्या शहाबुद्दीन घोरी यानें बनारसपर्यंत हिंदुस्थान काबीज केलें होतें. व याच्या बंधमुक्त गुलामांनीं १८५७ पर्यंत टिकून राहणारें हिंदुस्थानांतील मुसुलमानी राज्य स्थापिलें होतें. कांहीं काळपर्यंत अफगाण लोकांचा प्रदेश खाझारिम येथील राजांच्या ताब्यांत होता व जलालुद्दीन खाझारिमनें चेंगीझखानाची प्रगति थांबविली होती.

मेंगल घराणें :- तैमूरनें हे सर्व देश काबीज केले होते व ते त्याच्या वंशजांच्या ताब्यांत १५०१ पर्यंत होते. नंतर ते सुलतान बाबरच्या हातीं आले. यानें १५२२ मध्यें अर्घन लोकांपासून कंदाहार घेतलें व यानंतर मोंगल घराण्यानें दिल्ली येथें स्थापिलेल्या मुसुलमानी राज्याचे हे प्रांत बनले. कंदाहार हें कधी मोंगल लोकांच्या हातीं असे व कधीं इराणांतील सूफी लोकांच्या स्वाधील असे.

दुराणी घराणें :- १७३७-३८ मध्यें नादिरशहानें कंदाहार व काबूल घेतलें. नादिरशहाच्या सैन्यांत अहमदखान नावाचा एक तरुण शिपाई होता. नादिरशहाच्या वधानंतर अफगाण लोकांनीं या अहमदखानाला राजा निवडलें. यानें स्थापिलेलें दुराणी घराणें अद्याप राज्य करते. यानें मराठे लोकांचा पानिपत (१७६१) येथें पूर्ण पराजय केला व आपल्या मरणानंतर आपल्या पाठीमागे अफगाणिस्तान, पंजाब, काश्मीर, आक्सस पर्यंत तुर्कस्थान, सिंध, बलुचिस्तान व खोरासान वगैरे प्रांताचें बनलेलें राज्य आपला मुलगा तैमूर याच्या स्वाधीन केले.

तैमूरनें राजधानी कंदाहारहून, काबूलला आणली त्याच्या मरणानंतर त्याच्या तेवीस मुलांमध्ये गादीबद्दल लढाया झाल्या. अखेरीस महमूदानें बरकझाई घराण्याच्या फत्तोखान नांवाच्या शूर सरदाराच्या मदतीनें गादी मिळविली. परंतु महमूदचा मुलगा कामरान यानें फत्तोखानाचा मत्सरानें खून केला.

बरकझाई बंधूंनीं फत्तेखानाबद्दल सूड उगविला व सादोझाई (महमूद व त्याचे वारस) लोकांना काबूल, गिझनी, व कंदाहार येथून हांकून लाविलें. हिरात फक्त कामरानच्या ताब्यांत राहिलें व बाकीचें राज्य बरकझाई लोकांमध्यें वांटून देण्यांत आलें. अशा रितीनें दोस्त महंमदाचे ताब्यांत काबूल आलें.

पहिली अफगाण लढाई :- [१८३८-४२] १८०९ मध्यें नेपोलियननें इराणमध्यें कारस्थान सुरू केल्यामुळें माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांस अफगाणिस्थानचा अमीर शहासुजा यांजकडे वकील म्हणून पाठविण्यांत आलें. १८३७ मध्यें इराणी लोकांनीं हिरातला वेढा दिला व रशियनलोकांच्या कारस्थानामुळें अस्वस्थता उत्पन्न झाली. या वेळीं बर्न्स यांस गव्हर्नर-जनरलनें अमीरच्या दरबारीं वकील म्हणून रवाना केलें. शहा सुजाला गादीवर बसविण्याचें ब्रिटिश सरकारनें ठरविलें. लढाई १८३८ मध्यें सुरू झाली. कंदाहार, गिझनी काबीज करण्यांत आली, शहासुजाला गादीवर बसविलें, दोस्त महंमद शरण आला व त्याला हिंदुस्थानांत रवाना केलें. परंतु परकी लोकांच्या तंत्रानें वागणारा राजा अफगाण लोकांना फारसा पसंत नव्हता. दोन वर्षानंतर १८४१ मध्यें काबूलमध्यें बंड झाले; याचा नायक दोस्त महंमदाचा मुलगा अकबरखान हा होता. बर्न्स, मकनॉटन व इतर अधिकारी यांचे खून झाले. ब्रिटिश शिबंदीनें काबूल सोडून जाण्याचें कबूल केलें. यांपैकीं फक्त डॉ. ब्रायडन हाच जलालाबाद येथें येऊन पोहोंचला. १८४२ मध्यें जनरल पोलॉक यानें जलालबादची सोडवणूक केली, काबूल घेतलें, व कैदी सोडवून घेऊन १८४२ मध्यें तो अफगाणिस्तान सोडून परत आला.

ब्रिटिश व रशियन संबंध :- अफगाणिस्तान स्वतंत्र व अविभक्त ठेवून रशियनराज्य व ब्रिटिश हिंदुस्थान यांच्या मध्यें एक प्रतिबंधक सरहद्द ठेवावी हेंच या वेळीं ब्रिटिश लोकांचें धोरण होतें. दोस्त महंमद इंग्लिश लोकांचा दोस्त बनला. १८६३ मध्यें तो मेल्यावर त्याचा मुलगा शेर अली १८६८ त अमीर बनला. १८६९ मध्यें शेर अली व व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांची अंबाला येथें मुलाखत झाली, व दोन्हीं राज्यांतील परस्परसंबंध जास्त दृढ करण्यांत आले.

१८७३ मध्यें रशियन लोकांनीं खिवा घेतलें. त्यामुळें अमिरास धास्ती उत्पन्न होऊन त्यानें ब्रिटिश सरकारची मदत मागितली, परंतु ती नाकारण्यांत आली. त्यामुळें तो नाराज होऊन त्यानें रशियन लोकांच्या दोस्तीचें बोलणें स्वीकारलें. १८७२ मध्यें वायव्येकडील अफगाणिस्तानची सरहद्द इंग्लंड व रशिया यांनी ठरविली.

अफगाणिस्तानच्या पलीकडे रशियन लोक आपलें राज्य एकसारखें वाढवीत असल्यामुळें ब्रिटिश लोकांनीं अमिराशीं तहाचें बोलणें लाविलें परंतु त्यानें नाकारलें.

दुसरी अफगाण लढाई :- (१८७८-८०) रशियन सरकारानें कान्स्टांटिनोपलवर करावयाच्या हल्ल्यांत इंग्रज लोकांची ढवळाढवळ बंद करावी म्हणून काबूलला अमीराशीं तह करण्याकरितां एक वकील पाठविला. हिंदुस्थानांतून अमिराकडे एक मिशन रवाना करण्यांत आलें, परंतु तें अफगाण सरहद्दीवरूनच परत करण्यांत आलें, यामुळे व्हइसरॉयानें लढाई पुकारली. या लढाईंत डोनाल्ड स्टुअर्टनें कंदाहार घेतलें. दुसर्‍या एका सैन्यानें जलालाबाद व इतर ठाणीं घेतलीं. सर फ्रेडरिक रॉबर्टस्, यानें अमिराचा पराभव पैवार कोटाळ येथे केला. अमीर उत्तरेकडे पळाला व १८७९ मध्यें मझर-इ-शरीफ येथें मेला. आतां शेरअल्लीच्या गादीवर कोणाला बसवावें हा प्रश्न उद्भवला.

मध्यंतरीं याकूबखान यानें आपण गादीवर बसल्याचें पोलिटिकल एजंट मेजर कॅव्हॅग्नियाजला कळविलें व त्याच्याशीं एक तह १८७९ मध्यें करण्यात आला. या तहान्वयें अमीर इंग्रजांचा दोस्त बनला व परराष्ट्रीय कारभार त्यानें इंग्रजांच्या हवालीं केला. परंतु याच वर्षी सपटंबरमध्यें कॅव्हॅग्नि व त्याचे लोक यांचा खून झाला व मोठें बंड झालें. रॉबर्टस् यानें अफगाण लोकांचा चॅराशिया येथें पराभव केला व काबूलमध्यें प्रवेश केला. याकूबखान शरण आला व त्याला हिंदुस्थानांत पाठविण्यांत आलें. डिसेंबर १८७९ पर्यंत ब्रिटिश सैन्यानें काबूल जिल्हा आपल्या ताब्यात ठेविला, परंतु अफगाणिस्तानांतील राजकीय स्थिति समाधानकारक नव्हती.

अबदुल रहमानची कारकीर्द :- अमीरशेर अलीच्या मोठ्या भावाचा मुलगा अबदुल रहमान हा शेरअलीविरुद्ध लढला होता, म्हणून त्याला दहा वर्षेंपर्यंत रशियन लोकांजवळ ऑक्सस नदीपलिकडे बंदिवासांत रहावें लागलें. १८८०त तो परत आला व अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागांत आपली सत्ता स्थापन करूं लागला. व्हाइसराय लॉर्ड लिटन यानें काबूल येथील अधिकार्‍यास त्याच्याशीं बोलणें सुरू करण्यास फर्माविलें. मोठ्या चतुराईनें अबदुल रहमानला इंग्रज लोकांनीं इतर कोणत्याहि परकी राष्ट्रांशीं संबंध न ठेवण्याचें कबूल करावयास लाविलें, याबद्दल ब्रिटिश लोकांनीं त्याला अमीर म्हणून कबूल केलें. काबूल राज्यापासून कंदाहार प्रांत अलग करून ब्रिटिश लोकांनीं त्याच्यावर बरकझाई घराण्यांतील शेर अलीखाल नांवाच्या सरदारास स्वतंत्र राजा नेमिलें.

अफगाणप्रकरणाचा निकाल लागल्यासारखें वाटले परंतु १८८० मध्यें शेरअलीचा धाकटा मुलगा अयुबखान यानें हिरातहून कंदाहारवर स्वारी केली. ब्रिटिश सैन्याचा भैवंड येथें पूर्ण पराभव केला व कंदाहारला वेढा दिला. सर फ्रेडरिक रॉबर्टस् यानें काबूलहून चाल केली, अयुबखानाच्या सैन्याचा पराभव करून दाणादाण उडविली. ब्रिटिश मंत्र्यांनीं कंदाहार सोडून देण्याचें ठरविलें व सरदार शेरअलीखान हा राज्य सोडून हिंदुस्थानांत गेला, यामुळें अमीरास या शहराचा ताबा घेण्याचें बोलावणें आलें. परंतु अयुबखान यानें जेव्हां ब्रिटिश फौज हिंदुस्थानांत परत गेल्याचें ऐकलें तेव्हा तो हिरातहून मोठें सैन्य घेऊन कंदाहारजवळ आला. त्याच्या लोकांनीं गिरिष्कचा किल्ला घेतला. अमिराच्या सैन्याचा पराभव झाला व अयुबखानानें कंदाहार घेतलें. अमीरानें सैन्य घेऊन चाल केली व अयुबचा पराभव करून त्याच्या तोफा घेतल्या तेव्हां अयुब पळाला. मध्यंतरीं अमीराच्या सरदारानें हिरात घेतलें; त्यामुळें अयुबखान इराणांत पळून गेला व अशा रीतीनें अमीराचें वर्चस्व स्थापित झालें.

१८८४ मध्यें ब्रिटिश व रशियन अधिकार्‍यांच्या संयुक्त कमिशननें अफगाणिस्तानची उत्तरसरहद्द कायम करण्याचें ठरविलें व हें काम मोठ्या कारवाईनें संपविण्यांत आलें.

१८८० मध्यें गादीवर बसल्यानंतर पहिलीं दहा वर्षें अमीरानें सर्व देशावर आपली सत्ता मजबूत करण्याच्या कामी घालविलीं. कांही स्थानिक बंडे व अयुबखान व अमीराचा चुलत भाऊ इशाकखान यांचे अमीरास पदच्युत करण्याचे यत्‍न मोठ्या क्रोर्यानें मोडण्यांत आले. १८९१ मध्यें अमिरानें आपली सत्ता सर्व अफगाणिस्तानभर स्थापन केली. १८९५ मध्यें अमीराच्या सैन्यानें काफरिस्तानांत शिरून तो प्रांत काबीज केला. मध्यंतरी, जेथें चिनी राज्यास अफगाण सरहद्द मिळते त्या टोंकापर्यंत उत्तरसरहद्द ठरविण्यांत आली, व हिंदुस्थानकडील अफगाणची पूर्वसरहद्द ठरविण्यांत येऊन नकाशा काढण्यात आला. याबद्दल अमीराला ब्रिटिश सरकाराकडून वार्षीक मोठी खंडणी मिळाली व युद्ध सामुग्रीहि बरीच मिळाली व हिंदुस्थानांत हत्यारें खरेदी करण्याचा हक्क मिळाला. यामुळें अमीराला देशांतील निरनिराळ्या टोळ्यांनां कमजोर करता आलें, व यूरोपीयन शस्त्रायुधानीं सज्ज केलेले शिस्तवार सैन्य ठेवितां आलें. व देशांत अनियंत्रित सत्ता स्थापन करता आली. सर्वप्रकारचे जबर कर बसविण्यात येऊन व्यवस्थित रीतीनें वसूल करण्यात आले. याचा परिणाम असा झाला कीं, पूर्वी निरनिराळ्या टोळ्यांच्या नायकांना लढाई करिता सैन्य पुरविण्याबद्दल जमीनी देत असत, परंतु आतां उक्ता पगार देऊन सैन्यभरती करण्यांत येऊं लागली. ज्यांच्या ज्यांच्या पासून अमीराला धोका वाटत असे त्या सर्वांना त्यानें मारिलें अथवा हद्दपार केलें. त्याच्या शिक्षा फार कडक असत. परंतु ह्याच अमीरानें देशांतील बेबंदशाही मोडली, स्थानिक नायकाचा जुलूम नाहींसा केला, व कांहीं शांतता व व्यवस्था स्थापन केली. अफगाणिस्तानच्या इतिहासांत याच अमीरानें प्रथम सुयंत्रित राज्यव्यवस्था स्थापन केली. अंतरराष्ट्रीय कारभारांत कोणत्याहि प्रकारची परराष्ट्रीय ढवळाढवळ चालू द्यावयाची नाहीं हें त्याचें धोरण होतें. तो ब्रिटिश लोकांपासून खंडणी व युद्धोपयोगी सामान घेत असे, परंतु राज्यरक्षण अथवा व्यापारवृद्धि या कोणत्याहि सबबीवर त्यानें रेल्वे, तारायंत्रे वगैरे सुधारणा ब्रिटिश लोकांनां करूं दिल्या नाहींत.

हबिबुल्लाचें राज्यारोहण :- अबदुल रहमान १९०१ मध्यें मेला व त्यानंतर दोन दिवसांनीं त्याचा वडील मुलगा हबिबुल्ला त्याच्या गादीवर बसला. सैन्य, धार्मिक संस्था, टोळ्यांचे नायक व सर्व दर्जाचे लोक यांनीं याला कायदेशीर राजा म्हणून कबूल केले. अमिराचें पहिलें काम म्हटलें म्हणजे आपली लोकप्रियता वाढविणे व अंतरराष्ट्रीय राज्यकारभारपद्धत सुधारणें हें होतें. विशेषत: अबदुल रहमान यानें प्रत्येक टोळीस कांही ठराविक लोक सैन्यांत काम करण्यास देणें भाग पाडलें होतें. या बाबतींत कांहीं सुधारणा करण्याचें त्यानें योजिलें व या हेतूनें टोळ्यांचे कामकाज पाहण्याकरितां एक कौन्सिल नेमण्यांत आलें व या कौन्सिलांत प्रत्येक टोळीचा एक प्रतिनिधि असावा अशी योजना करण्यांत आली.

परराष्ट्रीय कारभाराच्या बाबतींत या अमीरानें आपल्या बापाचेंच धोरण स्वीकारलें. परराष्ट्रीय प्रकरणांत ब्रिटिशसरकारची सल्ला घेण्याची अट अमीरानें इमानानें पाळली आहे. हिंदुस्थान सरकार व अफगाण सरकार यांच्यामध्यें भिजत पडलेल्या कांहीं प्रकरणाच्या बाबतींत या अमिरानें आपल्या बापाचेंच धोरण स्वीकारलें. १८८० मध्यें ब्रिटिश सरकारनें दिलेली आश्वासनें वाढविणें अगर बदलणें या कामाकरितां सर वुईडेन यांच्या नेतृत्वाखाली काबूलला एक मिशन पाठविण्यांत आलें. परंतु पूर्वीच्या करारापेक्षां कांहीं एक जास्त ठरविण्यांत आलें नाहीं. हा ठराव १९०५ मध्यें झाला. जानेवारी १९०७ मध्यें व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांची भेट अमिरानें हिंदुस्थानांत घेतली.

३१ आगस्ट सन १९०७ रोजी आंग्लोरशियन तह झाला. या तहान्वयें अफगाणिस्तानाची राजकीय स्थिति बदलण्याचा, त्याच्या अंतरराष्ट्रीय कारभारांत हात घालण्याचा किंवा या राज्यांतील मुलूख घेण्याचा इरादा ब्रिटिश सरकारनें सोडून दिला व रशियानें अफगाणिस्तान आपल्या वर्चस्वकक्षेच्या बाहेर असल्याचें जाहीर केलें.

अफगाणिस्तानचे अमीर हबीबुल्लाखान यांनी १९०७ मध्यें हिंदुस्थानला भेट दिली व त्या भेटींत ब्रिटिश अधिकारी व अँग्लो-इंडियन समाज यांच्याशीं त्यांचा जो परिचय झाला त्याचा परिणाम अमीर साहेबांच्या पुढील कारकीर्दीवर बराच झाला. ब्रिटिश सरकारशीं त्यांची दोस्ती वाढली. व त्याच सालीं रशियाबरोबर होऊं घातलेल्या व्यापारी सवलती व राजकारणांत शिरकांव देणार्‍या करारनाम्याला संमति देण्याचें त्यांनीं अखेर नाकारलें. १९०८ ते १९१४ हा काल अफंगाणिस्तानला शांततेचा जाऊन तेथें बर्‍याच मुलकी, आर्थिक व  लष्करी सुधारणा करण्यांत आल्या. शाळा, कारखाने, दवाखाने, तारायंत्रें व टेलिफोन अधिक वाढवण्यांत आलें. सुधारलेले लष्करी शिक्षण देऊन सैन्यांत सुधारणा करण्याची व्यवस्था तुर्की अधिकारी नेमून करण्यांत आली. मोटारीनांहि योग्य अशा पक्क्या सडका बांधण्यांत आल्या. आणि हेलमंड, काबूल व आंर्गदाब या नद्यांचे कालवे काढून शेतकी सुधारण्यांत आली.

१९११ मध्यें इटाली व तुर्कस्तान यांत युद्ध सुरू झालें. त्यावेळीं अफगाण लोकांनीं आपल्या धर्मबांधवांना सार्वजनिक फंड गोळा करून पैशाची मदत केली. १९१४ मध्यें जागतिक युद्ध सुरू होतांच हिंदुस्थांन सरकारनें अमीर साहेबांनां बातमी कळवून अफगाणिस्तान तटस्थ राखण्याबद्दल कळविलें, आणि अमीरसाहेबानींहि अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याला धोका पोहोंचणार नाहीं तोपर्यंत तटस्थ राहण्याचें कबूल केले. १९१४ च्या नवंबरमध्यें तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूनें युद्धांत सामील झाल्यावर पुन्हां हिंदुस्थानसरकारनें अमीरसाहेबांनां खलीता पाठवून युद्ध धार्मिक स्वरूपाचें नाहीं व अरबस्तानांतील इस्लामी पवित्र स्थानांवर हल्ला होणार नाहीं याबद्दल खातरजमा केली. उलटपक्षीं तुर्कस्तान युद्धांत शिरतांच अफगाण लोकांत बरीच चळवळ सुरू झाली व धर्मबांधव तुर्कांना मदत करून स्वत:चाहि फायदा करून घेण्याची विनंति अमीरांनां करण्यांत येऊं लागली. बाहेरून जर्मन सरकारनें जर्मन व तुर्की अधिकारी व त्यांच्याबरोबर हिंदु व मुसुलमान अशा हिंदी राजद्रोही इसमांनां देऊन एक मिशन अमीरसाहेब यांचकडे १९१५ मध्यें पाठविलें पण त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून अमीरांनीं आपलें तटस्थ राहण्याचें वचन पूर्णपणें पाळलें, इतकेंच नव्हे तर सरहद्दीवरील टोळ्यांत शांतता राखण्याच्या कामीं मदत केली; व त्यामुळें हिंदुस्थानसरकारला पुष्कळसें हिंदी सैन्य रणभूमीवर पाठवितां आलें. १९१८ नवंबर मध्यें जागतिक युद्ध थांबलें, पण अफगाणिस्तान मात्र शांततेच्या लाभाला लवकरच अंतरलें. १९१९ फेब्रुवारी मध्यें अमीर हबीबुल्लाखान यांनां रात्री अंथरुणांत असतांना गोळी झाडून ठार करण्यांत आलें. आणि त्याचा भाऊ नसरुल्लाखान आणि तिसरा मुलगा अमानुल्लाखान या दोघांनीं राजा म्हणून जाहीर केलें. पण लोकांनीं तिसर्‍या मुलाच्या हक्कालाच पाठिंबा दिल्यामुळें चुलता नसरुल्लाखान व इतर राजवंशीय पुरुष यांनीं त्याची सत्ता मान्य केली. अमानुल्लाखान यांनीं हिंदुस्थानसरकारला स्वराज्यारोहण जाहीर करून दोस्तीचें आश्वासन दिलें. पण या अमीरांनीं लवकरच भलत्या लोकांच्या नादीं लागून पूर्ण स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला, व सोव्हिएट सरकारशीं स्नेहसंबंध जोडण्याकरितां मास्कोला मिशन पाठविलें. हिंदुस्थानांत व मेसापोटेमियांत ब्रिटिशांच्या जुलमी अंमलामुळें बंडें उद्भवलीं आहेत अशा कंड्या पिकविण्यांत येऊन हिंदुस्थानावर स्वारी करण्याची तयारी अफगाण सरकारनें केली. १९१९ मे मध्यें हिंदुस्थानकडे सैन्य रवाना झालें. पण ब्रिटिश सैन्यानें त्याला मागे हटवून डाक्का व स्पिन बलदक हा अफगाणांचा किल्ला सर केला. तेव्हां अमीरानें तहाचें बोलणें सुरू करून रावळपिंडीस ८ ऑगष्ट रोजीं युद्ध तहकुबीच्या तहनाम्यावर सह्या झाल्या व कायमचा तह मागाहून करण्याचें ठरलें. १९१९ मे पासून आगष्ट पर्यंत सरहद्दीवरील रानटी टोळ्यांनीं लहान लहान हल्ले व लुटालुट सुरू ठेविली होती.

या तहांतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानें अफगाणिस्तानला परराष्ट्रीय राजकारणांत पूर्ण स्वातंत्र्य देण्यांत आलें. पूर्वीच्या अमीरांबरोबर ब्रिटिशांच्या सल्ल्यानें चालण्यासंबंधाचें परराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीवर जें नियंत्रण होतें तें काढून टाकण्यांत आलें; आणि अंतर्गत व परराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या कारभारांत अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य मिळालें. त्याबरोबरच हिंदुस्थान सरकारने अमीरांना चालू असलेली वार्षिक खंडणी बंद केली, व हिंदुस्थानांतून दारू गोळा वगैरे युद्धोपयोगी सामान नेण्याची परवानगी रद्द केली.

१९२० जानेवारीमध्यें सोव्हिएट सरकारनें काबूलला आपलें मिशन पाठविलें व बोलणें चालणें होऊन १९२० आक्टोबरमध्यें तहनाम्यावर सोव्हिएट सरकारनें सही करून अमीराच्या संमतीकरितां तहनामा पाठविला. अमीरांनां खंडणी द्यावयाचें व तज्ज्ञ पुरविण्याचें सोव्हिएट सरकरानें कबूल केलें आहें असें दिसतें. तथापि पूर्वी १९२१ नवंबरपर्यंत या अटी प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. पूर्वीच्या कराराप्रमाणे कायमचा तह करण्यासंबंधान हिंदुस्थान व अफगाण सरकारांमध्यें १९१९-२० मध्यें बराच पत्रव्यवहार चालू होता. पुढे १९२१ मध्यें सर हेनरी डॉब्सच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश वकील मंडळ काबूलला पाठविण्यांत आलें. १९२० नवंबर मध्यें तुर्की जनरल जेमलपाशाहि काबूलला आला होता.

गेल्या दोन वर्षांत अफगाणिस्तान विविध चळवळीचें केंद्र बनून राहिलें होतें. एकीकडून बोल्शेविक व दुसरीकडून ब्रिटिश यांनी मुत्सद्दीगिरींचे आटोकाट प्रयत्‍न चालविले होते. डाब्स मिशननें अफगाणिस्तानांत दोन वर्षे राहून त्या देशाला फायदेशीर असा तह घडवून आणिला; या तहामुळें अफगाणिस्तानाला जास्त स्वतंत्रता मिळाली. बोल्शेविकांच्या भीतीमुळें ब्रिटिशांनीं अफगाणला सवलती दिल्या, बोल्शेविकांशीं झालेला तहनामा पुढें दिला आहे.

अ फ गा णि स्ता न व र शि या यां चा त ह.- रशिया व अफगाणिस्तान यांचमधील मित्रत्वाचे नातें दृढ करण्याकरितां ता.२८ फेब्रुवारी सव १९२१ इ. रोजीं मास्को येथें खालील तह झाला. तहाचें बोलणें करण्यास रशियाचे २ व अफगाणिस्तानचे ३ प्रतिनिधी मास्को येथे जमले होते. तहांतील २,९ व १० ही महत्त्वाची कलमे होत. पहिल्या कलमानें दोघांनीं एकमेकाचें स्वातंत्र्य कबूल करून तह करण्याचें ठरविलें. दुसर्‍या कलमानें एकानें दुसर्‍यास नुकसानकारक होईल असा कोणताहि लष्करी अगर राजकीय करार तिसर्‍याच देशाबरोबर करण्याची मनाई केली आहे. तिसर्‍या कलमानें अंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणें वकिलातीस जे जे हक्क अगर सवलती असतात, त्या त्या एकमेकांस दिल्या आहेत. आपलें निशाण उभारणें, वकिलातींतील सभासदास व वकिलातीच्या पत्रव्यवहारास असलेली सवलत, टेलिफोन अगर टेलिग्राफचे मार्ग खुले असणें, वकिलातींच्या इमारतीची देशांतील कोर्टाच्या अधिकारांतून मुक्तता वगैरे हे हक्क होत. एकमेकांच्या लष्करी एजंटांचाहि त्यांच्या त्यांच्या वकिलातींत समावेश करावयाचा. चवथ्या व पांचव्या कलमानें रशियानें अफगाणिस्तानांत ५ व अफगाणिस्तानानें रशियांत ७ ठिकाणीं वकिलाती उघडाव्या व त्या कोठें उघडाव्या हें सांगितलें आहे. याशिवाय जादा वकिलातहि एकमेकांच्या तंत्रानें उघडण्यास हरकत नाहीं. सहाव्या कलमानें अफगाणिस्तान रशियांत जो जो माल विकत घेईल तो तो कोणतीहि जकात न घेतां रशियाबाहेर जाऊं देण्याची रशियानें कबुली दिली आहे. सातव्या कलमानें पूर्वेकडील देशाचें स्वातंत्र्य कबूल करण्यांत येऊन आठव्या कलमानें बुखारा व खिवा या देशांस स्वातंत्र्य देऊन नवव्या कलमानें गेल्या शतकांत अफगाणिस्तानच्या मालकीचे पण आतां रशियाकडे असलेले प्रांत न्यायास व लोकमतास अनुसरून रशियानें अफगाणिस्तानास परत देण्याचें कबूल केलें आहे. दहाव्या कलमानें रशियानें अफगाणिस्तानास आर्थिक व इतर मदत देण्याचें कबूल केले आहे. या कलमाप्रमाणें दरसाल अफगाणिस्तानास दहा लाख रूबलपर्यंत अगर त्या किंमतीची सोनें चांदीची मदत फुकट देणे, कुष्क, हिरात, कंदाहार, काबूल ही टेलिग्राफ लाईन बांधून देणें, तज्ज्ञ लोक पुरविणे वगैरे मदत रशियानें तह कायम झाल्यापासून दोन महिन्याच्या आंत करण्याचें कबूल केलें. अकराव्या कलमांत तह रशियन व पर्शियन या दोनहि भाषांत लिहिला असून दोनहि प्रती अस्सल आहेत असें नमूद आहे. दोनहि राष्ट्रांच्या सरकारांनीं मंजुरी दिल्यावर सदरहू तह पक्का व्हावा व त्यावर काबूल येथें शेवटचें शिक्कामोर्तब व्हावें असें बाराव्या कलमांत आहे.

प र रा ष्ट्री स धो र ण.- अफगाणिस्तानाचें परराष्ट्रीय धोरण तीन संबंधाकडे लक्ष ठेवून आखावें लागेल. (१) इराणाशीं संबंध, (२) बुखार्‍याशीं संबंध, (३) ब्रिटिश व सोव्हिएट सरकार यांशीं संबंध. गेल्या तीन वर्षांत वरील संबंधात पुढीलप्रमाणें फेरफार झाले.

बुखारा :- बुखारा येथें लोकसत्तात्मक पद्धतीवर राज्य व्यवस्था बनविण्याच्या कामीं अफगाणिस्तानचा हात होता हें विदितच आहे. तथापि बुखार्‍याचा माजी अमीर अफगाणकडे आल्याबरोबर तेथील अमीरानें त्याला आश्रय दिला व त्याची गादी पुन्हां परत मिळवून देण्याची खटपट चालविली अशी कुणकुण आहे. अफगाणपत्रें याचा पूर्ण इनकार करीत आहेत.

इराण :- आक्टोबर १९२१ मध्यें इराणशीं असा तह झाला कीं, जर एक राष्ट्र तिर्‍हाईत राष्ट्राशीं युद्ध करण्यांत गुंतलें असेल तर दुसर्‍या राष्ट्रानें त्या तिर्‍हाईत राष्ट्राचा जय न होईल अशी मोठी खटपट करावी.

ब्रिटन :- १९१९ सालीं डाब्समिशनने असा तह घडवून आणला कीं, अफगाणिस्तानला पूर्ण अंतस्थ स्वातंत्र्य असावें; व त्या राष्ट्रानें बोल्शेविक वकीलात परत पाठवावी व कंदाहार आणि जलालाबाद येथें ब्रिटिशांचे वकील नेमावेत. सरहद्दीवरील टोळ्यांचे स्वातंत्र्य कोणी हिरावूं नये कारण त्या योगानें हिंदुस्थानला धोका पोचण्याचा संभव आहे.

सोव्हिएट :- वरील तहामुळें सोव्हिएट सरकारचे प्रयत्‍न थंड पडले असें कोणी समजूं नये. काबूल येथील सोव्हिएट सरकारच्या वकीलानें अफगाणिस्तानाला पौरस्त्य राष्ट्रसंघाचा सभासद होण्याला विनवावें असा त्याला इषारा मिळाला. या संघांत रशिया, तुर्कस्तान, काकेशियन लोकसत्ताक राज्य, बुखारा, मोंगोलिया आणि इराण यांचा समावेश आहे.

आ धु नि क अं त स्थ सु धा र णा.- काबूल हे हिंदुस्थानपर्यंत तारायंत्रे सुरू केली आहेत. लोकहितासाठीं अमीराचा खाजगी खर्च बराच संपुष्टांत आणिला आहे. पुष्कळसे फ्रेंच पंडित बोलावण्यांत आले असून त्यांच्याकडे शिक्षण व संशोधन हीं कामें दिलीं आहेत. एक तज्ज्ञ इटालियन इंजिनियर नेमून भूगर्भाचें धातूंकरितां संशोधन चालविलें आहे; त्यानें प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून कोळसा, तांबें, लोखंड, रुपें आणि गंधकित द्रव्यें हीं चांगलीं निघतील असा तर्क आहे. मालाची नेआण करण्याच्या बाबतींत अद्याप मोठी अडचण आहे. अफगाणिस्तानाच्या वेशीपर्यंत आगगाडी नेण्याचें ब्रिटिश पत्करीत आहेत व पुढें आपल्या हद्दींत अमीरानें फांटे न्यावेत असें कांही घाटत आहे असें म्हणतात. अफगाण सरकारनें सध्यां पोष्ट खाते सुरू केले आहे व अंतरराष्ट्रीय टपालसंघांत तें सामील झालें आहे. १९२२ च्या उत्तारार्धांत मोटारनें होत असलेले टपालासुद्धां सर्व व्यवहार एका इटालियन कंपनीच्या स्वाधीन केले आहेत. काबूलचें ''आमन-इ-अफगाण'' आणि जलालाबादचें ''इत्तिहद-इ-मशगी'' हीं दोन राष्ट्रीय पत्रें देशाच्या सुधारलेल्या भावना व्यक्त करितात. याखेरीज दुसरीहि पत्रें आहेत.

हल्लींचे अफगाणचे अमीर अमानुल्ला फारच साधे असून स्वत: राज्यकारभार पाहतात. त्यांची टापटीप व व्यवहार मागील कोणत्याहि अमीराच्या अंगी नव्हता. राज्यांत सुधारणा कशी करावी याकडे त्यांचे लक्ष असतें. मुलांप्रमाणें मुलींसहि शिक्षण मिळालें पाहिजे यावर त्यांचा मोठा कटाक्ष आहे. राज्यांतील बहुतेक शैक्षणिक कामें हिंदी गृहस्थाकडे आहेत. पेशावरपासून काबूलपर्यंत मोटाररस्ता करण्याची त्यांची मनीषा आहे. हिंदी लोकांना खुष ठेवण्याबद्दल अमीर फार उत्सुक दिसतात असें अफगाणिस्तानांतून जाऊन आलेला डॉ. स्कार्पा नांवाचा एका इटालियन व्यापारी संघाचा अध्यक्ष म्हणतो.

अ मी रा चें हिं दी लो कां शी व र्त न.- अमीराचें हिंदी लोकांशी वर्तन कोणत्या प्रकारचें आहे हें तीन वर्षांपूर्वी त्यांनीं काढलेल्या पुढील जाहीरनाम्यावरून दिसून येईल. आपल्या राज्यांतील हिंदु लोकांचे हाल होत आहेत असें अमीरांच्या कानीं येतांच त्यांनी हिंदी लोकांनां आपलीं गार्‍हाणीं नीटपणें पुढें मांडण्यास सांगितले. नंतर आपल्या प्रजेला जो हुकूम सोडला त्यांतील कलमांचा गोषवारा येणेप्रमाणें:- (१) इस्लामीधर्म स्वीकारण्याविषयीं कोणाहि हिंदूवर जुलूम होऊं नये. (२) हिंदूंनी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणें धार्मिक विधी आचारावेत व आपआपसांतील भांडणे मिटवावींत. (३) हिंदी स्त्रियांनां वाटेल त्या ठिकाणीं बिनहरकत जातां यावें. (४) एखादी धर्मशाळा ओस पडली असेल तर त्या ठिकाणीं पुन्हां वस्ती व्हावी. (५) कोणतीहि रोगी गाय मारण्यांत येऊं नये; तिला आपोआप मरण येऊं द्यावें. (६) पाहिजे तो पोषाख हिंदूंनीं करावा. (७) अमीराच्या हिंदी प्रजेने अफगाणिस्तानांत कोठेंहि जमीन खरेदी करावी. (८) मुसुलमानांच्या इतकाच हिंदूंनीं कर द्यावा. (९) जर एखादी स्त्री किंवा पुरुष मुसुलमान झाला तर त्याच्या बायकोवर किंवा तिच्या नवर्‍यावर नवीन धर्म स्वीकारण्याविषयीं बळजबरी होऊं नये. (१०) आपल्या बापाच्या हयातींत जर मुलगा मुसुलमान झाला तर फक्त त्याची स्वत:ची मिळकत त्याला घेऊं द्यावी, बापाच्या मिळकतीवर त्याचा हक्क राहणार नाहीं. (११) बापाच्या मृत्यूनंतर जर मुलगा मुसुलमान धर्म स्वीकारील व जर बापाची मालमत्ता तोंपावेतों मुलांमध्यें वांटली गेली नसेल, तर मुसुलमान झालेल्या मुलाला कायद्याप्रमाणें त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा मिळेल. पण जर बापाच्या हयातींत तो मुसुलमान धर्म स्वीकारील तर वडिलार्जित मिळकतीवर त्याचा वारसा राहणार नाहीं. (१२) हिंदु लोकांनां अफगाणिस्तानात येण्याची व बाहेर जाण्याची मोकळीक आहे. (१३) सरकारी अधिकारी हिंदु मुसलमानांना सारखेच उपयोगी पडतील. अधिकारी लोक, एखाद्या मुसुलमानाच्या घरी चोरी झाली असतां तिचा तपास जितक्या कसोशीने त्यांनीं लाविला असतां तितक्याच कसोशीने हिंदूच्या चोरीचाहि तपास लावतील. (१४) जलालाबाद, गझनी व कंदाहार येथून एक एक हिंदु प्रतिनिधि असेंब्लीकरितां निवडला जाईल.

गेल्या नोव्हेंबर महिन्यांत नवीन होणारी राजधानी जी दरुलमल तिचा पाया घालण्यांत आला. दोन व्यापारी कंपन्या सरकारी मदतीनें निघाल्या, त्यापैंकीं अमानिया ब्रदर्स कंपनी विशेषत: लोंकर, सतरंज्या व गालीचे यांच्या व्यापाराकरितां स्थापन झाली आहे तर फ्रूट कंपनीनें काबूल आणि हिंदुस्थान यांमधील ताज्या व सुक्या फळांचा मोठ्या प्रमाणावरचा व्यापार हातीं घेतला आहे.

इंग्लंडांतील नुकत्या झालेल्या निवडणुकीनंतर अफगाण-हिंदुस्थान राजकारण जें बदललें याचें कारण सध्यां अधिकारावर असलेल्या पक्षाचा स्वसामर्थ्य वाढविण्याचा कदाचित् हा डाव असेल असें वाटतें. कारण गुदस्ताच्या हिंदुस्थानविषयक सरकारी अहवालांत अमीरांची स्तुति व या दोन देशांतील अभंग स्नेह आढळतो; पण हा रिपोर्ट पार्लमेंटला सादर होऊन थोडे दिवस झाले नाहींत तोंच अमीरासंबंधीं ब्रिटन साशंक होतें.

डिसेंबर (१९२३) महिन्यांत ब्रिटिश सरकारनें अफगाणिस्तानाला, मागील महिन्यांत ब्रिटिश अधिकार्‍यांचे खून पाडणार्‍या इसमांनां पकडून देण्याची जोरानें खटपट करण्याविषयीं कडक शब्दांत लिहिलें. महंमद ताझीं या पॅरिस येथील अफगाण वकिलानें या बाबतींत अफगाणिस्तानाला गुन्हेगार धरण्याबद्दल ब्रिटनला दोष दिला व ज्याअर्थी ब्रिटिश हद्दींत हे खून पडले, त्याअर्थी अफगाणिस्तानावर याची मुळींच जबाबदारी येत नाहीं असें निक्षून सांगितलें. सरहद्दीवरील ब्रिटिश मुलुखांतील टोळ्यांसंबंधांत अफगाण सरकार नेहमीं ढवळाढवळ करिते, अशी ब्रिटननें तक्रार पुढें करून वरील प्रश्नाचा समाधानकारक निकाल लागेपावेतों अफगाणिस्तानांत बाहेरून जाणारीं शस्त्रास्त्रें व दारूगोळा यांना मज्जाव करण्याचें ठरविलें. अफगाण मुलुखांत खुनी इसमांना आश्रय मिळतो असें ब्रिटिशांचे म्हणणें पडलें, तेव्हां अमीरानें ११०० सैनिकांची एक टोळीं तपासाकरितां पाठविली. जलालाबाद जिल्ह्यांतील मांडताई टोळीला जरब दिली. इकडे ब्रिटननें, काबूल येथील आपला वकील परत बोलाविण्याचा, तिकडचे सर्व रस्ते बंद करण्याचा व व्यापार अडविण्याचा धाक घातला. अमीराला पुन्हां रशियाचा धाक आहेच. कारण बुखारा येथें बंडखोरांनां दडपून टाकण्याकरितां म्हणून जें मोठें सैन्य रशियन सरकारनें ठेविलें आहे, तें वास्तविक अफगाण सरकारला आपली दहशत बसावी म्हणून रशियानें मुद्दाम ठेविलें आहे असा तर्क करण्यांत येतो. रशिया व ब्रिटन यांचे आशियाखंडांतील हितसंबंध एक नाहींत. दोघेहि एकमेकाला हुसकून लावून खंडावर ताबा मिळविण्याच्या अनेक वर्षांपासून खटपटींत आहेत. अफगाणिस्तान हें एकच कायतें बफर स्टेअ राहिलें आहे. त्यामुळें दोघेहि आळीपाळीनें त्याला खुष करण्यास तर कधीं धाक लावण्यास उद्युक्त होतात यांत नवल नाहीं.

[सं द र्भ ग्रं थ.- इंपीरियल गॅझिटियर ऑफ इंडिया. अफगाणिस्तान आणि नेपाल १९०८; अकांउटस् रिलेटिंग टु दि ट्रेड बाय लँड ऑफ दि ब्रिटिश इंडिया वुइथ फॉरेन कंट्रीज. अन्युअल कलकत्ता.- पार्लमेंटरी पेपर्स, अफगाणिस्तान १८७३-१८९९.- ट्रेड बिटवीन दि ब्रिटिश गव्हर्नमेंट अँड दि अमीर ऑफ अफगाणिस्तान , डेटेड मार्च २१-१९०५ लंडन १९०५- दि सेकंड अफगाण वार १८७८-८०. प्रिपेअर्ड इन दि इंटिलिजन्स ब्रँच ऑफ दि इंडियन आर्मी हेडक्कार्टर्स. लंडन १९०८-बेल्यू (एच-डब्ल्यू) अफगाणिस्तान अँड दि अफगाणस्, लंडन, १८७९; अँड दि रेसिस ऑफ अफगाणिस्तान १८८०- कर्झन (ऑ.जी.एन्); रशिया इन सेंट्रल एशिया (कंटेन्स बिब्लिआग्रफि) लंडन १८८९ - डाली (मिसेस केट) एट इयर्स अमंग दि आफगाणस. लंडन १९०५- एल्फिन्स्टन (ऑं. एम्.) अ‍ॅन अकाउंट ऑफ दि किंग्डम ऑफ काबूल अँड इटस् डिपेंडन्सीज्. लंडन १८१५. - फॉर्बेज (ए.) दि अफगाण वार्स, १८३९ -४२ अँड १८७८-८० लंडन १८९२.- ग्रे. (टी.) अ‍ॅट दि कोर्ट ऑफ दि अमीर न्यू. एडि. लंडन १९०१.- हमिल्टन (अंगस) अफगाणिस्तान लंडन १९०६.- हॅना (कर्नल एच.बी.) दि सेकंड अफगाण वार वेस्टमिनिस्टर १८९९.-होल्डिच (कर्नल सर टी. एच्.) दि इंडियन बॉर्डर लँड १८८०-१९००; लंडन १९०१.- ला कोस्ट (बी.डे) अराउंड अफगाणिस्तान. लंडन १९०१.- मॅक मोहन (ए.एच्) दि सदर्न बॉर्डरलँडस् ऑफ अफगाणिस्तान.  लंडन १८९७. मॅलेसन (जी.बी) हिस्टरी ऑफ अफगाणिस्तान सेकंड एडि. १८७९. नोई (एफ) इंग्लंड, इंडिया अँड अफगाणिस्तान. लंडन १९०२ पेनेल (पी.एल) अमंग दि वाइल्ड ट्राइब्स ऑफ अफगाण फ्रंटिअर लंडन १९११.-रॉबर्टस् (फील्डमार्शल लार्ड) फॉर्टीनाइन इयर्स इन इंडिया लंडन १८९७ - रॉबर्टसन (सर जी. एस्.) दि काफीर ऑफ दि हिंदुकुश लंडन १८९६.- सेल (जी.) जर्नल ऑफ दि डिझार्स्टर्स इन अफगाणिस्तान, इन १८४१-४२ लंडन १८४३.- सुलतान महमदखान (मिर मुनशी) (एडिटर) दि लाइफ ऑफ अबदूल रहमान, अमीर ऑफ अफगाणिस्तान २ व्हा. लंडन १९००.- कान्स्टिय्यूशन अँड लॉज ऑफ अफगाणिस्तान, लंडन १९१०.-टेट (जी.पी.) दि किंग्डम ऑॅफ अफगाणिस्तान. बाम्बे १९११.- थॉर्नटन (मि. व मिसेस) लीव्हज् फ्रॉम अन अफगाण स्क्रप बुक, लंडल १९१०.- व्हीलर (एस.इ.) दि अमीर अबदुल रहमान, लंडन १८९५-येट (मेजर सी. इ) नार्दर्न अफगाणिस्तान लंडन १८८८. इंडियन ईयर बुक (टाइम्स ऑफ इंडिया.); स्टेटमन्स ईयर बुक; ए. ब्रि. इत्यादी].

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .