विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अफसर - याला दुसरें नांव जफूरपुर. बंगालच्या गया जिल्ह्यांत नवडासुओ भागांतील एक खेडें. उत्तर अक्षांश २५० ४’ व पूर्व रेखांश ८५० ४०’ लोकसंख्या सुमारें एक हजार. गुप्त राजांच्या कालवी वराह अवताराची एक विष्णूची धातूची मूर्ति सांपडली आहे. तो कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याच ठिकाणीं गुप्त राजांची वंशावळ देणारा एक शिलालेख मिळाला. तसेंच जमिनींत गडप झालेलें एक गुप्तराजांच्या वेळचें मंदिर सांपडलें आहे. पुराणवस्तुसंशोधन दृष्ट्या हें अति महत्त्वाचे आहे व कारागिरीच्या दृष्टीनें बुद्धगयेच्या मंदिराच्या खालोखाल हें महत्त्वाचे आहे (इं.गॅ. ५).