प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अफू - अफूच्या झाडास लॅटिनमध्यें पॅपिव्हर सेमि फेरम इंग्रजींत ओपियम, संस्कृतमध्यें अहिफेन, गुजराथी अफीन, मराठींत अफू, कनाडींत अफिम्, हिंदी अफिम् इत्यादि नांवें आहेत. अफूचें झाड ३-५ फूट उंच वाढतें. त्याचीं पानें कडेनें कातरल्यासारखी असतात. फळें येतात त्याला दोडा असें म्हणतात. दोड्यांतील बियास खसखस म्हणतात व बोंडांच्या त्वचेंतील रसास अफू म्हणतात. आफ्रिका, इराण, चीन वगैरे ठिकाणीं या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. हिंदुस्थानांत बंगाल, अयोध्या, व संयुक्तप्रांतांत, पंजाब, राजपुताना, बिहार, पाटणा, गुजराथ, माळवाप्रांत वगैरे ठिकाणीं अफू होते. पैकीं बिहार, माळवा व पाटणा येथील अफू बाहेर देशीं रवाना होतें. चिनी लोक अफू खातात व ओढतात. दरवर्षी हिंदुस्थानांतून सुमारें ८-९ कोट रुपयांची अफू बाहेर देशी जाते व खसखस ६० ते ६५ लक्ष रुपयांची जाते. सरकारी कराचें उत्पन्न सुमारें सहा कोटी रुपयाचें होतें. हें पीक करण्याला सरकारची परवानगी लागते. यांत पांढर्‍या व तांबड्या फुलांची अशा दोन जाती आहेत. पांढर्‍या फुलांच्या जातींत जास्त अफू व तांबड्या फुलांच्या जातींत जास्त बीं असते. हें पीक गोराडू जमिनींत फार चांगलें होतें. बहुतकरून याची लागवड गांवाजवळील जमिनींत करितात. कारण या पिकाच्या लागवडीस जास्त मेहनत करावी लागते. हें पीक बहुतकरून सरसूच्या पिकामागून घेतात. गुजराथेंत या पिकासाठीं ८-१० हलक्या नागंरट्या व वरचेवर कुळवणी देऊन जमीन अगदीं भुसभुशीत व मऊ करतात. शेणखत दर एकरीं सुमारें १०-१५ गाड्या देतात.

अफूचा पेरा आक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत करतात. दरएकरीं बी ३-४ पौंड लागतें. पेरणी झाल्यावर लागलीच पाणि देतात. या पिकास तीन चार खुरपण्या द्याव्या लागतात दुसरें पाणी पेरणीनंतर तिसर्‍या दिवशीं देतात सुमारें आठ दिवसांनी झाडें पातळ करून ती टीच टीच अंतरावर राखतात व तिसरें पाणी देतात. एक महिन्यानें पुन्हां झाडें पातळ करून तीं वितीवर राखतात. पुढें दर आठ दहा दिवसांनीं बोंडें टोचण्याजोगी होईपर्यंत पाणी द्यावें लागतें. फुलें दोन महिन्यांनीं येऊं लागतात. तिसरा महिना अखेर बोंडें चिरा पाडण्यास तयार होतात. या चिरा मार्च, एप्रिल महिन्यांत संध्याकाळीं दर बोंडास खालून वर अशा तीन चिरा पाडितात व त्या नाणा नांवाच्या लहान हत्यारानें पाडितात. त्यांत वरची कातडी मात्र चिरली जाते. या चिरांतून रात्रीं रस उतरून सकाळीं घट्ट होतो. दिवसां चांगलें ऊन व रात्री चांगलें दंव पडल्यास हा रस जास्त येतो, नाहींपेक्षां तो कमी पडतो. अशा तर्‍हेच्या चिरा प्रत्येक बोंडाला चार चार दिवसांच्या अंतरानें चार वेळां पाडतात. बाहेर निघून घट्ट झालेला रस शिंपीसारख्या लोखंडाच्या भांड्याला प्रथम तेल चोळून त्यांत दुसर्‍या दिवशीं सकाळीं खरडून घेतात. तो रस मडक्यांत किंवा चिनी मातीच्या भांड्यांत आंतील बाजूस तेल चोळून त्यांत सांठवितात. व त्यांत गोडें तेल आंत दाट रस बुडून राहील इतकें ओतितात. नाहींतर रस घट्ट माती सारखा होतो. सर्व रस गोळा झाल्यावर तो तेलांत घालून मळतात व त्याचे गोळे करून विकतात.

पहिल्या दोन वेळां केलेल्या चिरांतून जास्त रस निघतो व पुढें कमी कमी होत जातो. दर झाडापासून सुमारें चार मासे रस निघतो.

बोडें झाडावर सुकलीं म्हणजे तीं खळ्यांत आणून पायांखालीं चिरडतात म्हणजे बीं बाहेर पडतें. त्याला खसखस असें म्हणतात.

दर एकरीं सरासरी उत्पन्न अफूचें २०-२५ पौंड; किंमत १०० रुपये. खसखस ४००-५०० पौंड, किमत ४० रुपये इतके होतें. कोंवळ्या पाल्याची भाजी करितात. फुलें व बोंडें उकळून पुष्कळ रोगांवर त्याचा शेक देतात. खसखस पौष्टिक आहे. तिचा पक्वान्नांत उपयोग करितात. बियांचें तेल काढितात, त्याचा साबु व मेणबत्त्या करण्याकडे उपयोग होतो. पेंड गुरांस खावयास देतात. अफू औषधी आहे व ती उत्तर हिंदुस्थानांत रोज खातात. तिनें गुंगी येते. महाराष्ट्रांत जीं तान्हीं मुलें फार रडवीं असतात त्यांस अफू देण्याची चाल आहे.

इ ति हा स.- बागेंत शोभेकरितां लावलेल्या व रानांत स्वैर वाढून सुंदर दिसणार्‍या खसखशीच्या झाडाच्या निरनिराळ्या जातींचा होमर वगैरे ग्रीक लेखकांनीं उल्लेख केला आहे. यानंतरची ग्रीक लोकांची या झाडाविषयीं माहिती व ज्ञान क्रमश: खालीं दिल्याप्रमाणे आहे:- (१) याचें बीं खाणें व त्यापासून तेल काढणें. (२) बोंडांतील मादकपणाचा गुण व (३) बोंडातून निघणारा दुधासारखा रस. (४) बोंडें, पानें, व दांडे यांपासून 'मेकोनिअम' नांवाचा अर्क काढणें; या अर्काचा झोंप आणणारें औषध म्हणून व पंजाबातील 'पोस्त' नांवाचा किंवा अकबरच्या वेळचा 'कुंकनार' नांवाचा मद्यार्कासारखा मद्यार्क काढण्यासाठीं यांचा उपयोग करीत. (५) शेवटीं जास्त गुणकारी व दाट रसाचा शोध लागला; याला ग्रीकलोक 'ओपिओन' म्हणत. खसखशींचीं झाडें एशिआमायनरमध्यें बोंडांकरितां लावीत असत. यांच्या रसांतील उत्तजक व उन्मादक गुणाचा ग्रीक लोकांनी शोध लावण्यापूर्वीं अरब लोकांनीं याची माहिती पूर्व गोलार्धांत चीनमध्यें देखील करून दिली होती. ख्रिस्ती शकाच्या तिसर्‍या शतकाच्या सुमारास ग्रीक लोकांच्या अफूच्या शोधाकडे लक्ष लांगू लागलें. थिओफ्रेस्टस, व्हर्जिल, प्लिनि, डिओस्कोराइडस वगैरे लेखकांनी अफू व तिचे गुणधर्म व कृति याविषयीं उल्लेख प्रसंगविशेषीं केला आहे. रोमन साम्राज्याच्या वेळीं फक्त एशियामायनरमधीलच अफू माहीत होती.

ग्रीक लोकांनीं अफूचा शोध लावला. तथापि खसखशीचें झाड व त्याचा उपयोग या विषयींच्या माहितीचा अरब लोकांनींच प्रसार केला. हिंदुस्थान व चीन देश यांनी इस्लामी पंथाचे अनुयांयानां अफूविषयीं माहिती करून दिली याविषयीं शंका घेण्याचें कारण दिसत नाहीं. कारण संस्कृत आणि इतर एतद्देशीय भाषेंत अफूला जीं नांवें आहेत तीं 'ओपोस' किंवा 'ओपिओन' या शब्दाच्या 'अफ्युन' या अपभ्रंशापापासून निघालेलीं आहेत. संस्कृत ''अहिफेन'' (म्हणजे सर्पाचें विष) हा शब्द अलीकडील असावा असें यूरोपियन पंडित म्हणतात. त्याचप्रमाणें चिनी भाषेंतील अफूचीं नांवें अरबी शब्दापासूनच निघालीं असावीं असें दिसतें.

८०० वर्षांपूर्वीं लिहिलेल्या भावप्रकाशांत अफूचा उल्लेख आढळतो; परंतु इ. स. च्या १६ व्या शतकापूर्वीची अफूसंबंधी माहिती विशेष स्पष्ट रीतीनें मिळूं शकत नाहीं.

बिहार प्रांतीं खसखशीच्या झाडाच्या लागवडीस सरासरी दोन अडीचशें वर्षापूर्वीं सुरुवात झाली असावी असें दिसतें. परंतु 'पोस्त' आणि 'पुस्त' या अफूच्या नांवांचा आणि ग्रीक भाषेंतील नांवाचा मुळींच संबंध दिसत नाहीं. यावरून असें वाटतें कीं अफूविषयीं नसली तरी खसखशीच्या झाडासंबंधीं येथील लोकांची माहिती जास्त पुरातन कालची म्हणजे दोन शतकांपूर्वींची आहे. संस्कृतांत या झाडाच्या बोंडांना खाखस व बियांनां खरितल म्हणतात (दत्ता-मटेरिया मेडिका). पण अफूला कांही नांव सांपडत नाहीं. तसेंच चीन देशांत या झाडाला जीं नावें आहेत त्यांवरून असें वाटतें कीं, त्यांचीहि या विषयींची माहिती सातव्या शतकापासून असावी. हिंदुस्थानांतून चीन देशांत अफू जाण्यापूर्वीं बरीच वर्षें अगोदर तेथें अफूची लागवड सुरू झाली होती यांत संशय नाहीं व हिच्यापासून तयार केलेल्या आमांशावरील फारच गुणकारी औषधाचें वंगशिह यानें तेराव्या शतकात वर्णन केलें आहे.

'अलबुकर्क यानें आठ 'गुझझारेत' (गुजराथी) जहाजें पकडलीं व त्यांत अफू व इतर माल होता' असा जिओव्हान्नि डा एम्पोलि यानें (१५११ त) उल्लेख केला आहे. यावरून अफूचा व्यापार किती पुरातन आहे याविषयीं कल्पना येईल.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानांतून चीन देशांत अफूची निर्गत होत होती इतकेंच नव्हे, तर माळव्यात अफूची लागवड व अफू बनविण्याचे कारखाने हे महत्त्वाचे धंदेच होऊन बसले होते. ब्रिटिश लोक येथें येण्यापूर्वीं हिंदुस्थानांतून चीन देशाशीं चालणारा अफूचा व्यापार पोर्तुगीज लोकांच्या हातीं होता. मोंगल राजांनीं बिहार येथील अफूच्या लागवडीचा व विकण्याचा मक्ता आपल्या ताब्यांतच ठेवलेला होता. हा मक्ता मोंगल राजांपासून व पूर्वींच्या पोर्तुगीज व्यापार्‍यांपासून प्लासीच्या (१७५७) लढाईनंतर लवकरच ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्यांत आला. अफू कशी करावे हें येथील लोकांनां माहित होण्यापूर्वींच चिनी लोकांस अवगत होतें. तिची लागवड व तयार करण्याची कृति १५व्या शतकाच्या मध्यकाळापासूनच त्यांना माहीत होती.

चीन देशांत पूर्वी अफूचा उपयोग औषधासाठी करीत असत, परंतु भिंग घराण्याच्या शेवटीं शेवटीं सुमारें १६५० मध्यें लोकांना अफू ओढण्याची संवय लागली व ती पुढें जास्त जास्त वाढत गेली. याचें कारण देशांतील लागवड व आयात बंद करण्याविषयीं चिनी अधिकार्‍याची हयगय, हेंच असावें.

खु ल्या व्या पा रा ची प द्ध त.- १८ व्या शतकाच्या मध्यकालीं बिहार प्रातांत उत्तम प्रकारची व सर्वांत जास्त अफू होत असे. रामचंद्र पंडित यानें खालीं दिल्याप्रमाणें त्यावेळच्या अफूच्या व्यापाराचें वर्णन केलें आहे. ''त्यावेळीं पाटणा येथें राहणार्‍या अफूच्या व्यापार्‍यांचा एक वर्ग असे. हे व्यापारी शेतकर्‍यांनां आगाऊ पैसे देत व हंगामावर त्यांच्याजवळून त्या पैशांबद्दल अफू घेत व ती घरीं नेऊन निर्गत करणार्‍या व्यापारांनां ती जशी लागेल त्याप्रमाणें तयार करून देत. पाटणाच्या व्यापार्‍यांना दिल्यानंतर उरलेली अफू शेतकरी लोक येथें विकीत व त्यामुळें अर्थातच ती जास्त किंमतीत विकली जात असे. पाटणाचे व्यापारी अक्टोबर महिन्यांत तयार केलेली अफू ठरलेल्या दरानें पहिल्यांदा डच व्यापार्‍यांनां विकीत. जवळ जवळ ५०० मण अफू असली तर ते डच व्यापार्‍यांनां त्यापैकीं दोनशें मण देत असत. त्यानंतर दोनशें मणांपैकीं कांहीं अफू इंग्लिश व्यापार्‍यांना जास्त भावानें व शेवटीं फ्रेंच व्यापार्‍यांनां त्याहून जास्त भावानें विकीत असत. त्यानंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यांत डच व्यापारी पुन्हां अफूच्या व्यापार्‍यांशीं मागल्यापेक्षां जास्त किंमत देण्याचा करार करीत असत. अफूची नेहमींची किंमत मणाला शंभर ते दीडशें रुपये असे व कधीं कधीं जास्तहि होत असे.

वर दिलेल्या पद्धतीप्रमाणें व्यापार चालू झाल्यावर शेतकरी व व्यापारी लोक जास्त जास्त लबाडी करूं लागले यांत मोठेसें नवल नाहीं. यामुळें याप्रकारच्या व्यापारावर कोणत्या तरी प्रकारचा दाब असावा अशी गरज भांसू लागली. १७७३ सालीं वारन हेस्टिंग्ज् साहेबांनें ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचीं सूत्रें जेव्हां आपल्या हातीं घेतलीं तेव्हां त्यानें डेन्स, डच व फ्रेंच व्यापार्‍यांनां दरवर्षी ठरीव वजनाची अफू पुरविण्याचा करार केला. १७७३ पासून १७८१ पर्यंत दरवर्षी व १७८१ पासून १७९७ पर्यंत दर चार वर्षांनीं कंपनीकरितां अफू तयार करून देण्याचा हक्क सरकारनें खाजगी लोकास विकण्यास सुरुवात केली. १७८५ त या हक्काचा लिलांव होत असे व यांत सर्व लोकांना सामील होण्याची मोकळीक असे. शेतकर्‍याच्या बचावासाठीं ठेकेदारांनां कांहीं ठरलेल्या अटींवर ठेका देण्यांत येत असे. शेतकर्‍यांनीं पिकवलेल्या अफूपैकीं कांही ठेवल्यास, किंवा कांही भेसळ करून ती बट्ट्यानें विकल्यास त्यांनां दंड होत असे; सरकारी मक्त्याविरुद्ध कोणी बेकायदेशीर वागल्यास त्याला गुन्हेगार मानण्यांत येत असे. परंतु इतके कायदे केले तरीहि ही ठेक्याची पद्धत त्रासदायकच होऊं लागली. शेतकर्‍यांनीं नुसती अफूच पिकवावी म्हणून ठेकेदार लोक त्यांनां त्रास देऊं लागले, याचा परिणाम असा झाला कीं अफू तयार करण्यासाठीं बोर्ड ऑफ डायरेक्टरांना ठेक्याची पद्धत सोडून दुसरी युक्ति काढावी लागली.

खुल्या व्यापाराची व ठेके देण्याची पद्धत सदोष असल्यामुळें सरकारी मक्त्याची पद्धत सुरू केली. या पद्धतीमुळें अफूच्या व्यापारांत होणार नफा व्यापारी खात्याकडे जमा न होतां मुलकी खात्याकडे जमा होऊं लागला व हीच पद्धत शेवटीं सर्वांत चांगली ठरली.

ची न म धी ल अ फू.- चीन देशांत खपणार्‍या अफूपैकीं बरीच अफू येथेंच तयार होते. चीनमध्यें साडेचार लक्ष लोकसंख्येपैकीं तीन लक्ष लोक अफू ओढतात. देशांत होणारा माल हळूहळू बाहेरून येणार्‍या मालाची जागा बळकावीत आहे. युनान प्रांतांतून चीनच्या इतर भागांतहि अफूचा पुरवठा होऊं लागला आहे. चीन देशांत जरी हिंदुस्थानांतून जाणारी अफू बंद झाली तरीहि तेथील लोकांच्या व्यसनाला विशेष आळा बसण्याचा संभव नाहीं.

ला ग व ड.- खसखशीच्या झाडाच्या जातींपैकीं कोणत्या जातीच्या झाडांची लागवड करणें श्रेयस्कर होईल हा अजून एक मोठा प्रश्नच आहे. निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या जातीची लागवड येणेंप्रमाणे करितात.

बंगाल :- मुख्यत्वेंकरून पांढर्‍या फुलाच्या जातींपैकीं कोणत्या तरी एका जातीची पण विशेषेंकरून जिला फिक्या रंगाचीं बोंडें येतात ती जात लावतात.

माळवा :- बहुधा जांभळ्या फुलांचीं झाडें विशेष आढळतात.

हिमालय :- क्वचित चित्रविचित्र रंगाच्या फुलांचीं झाडें दिसतात.

यूरोपांत एशिया मायनरमधील अफू औषधासाठीं वापरीत असत व हल्लींहि वापरतात. परंतु हिंदुस्थानांत औषधांकरितां उपयोगांत आणलेली अफू हिंदुस्थानांतच 'अल्बा' नांवाच्या जातीच्या झाडापासून तयार करितात व त्यांची लागवडहि येथेंच होते. या दोहोंतील रासायनिक गुणधर्म कांहीं बाबतींत अगदीं भिन्न दिसतात. पण हिंदुस्थानांतील वैद्य लोकांचें असें म्हणणें आहे कीं, औषधांत सारख्या प्रमाणांत ती टाकल्यास हिंदुस्थानांतील अफू यूरोपांतून येणार्‍या अफूपेक्षां कोणत्याहि बाबतींत कमी दर्जाची ठरत नाहीं.

ला ग व डी चें क्षे त्र फ ळ व उ त्प न्न.- हल्लीं जिला बंगाली अफू म्हणतात ती पाटणा आणि गाझीपूर येथील कारखान्यांत तयार होते व तिची लागवड बंगाल, आग्रा आणि अयोध्या या प्रांतांत होते. 'माळवी अफू', मध्य हिंदुस्थान, राजपुताना, आणि कांहीं इतर संस्थानें यांत लावतात. बंगाली अफूची निर्गत कलकत्त्याहून व माळवी अफूची निर्गत मुंबईहून होते. बंगाली अफूच्या लागवडीनें किती क्षेत्रफळ व्यापिलें आहे हे निश्चितपणें सांगतां येतें. तिची लागवड खुद्द सरकारच्या ताब्यांत आहे. माळवी अफूची लागवड किती क्षेत्रफळ जमीनींत होते हें केवळ अजमासानेंच सांगतां येईल, कारण तिच्या लागवडीचा कमजास्तपणा फक्त निर्गतीच्या जकातीवरूनच काढावा लागतो.

१८७२ पासून १८९२ पर्यंत ब्रिटिश मुलुखांत सरासरी ५,१५,००० एकर जमिनींत बंगाली अफूचें पीक होत असे. पीक करून हातीं लागलें नाहीं अशीं जमीन वगळली तर गंगेच्या खोर्‍यांत १९०२-३ सालीं ५,८२,८०७ एकर व १९०५-६ सालीं ६,५४,९२८ एकर जमीनींत अफूची लागवड झाली होती. १९०६-७ सालीं हिंदुस्थान सरकारनें लागवडीचें क्षेत्रफळ कमी करून सरासरी ५,६२,५०० एकर जमीनींतच लागवड करावयाचें ठरविलें होतें. एतद्देशीय संस्थानांत सरासरी ७०,००० एकर; ब्रिटिश मुलखापैकीं बंगाल्यांत अजमासें २,००,००० एकर; तितकीच आग्र्यांत; व त्यापेक्षां थोडी कमी अयोध्येंत जमीन अफूच्या लागवडीखाली असते. या शिवाय इतर ठिकाणची लागवड महत्त्वाची नाहीं. उदाहरणार्थ, पंजाब, अजमीर-मेरवाड आणि वरचा ब्रह्मदेश या सर्व ठिकाणीं मिळून सरासरी ६००० ते ७००० एकर जमीन अफूकडे असते. माळवी अफूपैकीं, ग्वालेर संस्थानांत ३६,३७८ एकर; टोंक ९,७३३ एकर; कोटा ३१,१६६ एकर; आणि जयपूर ३,०७७ एकर जमीन १९०४-५ सालीं अफूच्या लागवडींखालीं होती. बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणाहून माहिती मिळत नाहीं.

एतद्देशीय संस्थानें अफूची लागवड वगैरेच्या बाबतींत ब्रिटिश सरकारच्याच धोरणाचें अनुकरण करितात व बेकायदेशीर व्यापार थांबविण्याचा प्रयत्‍न करितात, तरी देखील बराच चोरटा व्यापार चालतो. हल्लींच्या राज्यव्यवस्थेप्रमाणें एतद्देशीय संस्थानांतून चीन देशांत जाणार्‍या मालावर संस्थानें बरीच जकात वसूल करतात व त्या अफूवर ब्रिटिश सरकारहि जकात होतें. चीन देशात अफू उत्पन्न होऊं लागल्यामुळें माळव्यांतील हलक्या दर्जाच्या अफूचा खप कमी झाला. तेथे आतां बंगालमधील उत्तम व स्वच्छ अफू खपते. याप्रमाणें लागवडीच्या आणि अफू तयार करण्याच्या प्रत्येक व्यवस्थेंत सरकारची देखरेख असते. सरकारनें जर व्यापारावर इतकीं बंधनें व कायदे केले नसते तर शेतकर्‍यांनां कितीतरी जास्त किंमत मिळाली असती. प्रत्येक एकरीं ६ ते ८ शेर अफू होत असावी. म्हणजे सध्या इतर पिकापासून त्याला जो फायदा मिळाला असता त्याहून जास्त फायदा मिळत नाहीं. सरकारी अफूचा स्थानिक खप इतर ठिकाणच्या खपापेक्षा कमी असतो. याचें कारण असें सांगतात कीं शेतकरी लोक स्वत:च्या व इतर मित्रमंडळींच्या साठीं अफू काढून ठेवीत असावेत. यावरून एकरी ९ शेर पीक होत असावें हा अंदाज कांहीं चुकीचा होणार नाहीं. डब्ल्यू. बी. जॉनसन यानें यासंबंधीं लिहितांना असे म्हटलें आहे कीं अफूचें पीक एकरी १५ शेर होतें.

बं गा लां ती ल आ णि सं यु क्त प्रा तां ती ल ला ग व ड.- हिच्या लागवडीचें वर्ष सप्टंबर पासून सुरू होतें. खरीपाचें पीक काढल्यानंतर या पिकासाठीं जमीन तयार करावयास सुरवात करतात. आक्टोबरच्या मध्यापर्यंत दहा दहा दिवसांच्या अंतरानें जमीन नांगरून, नंतर पेरणीस सुरवात करतात व ती नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत चालते. याला वाळूमिश्रित चिकण मातीची काळी व कसदार जमीन लागते. म्हणून गांवाच्या लगत असेल तीच जमीन बहुतेक तयार करितात. बहुधा १५० ते २०० मण खत घालतात. शेतांत मेंढरें वगैरे बसवून त्यांचें खत घेण्याची पद्धत फारच चांगली असते. पालाशनत्रित (नैट्रेट आफ पोट्याश) याचाहि खताकरितां उपयोग करणें चांगलें असतें. नंतर सहा किंवा आठ फूट लांब आणि चार फूट रुंद असे वाफे तयार करितात. हे वाफे बेणण्यास व पाणी देण्यास सोईचे असतात. सर्वांत मोठ्या आकाराचें किंवा सर्वांत जास्त माल उत्पन्न करणारें बोंड बियासाठीं निवडतात किंवा दुसर्‍या ठिकाणच्या बियाशीं अदलाबदल करतात.

पेरणी करतात त्याच दिवशीं शेताला भरपूर पाणी देऊन, त्यांतील ढेंकळें फोडतात. बिघ्यागणीक ६ पौंड बीं पुरतें. बीं पेरण्याच्या आदले दिवशीं रात्रीं तें पाण्यांत भिजवून ठेवितात व कांहीं शेतकरी त्यांत पातळ खत घालतात. एक आठवड्यानंतर रोपें वर येतात. तीं सरासरी ६ इंच वाढलीं म्हणजे बेणणीं करून रोपें दाट झालीं असल्यास तीं विरळ करतात. फक्त जोरदार रोपेंच ठेवतात व त्यांची पूर्ण वाढ झाली म्हणजे तीं ७-८ इंचांहून जास्त जवळ राहूं देत नाहींत.

रोपें येण्यास सुरवात होतांच पाणी देऊं लागतात आणि पीक बिघण्याचीं चिन्हें दिसल्यास पुन्हा पेरणी करितात. बोंडें पक्व होईपर्यंत सारख्या कालानें पाणी देणें चालू ठेवावें लागतें. ह्या पाण्यांत झाडें न बुडण्याविषयीं किंवा तें सांचूं न देण्याविषयीं खबरदारी घेतली पाहिजे. येथें जमीनींत ओलावा असतो तेथें दिसेंबरपर्यंत पाणी देत नाहींत व कांहीं ठिकाणीं पाणी देण्याची मुळींच अवश्यकता नसते.

फुलांचा बहार येण्याला ७५-८० दिवस लागतात. फुलाला चार पाकळ्या असतात व त्या फुलें आल्यावर तिसरे दिवशीं तोडून, नीट राखून ठेवितात. कारण 'पुरवठ्याची अफू' पेठ्यांत बंद करितांना त्या लागतात. पाकळ्या तोडल्यानंतर ८-१० दिवसांनीं बोंडें तयार होतात. बंगालमध्ये जानेवारीच्या शेवटीं प्रथम अफू गोळा करण्यास सुरवात होते. व हें काम मार्च मध्यापर्यंत चालू असतें. संयुक्तप्रांतांत हंगामास उशीरा सुरुवात होते. येथें साधारणपणें मार्च महिन्यापासून फुलें येऊं लागतात. साधारणत: एप्रिल महिन्यांत व डोंगराळ ठिकाणीं जूनपासून अफू गोळा करण्यांत होते. अफूचें पीक काढल्यानंतर खरीपाचा हंगाम येईपर्यंत जमीन नेहमीं पडीत ठेवितात व नंतर त्यांत इतर पिकें किंवा, कधीं कधीं भरपूर खत देऊन, पुन्हा अफूचेंच पीक करतात.

मा ळ वा, पं जा ब व गै रे ठि का ण ची ला ग व ड.- सौम्य हवा, विपुल पाटाचें पाणी, उत्तम कसदार जमीन व सतत उद्योग हीं माळवी अफूला अवश्य लागतात असें म्हणतात. काळी कपाशीची जमीन भरपूर खत दिल्याशिवाय या पिकाच्या उपयोगी पडत नाहीं. बडोद्यांत बाजरी नंतर खसखशीचें पीक करतात. माळवा अफू खालीं दिलेल्या ठिकाणीं पिकते:-

मध्यहिंदुस्थान:- इंदोर, ग्वालेर, भोपाळ, बुंदेलखंड, वाघेलखंड, माळवा आणि भोपावर.

राजपुतान्यांत:- मेवाड, जयपूर, हरौति आणि टोंक पूर्व आणि पश्चिम राजपुतान्यांतील संस्थानें, कोटा, अलवार आणि बिकानेर.

पंजाबांत:- शाहपूर येथून लाहोर आणि अमृतसर या ठिकाणीं पुरवठा होतो.

ख स ख शी च्यां झा डा पा सू न त या र हो णा रा मा ल.- या झाडापासून निरनिराळे आणि उपयुक्त पदार्थ उत्पन्न होतात:-

अशुद्ध बंगाली अफू:- ही अफू काढण्यासाठीं कच्च्या बोंडांना ओरखाडे पाडावे लागतात. ओरखाडे पाडण्याचें काम फार कसबाचें असतें. हें काम 'नस्तरानें' करतात. या नश्वराला चार पातीं असतात व हीं पातीं मधून कापूस घालून एकेठिकाणीं (सरासरी एक तिसांश इंच अंतरावर) बांधलेलीं असतात. बोंडाच्या वरील सालीलाच फक्त ओरखाडे पाडले पाहिजेत; पण ते देखील वरवर नसले पाहिजेत. ओरखाडे बोंडाच्या खालून वर पाडीत नेतात व हें काम संध्याकाळीं करितात. हें काम भर उन्हांत करावें व रेघा तिरक्या पाडाच्या असें जॉनसन साहेबाचें म्हणणें आहे. दोन किंवा तीन दिवस मध्यें जाऊं देऊन याप्रमाणें बोंडांनां तीन किंवा चार वेळ रेघा पाडाव्या लागतात. कधीं कधीं एकदा ओरखाडून काम भागतें. उत्तम बोंड असल्यास त्यांतून आठ किंवा दहावेळ देखील रस निघतो. पहिल्या लागवडीचा रस पातळ असतो आणि नंतरच्या लागवडीचा थोडा असून घट्ट असतो. काम सुरळितपणें व व्यवस्थेशीर रीतीनें व्हावें म्हणून शेताचे कांहीं भाग करून रोज एका भागांतील बोंडांना ओरखाडे पाडितात.

ओरखाडे पाडल्यानंतर दुसरे दिवशीं हा रस 'सेतवा' नांवाच्या थापीसारख्या चमच्यानें ओरपून किंवा खरडून गोळा करितात व तो एका खापराच्या पसरत्या भाड्यांत सांठवितात व तें भांडें वांकडे ठेवितात म्हणजे दाट रस राहून पातळ रस निघून जातो. या पातळ रसाला 'पसेवा' असें म्हणतात. बनारसमधील उत्तम प्रकारच्या अशुद्ध अफूंत शेंकडा दाट अफू सत्तर आणि पातळ अफू तीस. असें प्रमाण असतें. सर्व पसेवा निघून जाईपर्यंत रस वेळोवेळीं एका भांड्यांतून दुसर्‍या भांड्यांत ओततात. बंगालमध्यें रसांतील अफूचे प्रमाण शेंकडा पंचाहत्तर असतें व ती काढण्यासाठीं मडक्याच्या तोंडावर फडकें बांधून त्या फडक्यावर रस ओतून तो वाळवतात. या फडक्याला अफू चिकटते म्हणून हीं फडकीं देखील विकलीं जातात. या फडक्यांना 'कफा' असें म्हणतात. ओरखाडे पाडल्यावर प्रत्येक वेळीं प्रत्येक झाडापासून सरासरी दहा ग्रेन अफू निघते.

पसेवा:- अशुद्ध अफू वाळवितांना त्यांतून जो पातळ पदार्थ वेगळा निघतो त्याला 'पसेवा' म्हणतात. हें वर सांगितलेच आहे. हा पदार्थ काळा, काफीच्या रंगासारखा असतो व हा अफूंत राहिल्यानें ती काळी व पातळ होते. याला चमत्कारिक वास येतो व तो अतिशय आंबट असतो. याशिवाय यांत मेकॉनिक अ‍ॅसिड, रेझिन, मॉरफिआ आणि नारकोटिन हीं द्रव्यें असतात.

पानें व पाकळ्या:- जानेवारीपासून मार्च महिन्यापर्यंत फुलांचा मोसम असतो. फुलांची पुरती वाढ होण्यापूर्वीं जर तीं तोडलीं तर बोंडांतून रस कमी निघतो. म्हणून फुलें तोडतांना फार काळजी घ्यावी लागते. फूल बुडाशीं बाहेरून हातीं धरून हळूच मूठ मिटावी व ती उचलावी म्हणजे फुल पुरतें वाळलें असल्यास पाकळ्या निघून येतात. एरव्हीं येत नाहींत. पाकळ्या तोडण्यासाठीं कोरडी हवा चांगली असते. नाहींतर पाकळ्यांचा रंग वाईट होतो. पाकळ्यांच्या पत्रावळी करतात. मंदाग्नीवर तवा ठेऊन त्यावर थोड्या पाकळ्या पसराव्या व त्या पसरलेल्या पाकळ्यांवर ओलसर फडकें पसरून त्या दाबाव्यात म्हणजे फडक्यांतील वाफेनें त्या एकमेकांवर चिकटतात व त्यांची पोळी किंवा पत्रावळ बनते ही तव्यावर उलटवून दुसर्‍या बाजूनेंहि तसेंच करावें म्हणजे त्या बाजूनेंहि पाकळ्या एकमेकांस चिकटतात. या पत्रावळींनां मधुर वास असतो व अफूच्या पेट्या बंद करतांना या पत्रावळी अफूवर झांकण म्हणून घालतात. या पत्रावळींची मणाला ५ पासून १० रुपये पर्यंत किंमत येते.

भुकटीं:- देंठ, पानें वगैरे पासून ही तयार करितात. अफू पेट्यांतून बंद करतांना हिचाहि उपयोग होतो.

लेवा:- ही हलकी अफू व 'पसेवा' यापासून तयार केलेली एक प्रकारची चिक्की असते. हिचा देखील अफूच्या पेट्या भरतांनां उपयोग करतात.

बीं आणि तेल:- ज्या बोंडांना ओरखाडे पाडलेले नसतात त्यांतून उत्तम खसखस निघते. खसखशीचें गोड तेल निघतें व तें खातात. याच्या अंगीं अफूच्या मादकपणाचा मुळीं लेशहि नसतो. अबकारी अफू तयार करतांना हें तेल तिला लावितात म्हणजे वर गुंडाळलेला कागद तिला चिकटत नाहीं.

मा ळ वी अ फू त या र क र ण्या ची कृ ति:- माळव्यांतील व हिंदुस्थानाच्या इतर भागांतील कृतींत नस्तरांतील पात्यांची संख्या व बोंडांना ओरखाडे पाडणें, अफू गोळा करणें व सुखविणें या पद्धती वेगवेगळ्या आहेत. लबाडी करावयाची असल्यास बोंडावरून अफू काढतांना बोंडांच्या टरफलाचा वरील भाग खरवडून घेतात म्हणजे सहज भेसळ अफू निघते. एकपट चीक व दुप्पट तेल या प्रमाणानें गोळा केलेला चीक एका अळशीचें तेल असलेल्या भांड्यांत ठेवितात. रसाची वाफ होऊन उडून जाऊं नये म्हणून असें करणें एका दृष्टीनें ठीक असतें पण वास्तविक ही एक भेसळ करण्याची रीत आहे. एका एकरांत ३५ ते ५० शेर चीक (रस) निघतो व त्याची २०० पासून ६०० रुपये किंमत येते.

तेलांत टाकलेला चीक नंतर दुहेरी थैलींत टाकून बंद व अंधाराच्या खोलींत वर टांगून ठेवितात म्हणजे एक महिन्यांत सर्व तेल गळून जातें. मग जून किंवा जुलै महिन्याच्या सुमारास थैलींतील अफू एका लांबोड्या मोठ्या पिपांत टाकतात व त्याला सारखा रंग व दाटपणा येईपर्यंत त्यांतच ठेवितात. नंतर त्याचे आठ किंवा दहा औंसांचे गोळे वळून ते गोळे बोंडांच्या टरफलापासून तयार केलेल्या व टोपलींत ठेवलेल्या भुश्यांत टाकतात. मग पानांचा व देंठांचा भुसा जमीनीवर पसरून त्यांवर ते वाळविण्यासाठीं पसरतात. वाळले म्हणजे सरासरी १५० वड्यांची एक पेटी याप्रमाणें पेट्या तयार करतात व आक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यांत विकावयास बाहेर पाठवितात.

बं गा ली अ फू क र ण्या ची कृ ति.- शेतकर्‍याजवळून घेतलेली अफू शुद्ध व कोणत्या प्रकारची आहे हें समजण्यासाठी पहिल्यानें तिची पारख करतात व नंतर दहा हंड्रेडवेट अफू मावेल एवढ्या मोठ्या पेटींत ती सांठवून ठेवितात. याप्रमाणें हवेंत आणि उजेडांत ठेवल्यावर तिचा रंग अधिकाधिक गर्द होत जातो. मोठ्या पेटींतून रोज तयार करावयाची असेल तेवढी अफू काढून घेतात व तिचे निवडून वेगळाले नमुने तयार करितात. नंतर ती मळून पेट्यांत भरतात. या पेट्यांपैकीं कांहींची वरील प्रमाणें पुन्हां पारख करितात म्हणजे अफू सारखी होते. तिच्या दुसरे दिवशी वड्या करतात. वड्या करण्याची कृति येणेंप्रमाणें आहे:- वड्या करणारा एक पितळेचा पेला हातीं घेतो व त्यांत पाकळ्यांच्या पत्रावळी व लेवा (चिक्की) टाकून अर्धा इंच जाडीचें 'शुल' तयार करतो व त्यांत वडी टाकून ती वरून व बाजूनें पत्रावळी व लेवा टाकून बंद करतो. नंतर ती पेल्यांतून काढून घेऊन भुकटींत टाकतो व भुकटींतून काढून खापराच्या पेल्यांत ठेवून उन्हांत तीन दिवस वाळवितो. या प्रत्येक वडीचें वजन सरासरी ४ पौंड ३॥ औंस असतें. पण त्यांतील अर्धे वजन वरील 'शुल' चेंच असतें.

शेंकडा नव्वद हें प्रमाण येईपर्यंत व मेणासारखीं दाट दिसेंपर्यंत अबकारी अफू वाळवितात. नंतर तिच्या दोन पौडांची एक याप्रमाणें चौकोनी विटा तयार करितात. नंतर या विटा तेलांत बुडविलेल्या नेपाळी कागदांत गुंडाळून पेट्यातून बंद करतात.

अ फू चा व्या पा र.- हिंदुस्थानांत होणारी अफू दोन निरनिराळ्या प्रकारची असते. जिला बंगाली अफू म्हणतात ती बंगाल, बिहार व संयुक्त प्रांतामध्यें खसखसीच्या झाडापासून तयार केलेली असते. दुसरी माळव्यांतील अफू ही राजपुताना व मध्यहिंदुस्थानांतील कित्येक संस्थानें यांमध्यें तयार होत.

बंगाली अफू:- खसखसीच्या झाडांची लागवड करण्यास परवाना काढावा लागतो. लागवड करणारांना सरकार बिनव्याजी आगाऊ पैसे देतें व नंतर मालकांनां तयार केलेली सर्व अफू गाझीपूर येथील ओपियम फॅक्टरीला सरकारनें ठरविलेल्या दरानें विकत द्यावी लागते. ७०० अफूचा दर शेरास ७।८ रुपये असा भाव हल्लीं आहे. अलीकडे हिंदुस्थानसरकार व चिनी सरकार यांच्यामध्ये करारमदार होऊन अफूच्या लागवडीचें क्षेत्र बरेंच कमी करण्यांत आलें असून फक्त संयुक्त प्रांतांतच लागवड होत असते. जेवढ्या भागांत लागवड होते त्याचें क्षेत्रफळ (१९१७-१८ सालीं) व पिकाचे आंकडे पुढील प्रमाणें आहेत. पिकाची जमीन ३,३१,२१६ बिघे; एकंदर पीक ३२,३२१ मण; तयार केलेल्या पेट्या २५१४६. फॅक्टरींमध्यें अफूचे दोन वर्ग करतात:-

(१) ''प्रोव्हिजन'' अथवा निर्गती अफू ही परदेशीं पाठविण्याकरितां असते. ह्या अफूच्या गोळ्या किंवा वड्या करतात. प्रत्येक गोळी किंवा वडी ३.५ पौंड वजनाची असते व अशा ७० वड्या १४० १/७ पौंड वजनाच्या एका पेटीत असतात.

(२) ''एक्साईज'' अथवा स्थानिक उपयोगाची अफू हिंदुस्थानांतील ब्रिटिश मुलुखांतल्या खपाकरतां असते. हिच्या एकेक शेर वजनाच्या चौकोनी वड्या करतात व त्या एका पेटींत ६० असतात. ही अफू 'प्रोव्हिजन' अफूपेक्षां अधिक चांगल्या प्रकारची असते.

''प्रोव्हिजन'' अफू कलकत्ता शहरांत जाहीर लिलावानें विकली जाते; पण ती विकण्यासंबंधींचे परिमाण सरकार ठरवितें. चीनबरोबर ठराव झाल्यामुळें अलीकडे या अफूची विक्री बरीच कमी झालेली आहे. १९११ मध्यें १५,४४० पेट्या विकल्या गेल्या, पण १९१२ मध्यें ६७०० पेट्यांचीच फक्त विक्री झाली. १९१३ सालापासून चीनमध्यें अफू जाणें अजीबातच बंद झालें आहे.

माळवी अफू:- माळवी अफू ज्या खसखसीच्या झाडांपासून करतात त्यांची लागवड इंदूर, ग्वालेर, भोपाळ, जावरा, धार, रतलाम, मेवाड व कोटा या देशी संस्थानांत मुख्यत: होते. ही खसखशीची लागवड किंवा अफूची निपज यांशीं सरकारचा कांहीं एक संबंध नसतो; परंतु चीनला अफू पाठविण्याचें बंद होण्याच्या पूर्वी माळवी अफू ब्रिटिश मुलुखांत येऊं देतांना व ब्रिटिश मुलुखांतून परदेशी जातांना त्यावर सरकार नियंत्रण घालीत असे. माळवी अफूचें मुख्य गिर्‍हाईक चीनदेश असल्यामुळें आणि ज्या संस्थानांत अफू तयार होते त्यांना ब्रिटिश हद्दींतील बंदरांतूनच ती परदेशी पाठविणें भाग पडत असल्यामुळें माळवी अफू मुंबई बदंरातून चीनला रवाना होण्याच्या वेळीं ब्रिटिश सरकार तिच्यावर कर बसवून तो वसूल करीत असे.

संस्थानांमध्यें होणार्‍या या लागवडीचे किंवा निपजीसंबंधीचे आंकडे उपलब्ध नाहींत. खसखशीची पेरणी नवंबर महिन्यांत करतात. त्या झाडांना फेब्रुवारींत फुलें येतात आणि मार्चमध्यें शेतकरी सर्व पीक गोळा करून ती कच्ची किंवा शुद्ध अफू गांवांतल्या सावकारांनां विकतात. सावकारांपासून घाउक व्यापारी ती खरेदी करतात व तिचे सुमारें बाराबारा औसांचे गोळे बनवून सांठवून ठेवतात व पुढें सप्टेंबर, आक्टोबर महिन्यांत परदेशीं पाठविण्यांत येते ९०० ते ९५० चीहि अफू असून ती निम्या आकाराच्या पेट्यांत भरतात. मुंबईस पोहोंचेपर्यंत ही नवी अफू बरीच वाळून जाते.

१९१३ जानेवारीपासून चीनमध्यें माळवी अफू पाठविण्याचें बंद झालें व त्या वर्षांच्या डिसेंबर ता. १७ रोजी जीं अफूचीं जहाजें चीनला रवाना झालीं ती शेवटचीं असून तेव्हां पासूनच ही निर्गत पूर्णपणें बंद झालेली आहे. तोपर्यंत मुंबईस जाणारी सर्व माळवी अफू चीनला जात असे. स्ट्रेट्स सेटलमेंट्स मध्यें या अफूचा खप मुळींच नाहीं. झांझीबारला या अफूच्या कांहीं पेट्या जातात.

सरकारी उत्पन्न:- हिंदुस्थानसरकारच्या अलीकडील सालांतल्या अफूच्या कांहीं उत्पन्नाचे आंकडे पुढील प्रमाणे आहेत:-

सन पौंड
१९१५-१६ १,९१३, ५१४ 
१९१६-१७ ३,१६०, ००५
१९१७-१८ ३,०७८, ९०३
१९१८-१९ ३,२२९, ०००
१९१९-२० (बजेटांतील अंदाज) ३,०५६, २००
१९१९-२० सालचा अंदाजी खर्च १०,४६, १०० पौंड आहे.

चीन सरकारनें इसवी सन १८२९ मध्यें स्वदेशांत आयातीस बंदी केली; तथापि त्यानंतर अफूचा चोरटा व्यापार चीनशीं मोठ्या प्रमाणावर चालू होताच. चीननें अफू बंद केल्यास गोर्‍या व्यापार्‍यांचें नुकसान होतें म्हणून चीनच्या घशांत अफू कोंबली पाहिजे व ती कोंबण्यासाठीं पुढें चीन व इंग्लंड यामध्यें युद्ध झालें. या बेशरम युद्धांत इंग्लंडाला फ्रान्सची मदत होती. हें युद्ध १८४२ मध्यें थांबून पुढें १८५८ मधील टीन्टसिनच्या तहानें इंग्लंडनें चीनला अफूचा व्यापार पूर्ववत् चालू ठेवण्यास भाग पाडलें. १८७६ मध्यें या बाबतींत कांहीं नवे नियम करण्यांत आले. १८५० मध्यें इंग्लंड व युनैटेड स्टेट्समध्यें अफूच्या सेवनास सुरवात झाली आणि आजची स्थिति अशी आहे कीं या दोन्ही देशांतील बहुतेक मोठाल्या शहरांत अफूबाज लोक थोडे बहुत आढळून येतात. अगदीं अलीकडे अफूच्या सेवनाविरुद्ध चळवळ विशेषत: इंग्लंडमध्यें सुरू झालेली आहे. चीन सरकारनेहि परदेशची अफू येण्याचें बंद करण्याकरितां व स्वदेशांतहि अफूची निपज व होऊं देण्याविषयीं जोरानें उपाय योजिले (नवंबर १९०६). अफूच्या एकंदर निपजेपैकीं मोठा भाग नियमितपणें अफू ओढणारे व पिणारे सहा कोटी चिनी लोक खपवीत असतात. पण चीनच्या एकंदर लोकसंख्येपैकीं  निम्मे लोक कमी अधिक प्रमाणात अफूबाज आहेत असा अंदाज आहे.

आं क डे वि ष य क मा हि ती :- चीनमधील अफूचें पीक दरसाल वीस हजार ते तीस हजार पेट्या होतें; व पूर्व हिंदुस्थानांत म्हणजे बंगाल व बिहार प्रांतांत ६३,५८,४९५ किलोग्रॅम अफू उत्पन्न होते व त्यापैकीं ६१,४४,१३२ किलोग्रॅम चीनमध्यें जाते (१८७३-७४). आशिया मायनरमध्यें तीन लक्ष किलोग्रॅम अफू दरसाल पिकते. चीन सरकारचें देशी अफूचें उत्पन्न १९००-१ मध्यें १५०५७८० डॉलर झालें; १९०५-६ मध्यें ५,७६,०००डॉलर व परदेशी अफूवरचें उत्पन्न छत्तीस लक्ष झालें. १८८० मध्यें हिंदुस्थान सरकारच्या एकंदर उत्पन्नापैकीं १४ टक्के उत्पन्न अफूचें होतें, तेंच १९०६ मध्यें ७ टक्के झालें.

वरील आंकडे लक्षांत घेतां अफूच्या व्यापाराच्या बाबतींत अत्यंत पापी वर्तन इंग्लंडच्या हातून होत आहे, असें सिद्ध होतें. अफूच्या आयातीविरुद्ध चिनी सरकारनें पुष्कळ तक्रारी केल्या. कारण या व्यसनाचे चिनी प्रजेवर होणारे घातक परिणाम त्या सरकारला पूर्ण कळले आहेत. तुर्क लोक अफू खाणारांचा व ओढणारांचा तिरस्कार करितात. या मनोवृत्तीवरून अफूच्या व्यसनामुळें शरीरावर, मनावर व आचरणावर किती वाईट परिणाम होतात ही गोष्ट पौरस्त्य लोकांना चांगली माहीत आहे असें स्पष्ट होतें. आणि इंग्लंड मध्येंहि एक पक्ष हिंदुस्थान सरकारनें चालविलेल्या अफूच्या व्यापाराविरुद्ध ओरड करीत आलेला आहे; आणि या पक्षाच्या प्रयत्‍नास यश येऊं लागलें आहे, ही गोष्ट अलीकडील अफूच्या उतरत्या उत्पन्नावरून दिसून येते.

ची न ब रो ब र चा क रा र.- अफूच्या उत्पन्नामध्यें जो चढ उतार दिसून येतो तो अफूच्या निर्गतीवरील नियंत्रणामुळें उत्पन्न होणारा आहे. चिनी लोकांचें अफूचें व्यसन नाहींसें करण्यासंबंधाच्या चिनी सरकारच्या प्रयत्‍नांतील प्रामाणिकपणाबद्दल १९०७ सालीं हिंदुस्थान सरकारची खात्री पटल्यामुळें हिंदुस्थानांतून चीनमध्यें होणारी अफूची निर्गत हळूहळू कमी करून चिनी सरकारशीं सहकार्य करण्याचें हिंदुस्थान सरकारनें ठरविलें. या बाबतींत १९०८ सालीं करार करून, दरसाल सर्व साधारणपणें ६७,००० पेट्या चीनला जात. त्यांपैकीं दरसाल ५,१०० पेट्या कमी कमी पाठविण्याचें हिंदुस्थान सरकारनें ठरविले. त्यानंतर चीनमध्यें होणारी देशी अफूची निपज बंद करण्याबाबतचा चीन सरकारकडून खात्रीलायक पुरावा मिळाल्यावर १९११ सालीं आणखी नवा करार करून हिंदुस्थान सरकारनें माळवी अफूची निर्गत अधिक मोठ्या प्रमाणांत कमी करण्याचें ठरविलें. परंतु अफूची निर्गत कमी झाल्यामुळें तिकडे चीनमध्यें तिची किंमत वाढली व त्याबरोबर हिंदुस्थानांतील अफूच्या लिलावांचे दरहि वाढले. परंतु त्याच सुमारास मध्यवर्ती चिनी सरकाराच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून चिनी प्रांतिक गव्हर्नरांनीं हिंदुस्थानांतील अफूच्या आयातीवर व विक्रीवर प्रतिबंध घातले व त्यामुळें १९१२ साली चीनबरोबर अफूचा व्यापार पूर्णपणें बंद झाल्यासारखा झाला. शांघाय व हांगकांग बंदरात अफूचा सांठा फार वाढला आणि १९१२ दिसेंबरमध्यें तेथील परिस्थिती इतकी बिकट झाली कीं, अफूची विक्री बंद ठेवण्याबद्दल हिंदुस्थान सरकारकडे जोराची मागणी करण्यांत आली. तदनुसार बंगाली व माळवी अफूची विक्री पुढें ढकलण्यांत आली, इतकेच नव्हे तर माळवी अफूच्या व्यापार्‍यांचें नुकसान होऊं नये म्हणून १९१३ मध्यें पाठवावयाच्या माळवी अफूच्या ११२५३ पेट्या हिंदुस्थान सरकारनें स्वत: खरेदी केल्या. त्यानंतर अलीकडे १९१३ सालापासून चीन बरोबरचा अफूचा निर्गत व्यापार पूर्णपणें बंद झाला आहे. १९१७-१८ सालीं अफूची खासगी निर्गत १२,००० हंड्रेटवेट झाली, तिची किंमत २४० लाख रुपये आली. इंडोचायना, सयाम, जपान, हांगकांग व स्ट्रेट्स सेटलमेंट इतक्या देशांत अफू जात असे.

[वाङ्मय:- वॉट दि कमर्शिअल प्रॉडक्स ऑफ इंडिया. रिपोर्ट-रॉयल कमि. ऑन. ओपियम १८९४ ए.ब्रि. मॉरल अँड मटीरियल प्रोग्रेस ऑफ इंडिया १९०५-०६ पेपर्स रिलेटिंग टु कन्झम्शन ऑफ ओपियम इन. ब्रि. बर्मा १८८१. इंडियन ईयर बुक. फार्मास्युटिकल जर्नल. रिपोर्ट ऑन माळवा ओपियम (मुंबई १८४८). दि फ्रेंड ऑफ चायना. (१८८३) कमर्शिअल आर्गनिक अ‍ॅनॅलिसिस पु. ३ फ्रँक ब्रौन-रिपोर्ट ऑन ओपियम (हांककांग १९०८). चीनचा इतिहास (ए. ब्रि.). इंपीरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया पु. ४].

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .