विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅबट, लीमन - हा अमेरिकन धर्मोपदेशक व लेखक रॉक्सबरो येथें जन्मला (१८३५). उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर यानें कायद्याचा अभ्यास केला. तो ''हार्पर्स मॅगॅझीन'' ''इलस्ट्रेटेड ख्रिश्चन वुइक्ली'' वगैरे नियतकालिकांचा सहसंपादक व ''दि ख्रिश्चन यूनियन,'' ''दि आउट लुक'' वगैरेंचा मुख्य संपादक होता.
याच्या लेखांवरून सामाजिक सुधारणा, धर्मशास्त्र, उदारमतवाद, ख्रिस्ताचें मुनष्यत्व व एकात्मकेश्वकवाद वगैरे विषयांतील त्याचे विचार दिसून येतात. ''ख्रिश्चॅनिटी अॅण्ड सोशल प्रॉब्लेम्स (१८९७), दिराइट्स् ऑफ मॅन, (१९०५), हे त्यानें लिहिलेल्या ग्रंथांपैकीं कांहीं प्रमुख ग्रंथ होत.