विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदल. (पंजाब) - हे लोक कांग्रा व होशियारपूर जिल्हे व बिलासपूर, चंबा, मंडी व सुकेत या संस्थानांत आढळतात. हे भिक्षा मागत, गाणीं गात, एका गांवांहून दुसर्या गांवाला भटकतात. विशेषत: ते रजपूत लोकांच्या लग्नसमारंभाच्या व अंत्यविधीच्या वेळीं गाण्याचें काम करतात. याच नांवाचे दुसरे मुसुलमान फकीर आहेत. परंतु त्यांचा व अबदल लोकांचा कांही एक संबंध नाहीं. या मुसुलमानाची एकंदर हिंदुस्थानांतील लोकसंख्या ५४७९ (सन १९११) आहे; पैकीं बंगालमध्येंच ४९६० लोक आहेत.