विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल गफूर - अब्दुर्रहमान जामीचा शिष्य; लाहोरचा राहणारा हा फारशी ग्रंथकार १५०६ मध्यें मरण पावला.
(२).-शहा अबदुल गफूरला 'बाबा कपूर' असें नेहमीं म्हणत. हा काल्पीचा राहाणारा असून शहा मदारचा एक शिष्य होता. १५७१ त याचा अंत झाला. या साधूची कबर ग्वाल्हेरला आहे. [बीलचा कोश]