विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल्ला बिन अली बिन अबशुव अलहलबी - ह्यानें हदसी आणि इमामियापंथाच्या प्रमाणग्रंथावर ग्रंथ लिहिले. याचा आजा अबू शुबा यानें इमाम हसन आणि हुसेन यांच्या वेळच्या सर्व दंतकथा जमा केल्या होत्या असें म्हणतात. अबदुल्लानें या सर्व कथा लिहून काढून तो ग्रंथ इमाम जाफर सादिक याला नजर केला; व इमाम जाफरनें त्यांत दुरुस्त्या केल्या व तो तपासून पाहिला असें म्हणतात [बीलचा कोश].