विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबानो पिट्रो - प्राचीन काळचा प्रख्यात वैद्य व तत्त्ववेत्ता. याचा जन्म १२४६ च्या सुमारास इटलींत अबानो येथें झाला. १३१६ सालीं मृत्यु. यानें आपल्या ग्रंथांत अरबी वैद्यकीचें व तत्त्वज्ञानाचें समर्थन व विवरण केलें आहे.
प्र सि द्ध ग्रं थ. - यानें केलेले प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे 'कान्सिलिएटर डिफरेन्शियारम क्वे इंटर फिलॉसॉफॉस एट मेडिकॉस व्हर्संटुर' (मांटुआ, १४७२, व्हेनिस, १३७६) आणि 'डि व्हेनेनिस एओरुम्क्वे रेमेडिइस' (१४७२). यांपैकीं दुसर्याचें १५९३ मध्यें लिऑन्स येथें फ्रेंच भाषांतर प्रसिद्ध झालेलें आहे.