विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबाब्दा.- अफ्रिकेंतील ''अरबी'' म्हणविणारी एक जात. हिचें वसतिस्थान नाईल नदीच्या पूर्वेस इजिप्तच्या दक्षिण भागांत आहे.
जा त.- ब्लेमिज नांवाची ग्रंथांत उल्लेखिलेली जात ती हीच. असे तेथील अवशेषांवरून व परंपरेवरून दिसतें. हे लोक जरी आपणांस अरब लोकांचे वंशज म्हणवितात, तरी यांच्यामध्यें इजिप्तमधील शेतकरी लोकांच्या रक्ताची भेसळ झाली आहे.
रा ह ण्या ची त र्हा.- नेहमीं फिरते असतात. पोषाख इजिप्तमधील शेतकर्यांप्रमाणें असतो.
उ प जी वि का.- हे लोक आपली उपजीविका मांस व दुधावर करितात