विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबिरामम् - मद्रास इलाख्यांत मदुरा जिल्ह्यात रामनाद जहागिरींत हे एक शहर आहे. हें उत्तर अक्षांश ९० २९' व पू. रे. ७८० २७' यांवर आहे. लोकसंख्या साडेसात हजार व त्या पैकीं शेंकडा सुमारें ५० लब्बई जातीचे मुसुलमान व्यापारी आहेत. येथें मुख्य धंदा म्हणजे हातमागावरील कापड. पण धान्य, कापूस, कपडा, यांचाहि व्यापार पुष्कळ चालतो. या शहराला पिण्याच्या तसेंच शेतकीस उपयोगीं पडणार्या पाण्याचा पुरवठा चांगला आहे. येथें एक अशी समजूत प्रचलित आहे कीं, या गांवापासून दोन मैलांत सापाचें विष बाधत नाहीं.