विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबीर (बुका) - ह्या पदार्थाचा तसेंच गुलालाचा खप सर्व हिंदुस्थानांत होतो. बुक्याचा खप पंढरपूर, आळंदी, देहू वगैरे वारकरी पंथांतील क्षेत्रांत पुष्कळ होतो. हरिकिर्तन, पुराण, वगैरे प्रसंगींहि याचा उपयोग करण्याचा प्रघात आहे. यासाठीं व्यापारी दृष्टीनें बुका करण्याच्या कांही ठळक कृती खालीं दिलेल्या आहेत.
पां ढ र्या रं गा चा अ बी र क र ण्या ची कृ ति.- कृति नं. (१) वाळा, चंदन, कापूरकाचरी, नाचणीचें पीठ, यांच्या मिश्रणानें पांढर्या रंगाचा बुका होतो. कृति नं. (२) देवदार, लवंगा, दवणा, गवलाकचरा, वेलची यांच्या मिश्रणानेंहि पांढरा बुका तयार करतात. याचा प्रघात बंगाल्यात विशेषेंकरून आहे.
का ळ्या रं गा चा अ बी र.- कृति नं. (१), चंदन, नागरमोथे, गवलाकचरा वगैरे जिनसांपैकीं ज्या जिनसांचा बुका करणें असेल तो जिन्नस चांगला प्रथम उन्हांत वाळवून मुसळानें अगर पहारीनें बारीक कुटावा अगर दळून काढावा. नंतर त्यास काळेपणा येण्यासाठीं त्यांत कोळशाची पूड घालून दळावें. वस्त्रगाळ केल्यानंतर चोथा राहील तो पुन्हां कुटावा. बुक्याचा उपयोग उदबत्या तयार करण्याकडेहि होतो. कृति नं. (२), सफेदचंदन २०, गुलाबकळी २०, पाच २०, बकुळीचींफुलें १०, कृष्णागरु १०, जटामांसी ३, वाळा ५, लोबान ५, नागरमोथा ५, दवणा ५, मरवा ५, चंदनीतेल ४. हे पदार्थ वर सांगितलेल्या प्रमाणांत चंदनीतेल खेरीजकरून बाकी सर्व कुटून वस्त्रगाळ करावे. नंतर मसाल्यास केशरी पाण्याचा व चंदनी तेलाचा हात द्यावा म्हणजे फार उंची जातीचा अबीर होतो.
फि क ट रं गा चा अ बी र.- जैन लोकांचा फिकट रंगाचा अबीर (वसक्षेप) करतात तो करण्याची कृति- चंदन, केशर, कापूर, कस्तुरी, यांच्या मिश्रणानें हा अबीर करतात. तो फार सुवासिक असून किंमतीनेहि महाग पडतो.