विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबू-तालिब कलिम.- इराणांतील हमदानचा हा प्रसिद्ध कवि जहांगीरबादशहाच्या कारकीर्दीत प्रथम हिंदुस्थानांत आला, व १६१९ मध्यें परत इराणला गेला. नंतर पुन्हां एकदां शहाजहानच्या वेळीं इकडे आला. बादशहानें त्याला पदरीं ठेवून ''मलिक-उश-शुआरा'' (राजकवि) अशी पदवी अर्पण केली. त्याची दोनदां सुवर्णरौप्य तुला करण्यांत येऊन, तें सोनेंरुपें त्याला बक्षीस देण्यात आलें. १९ नव्हेंबर १६५१ रोजीं हा दिवंगत झाला. ''झफर-नामा-इ-शहाजहान'' हें त्याचें एक शहाजहानवरचें काव्य आहे.