विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबू-तालीब हुसैनी.- यानें ''तुझुक-इ-तैमूरी'' नांवाचा ग्रंथ लिहिला. तैमूरलंगानें चघताइ तुर्की भाषेमध्यें आपल्या पहिल्या सत्तेचाळीस वर्षांची माहिती असलेला जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचें फारशी भाषांतर म्हणजे वरील तालीबचा ग्रंथ होय. हा ग्रंथ त्यानें शहाजहानला अर्पण केला. या ग्रंथाचें भाषांतर मेजर चार्लस स्टुअर्ट यानें इंग्रजीमध्यें केलेलें आहे.