विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबूसिंबेल.- ह्या नांवाची खडकांतील कोरीव देवालयें आफ्रिकेंत नाइल नदीच्या कांठावर न्युबिया देशांत आहेत. ही देवालयें एकंदर तीन आहेत. हा खडक वाळूचा बनलेला आहे. ही सूर्याचीं देवालयें आहेत. ह्यांतील मूर्ती ६५ फूट उंचीच्या आहेत. दुसरा रामेसीस या नांवाच्या राजाच्या कारकीर्दीतील लढाईचे देखावेहि येथें कोरिले आहेत.