विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबू हानिफ (६९९—७६७) — हा मुसुलमान लोकांमध्यें एक कायदेपंडित व धर्मशास्त्रलेखक म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यानें धर्मशास्त्रावर कुफा येथे व्याख्यानें दिलीं. हा इ. स. ७६७ मध्यें मरण पावला. याचे प्रमुख ग्रंथ म्हणजे ''मसनद'' (यांत मुसुलमानी धर्मांतील तत्वें प्रतिपादिली आहेत,) '' फिल्कलाम'', आणि ''मुआल्लिम-उल-इस्लाम''.