विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबेव्हील — हें गांव फ्रान्स देशांत सोमनदीवर तिच्या मुखापासून बारा मैलांवर आहे. हें नदीच्या दोन्ही तीरांवर व बेटावर वसलेलें आहे. याची उद्योगधंद्याबद्दल व व्यापाराबद्दल प्रसिध्दि आहे. येथील सेंट व्हलफ्रानचें चर्च (प्रार्थनामंदिर) व जुन्या इमारती फार प्रेक्षणीय आहेत.