विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अब्लुर —( मुंबई इलाखा, धारवाड जिल्हा. ) कोडच्या पश्चिमेस दोन मैलांवर असलेलें खेडें. लोकसंख्या सुमारें आठशें. येथें बसप्पा आणि सोमनाथ यांचीं देवालयें आहेत. बसप्पाच्या देवळांत इ. स. ११००, १११९, ११४४ अशा सालचे तीन शिलालेख असून सोमनाथाच्या देवळांत मूर्तीच्या उजवीकडे सन ११६८ चा एक शिलालेख आहे. [धारवाड. गॅ.]