प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अभिनय - ज्याचें रूप घेतलें असेल त्याचें वेष, भाषण चेष्टा, मनोविकार इत्यादि सर्व गोष्टींत अनुकरण करणें यास अभिनय म्हणतात. अभिनय या शब्दाचा यौगिक अर्थ “ जवळ नेणे ” असा होतो; म्हणजे कवीच्या भावार्थाजवळ प्रेक्षकांनां नेणें. तेव्हां प्रेक्षकांनां कवीच्या भावार्थाचें ज्ञान करून देण्याचा जो प्रयत्‍न केला जातो त्यास अभिनय म्हणतात. रूपकरससिद्धि सर्वस्वी अभिनयावर अवलंबून असते. आपले नेहमीचे स्वाभाविक अभिनय नाट्यनृत्यप्रयोगांत जास्त प्रमाणांत व्हावे लागतात. सिनेमाद्दश्यांत तर त्याहूनहि जास्त प्रमाणांत पाहिजेत; कारण केवळ अभिनयांवरूनच त्यांतील भावार्थ समजून घ्यावयाचा असतो. मूकदृश्यांत अभिनयाला पहिलें स्थान जें दिलें जातें तें यामुळेंच. पॅथेसारख्या जगविख्यात् सिनेमाफिल्म तयार करणार्‍या कंपनीत जे मोठ्या पगाराचे नटनटी काम करितात व त्यांचीं नांवे सिनेमाप्रेक्षकांच्या तोंडी जीं अक्षय राहतात त्याचें कारण या नटांचा सर्वोत्कृष्ट व हदयंगम अभिनय हे होय. नाट्य व नृत्यकलांतून अभिनय कशा प्रकारचा असावा याविषयी बर्‍याच संस्कृत ग्रंथातून विवेचन आढळतें. भरत मुनिकृत नाट्यशास्त्रांत नाट्याभिनय विवेचिला आहे.नंदिकेश्वराचा “ अभिनयदर्पण ” नांवाचा जो ग्रंथ आहे त्यांत विशेषत: नृत्यकलेंत उपयोगी पडणार्‍या अभिनयाचे नियम फार विस्तारानें दिलें आहेत.

ना ट्या भि न य :—नाटकांत निरनिराळ्या अवयवांच्या क्रिया व हालचाली विशेष महत्त्वाच्या आहेत. या हालचालींच्या क्रियेस नाट्य किंवा अभिनय म्हणतात. ज्याची भूमिका घेतली असेल त्याचें बोलण्या चालण्यांत हुबेहुब अनुकरण करणें याचें नांव अभिनय. ( भ. ८—६. इ.सा.द. ६२);  अभिनय चार प्रकारचे सांगितले आहेत ते असे :— आंगिक, वाचिक, आहार्य व सात्त्विक. आहार्य अभिनय पोषाखासंबंधी असतो. सात्त्विक अभिनयांत निरनिराळ्या भावना व मनाच्या अवस्था व्यक्त करण्याच्या स्वाभाविक पद्धतींचा अंतर्भाव होतो. वाचिक अभिनयाशीं भाषा व वाचा यांचा संबंध असतो. निरनिराळ्या भावना व मनाच्या अवस्था कशा व्यक्त कराव्या हें सांगतांना भरतानें आपल्या ग्रंथाच्या सहाव्या व सातव्या अध्यायंत वरील दोन प्रकारांसंबंधानें नियम दिले आहेत.

निरनिराळ्या मानसिक अवस्था व भाव व्यक्त करून तदनुरूप रस प्रेक्षकांमध्यें उत्पन्न करणें हा शास्त्रकारांच्या मतानें नाटकाचा उद्देश असल्यामुळें त्या मानसिक अवस्था व भाव यांचें पृथक्करण करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला आहे. त्या पृथक्करणाचें सविस्तर विवेचन करणें हा वास्तविक काव्यशास्त्राचा भाग असल्यामुळें त्याची केवळ त्रोटक हकीकत मात्र येथें देणें शक्य आहे. ज्या मूळ कारणांपासून निरनिराळ्या मानसिक अवस्था व भाव उत्पन्न होतात त्यांस विभाव म्हणतात व सदर अवस्था व भाव यांपासून जे परिणाम घडून येतात त्यांस अनुभाव असें म्हणतात. या भावांपैकी कांहीं भाव असें असतात कीं, त्यांचा अंमल मनुष्यांवर बराचकाळपर्यंत चालू राहतो आणि म्हणून त्यांस  ‘स्थायीभाव ’ असें म्हणतात. भरताच्या मताप्रमाणें रति, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा व विस्मय हे ते स्थायीभाव होत. भरताच्या नंतर झालेल्या शास्त्रकारांच्या मतानें त्या स्थायीभावांत “ निर्वेद ” याचाहि अंतर्भाव होतो. परंतु अल्पकाळ टिकणार्‍या व स्थायीभावाबरोबर असणार्‍या भावांतच भरतानें “निर्वेदाचा” उल्लेख केला आहे. विभाव, अनुभाव या योगानें घडलेल्या गोष्टी दर्शविल्या जात नाहीत, परंतु त्यांचें रंगभूमीवर आविष्करण झालें म्हणजे प्रेक्षकांच्या मनांत रस उत्पन्न करण्याकडे त्यांचा उपयोग होतो. रस म्हणजे प्रेक्षकांच्या मनांत पडलेलें नाट्यभावनांचें प्रतिबिंब आणि त्यामुळें त्या भावना प्रेक्षकांच्या मनांत वासनास्वरूपांत राहतात. तदनंतर त्या त्या भावनांस अनुरूप अशा निरनिराळ्या मानसिक अवस्था उत्पन्न होतात. जसे:— शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक,बीभत्स व अद्भुत आणि नन्तर जोडण्यांत आलेली शांत अवस्था या प्रत्येक मानसिक अवस्थेस ( भ. ६-४२ इ.) यांत एकेक विशिष्ट रंग सांगितला आहे. जसें शृंगारास श्याम, हास्यास सित, करूणास कापोत, रौद्रास रक्त, वीरास गौर, भयानकास कृष्ण, बीभत्सास नील व अद्भुतास पीत.

निरनिराळ्या भावना कशा व्यक्त कराव्या, हें भरतानें आपल्या ग्रंथाच्या ७ व्या अध्यायांत सांगितलें आहे. जसें, प्रेमळ भाषणानें व अंगविक्षेपांनी प्रेम, स्मित हास्य किंवा दीर्घ हास्य यांनी आनंद आणि रडणें, शोक करणें, विलाप करणें फिकट होणें. आवाज फाटणें, पडणें, आक्रोश करणें, सुस्कारे टाकणें इत्यादिकांनी दु:ख व्यक्त करावें. सहाव्या अध्यायांत रसांसंबंधानेंहि असेच नियम दिले आहेत.

निरनिराळे अंगविक्षेप किंवा आंगिक अभिनय यासंबंधानें भरतानें (भ. अध्याय ८-९) अधिक सविस्तर नियम सांगितले आहेत. हे नियम अर्थात् मुग्ध नाटकांतील विशिष्ट कलासंबंधी आहेत. भरतानें हे नियम प्राचीन नटसूत्रावरून रचले असले पाहिजेत हें उघड आहे. निरनिराळे अंगविक्षेप सांगतांना त्यावरून कसले बोध होतात. हेंहि सांगितलें आहे. कंप थोडा असला तर त्यास “अकंपित” म्हणतात; तोच जलद असला तर “कंपित” म्हणतात. याप्रमाणें प्रत्येक हालचालीचा अर्थहि सांगितला आहे. प्रत्येक भावनेगणिक नेत्रविक्षेपांत फरक पडतो. निरनिराळ्या भावना व मानसिक अवस्था व्यक्त करण्याकरितां नेत्रांतील तारका निरनिराळ्या   तर्‍हेनें फिरवितात. यास्तव भुवया,नाक, गाल, ओंठ, हनुवटी व मान यांच्या हालचालीसंबंधानें अनेक नियम दिले आहेत. त्याचप्रमाणें हाताच्या हालचालीसंबंधानेहि सविस्तर नियम दिले आहेत ( भ. ९). जर हाताचा आंगठा वांकवून बाकीचीं चार बोटें लांब केलीं तर त्यास पताका म्हणतात. कपाळाला हात लावून धरला तर ठोसे, इजा, आपत्ति, आनंद किंवा दर्प इत्यादिकांचा बोध होतो. हात तसाच धरला, परंतु बोटें अलग केली व हलवलीं तर अग्नि, पर्जन्य किंवा पुष्पवृष्टि द्दष्टीस पडत आहे असा बोध होतो. हाताच्या त्याच स्थितींत जर आंगठीचें बोट ( अनामिका, विशेषत: डाव्या हाताची ) वाकविलें तर तसें करणारा कांहीतरी  आणीत आहे किंवा देत आहे, खाली जात आहे किंवा आंत येत आहे असा बोध होतो. अशा प्रकारचे हाताच्या ठेवणीचे चोविसांहून अधिक प्रकार असून त्यांचे तेरा निरनिराळे संयोग असल्याचें वर्णन आहे. त्याचप्रमाणें त्यांच्यापासून काय बोध होतो, तेंहि सांगितलें आहे. या रीतीनें निरनिराळ्या कृती व पदार्थ अंगविक्षेपांच्या योगानें दाखवितां येतात. शिवाय वक्ष, कुक्षी, उदर, जघन, ऊरू, पद इत्यादिकांसंबंधानेंहि नियम सांगितले आहेत. पायाच्या व त्यास अनुसरून हाताच्या निरनिराळ्या ठेवणींचें व हालचालीचें वर्णन करण्याकरितां सबंध दहावा अध्याय खर्ची घातला आहे. अकराव्या अध्यायांत भिन्न भिन्न पदक्रमांचीं मंडलें सांगितलीं असून बाराव्यांत चालण्याच्या विविध गती दिल्या आहेत.

निरनिराळ्या लोकांच्या चालण्याच्या गती निरनिराळ्या असतात आणि प्रत्येकाच्या अवस्थेप्रमाणेंहि त्याच्या चालण्याच्या गतींत फरक पडतो.

स्त्रिया व कनिष्ठ वर्गांतील लोक आपले अवयव एकत्र गोळा करून अवयव व ओठ थरथर कांपवून आणि दांत करकर वाजवून शीत व पर्जन्य यांचा बोध करतात; डोळे व पाय वर करून रथारोहण सुचवितात; पाय उंच करून व पावलें लांब टाकून राजगृहाधिरोहण दाखवितात, वस्त्रें वर उचलून धरण्यानें पाण्यांतून चालण्याचा आणि पाणी खोल असेल तर हाताला ताण देण्यानें त्यांतून जाण्याचा बोध करतात. हत्ती व घोडे असल्याबद्दलची साक्ष अनुक्रमें अंकुश व लगाम यांच्यायोगानें पटवितात आणि रश्मी पकडून धरण्यानें रथ असल्याबद्दल ज्ञान करून देतात.

येणेंप्रमाणें खुणा व हावभाव करून अनेक गोष्टींचा बोध करण्यांत येतो आणि यांसंबंधाने भरतानें आपल्या ग्रंथाच्या पंचविसाव्या अध्यायांत अनेक नियम दिले आहेत. अलीकडील नाटकांतहि नट आपल्या मनांतील पुष्कळ गोष्टीचें दिग्दर्शन केवळ हावभावांनी करून दाखवितो (नाटयति), तसेंच तो कांही गोष्टी मोठ्यानें बोलतो (प्रकाशम्), कांही मनांतल्या मनांत बोलतो (स्वगतम्, आत्मगतम), कांहीं बाजूला तोंड करून बोलतो (अपवारितम्) कांहीं तिस­र्‍याला ऐंकूं जाणार नाहीं अशा रीतीनें (एक) दुस­र्‍याशी बोलतो (जनांतिकम्)  आणि कांही कोणी तरी आहे अशी कल्पना करून बोलतो (आकाशे ).

याप्रमाणें अनेक युक्त्या करून साधनसामुग्रीची उणीव दुर करण्यांत येत होती. ज्याअर्थी भरतानें इतके विस्तृत नियम दिले आहेत, त्याअर्थी त्याच्या वेळेस नाट्यकला बरीच प्रगल्भ झाली असली पाहिजे हें उघड आहे. तथापि ती नाट्यकला अलीकडील रंगभूमीप्रमाणें नसून प्राचीन नृत्य व मूकप्रहसनांच्या काळांतील होती. यावरून भरतानें आपले नियम त्यांवेळी प्रचलित असलेल्या अन्य नाट्यशास्त्रविषयक ग्रंथांवरून घेतले असले पाहिजेत असें दिसतें.

नृ त्या भि न य.— नंदी हा नृत्यकलेंत प्रवीण आहे अशी कल्पना करून त्याच्यापासून अभिनयाचे धडे घेण्याची  “ अभिनयदर्पणा  ” च्या कर्त्यास इच्छा झाली. नंदिकेश्वर हें कर्त्याचें नांव खरें आहे की टोपण आहे याविषयी शंका आहे.

नं दि के श्व रा चें अ भि य न द र्प ण.— याला सुरूवात, इंद्र कैलासांत राहणार्‍या नंदिकेश्वराकडे येऊन, त्याच्या नृत्यासंबंधीच्या भरतार्णवाचें विवेचन करण्याविषयीं त्याची प्रार्थना करितो व नंदिकेश्वर भरतार्णवाचें या “ दर्पणा ” च्या रूपानें थोडक्यांत सार सांगतो, अशा पद्धतीनें झाली आहे. प्रथम नाट्य, नृत्त व नृत्य यांमधील भेद सांगून, सभागृहाचें वर्णन दिलें आहे. रंगभूमीवरील पात्र कसे असावें हे खालीलप्रमाणें विवेचिलें आहे.

पात्रानें रंगभूमीच्या मध्यभागीं उभें राहावें व नर्तकीच्या शेजारी नटानें असावें; उजव्या बाजूला तालधारी व कोठल्या तरी बाजूला मृदंग्या असावा व गीतकार त्यांच्या मध्यें, आणि श्रुतिकार जरा मागें असा थाट असावा.

नर्तकी :— अतिशय सुरूप, तरूणी पूर्णवर्तुळस्तनांची आत्मविश्वासी, मोहक, प्रिय, गृह-मोक्षामध्यें (भाव दर्शविण्यामध्यें) कुशल, पाद व ताल यांत वाकबगार, रंगभूमीवर सहजरीतीनें काम करणारी, हात व अंग यांच्या विक्षेपामध्यें तरबेज, अभिनयांत सुरेख, डोळे पूर्ण उघडे ठेवणारी, गान, वाद्य आणि ताल यांनां अनुसरणारी, मौल्यवांनं अलंकार धारण करणारी, कमलासारखें सुंदर मुख असणारी फार स्थूल किंवा फार कृश नव्हे अशी, फार उंच किंवा फार ठेंगणी नसणारी नर्तकी असावी. जिचे डोळे फुलासारखे पांढरे आहेत, जिला थोडे केंस आहेत, जिचे ओंठ जाड व स्तन लोंबत आहेच, जी फार स्थूल किंवा फार कृश, फार उंच किंवा फार ठेंगणी आहे. जिला कुबड आहे किंवा जिचा आवाज मधुर नाही अशी वेश्या वर्ज करावी.

नट :—नट सुंदर, मधुरभाषणी, विद्वान, कार्यक्षम. वक्ता, कुलीन, शास्त्रकलांमध्यें पारंगत, मधुस्वनी, गायनवादन नर्तनपटु, आत्मश्रद्धावान व चतुर असावा.

अभिनय :— अभिनय तीन प्रकारचे आहेत. आंगिक, वाचिक व आहार्य ( अलंकारित). यांशिवाय सात्विक, राजस व तामस असे भेद आहेत. या ठिकाणीं फक्त आंगिकाभिनयाचा विचार कर्तव्य आहे. अंग, प्रत्यंग व उपांग असें आंगिकाभिनयाचे तीन प्रकार पडतात. अंगाभिनयांत डोकें, हात, कांखा, कुशी, कंबर आणि पाय ही सहा अंगे मानली जातात कोणी कोणी मान हें एक अंग धरतात. प्रत्यंगाभिनयांत खांदे, खांद्याच्या मागील फरे, बाहू, पाठ, पोट, मांड्या आणि पोटर्‍या ही येतात  मनगटें, गुडघे आणि कोंपरें हींहि प्रत्यंगे होत असें कांहींचें म्हणणें आहे. उपांगाभिनयांत डोळे, पापण्या, बुबुळें, गाल, नाक, जबडा, ओंठ, दांत, जीभ, हनुवटी आणि चेहरा अशीं अकरा उपांगे गणली जातात. याखेरीज टांच, घोटो, बोटें, आणि आंगठे व तळहात यांसारखी साह्यकारी उपांगें आहेत. नृत्यामध्यें जेवढीं उपयोगी तेवढींच वर्णिलीं आहेत. डोकें हालवण्याचे नऊ प्रकार :- सम, उद्वहित, अधोमुख, आलोलित, धूत, कंपित, परावृत्त, उत्क्षिप्त आणि परिवाहित.

(१) सम- डोकें खाली वाकलेले किंवा उचललेलें किंवा हलत नसलेलें उपयोग : नृत्यारंभ, प्रार्थना, अधिकारयुक्त भाषण, समाधान, राग, बेपर्वाई किंवा क्रियाशून्यता.
(२) उद्वाहित- डोकें वर उचलून स्थिर ठेवणें. उपयोग: पताका, चंद्र, आकाश, पर्वत, हवेंत उडणारे पदार्थ कोणतीहि उंच वस्तु. (३)अधोमुख—डोकें खालीं वाकविलेलें असणें. उपयोग: विनय, दु: ख, नमन, एखादी गोष्ट हिडिस मागणें, मूर्च्छा, जमिनीवर पडलेले पदार्थ, स्नान.
(४) आलोलित—डोकें वर्तुलांत फिरविणें. उपयोग: निद्रावस्था, पर्याकुलावस्था, उन्माद, मूर्च्छना, घेरी येणें, काकूं करणें, हंसणें इत्यादि. (५) धूत-उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे डोकें वळविणें. उपयोग: नकार, पुन:पुन्हां पाहणें, सहानुभूति, आश्चर्य, निराशा, बेपर्वाई, थंडी, आग‚ भीति, मद्य पिण्याच्या वेळचा पहिला क्षण, युद्धाची तयारी, अव्हेर, आतुरता आपल्या अवयवाकडे नजर टाकणें, दोन्ही बाजूला हाक मारणें. (६) कंपित—खालीं वर डोकें हालविणें. उपयोग:“  क्रोध, ‘ थांब ’ म्हणणें, पृच्छा, हांक, भीति घालणें इत्यादि. (७) परावृत्त (वळलेले)— डोकें एका बाजूला करणें. उपयोग: “ हें कर ” असें सांगणें, तिटकारा, नम्रता, कांपणें, आंग चोरणें, अनादर करणें, इत्यादि, (८) उत्क्षिप्त— डोकें एका बाजूला वर करणें. उपयोग: ‘ हें घे ’ इत्यादि म्हणणें, खून करणें, प्रति. पाळ करणें, मान्यता देणें. (९) परिवाहित- एका बाजूकडून दुस-या बाजूकडे पंख्याप्रमाणें डोकें हालविणें. उपयोग: प्रेमी बनणें, प्रियकरिणीकरितां झुरणें, सुख, आनंद, विचार.

भरताचार्य आणि इतर मुनींनीं चोवीस डोक्यांचे प्रकार सांगितले आहेत ते असे:  धूत विधूत, अवधूत, कंपित, अकंपित, उद्वाहित, परिवांहित, अंचित, निहंकित परावृत्त, उत्क्षिप्त, अधोमुख, लोलित, निर्योन्नतान्त, स्कंधानत, आरात्रिक, सम, पार्श्वाभिमुख, सौम्य, अवलोकित, तिरश्चीन, प्रकंपित, सौंदर्य.

अष्टदृष्टि:—भरत-शास्त्रांत दृष्टीचे आठ प्रकार सांगितले आहेत:  सम, आलोकित, साचि, प्रलोकित, निमीलित, उल्लिखित, अनवृत्त, अवलोकित.
(१) सम—देवांच्या स्त्रियांप्रमाणें डोळे न हालवितां बघणें. उपयोग: नृत्यारंभ, तागडी, इतर कांहीं गोष्टीविषयीं विचार, आश्चर्य, देवमूर्ति. (२) आलोकित—तीक्ष्ण कटाक्षांनीं जलद डोळे फिरविणे. उपयोग: कुंभाराचें फिरते चाक, एकूण एक वस्तू दाखविणें, इच्छा. (३) साचि (काना डोळा)—डोकें न हालवितां डोळ्यांच्या कोप-यांतून पाहणें, उपयोग: इंगित‚ मिशाला पीळ घालणें, आत्मविश्वास, बाणाचा नेम धरणें, खूण करणें आणि कुलटा नाट्यामध्यें. (४) प्रलोकित—एका बाजूकडून दुस-या बाजूकडे फिरविणें. उपयोग: दोन्ही बाजूच्या वस्तू पाहणें, खूण करणें, हालणें, अस्वस्थ मन. (५) निमीलित (झांकलेलें)—डोळे अर्धवट झांकलेले अर्धवट उघडलेले. उपयोग: ऋषीसारखा आविर्भाव, दुस-याच्या मर्जीप्रमाणें वागणें, जप, ध्यान, नमस्कार, वेड, सुक्ष्मदृष्टि. (६) उल्लिखित—सूक्ष्म रीतीनें वर व बाजूला कटाक्ष टाकणें. उपयोग: ध्वजाचा अग्र, गोपूर, देवमंडप, पूर्वजन्म, उंची, चंद्रिका.(७) अनवृत्त—झटदिशी खालीं वर बघणें. उपयोग: रागिट मुद्रा, स्नेहयुक्त आमंत्रण. (८) अवलोकित—खालीं बघणें. उपयोग: छायेकडे बघणें, विचार, शय्या, अभ्यास, आपल्या अंगाकडे बघणें.

पुढील दृष्टी इतर ठिकाणीं वर्णिलेल्या आहेत. सम, प्रलोकित, स्निग्ध, शृंगार, उल्लिखित, अद्भुत, करूण, विस्मय,तृप्त, विषण्ण, भयानक,साचि, दृत, वीर, रौद्र, दुर, इंगित,विलोकित, वितर्कित, शंकित, अभितप्त, अवलोकित, शून्य, हृष्ट, उग्र, विभ्रांत, शांत, मीलित, सूचन, लज्जित, मलिन, त्रस्त, म्लान,  मुकुल, कुंचित, आकाश, अर्धमुकुल, अनुवृत्त, विप्लृत, जिम्ह, विकोश, मदिर, हृदय, ललित.

भ्रुंकुटि :- दुस–या एका ग्रंथांत भुंवया हालविण्याचे सहा प्रकार सांगितले आहेत: सहज, पतित, उत्क्षिप्त, चतुर, रेचित, कुंचित.
(१) सहज—नेहमींच्या चेह–यांतील भुंवई ही नैसर्गिक स्थिति दर्शविते (२) पतित—स्थिर असलेल्या भुंवया चढविणें. उपयोग: अरूचि, आश्चर्य, मत्त्सर. (३) उत्क्षिप्त—एक किंवा दोन्ही भुंवया वर उचलणें. उपयोग : स्त्रीचा राग, खरें बोलणें, शृंगारभाव, लीला. (४) चतुर—भुंवया मिळवून थोड्या हालविणें. उपयोग: एकमेकांचे चेहरे मिळविणें. हत्सौख्य, आवेग. (५) रेचित- सुंदर व मधुर रीतीनें एक भुंवई अकुंचित करणें. उपयोग: एखादें गुह्य ऐकणें, ‘ साध ’ असें म्हणणें, एखाद्या स्थळाकडे बघणें. (६) कुंचित—एक किंवा दोन्ही भुंवया कमानदार करणें. उपयोग: प्रियकर हजर नसतांना त्याची आठवण करून दिल्यामुळें झालेला आनंद (मोट्टाइत), खोटाराग (कुट्टमित), विलास, किलकिंचित.

मान.— भावज्ञांनीं मान हालविण्याचे चार प्रकार सांगितले आहेत. सुंदरि, तिरश्चीन, परिवर्तित, प्रकंपित.
(१) सुंदरि-मान क्षितिजसमांतर अशी इकडे तिकडे फिरविणें (तिर्यकू प्रचलित). उपयोग: प्रणयप्रारंभ, परीक्षा घेणें, शाबास असें म्हणणें, आठवण, थट्टेचें भाषण, सहानुभूतीचें सुख. (२) तिरश्चीन—सापाच्या चालीप्रमाणें दोन्ही बाजूंनां मान वर करणें, उपयोग: तरवार पाजळणें, सर्पाकार गति.
(३) परिवर्तित—अर्धचंद्राप्रमाणें उजव्या व डाव्या बाजूला मान वळविणें. उपयोग: शृंगारनर्तन, कपोलचुंबनप्रसंगीं.
(४) प्रकंपित—कपोताप्रमाणें पाठीमागें  व पुढें मान फिरविणें. उपयोग: ‘ तू आणि मी ’
असें सांगणें, विशेषत: देशी नाट्यांत, गणना, झोके.
हस्त. हात हालविण्याचे प्रकार बारा आहेत. प्रसारण, कुंचित, रेचित, पुंखित, अपवेष्टित, प्रेरित, उद्वेष्टित, व्यावृत्त, परिवृत्त संकेत, चिन्ह, पदार्थटीक.

( १ ) प्रसारण ( उघडलेला ) बोटें ताठ करुन ( २ ) कुंचित—बोटें वाकवून. ( ३ ) रेचित—बोटें पसरून. (४) पुंखित—हात पुढें, बोटें ताठ वाकलेली किंवा पसरलेली. ( ५ ) अपवेष्टित- हात खाली केलेला असा. (६) प्रेरित- हात पाठीमागे वळविलेला व बोटें ताठ, वाकलेली किवा पसरलेली. (७) उद्वेष्टित— तळहात वर धरलेला. (८) व्यावृत्त—हात बाजूनें पुढें रोखलेला. (९) परिवृत्त—हात बाजूकडून पुढें केलेला. (१०) संकेत—शब्दाशिवाय कल्पना देणें. (११) चिन्ह—ज्या गोष्टी पुढें आहेत व ज्या अदृश्य आहेत त्यांच्या खुणा निरनिराळ्या चिन्हांनी दाखविणें. (१२) पदार्थटीक—शब्दाचे अर्थ समजावून देणें.


हस्तभेद :- हातांनी अभिनय करण्याचे दोन प्रकार आहेत. एक, एक हाताचा (असम्युत्त) व दुसरा जोड हाताचा (सम्युक्त). असम्युत्त हात २८ आहेत ते असे:  पताका, त्रिपताका, अर्धपताका, कतर्रमुख, मयूर, अर्धचंद्र, अराल, शुकतुंडक, मुष्टि, शिखर, कपित्थ, कटकमुख, सूचि, चंद्रकला (पद्म), कोश, सर्पशीर्ष, मृगृशीर्ष, सिंहमुख, लागूल, सोलपद्म, चतुर, भ्रमर, हंसास्य, हंसपक्ष, समदंश, मुकुल, ताम्रचूड आणि त्रिशूल.

( १ ) पताका —आंगठा इतर बोटांना चिकटून बोटें ताठ करणें. उपयोग:  नृत्यारंभ, ढग, अरण्य, मनाई करणें, हदय, रात्र, नदी, देवलोक, घोडा, कापणें, वारा, कलणें, चालणें, बल, चांदणे, इत्यादि. (२) त्रिपताका—हाताचे तिसरें बोट वाकविणें. उपयोग:  मुगुट झाड, वज्र, वज्रधारी (इंद्र), गाल, स्त्रीपुरूषसंयोग इत्यादि. (३) अर्धपताका- त्रिपताका हस्तांतील करंगळी वाकविणें. उपयोग: पल्लव, फलक, नदीतीर, चाकू, गोपूर, शृंग, ‘ दोन ’ असें म्हणणें. (४) कर्तरीमुख——वरील हाताची करंगळी व तर्जनी पसरणें. उपयोग: पुरूष व स्त्री यांचा वियोग, विरोध, चोरणें, डोळ्याचा कोपरा, मृत्यु, बेकी, वीज, एकटें निजणें, पडणें. (५) मयूर-कर्तरीमुख हस्तांतील तिसरें बोट आंगठ्याला जोडणें व इतर बोटें ताठ ठेवणें. उपयोग: मयूरचंचु, लता, शकुन पक्षी, ओकणें, कपाळ, केंसावर थोपटणें, अश्रू पुसणें इत्यादि. (६) अर्धचंद्र-पताका हस्तांतील आंगठा पसरणें. उपयोग: वद्य अष्टमीचा चंद्र, गळा धरणारा हात, भाला, उत्पत्ति, कंबर, काळजी, आपण स्वत: , अवयवस्पर्श, साधारण लोकांचा आदर करणें. (७) अराल—पताका हस्तांतील पहिलें बोट वांकलेलें असणें. उपयोग: विषपान, अमृतपान इत्यादि ( ८ ) शुकतुंडक—अराल हस्तांतील तिसरें बोट मिटणें. उपयोग: बाण सोडणें, भाला फेकणें, मर्म, क्रौर्य. ( ९ ) मुष्टि— चा–ही बोटें तळहातावर मिटवून वरती आंगठा ठेवणें. उपयोग: स्थैर्य, केस धरणें, कुस्ती खेळणें. ( १० ) शिखर—वरील हाताचा आंगठा वर उचलणें. उपयोग: मदन, खांब, शांतता, पति, दांत, प्रवेश, प्रश्न, नाहीं म्हणणें, अभिनयांतर, कंबरपट्टा सोडणें, आलिगन, प्रियकर, घंटानाद, कुटणें. (११) कपित्थशिखर  हस्ताची तर्जनी आंगट्याच्या टोंकावर ठेवणें. उपयोग:  लक्ष्मी, सरस्वती, गाईची धार काढणें, लीलेमध्यें फूल धरणें, साडीचें टोक. धरणें, डोक्यावर पदर धरणें इत्यादि (१२) कटक—मुख-तर्जनी व मध्यमिका आंगठ्याला लावणें. उपयोग: फुलें तोडणें, माला धारण करणें, हळू हळू धनुष्य सज्ज करणें, तांबूल देणें, कस्तुरी—अत्तर वगैरे लावणें इत्यादि. (१३) सूचि—कटकमुख हस्तांतील तर्जनी वर उचलणें. उपयोग: एक, परब्रह्म, एक शेंकडा,सूर्य,शहर, ‘ असें किंवा कसे ’ म्हणणें, ‘ तो‚ ’ पंखा, झुरणें, वेणी, छत्री, नगारा वाजविणें. (१४) चंद्रकला—सूची हस्तातील आंगठा मोकळा सोडणें. उपयोग: चंद्राची कोर दाखविणें. (१५) पद्मकोश—बोटें वेगवेगळी करून जरा वाकविणें व  तळहात थोडा खोलगट करणें. उपयोग: फळ, स्तन, फुलाचा गोटा फराळ, कळी, आबा, फुलांचा पाऊस, घंटेचा आकार इ. (१६) सर्पशीर्ष—पताका हस्ताचा मध्य खोलगट करणें. उपयोग: चंदनाची उटी, साप, हळूपणा, देव व देवर्षी यांना पाणी देणें, हत्तीच्या कानाचें फडफडणें, मल्लाचे मर्दन. (१७) भृगशीर्ष—वरच्या सारखाच हात करून आंगठा व करंगळी पसरणें. उपयोग: स्त्रिया, गाल,क्रममर्यादा, भीति, नेपथ्य, त्रिपुंड्र, पदमर्दन, छत्रधारण, इत्यादि. पुढील हस्तविस्ताराचें वर्णन विस्तारपूर्वक केलेलें नाही, त्यांचा नामनिर्देश पूर्वी केलाच आहे. याशिवाय उणनामा; बाण; अर्धसूचिक या तीन हस्तलक्षणांचा कांही ठिकाणीं उल्लेख आलेला आहे.

जोडलेले हात :- ( संयुक्त हस्त ) चोवीस प्रकारचे जोडलेले हात पुढीलप्रमाणें होत. अंजली, कपोत, कर्कट, स्वस्तिक, दोल, पुष्पपुट, उत्संग, शिवलिंग, कटकवर्धन, कर्तरी, स्वस्तिक शकट, शंख, चक्र,संपुट, पाश कीलक, मत्स्य, कूर्म,वराह गरूड, नागबंध, खट्व भेरूंड, अवहित्य.

नात दाखविणा-या हातांचे अकरा प्रकार पुढील प्रमाणें:- ( १ ) दंपती (नवराबायको)—डावा हात शिखर व उजवा हात मृगशीर्ष स्त्रीपुरूषदर्शक आहे.    ( २ ) मातृ (आई)—डावा हात अर्धचंद्र, उजवा हात संदंश करून, डावा हात पोटावर ठेवावा; मातृ किंवा कन्या दर्शक,(३) पितृ (बाप)—मागल्याप्रमाणें हात केल्यावर उजवा हात शिखराप्रमाणें धरावा; पितृ किंवा श्वशुरदर्शक. (४)श्र्वश्रू (सासू)— उजवा हात हंसास्य आणि संदंशप्रमाणें गळ्याशीं धरून नंतर डावा हात स्त्रीहस्ताप्रमाणें पोटावर ठेवावा. (५) श्वशुर ( सासरा ) – मागल्याप्रमाणें हात ठेवून उजवा हात शिखराप्रमाणें दाखवावा. (६) भर्तृ-भ्रातृ (दीर)— डावा हात शिखर व उजवा हात बाजूला कर्तरीमुखाप्रमाणें ठेवावा (७) ननांदृ (नणंद)—भर्तृ-भ्रातृ हात केल्यावर डावा हात स्त्रीहस्त करावा. (८) ज्येष्ठ, कनिष्ठ भ्रातृ (वडील किंवा धाकटा भाऊ)— मयूरहस्त पुढें आणि मागें दाखवावा (९) स्नुषा (सून)- पाठीमागला हात केल्यानंतर उजवा स्त्रीहस्त करावा. (१०) भर्तृ (नवरा)— हंसास्य आणि शिखर हात हे गळ्याशीं धरावे (११) सपत्नी (सवत)— प्रथम पाशहस्त दाखवून नंतर दोन्ही हात स्त्रीहस्ताप्रमाणे करावे.

देवांची कृत्यें व स्वभाव यांशी जुळणारे आविर्भाव दाखविणारे होत. ते पुढीलप्रमाणें दिले आहेत:—

बह्मा-डावा हात चतुर, उजवा हंसास्य. शंभू—डावा हात मृगशीर्ष, उजवा हात त्रिपताका. विष्णू—दोन्ही हातांनीं त्रिपताका. सरस्वती- डावा हात अर्धचंद्र, उजवा हात सूचि पार्वती दोन्ही हातांनीं अर्धचंद्र करून डावा हात वर व उजवा हात खालती अभय व वरद दर्शक असा ठेवावा. लक्ष्मी—खांद्याशीं दोन्ही कपित्थ हात करावे. मन्मथ—डावा हात शिखर,उजवा हात कटक इंद्र—त्रिपताका हात एकमेकांवर आडवे ठेवणें. यम—डावा हात पाश, उजवा हात सूचि. सूर्य—सोलपद्म आणि कपित्थ हात खांद्यावर धरणें. चंद्र—डावा हात सोलपद्म उजवा हात पताका. बृहस्पति—जानवें धरलें आहे असें दाखविण्याकरितां दोन्ही हात शिखर करावे. दशावताराचे हस्तहि वर्णिले आहेत.

चातुर्वर्ण्यदर्शक हात. ब्राह्मण :— जानवें धरलें आहे असें दाखविण्याकरितां दोन्ही हात शिखर करून उजवा हात इकडून तिकडे हालविणें. क्षत्रिय—डावा हात शिखर करून पुढें मागें हालविणें व उजवा पताकहस्त करणें. वैश्य—डावा हात हंसास्य, उजवा हात कटक. शुद्र—डावा हात शिखर, उजवा हात सूचि यांखेरीज आणखी अठरा जातीचे हात त्यांच्या त्यांच्या कर्मावरून दाखविण्यांत येतात, त्याचप्रमाणें निरनिराळ्या देशच्या लोकांचे हातहि त्यांची खूण पटविण्याजोगे कसे दाखवावे तें सांगितलें आहे.

प्रसिद्ध सम्राटांचे हात :— हरिश्चंद्र—शुकतुंड;  नल—मयूर; पुरूकुत्स—अलपद्म;पुरूरवस्—मुष्टि; सगर—डोक्यावर अलपद्म; दिलीप—पताका; अंबरीष—कर्तरि; शिबि—कपित्थहस्त पुढें हालवावयाचा; कार्तवीर्य—देवविभावना-मधील दोन पताकाहस्त खांद्यांशीं धरणें; रावण—मागील प्रमाणेंच हात पण बोटें मात्र फाकणें;  धर्मराज—दंडाजवळ हात हालवीत ठेवणें; अर्जुन— त्रिपताकाहस्त पुन्हां  पुन्हां पुढें करणें; भीम-मुष्टि हस्त पुढें हालवीत ठेवणें; नकुल—कटक; सहदेव—शिखरहस्त इत्यादि.

सातसमुद्रांचे हात :— लवण-मुकुलहस्त खालीवर करणें; इक्षु-अलपद्म हात तसेच हालविणें; सूर-संकीर्ण आणि पताकाहस्त पूर्वीप्रमाणेंच हालविणें;  सर्पि—चतुरहस्त; दधि—त्रिपताकाहस्त; क्षीर—सर्पशीर्ष; शुद्धोदक—पताका हस्त.

प्रसिद्ध नद्या दाखविणारे हात .— खालींवर हात हालविण्यानें एखादी नदी दर्शविली जाते. कोणत्याहि नदीकरितां पताकाहस्ताची योजना करितात गंगा-ताम्रचूड; यमुना-रेखा:  कृष्णा-सिंहमुख;  कावेरी-चतुर; सरस्वती-पताका आणि चतुर; नर्मदा—अर्धपताका; चंद्रभागा—नुसता हात हालविणें; इत्यादि. ज्यांच्याकरितां विशिष्ट हात सांगितले नाहींत त्या पताकाहस्तानें दर्शविण्यांत येतात. यानंतर निरनिराळ्या वृक्षवनस्पती, पशुपक्षी, जलचर वगैरेंचे हातांनी दाखविण्याचे प्रकार सांगितले आहेत.

हा अभिनयदर्पण निडामंगलमच्या तिरूवेंकटाचारानीं संपादित केला आहे. त्याचें कुमारस्वामी यांनी “ दि मिरर ऑफ जेश्वर ” हे इंग्रजी भाषातर केलें आहे.

अलीकडे वरील ग्रंथाप्रमाणें शास्त्रीय नर्तन क्वचितच पहावयास सांपडेल. हिंदुस्थानांत नर्तन हें असभ्य गणलें जाऊं लागल्यामुळें सुशिक्षित व कुलीन समाजांतून त्यास अजीबात फाटा मिळाला व ती कला बहुतेक वेश्यांच्या हातांत गेली. कलावती या शब्दाचें मराठी रुपांतर कळवंतीण आहे. पण कळवंतीण शब्दाचा रूढार्थ वेश्या असा आहे. दक्षिणेकडे काहीं देवळांतून वर्षासनें देऊन नर्तकी ठेवलेल्या आहेत, त्यामुळें दक्षिणेंत पूर्वींच्या  पद्धतीचें नर्तन थोडया फार प्रमाणांत आढळून येतें. पाश्चात्त्य देशांत नर्तन ही कला सर्व स्त्रीपुरूषास ठाऊक असणें अवश्य समजलें जात असल्यामुळें नर्तनाबरोबर अभिनयाचीहि वाढ तितक्या स्वैर गतीनें व फार झपाट्यानें झालेली आहे व अलीकडे सिनेमामुळें तर ही कला फारच  उच्च दर्जाला पोंचली आहे, भारतीय चित्रपट पाश्चात्त्य चित्रपटांपुढें जें टाकाऊ वाटतात त्याचें मुख्य कारण अभिनयानभिज्ञता होय. तथापि महाराष्ट्रीय नाटकांतून आपणांस विशेषत: पुरूषपात्रांच्या कामांत अभिनयनैपुण्याची काहीं उदाहरणें पहावयास सांपडतात.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .