विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरगड निजामत − ( पंजाब ) पतियाळा संस्थानांतील तील निजामत किंवा जिल्हा. उ. अ. ३०° १७ ’ ते ३०° ५९ ’ व पू. रे. ७५° ३९ ’ ते ७६° ४२ ’. क्षेत्रफळ ८५८ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें तीन लक्ष सत्तर हजार. यांत तीन गांवे (वसी, पैल, सरहिद) व ६०५ खेडी आहेत. सन १९०३−०४ साली जमीनीचें एकंदर उत्पन्न नऊ पूर्णांक एक दशांश लाख रू. झालें.
यांत तीन तहशिली आहेत. त्यांची नांवे−फत्तेगड, साहिबगड अथवा पैल आणि अमरगड.
त ह शी ल : −३०°१७ ’ ते ३०° ३७ ’ उत्तर अ. व ७५°३९ ’ ते ७६° १२ ’ पूर्व रे. याचे क्षेत्रफळ ३३७ चौरस मैल. लोकसंख्या सव्वा लक्ष; खेडी. १६१ उत्पन्न (१९०३-४) ३−४ लाख रूपये.