प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अमरसिंह (१) – विक्रमादित्याच्या सभेंतील नऊ रत्नांपैकीं अमरसिंह हा एक होता. ह्युएनत्संगाच्या उल्लेखावरून या अमरसिंहाचा आश्रयदाता विक्रमादित्य, हा चंद्रगुप्त विक्रमादित्य असला पाहिजे असें दिसून येतें. सिंह या उपपदावरून हा क्षत्रिय असावा असें वाटतें, पण अमरकोशांतील पहिल्या श्लोकांत त्याचा जैनसंप्रदाय व्यक्त होतो ; कारण तें मंगलाचरण जैनसंप्रदायाला अनुसरून आहे. याचा अमरकोश सर्वश्रुत व सर्वमान्य आहे. त्याची भाषांतरें भारतीयेतर भाषांतून देखील झालेलीं आहेत. एकाक्षरनाममाला हा याचाच ग्रंथ आहे. यानें अनेक ग्रंथ लिहिले होते असें म्हणतात. पण ५ व्या शतकांत ब्राह्मणी संस्कृतीच्या अमदानींत ते नष्ट झाले. अमरसिंहाच्या कालासंबंधी एकमत नाही. त्याला कोणी पहिल्या शतकांत, कोणी चवथ्यांत, तर कोणी पांचव्यांत घालतात. रियासतकारांनी कोणत्याशा ग्रंथाच्या आधारें तो गुजराथच्या भीमदेव भोळ्याच्या (इ. स. १९७९-१२१५) दरबारी होता असे म्हटंले आहे. तथापि तो इ. स. ३७५ च्या सुमारास होऊन गेला असें पुढील पुराव्यांवरून दिसतें.

“ द्वौ द्वौ माद्यादिमासौ स्यादृतुस्तैरयनं त्रिभि : |” या अमरकोशाच्या कालवर्गांतील ओळीवरून त्या काळीं माघ महिन्यांत उत्तरायणाला  सुरूवात होत असावी. हा काळ १५ किंवा १६ शतकांपूर्वीचा आहे. अमरसिंह पाणिनीनंतरचा असावा हें त्यानें उचललेल्या पाणिनीच्या व्याकरणपद्धतीवरून व्यक्त होतें. तसेंच तो चंद्रगोमी ( ५ वें शतक )च्या पूर्वी होऊन गेला असावा.

“क्षेत्रज्ञ आत्मा पुरूष : प्रधानं प्रकृति : स्त्रियाम् |  ” (कालवर्ग) या शब्दयोजनेवरून कपिलाच्या सांख्य तत्त्वज्ञानाकडे अमरसिंहाचा बराच कल असावा असें वाटतें. ईश्वरकृष्णानें सांख्य तत्त्वांत जी सुधारणा केली ती अमरसिंहाला अवगत नसावी; कारण “अन्तराभवसत्त्वेश्वे गन्धर्वो दिव्यगायने |”
 ( नानार्थवर्ग ) यांतील अन्तराभव देहाची कल्पना ईश्वरकृष्णानें (यालाच विन्धवासी असें दुसरें नांव आहे) अमान्य केली आहे. तेव्हां अमरसिंह ईश्वरकृष्णापूर्वींचा म्हणजे ४ थ्या शतकांतला असावा असें उघड होतें ( अमरकोश पहा).

( २ ). काशीचा राहणारा ; याचें टोपण नांव  “  खुषगो  ” असें होतें. कोएल जिल्ह्यांत याला सरकारी नोकरी होती. यानें अकबराचा राजवाडा व आग्रयाचा ताजमहाल यांचा संक्षिप्त इतिहास लिहिला असून शिवाय, बहार दानिशचें पद्यांत रूपांतर केलें. या पद्याला  “तर्जुमा बहार दानिश ” म्हणतात. हा प्रबंध पलनारच्या मुल्लाझादानें लिहिलेल्या उर्दू इझारदानिशहून निराळा आहे.

(३) राठोड घराण्यांतील गजसिंह नांवाच्या जोधपूरच्या राजाचा वडील पुत्र. हा बादशाही फौजेंत नोकर होता. तो उद्दामपणें वागे. एकदां रजा घेतल्याशिवाय हा पंधरा दिवस कोठें बाहेर राहिला म्हणून बादशहानें याला दंड केला ;  व तो वसूल करण्यास सलाबतखान मीरबक्षी याला सांगितलें अमरसिंह बक्षीला आपल्या पुढें येऊं देईना, तेव्हां त्याला दरबारांत बोलावले. तेथें त्यानें शहाजहान बादशहाच्या देखत सलाबतखान मीरबक्षी याला ठार मारिलें (इ. स. १६४४). म्हणून बादशहाच्या हुकुमानें त्याचा पाठलाग करण्यांत येऊन आग्रा किल्ल्याच्या एका दरवाजांशी  झालेल्या चकमकींत तो पडला. मरतांना तो मोठ्या शौर्यानें लढला. आग्रा किल्ल्याच्या त्या दरवाजाला अद्याप ‘ अमरसिंह दरवाजा ’ असें म्हणतात. अमरसिंहाच्या तेरा बायका त्याच्या शवाबरोबर सती गेल्या [ टॉड-राजस्थान. सरदेसाई-मु.रि.बीलचा कोश].

( ४ ) पहिला ( इ. स. १५९७-१६२१ ).− हा प्रतापसिंहाचा ज्येष्ठ पुत्र असून विक्रम संवत्. १६५३ (इ. स. १५९७) मध्यें मेवाडच्या गादीवर बसला. हा आपल्या वयाच्या आठव्या वर्षापासून वडिलांच्या मृत्यूपर्यंत नेहमी वडिलांबरोबर राहिल्यामुळें त्याला संकटांचा चांगला सराव झाला होता. अमरसिंह राज्यारूढ झाल्यानंतर अकबर आठ वर्षें ह्यात होता ; परंतु यापुढें तो आपल्या हयातींत मेवाडच्या कधी वाटेस गेला नाही. इकडे अमरसिंहाने हा काळ राज्यकारभांतील निरनिराळ्या बाबीची फेरतपासणी करून त्यांची पुनर्घटना करण्यांत घालविला. त्यानें नवीन जमाबंदी केली. व सरजामांची पुन्हा वाटणी करून जहागीरदारांची कर्तव्यें ठरविलीं. त्यानें जे त्यावेळी निरनिराळ्या सरदारांचे दर्जे ठरविले ते तसेच त्याच्यापुढें चालत राहिले. त्यानें खर्चवेचादि कित्येक बाबतींत नियम ठरवून पगडी कशी बांधावयाची हें देखील ठरवून टाकलें. त्याची अमरशाही पगडी अद्याप प्रसिद्ध आहे. यांपैंकी पुष्कळ नियम देशाच्या निरनिराळ्या भागांत शिलास्तंभांवर कोरून ठेविलेले अजून दृष्टीस पडतात.

अमरसिंहास शांतता लाभल्यामुळें प्रतापसिंहानें मरतेवेळीं केलेलें भाकीत मात्र खरें ठरविण्याची वेळ आली (प्रतापसिंह पहा). त्यानें आपल्या बापाच्या मरतेवेळींच्या शब्दाकडे दुर्लक्ष करून तळ्याकांठी अमरमहाल नांवाचा एक लहानसा वांडा बांधला. जहांगिरचीं पहिली चार वर्षे  अंत:कलहांचा बंदोबस्त करण्यांत गेलीं. परंतु तें काम संपतांच त्यानें मेवाडच्या राण्यास मोंगल बादशहाचें अंकित करण्याचें आपल्या बापाच्या हातून पार न पडलेलें काम आपण स्वत: तडांस नेण्याचा निश्चय केला. मोंगलांचें सैन्य मेवाडवर चालून आलें तेव्हां ऐषआरामास लालचावलेल्या अमरसिंहास जहांगिराशीं तह करावा किंवा युद्ध करावे असा संमोह उत्पन्न झाला. बादशाही फर्मान स्वीकारून सुखानें काळ कंठावा असा सल्ला देणा-यांचीहि अमरसिंहाच्या प्रभावळींत वाण नव्हती. परंतु राण्याच्या चोंडावत कारभा-यानें प्रतापसिंहाच्या मरतेवेळच्या शब्दाची राण्यास आठवण देऊन त्याला हात देऊन गादीवरून उठविलें व ‘वीरहो, चला, रिकिबीत पाय ठेवा, व प्रतापसिंहाच्या मुलाच्या नांवास कलंक लागूं देऊं नका ’ अशी हाताखालच्या सरदारांस इषारत देऊन ताबडतोब शत्रूस तोंड देण्याची तयारी केली. राण्यास प्रथम आपल्या कारभा-याच्या वर्तनाचा राग आला; परंतु लवकरच तो भानावर आला. त्यानें आपल्या कारभा-याचे आभार मानिले व मिशास पीळ देऊन तो मोठ्या वरिश्रीनें आपल्या सरदारांसह शत्रूस तोंड देण्यास निघाला. अमरसिंह व मोंगल सैन्य यांची देवैर येथें गांठ पडली. मोंगल सैन्याचें आधिपत्य खानखानाच्या भावाकडे होतें. घांटाच्या तोंडाशी मोंगल व रजपूत यांची बराच वेळ पावेतों निकराची लढाई होऊन तींत रजपुतांनीं मोंगलांचा पराभव केला ( वि. सं. १६६४ इ. स. १६०८). या लढाईनंतर दोन्ही पक्षांत तह झाला, पण तो फार दिवस टिकला नाही. सं. १६६६ ( इं. स. १६१०) च्या वसंत ऋतूंत मोंगल व रजपूत यांच्या सैन्यांत दुसरी निकराची लढाई झाली. ही लढाई रानपूरच्या घांटांत झाली. तीत मोंगल सैन्याचें आधिपत्य अबदुल्ला नामक इसमाकडे होतें. या लढांईतहि मोंगलाचाच पराजय होऊन अबदुल्लाच्या सैन्यांतील बहुतेक लोक मारले गेलें. तथापि अमरसिंहाच्या बाजूचेहि अनेक उत्तम उत्तम वीर ह्या प्रसंगी कामास आले.

या विजयामुळें रजपूत लोकांस आनंदीआनंद झाल मेवाडचें किरमिजी निशाण पुन्हां एकवार गोदवाड प्रांतांत फडकूं लागलें. रजपुतांस एकामागून एक विजय मिळालेले पाहून त्यांच्यामध्यें फूट पाडण्याकरितां जहांगिरानें एक निराळीच युक्ति शोधून काढिली. अमरसिंहाचा चुलता सागर हा कित्येक वर्षांपूर्वी प्रतापसिंहास सोडून मोंगलास मिळाला होता. त्याला आतां जहांनिरानें मेवाडचा राजा बनवून फौज देऊन चितोडास रवाना केलें. सागर यानें सात [ ?] वर्षेपर्यंत चितोडांत अंमल केला; पण त्यास कोणीहि सरदार अनुकूल झाला नाही. सरतेशेवटी त्याचेंच मन त्यास खाऊं लागल्यामुळें तो चितोड अमरसिंहाच्या स्वाधीन करून तेथून निघून गेला. चितोडाबरोबर मेवाडांतील दुसरे ८० किल्ले राण्याच्या हाती आले.

रानपूरच्या पराभवानंतर जहांगिराने आपला   पुत्र पवीझ याच्या हाताखाली सैन्य देऊन त्यास मेवाडच्या मोहिमीवर पाठविलें. पण अमरसिंहाच्या लोकांनी या सैन्याचा  खामनोरच्या घांटांत पराजय करून त्यास अजमीरकडे पिटाळून लाविलें (इ. स. १६११). जहांगिरास हें वर्तमान समजतांच त्यानें पर्वीझ यास परत बोलावून त्याच्या जागीं मोहबतखानास बरोबर देऊन पर्वीझच्या मुलाची योजना केला. परंतु त्याचीहि पर्वीझप्रमाणेंच अवस्था होऊन तो मारला गेला. प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर अमरसिंहानें मोंगलाशी सतरा लढाया केल्या. त्या प्रत्येक लढाईत रजपुतांची कांहीनां कांही प्राणहानि होऊन त्यांची संख्या कमी कमी होत होती. उलटपक्षीं शत्रु मात्र दर वेळेस अधिकाधिक सैन्य घेऊन मेवाडांत येऊं लागला सरतेशेवटी हिजरी सन १०२२ (इ. स. १६१३) मध्यें जहांगिरानें आपला पुत्र खुर्रम उर्फ शहाजहान यास मोठ्या फौजेसह मेवाडांत पाठविलें. राणा व त्याचा पुत्र कर्ण यांनी आपल्या डोंगरांतील लोकांची जमवाजमव करण्याचा प्रयत्‍न केला. पंरतु फारच थोडे लोक त्यांच्या निशाणाखाली जमा झाले. यामुळें खुर्रम यास मेवाडांतील अनेक स्थळें एकामागून एक विशेष प्रयासावांचून काबीज करतां आली. त्यानें राण्याचे अठरा हत्ती काबीज करून ते आपल्या बापाकडे नजर म्हणून रवाना केले. वारा, ऊन, पाऊस वगैरे कशासहि न जुमानतां मोंगल सर्व प्रदेश उध्वस्त करीत चाललें. अशा स्थितींत शत्रूचा प्रतिकार करणें अश्यक्य होऊन राण्यानें जहांगिरास युद्ध बंद करण्याविषयीं विनंति केली (इ. स. १६१४). राणा शरण आल्यावर शहाजादा खुर्रम यानें त्याच्याशी फार उदारपणाचें वर्तन ठेवलें. अकबराच्या वेळेपासून जितका मुलूख जिंकून घेतलेला होता तितका सारा त्याला परत देऊन [ कर्नल म्यालेसन; गोडबोले ] त्याचा पुत्र कर्ण यास पांच हजारांची  मनसब देऊन आपल्या पदराच्या जहागिरदारांत मोठ्या पदवीस चढविलें. सामंत या नात्यानें मेवाडच्या राज्याच्या हजार लोकांच्या तुकडीनें बादशाही सैन्यांत चाकरी करावी अशी या तहांत अट होती. पण स्वत:  अमरसिंह राण्यास बादशहाच्या दरबारी हजर राहण्याचा कधींच आग्रह करण्यांत आला नाहीं. मेवाडच्या राण्याबद्दलची आदरबुद्धि व्यक्त करण्याकरितां बादशहानें पुढें राण्याचा व त्याच्या मुलाचा एक असे दोन संगमरवरी दगडाचे पूर्ण आकारचे पुतळे अजमीरहून तयार करवून आणून ते आग्रयास बागेमध्यें झरोक्याखाली ठेविले. अमरसिंहानें जहांगिराशीं तह केला खरा, परंतु आपल्या कारकीर्दीत उदेपूरच्या राजघराण्याची सर्वस्वी मानहानि झालेली पाहून त्याचें चित्त उद्विग्न झालें. सं. १६७२ (इ. स. १६१६-डौसन हा या गोष्टीचा काळ सं. १६६९ = इ.स. १६१३ देतो.) मध्यें तो आपलें सर्वस्व पुत्राच्या स्वाधीन करून उदेपूर शहराबाहेर नोचौकी वाड्यांत जो एकदांचा शिरला तो आमरण उंबरठ्याबाहेर आला नाही. येथें तो इ. स. १६२१ त मरण पावला. जहांगिरास त्याच्या निधनाची खबर १७ रबी उल्लावल = हिजरी सन १०२९ रोजीं कळली.

[ सं द र्भ ग्रं थ.−टॉडचें राजस्थान. कर्नल म्यालेसन कृत एतद्देशीश संस्थानिकांचा इतिहास].

(५) दुसरा, ( इसवी  सन  १७००-१७१६) − मेवाडचा राणा. हा जयसिंह याचा पुत्र असून त्याला वि. सं. १७५६ (इ. स. १७००) मध्यें मेवाडची गादी मिळाली. पहिल्या अमरसिंहाप्रमाणें हा देखील शूर व तडफी स्वभावाचा होता; परंतु तो गादीवर येण्यापूर्वीं त्याचें त्याच्या वडिलाशीं जें भांडण झालें त्यामुळें मेवाडचें नैतिक सामर्थ्य तितकें कमी होऊन त्याला मोंगल सत्तेच्या र्‍हासाचा पाहिजे तितका फायदा घेतां आला नाही. अवरंगजेबाच्या मुलांमध्यें आपसांत तंटे असलेले याच्या नजरेस आले तेव्हां त्यांचा फायदा घेण्यासाठीं अमरसिंहानें सिंधुनदीच्या पश्चिमेकडील प्रांतांत मोहिमीवर असलेल्या राजपुत्र मुअज्जमाशीं एक गुप्त तह केला. या तहांत ( १ ) शहाजहानाच्या कारकीर्दीतल्याप्रमाणें चितोडच्या गादीची व्यवस्था चालावी, ( २ ) गोवध बंद केला जावा, ( ३ ) शहाजहानानंतर जो प्रांत खालसा करण्यांत आला तो पुन्हां परत मिळावा, ( ४ ) अकबराच्या कारकीर्दीप्रमाणें उपासनास्वातंत्र्य असावें, ( ५ ) राण्यानें बडतर्फ केलेल्या इसमास राजानें आश्रय देऊं नये आणि ( ६ ) दक्षिणेच्या मोहिमींसाठी मेवाडांतून सैन्याची मागणी होऊं नये अशी सहा कलमें होतीं. सिंधच्या पश्चिमेकडील मोहिमींत शहाजाद्याच्या मदतीस मेवाडचें पथक गेलें असून त्यानें अनेक लढ्यांत मोठमोठे पराक्रम गाजविले होते तथापि अमरसिंहास लवकरच मोंगलाविरूद्ध शस्त्र उपसण्याचा प्रंसग आला. चंबळा नदीवरील रामपु-या-मानपु-याची जहागीर उपभोगणा-या उदेपूरच्या राजघराण्याच्या चंद्रावत नामक शाखेंतील रावगोपाळ म्हणून इसम आपलें पथक घेऊन दक्षिणच्या मोहिमेंत अवरंगजेबास मदत करीत असता त्याचा मुलगा घरीं राहून जहागिरीची व्यवस्था पहात होता. त्यानें जहागिरीचा वसूल बापाकडे न पाठवितां आपणच बळकविण्याचा उपक्रम केला. रावगोपाळानें याबद्दल अवरंगजेबाकडे तक्रार केली; परंतु त्याच्या मुलानें मुसुलामानीधर्म स्वीकारून अवरंगजेबाजी मर्जी संपादल्यामुळें  अवरंगजेबानें ह्या तक्रारीकडे लक्ष दिलें नाही. अवरंगजेबाच्या या अन्यायाच्या वर्तणुकींने रावगोपाळास राग येऊन त्यानें आपल्या मुलापासून आपली जहागीर सोडवून घेण्याचा प्रयत्‍न केला; पण त्यांत त्यास यश आलें नाही; तेव्हां रावगोपाळानें अमरसिंहाचा आश्रय घेतला; अवरंगजेबास राण्याचें हें कृत्य बंडखोरपणाचें वाटून त्यानें शहाजादा  अझिम यास राण्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठीं माळव्यांत पाठविलें. तेव्हां राण्यानेंहि आपल्याकडून लढण्याची सर्व तयारी केली व या कामी त्यास माळव्याच्या लोकांची मदत मिळाली. इतक्यांत मराठ्यांचा सरदार निमाजी शिंदे हा नर्मदा ओलांडून माळव्यांत शिरल्यामुळें ( इ.स.१७०६-०७) अवरंगजेबास शहाजादा अझिम याच्या मदतीस राजा जयसिंगाचीहि आणखी रवानगी करावी लागली.

परंतु ज्याच्या अविचारी वर्तनामुळें हें प्रकरण उपस्थित झालें तो अवरंगजेबच इ. स. १७०७ च्या आरंभास मरण पावल्याकारणानें तें पुढें विकोपास गेलें नाही. अवरंगजेबाच्या मरणानंतर शहाजादा मुअज्जम यानें काबूल मधून हिंदुस्थानांत येऊन जाजवच्या लढाईंत शहाजादा अझिम याचा पराभव केला. तेव्हा पश्चिम राजवाड्यांतील इतर संस्थानिकांप्रमाणें मेवाडचेंहि पथक त्याच्या कुमकेस होतें. मुअज्जम उर्फ शहाअलम (बहादुरशहा) यास सिंहासन मिळवून देण्याच्या कामी रजपुतानी मदत केली तरी तो बादशहा झाल्यावर मात्र त्यास रजपुतांचें सहाय्य राहिले नाही. स्वत: बहादुरशहा हा स्वभावानें पुष्कळ चांगला होता; परंतु अवरंगजेबाच्या वर्तनामुळें मुसुलमानांवरील रजतपुतांचा विश्वास इतका उडून गेला होता की, इ. स. १७०९−१० मध्यें मारवाड व अंबर येथील राजे मोंगलांच्या छावणींतून बादशहाची परवानगी न घेतांच बाहेर पडले व मेवाडच्या राण्याकडे जाऊन त्यांनीं आपल्या तिघांचा एक संघ स्थापन केला. आपल्या घराण्यांतील मुलीच्या संततीस वारस नेमण्याची अट घालून मेवाडच्या राण्यांनी इतर रजपुतांशी लग्नव्यवहार सुरू केला, तो याच प्रसंगी होय ( प्रतापसिंह पहा ). परंतु ज्येष्ठ पुत्राकडून याप्रमाणें वारसाचा हक्क काढून घेण्यात रजतपुतांची फार मोठी चूक झाली. कारण यामुळें भावाभावात तंटे उपस्थित होऊन रजतपुतांच्या खासगी कारभारांत हात घालण्याची मराठ्यांनां संधि मिळाली.

जयपूर, जोधपूर व उदेपूर येथील सैन्यांनीं एकत्र जमून शत्रूशी टक्कर देण्याचा प्रसंग प्रथमत: बहादुरशहाच्या कारकीर्दीच्या तिसर्‍या वर्षी आला. त्याचें कारण बहादुरशहानें वेडेपणानें रामपु र्‍याच्या बाटग्या जहागिरदारास मदत केली हें होय. राण्यानें हिमतसिंगाचा पक्ष घेऊन रामपु र्‍यावर स्वारी केला, परंतु रतनसिंग उर्फ राजा मुस्लिमखान यानें त्याचें कांहीं, चालू दिलें नाही. ह्या पराक्रमाबद्दल बादशहानें मुस्लिमखानाची चांगली संभावना केली. परंतू त्याच जासुदाकडून बादशहास अशी एक बातमी कळली कीं, अमरसिंहानें आपली गांवे उध्वस्त करून आपण स्वत: डोंगराचा आश्रय करण्याचें ठरविलें आहे. ही बातमी येऊन थोडे दिवस गेले न गेले तोंच राण्याचा सरदार सावलदास यानें पुरमंडळाचा सुभेदार फिरोजखान यावर हल्ला केला असून फिरोजखानाच्या सैन्याची बरीच प्राणहानि होऊन त्याला अजमीरपावेतों मागें हटत यावें लागलें अशी दुसरी बातमी बादशहाच्या कानी आली. या प्रंसगी सुप्रसिद्ध जयमल्लाचा वंशज सावळदास हा मरण पावला. अमरसिंहाने साळळादासाचा पुत्र रायसिंग यास तुमची स्वत:ची गांवे व त्याच्या आसमंतांतील  मुलूख तुम्ही बेचिराख करून टाका, तुमच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी दुसरीं गांवे देण्यांत येतील ’ असा हुकून केलेला टॉडला उदेपूर दफ्तरांत सांपडला होता. याच सुमारास जहाजाद अकबरास दक्षिणेंत सुखरूप पोंचवून येणारा शूर दुर्गादास, त्याचा धनी त्याचें संरक्षण करण्यास असमर्थ असल्यामुळें अमरसिंहाच्या आस-यास आला व अमरसिंहानेहि मोठ्या उदारपणानें रोजचे पांचशे रूपये देऊन त्यास आपल्या पदरी ठेऊन घेतलें. तथापि इ. स. १७१२ त शहा अलम बादशहास विषप्रयोग केला जाऊन त्याच्या जागी फर्रूखसेयर तख्तनशीन होईपर्यंत त्या रजतपूतसंघाच्या हातून कोणतीहि व्यक्त कामगिरी झालेली दिसली नाहीं. त्यानंतर मात्र त्यांनीं पूर्वीचा सहनशीलपणा पार झुगारून देऊन जशाच तसें म्हणूण मुसलमानानी आपल्या राज्यांतील देवळें पाडून त्यांच्या जागेवर मशिदी बांधल्या होत्या त्या जमीन दोस्त करण्याचा उपक्रम केला. राजस्थानात असा एकहि मोठा गांव नव्हता की, जेथें मुसुलमानांचे मुल्ला व काजी हे अधिकारी नव्हते. ह्या अधिका-यास आता जिकडे तिकडे अपमानकारक रीतीनें वागविण्यात येऊं लागलें. शूर राठोडांनी तर जसंवतसिंगाच्या मृत्यूनंतर एकसारखी खटपट करून सबंध मारवाडात आता औषधास देखील मोंगल राहूं दिला नव्हता. याच प्रसंगी जयपुर, जोधपूर व उदेपूर येथील राहण्याच्या फौजा साभरच्या तलावावर एकत्र जमवून त्यांनी तो तलाव ही आपली तिघांची सरहद्द ठरविली व त्या तलावाचें उत्पन्न आपसांत सारखें वाटून घेतलें.

परंतु या तीन राज्यांमधील दोस्ती फार दिवस टिकली नाही. रजतपुताचें हें बंडखोरपणाचें वर्तन पाहून सय्यद बंधूपैकी अमीर−उल−उमरा हुसेन अली हा मारवाडचा राजा अजितसिंह याजवर चालून आला. फर्रुख सेयर सय्यद बंधूंचें नियंत्रण असह्य झालें असल्यामुळें त्यानें अजितसिंगास एक गुप्त निरोप पाठवून हुसेन अलीचें पारिपत्थ करण्याविषयी इच्छा प्रदर्शित केली. पण यामुळें अजितसिंग व सय्यदबंधू यांच्यामध्यें दोस्ती होण्यास मदतच होऊन सय्यद बंधूंनी राठोडांना दिल्लीच्या राज्यकारभारांत बराचसा वांटा द्यावा व उलटपक्षी अजितसिंगानें बादशहाचें प्रभुत्व मान्य करून त्यास आपली मुलगी द्यावी असें त्या दोघांत ठरलें. त्याप्रमाणें इ. स. १७१५ च्या सप्टेंबर महिन्यांत फर्रूखसेयराचें अजितसिंगाच्या मुलीशी लग्न झालें. या लग्नानें रजपूत व मोंगल यांच्यामध्यें दिलसफाई होईल अशी जर कोणाची अटकळ असली तर ती साफ चुकीची होती. कारण लग्न होऊन थोडे दिवस झाले  नाहीत, तोंच बादशहाचा दिवाण एनायत उल्लाखान यानें हिंदूवर पुन्हां जिझिया कर बसविला. हा कर पूर्वीपेक्षां बराच सौम्य होता हें खरें.( त्याची रक्कम सालीना प्राप्तीवर पुरी पाऊण टक्का (२००० रूपयांवर १३ रूपये) देखील नसून लंगडे, आंधळे व अतिशय गरीब लोकांना तो माफ होता.) परंतु हिंदू लोकांनां ह्या कराबद्दल इतका तिटकारा उत्पन्न झाला होता की, त्याच्या पुनरूज्जीवनामुळें त्यांची मनें मुसुलमानांविरूद्ध पूर्णपणें विटून गेलीं.

मोंगलाशी सख्य करून अजितसिंगानें संघांतून आपलें अंग काढून घेंतले तरीं राणा अमरसिंह हताश झाला नाहीं. उलट स्वत: चें राज्य व त्याबरोबर सर्व रजपूत राष्ट्र स्वतंत्र करण्याचे प्रयत्‍न त्यानें दुप्पट जोरानें सुरू केले. बादशहाशीं त्यानें जो तह केला त्यावरून स्वातंत्र्याप्रीत्यर्थ त्याची कशीं धडपड चालली होती हें दिसून येतें, या तहाचें दुसरेंच कलम जिझिया कर उठवावा म्हणून होतें. या सर्व तहाचें बारकाईनें पृथक्करण केलें तर गेल्या कांही वर्षांत दोन्ही पक्षांच्या स्थितींत किती बदल झाला होता हें चांगलें ध्यानात येऊं शकतें. तहाचा मथळाच मुळीं विनंत्याची यादी असा असून त्यावरून रजपुताच्या अधिपतीवरील बादशहाचें प्रभुत्त्व व्यक्त होतें. परंतु नुसतें नाव सोडून दिलें तर आठव्या कलमाची भाषा राणा हा बादशहाचा जणूं काय रक्षणकर्तीच आहे अशी दिसून येते. आरंभीच्या कलमांत राण्यानें ७००० ची मनसब स्वीकारल्याचे वाचून दुसृ-याचें प्रभुत्व स्वीकारण्याचा प्रसंग आला असता राज्यत्याग पतकरणार्‍या थोरल्या अमरसिंहाची आठवण होते. परंतु मध्यंतरीच्या काळांत रजपूत संस्थानिकाच्या आपआपसांतील संबंधात व त्याबरोबरच लोकमतात जो फरक झाला होता तो ध्यानांत घेतला पाहिजे. ह्या अवधींत भौतिक सत्तेच्या बाबतीत दुसरी कित्येक संस्थानें मेवाडच्या बरोबरीस आली असून सर्वच संस्थानिक मोंगल बादशहाकडून मानसन्मान मिळविण्यांत भूषण मानूं लागले होते. इतर कलमांतील महत्त्वाच्या गोष्टी म्हटल्या म्हणजे जिझिया कर काढून टाकण्यांत आला, धार्मिक स्वातंत्र्य मिळालें, मेवाडच्या राज्यांतील जुनें ठाकूर व जहागिरदार पुन्हां राण्याच्या सत्तेखाली आले व मध्यंतरी हातांतून गेलेला सर्व मुलूख राण्याचा राण्यास परत मिळाला.

वरील तह हें राण्याच्या आयुष्यांतील शेवटचेंच कृत्य होतें. तो इ. स. १७१६ त मरण पावला. तो मोठा तडफदार व उदार अंत:करणाचा राणा होता अशी त्याची ख्याति आहे. त्यानें त्या वेळच्या धामधुमीच्या काळातहि आपल्या राज्याचा मोठेपणा कायम राखून तें भरभराटींस  आणिलें. त्यानें स्तंभावर जे लेख कोरवून ठेविले आहेत त्यांवरून त्यानें शेतकीस कसें प्रोत्साहन दिलें व उद्योगधंद्यांचे कसें संरक्षण केलें हें चांगले व्यक्त होतें. मेवाडच्या लोकांत त्याच्या नांवाबद्दल अद्यापहि आदर वसत आहे. त्याच्या नंतर संग्रामसिंह मेवाडचा राणा झाला. [ संदर्भग्रंथ.−टॉडचें राजस्थान.]

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .