विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरापूर (१) − रेवाकाठांतील पांडू मेहवाच्या बारीयावर्गांत हें संस्थान येतें. गोमा आणि महीनदी यांच्या संगमामुळें जो कोन तयार होतो त्यांत हें वसलें आहे. क्षेत्रफळ २ चौरस मैल.
( २ ) काठेवाडमधील एक लहान संस्थान. लोकसंख्या सुमारें दीड हजार. येथील मुसुलमान तालुकदारांनां शेट आणि मलिक म्हणतात. हे पूर्वीं राठोड रजपूत होते; परंतु धर्मांतर करून ते मुसुलमान झाले. जवळच अमरापूर नावांची ७७५ फूट उंचीची एक टेंकडी आहे.