विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरू शतक. - अमरू राजाच्या शरीरांत शंकराचार्य प्रवशिले असतां तेथें त्यांनीं कामशास्त्र विषयावर जो ग्रंथ केला, त्याचें हें नांव. या ग्रंथाला आधार वात्स्यायनाचीं सूत्रें होय. यालाच शृंगारशतक असेंहि नांव आहे. यांत शंभर पद्यखंडें आहेत. या ग्रंथाचें जर्मन व फ्रेंच भाषांतर अनुक्रमें रूकर्ट आणि अपुडी यांनीं केलेलें आहे.