विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमर्षण − इक्ष्वाकुकुलोत्पन्न रामचंद्रपुत्र कुश, त्याचा प्रपौत्र नभ याच्या वंशांत जन्मलेल्या संधि राजाचा पुत्र, याचा पुत्र महस्वान् नांवाचा राजा होता. याचा महाभारतांत उल्लेख नाहीं. भागवतांत नवमस्कंधांत ( अध्याय १२ वा ) पुढील वंशावळी दिलेली आहे. राम−कुश−अतिथि−निषध−नभ−पुंडरीक−क्षेमधन्वा−देवानीक−अनीह−पारियात्र−बल−स्थल−वज्रनाभ−खगण−विधृति−हिरण्यनाभ−पुष्प−ध्रुक्संधि−सुदर्शन−अग्निवर्ण−शीध्र−मरू−प्रसुश्रुत-संधि-अमर्षण.