विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमलापुर, ता लु का.-मद्रास इलाखा. गोदावरी जिल्ह्यांतील तालुका. १६० २५’ ते १६० ५६’ उत्तर अ. व ८१० ४३ ते ८२० २१’ पूर्व रे. यांचे दरम्यान. क्षेत्रफळ ५०६ चौरस मैल असून लोकसंख्या सुमारें दोनलक्ष ऐशीहजार आहे. या तालुक्यांत खेडीं १६९ आहेत. जमीनीचें एकंदर उत्पन्न इ. स. १९०३-०४ सालीं ९४७००० रू. होतें.
गां व.− तालुक्याचें मुख्य ठिकाण. १६० ३४’ उत्तर अक्षांश व ८२० १’ पूर्व रेखांश यांवर आहे. लोकसंख्या सुमारें दहाहजार; स्थानिक कामें पंचाइतीमार्फत चालतात.