विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमवा खास.-( संयुक्त प्रांत ) गोरखपुर जिल्ह्यांतील पद्रौना तहशिलींतील एक खेडें. २६० ५१’ उत्तर अक्षांश व ८४० १३’ पूर्व रेखांश यांवर. लोकसंख्या सुमारें नउहजार मोठ्या गंडकी नदीच्या जुन्या पात्राजवळ गोरखपूर शहराच्या पूर्वेस २८ मैलांवर हें खेडें आहे.