विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमानी गंज, हाट−( पूर्व बंगाल व असाम ) माल्दा जिल्ह्यांतील नाणावलेला रेशमाचा बाजार. येथें वस्ती नाहीं. परंतु हंगामाच्या दिवसांत मुर्शिदाबाद आणि राजशाही जिल्ह्यांतील व्यापारी रेशमाचे कोशे खरेदी करण्यास येतात. एखाद्या दिवशीं एक लाख रूपयांची देखील खरेदी होते. कोशांच्या विक्रीचा दर ठराविक असतो.