विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमाल − (मुंबई इलाखा)डांगमधील छोटें संस्थान. याचें क्षेत्रफळ २०० चौरस मैल व लोकसंख्या सुमारें ४७०० ( १८८० सालीं ) असून वार्षिक उत्पन्न ३००० रूपये आहे. याच्या उत्तरेस शेवड्याची बारी आणि जामन दगड, पूर्वेस बिलंद, राहोटे घांट, आणि दलमंदर, दक्षिणेस जामदार आणि वासुर्ण डांग, आणि पश्चिमेस पलाशविहीर आणि पिंपरी आहेत. येथील संस्थानिक भिल्ल आहे.