विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमिल नत्रायित.−(पंचिल नत्रायित)-पंचिल नत्रायित (समघटक प्राथमिक पंचिल अल्कहल) याचा नत्रायित अॅमिल (नायट्राइट) क५ उ११. प्रनप्र. हा रसरूप पदार्थ आहे. नत्रसाम्लाच्या वाफे ( नायट्रस फ्यूम्स ) ची क्रिया पंचिल अल्क हलावर (समघटक प्राथमिक पांचल अल्कहल ) केली म्हणजे हा पदार्थ तयार होतो. यासाठीं नत्रसाम्लाची वाफ करण्याची ती पिष्ठसत्वावर ( स्टार्च ) नत्राम्लाची क्रिया करून करावी. किंवा २६ भाग पालाश नत्रायित १५ भाग पाण्यांत विद्रुत करून ३० भाग पंचिल अल्कहलांत घालावें. या मिश्रणांत ३० भाग गंधकाम्ल ओतून या सर्वांचें पातन (डिस्टिलेशन) करावें. पंचिल नत्रायित पिंवळ्या रंगाचा रस असून त्याचें वि. गु. ०.८७७ असतें. याचा उत्क्वथनांक ९५०-९६० असतो. यास फार चमत्कारिक वास येतो आणि याची वाफ हुंगल्यानें किंवा श्वासाबरोबर घेतल्यानें रक्तवाहिन्या फुगतात. व आंखडलेले स्नायू शिथिल होतात. पंचिल नत्रायित अविद्राव्य असतो परंतु अल्कहल इथ्र स्फटिकित दार्वम्ल (ग्लेशिअल असेटिक अॅसिड) हरपुत्तिक आणि उदिन यांत सहज विद्राव्य आहे. याची वाफ उष्ण केल्यावर बार होतो. मथिल. अल्कहलाबरोबर उष्ण केल्यास मथिल नत्रायित ( मेथिनायट्राइट ) व पंचिल अल्कहल होतो. नवजात उज्जाची क्रिया त्यावर झाली म्हणजे अम्न (अमोनिया) व समघटक पंचिल अल्कहल तयार होतो. दाहक सिंधु अगर पालाशनें त्यावर उदक प्रक्रिया केली म्हणजे सिंधु नत्रायित व पंचिल अल्कहल होतात. वितळलेल्या दाहक पालाशवर (फ्यूज्ड कॉस्टिक पोट्याश) रसरूप पांचल नत्रायित (लिक्विड) टाकलें असतां त्याचें पालाश बलकित (पोट्याशिअम व्हॅलरेट ) होतें. पंचिल नत्रायिताचा उपयोग औषधात होतो. जहाज लागणें वगैरे समुद्रातील पर्यटनामुळें उद्भवणार्या आजारावर हा उत्तम उपाय असून हरपुत्तिक (क्लोरोफॉर्मच्या) वाफेच्या विषारी परिणामावर व हृदयविकृतीच्या (हार्टडिसईज) काहीं प्रकारावर हा उत्तम उपाय आहे. पंचिल नत्रायिताचा महत्त्वाचा उपयोग म्हटला म्हणजे निर्जल द्विअजीविक्षार (डायअझोनियम) सॉल्स्ट तयार करण्याकडे होतो.